तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?

Submitted by चामुंडराय on 14 August, 2020 - 11:26

तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता?

माबो वर "तुम्ही दारू कशी पिता?" हा धागा आहे. त्या धाग्यावर समस्त तळीराम मंडळी व्यक्त होत असतात. वारुणीचे विविध प्रकार, तिचे इतर पेयांबरोबरीचे असंख्य कॉकटेल्स, एकदम एक्झ्हॉटीक पर्म्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स अशी माहिती तेथे उपलब्ध आहे. दारूचे गुणगान करणारे, वाऱ्यावरती घेत लकेरी मदिरानंदी टाळी लागणारे अनेक प्रतिसाद आहेत परंतु जे लोक दारूला वर्ज्य मानतात, दारू पासून सोशल डिस्टन्स राखतात अश्या मिल्क टोटलर, टी टोटलर किंवा कॉफी टोटलर लोकांना त्या धाग्यावर सांगण्यासारखे फारसे काही नसल्याने ते त्या धाग्यावरून आपसूकच "कटाप" होतात व त्यांची कुचंबणा होते असे अस्मादिकांच्या निदर्शनास आले आहे.

अशा लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळावी, आपल्या आवडत्या अमादक परंतु शक्ती आणि स्फूर्तिदायक पेय्यांबद्दल लिहिण्याची संधी मिळावी केवळ ह्याच कारणासाठी ह्या धाग्याचे प्रयोजन. खरंतर "दूचकॉ" ह्या पेय्यांना दारू सारखे स्थळ, वेळ, काळ ह्यांचे बंधन नाही, दारू सारखी सामाजिक काळिमा किंवा लांच्छन (म्हणजे मराठीत सोशल स्टीग्मा) नाही त्यामुळे दुचकॉ प्राशन करणाऱ्या लोकांची संख्या दारू झोकणाऱ्यांपेक्षा जास्त असली तरी दारू पिणारे देखील दारू व्यतिरिक्त वरील पैकी एखादे तरी पेय्य पिणारे असतातच त्यामुळे तळीराम मंडळींना देखील इथे लिहिण्याची संधी आहे.

ढोबळमानाने दूचकॉ अशी विभागणी केली असली तरी ह्या व्यतिरिक्त तुमच्या आवडत्या ताक, लस्सी, कोकम, सोलकढी, लिंबूसरबतापासून ते मोहितों ची व्हर्जिन मेरी पर्यंत इतर पेय्यांबद्दल लिहिण्यास काहीच हरकत नाही.

दूध (एक पूर्णान्न):
आपण दूध कसे पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
ब्रँडेड की गवळ्याचे
धारोष्ण, थंडगार की गरम
गोड की अगोड
मसाला दुध (बासुंदी)
सायी सकट की सान्स साय
दूध व्युत्पन्न इतर पदार्थ (दही, लोणी तुपापासून मिठायांपर्यंत)

चहा (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द आम आदमी):
आपण चहा कसा पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
पावडरचा की टी बॅग्ज
पूर्णतः दुधाचा की सान्स दूध
अगोड की अतिगोड
अतिगरम म्हणजे अक्षरशः उकळता, कोमट की कोल्ड
मसालेदार काढा की फक्त स्वाद असलेले पाणचट फुळकवणी
ब्रँडेड की फक्कीवाला
ब्लॅक, ग्रीन की इतर

कॉफी (द फेव्हरिट ड्रिंक ऑफ द सिव्हिलाईझ्ड वर्ल्ड):
आपण कॉफी कशी पिता? काही पर्याय पुढील प्रमाणे -
उकळून की ब्रू करून
इन्स्टंट, फिल्टर की वड्याची
तयार पावडरची की नुकत्याच दळलेल्या बियांची
पूर्णतः दुधाची की काळी
ब्लॅक, लाटे, कॅपच्यूनो की एस्प्रेसो
कुठले बीन्स वापरता

कोको - चॉकलेट पेय्यांची खरंतर आणखी एक विभागणी होऊ शकते. त्याबद्दल लिहिण्यास हरकत नाही.

मद्यपींच्या मद्य बाटल्यांचे, चषकांचे विविध मनोवेधक आणि उत्तेजक आकार असतात. घरातील छोट्या मोठया बार मध्ये स्टॉक असतो, विविध उपकरणे असतात त्या तुलनेत तुम्ही दुचकॉ कसे पिता? साधी कप-बशी, मग, टम्ब्लर, स्टीलच्या किंवा काचेच्या पेल्यातून की आणखी काही (उदा. पितळी). तुमच्या कडे चहा, कॉफी करण्यासाठी आणि पिण्यासाठी काय काय साहित्य आहे?

मद्यपींसाठी मद्य पिताना खाण्यासाठी काँडिमेंट्स (मराठीत चखना) म्हणजे साध्या पापड, शेंगदाण्यापासून काजू, चिकन पर्यंत पर्याय असतात त्याप्रमाणे दुचकॉ बरोबर खाण्यासाठी खारी, बिस्किटे, पावापासून पोळी, भजी, चिवड्यापर्यंत वेगवेगळे पदार्थ असतात, त्यापैकी तुम्हाला काय आवडते?

मद्यपी मंडळी मद्याबद्दल मोठ्या कौतुकाने बोलत असतात आणि अमद्यपींना "हाय कम्बख्त, तू ने .....' वगैरे वगैरे हिनवत असतात तेव्हा दुचकॉपींनी कमीतकमी दुचकॉ बद्दल अभिमानाने बोलायला काय हरकत आहे?

एक गरम चाइ की प्याली हो
कोई उसको पिलाने वाली हो ...

पुढे तुमची "कल्पना"शक्ती हो !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण एखाद्या निष्पाप प्राण्याला मारून खाण्यापेक्षा दुध पिणे/ unfertilized अंडी खाणे परवडले.

Yes, humans for there needs and luxuries they made there own laws even if u are cutting any fruit or vegetable from tree, tree is undergoing a pain and we cannot hear their screams. आणि ती जीवहिंसाच आहे.
( इंग्रजी साठी क्षमस्व,मराठीत सुचत नाही )

unfertilized and fertilized egg बद्दल वाचावे >>> हे आज मला ३० वर्षांत पहिल्यांदा माहिती पडले. शाकाहारी कुटुंबात वाढल्याने अंड्याचा कधी संबंध आला नाही. कोंबडी अंडी घालते आणि ते उबवल्यावर पिल्लं बाहेर येतात एवढंच माहितेय. ही नवीन माहिती कळाल्याने म्हणा किंवा माझ्या याबाबतच्या अज्ञानामुळे म्हणा मला आत्ता धक्काच बसलाय Uhoh

नवीन Submitted by mrunali.samad on 15 August, 2020 - 17:21 >>> तुमचं बरोबर आहे पण काही दुसरा पर्याय आहे का याला ? हवा खाऊन जगायचं का?
प्राणी-पक्षी कापून खाणे आणि भाज्या-फळे कापून खाणे या दोन्ही गोष्टी सारख्या पातळीवरच्या हिंसा मानत असाल तर माझं काही म्हणणं नाही.

चहा आणि कॉफ़ी व्हेगन लोकांना चालते की
दूध घालायाच नाही >>>. गाय म्हशीचं दूध चालत नाही. पण काही व्हेगन्स काळा चहा नको असेल तर नारळाचं दूध, सोया मिल्क किंवा बदामाचे दूध वापरतात.

अरे शाकाहार की मांसाहार हा वाद आणु नका परत.
चाचाचो झालेला विषय आहे तो.

तुम्हाला वाटत असले तरी तुम्ही नविन कुठलेच आर्गुमेंट आणु शकत नाही.
सगळी आर्गुमेंट्स बहुतेकांना माहित आहेत, इतका चाचाचो झालाय त्याचा.

लोकहो अन्न हे अन्नच असते जे कुठल्याही सजीवाला वाढीसाठी गरजेचे असते. मग त्याचे स्वरुप काहीही असो.
शाकाहर मांसाहार हे मनुष्याच्या बुद्धीतून निघाले आहे.
ईतर मिश्राहारी प्राणी असा बुद्धीभेद करणारा विचार करत नसतील.
त्यामुळे तुम्हीही धागा भरकटू देऊ नका
दूध कसे पिता तेच लिहा Happy

बाकी वरची चर्चा वाचून आठवले. दूधात अंडे फेटूनही छान लागते. अर्थात कच्चे अंडे सर्वांनाच झेपत नाही.

तुम्ही दूध/चहा/कॉफी कसे/कसा/कशी पिता? >>>>
चहा/कॉफी गरम असताना कपात टाकून पितो.
दुध जिम मारल्यावर ब्लेंडरमध्ये प्रोटीन पावडर आणी अजून बाकी मटेरिअल टाकून स्मूदी बनवून पितो

तुमचं बरोबर आहे पण काही दुसरा पर्याय आहे का याला ? हवा खाऊन जगायचं का?

We have to eat whatever we need to stay healthy, then on what basis veg, non veg and vegan classified?
is it a man made classification for their own benefits to differ from others.

कशाच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केले जाते??
जीवहिंसा, जीवजन्य (वनस्पती/प्राणी)

दूध मी सहसा गार, काहीही न घालता प्यायचो. मग हिवाळ्यात त्यात पाव चमचा पिपली टाकून प्यायचो.
सध्या लॅक्टोज असहिष्णुतेमुळे दूध बंद, ताक पितो / दही खातो.

पहिल्या पानावर कोणीतरी लिहिलंय तसं मला तर दहावीपर्यंत ग्लासभर दुधात 2 चमचे चहा मिळायचा, त्याचंही अप्रूप असायचं. नन्तर हवा तसा चहा करून प्यायला लागले. थोडासा गवतीचहा आणि चेचलेलं आलं घालून 40 टक्के दूध 60 टक्के पाणी घालून उकळलेला आवडतो. मध्यंतरी तांबे सांगतात तसा करून बघितला पण 2 दिवसांवर तो पिऊ नाही शकले.

लोकहो अन्न हे अन्नच असते जे कुठल्याही सजीवाला वाढीसाठी गरजेचे असते. मग त्याचे स्वरुप काहीही असो.
शाकाहर मांसाहार हे मनुष्याच्या बुद्धीतून निघाले आहे.
ईतर मिश्राहारी प्राणी असा बुद्धीभेद करणारा विचार करत नसतील.

ऋन्मेष , मला पण इतकंच म्हणायचं होतं

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

धागा भरकटवल्याबद्दल क्षमस्व.

मृणाली... धागा हायजॅक करायची तुमची पद्धत ओळखीची वाटतेय... तुमच्या मायबोलीच्या वयाच्या मानाने लवकर जमायला लागलेय ...
कौतुक आहे ....

आणि माझे मत पण तेच.. शाकाहार मांसाहार वगैरे सगळे सेमच... प्रत्येक प्राणी दुसऱ्याला मारूनच जगतो... मग तुम्ही वनस्पती मारा नाहीतर प्राणी...
पण प्रत्येकाला चॉईस असतो आणि आपण तो रिस्पेक्ट केला पाहिजे...
एखादा अंडे खात नाही तो त्याचा चॉईस...उगाच वाद घालू नये...
उद्या आपल्याला कोणी दुसऱ्या एखाद्या पक्षाचे अनफर्टिलाईझ अंडे उदाहरण - कावळा, चिमणी.. खा म्हटले तर आपण खाणार का?
सेम गोस विथ मीट.. इथे चिकन मटण खाणारे... बेडूक किंवा इतर प्राणी खायला तयार होतील का जसे ईस्ट आशिया मध्ये खातात?

मृणाली... धागा हायजॅक करायची तुमची पद्धत ओळखीची वाटतेय...

नाही हो, मी दोन वर्षांपासून आहे माबोवर पण read-only होते. पण अगदी सगळं वाचायचे.. प्रतिसाद द्यायला इतक्यात सुरुवात केलीये. माझा एकमेव ,एकुलता एक आयडी आहे हा.

स्वागत आहे... मला विषयांतर करणारे फार आवडतात कारण मी स्वतः विषयांतर करतो...
तो एक खडा मारला होता... गम्मत म्हणून Happy

मृणाली तुम्ही एकदा गुगल वर खलबच्या बद्दल वाचा
निष्पाप म्हणवले जाणारे दूध पितानाही त्रास होईल

आशुचँप , खलब म्हणजे???

नवीन Submitted by च्रप्स on 15 August, 2020 - 18:23>>>
च्रप्स बरोबर. पण पृथ्वी टिकवण्यासाठी (अमुक आहार चांगला, तमुक वाईट म्हणुन नव्हे) येत्या काळात माणसाला मांसाहारावर आवर घालावा लागेल. पृथ्वीवर होणाऱ्या शेतीसाठी लागणाऱ्या जमिनीपैकी फक्त २५% ही धान्य, फळे, भाजी करता आणि उर्वरीत मांसाहार, दूध दुभते यासाठी प्राणी आणि प्राण्यांच्या चाऱ्याकरता वापरली जाते. हे प्राणी खूप मोठ्या प्रमाणावर मिथेन वायु सोडतात.
या करता जिज्ञासा यांचे लेख वाचा.

पण पृथ्वी टिकवण्यासाठी (अमुक आहार चांगला, तमुक वाईट म्हणुन नव्हे) येत्या काळात माणसाला मांसाहारावर आवर घालावा लागेल. पृथ्वीवर होणाऱ्या शेतीसाठी लागणाऱ्या जमिनीपैकी फक्त २५% ही धान्य, फळे, भाजी करता आणि उर्वरीत मांसाहार, दूध दुभते यासाठी प्राणी आणि प्राण्यांच्या चाऱ्याकरता वापरली जाते. हे प्राणी खूप मोठ्या प्रमाणावर मिथेन वायु सोडतात.
>>
यात red meat चा वाटा सिंहाचा आहे. ते पुर्ण बंद केले तरी आमची मासेखाऊंची काही तक्रार नाही.

धागा आवडला.
बारीक सारीक गोष्टींचा विचार करून उत्तम मांडणी केली आहे.

चहा:
आलं, साखर आणि चहा पावडर उकळून किंचित राहील इतकंच पाणी, घट्ट दूध (म्हशीचं) असलेला चहा आवडतो. बाहेरगावी असताना अशा पद्धतीचा चहा मिळत नसेल.कुठे तर नसला तरी चालतो.
वेलची, इ. मसाले ऑप्शनल.
टपरी वरचा अमृततुल्य चहा आवडतो.
इराण्याचा अजिबात आवडत नाही. बकवास एकदम.

कॉफी
कधीतरी हुक्की असेल तर.
कधी रात्री उशिरापर्यंत काम करत असेल तर गरम पाणी घालून 30 सेकंदात तयार होणारी कॉफी आवडते.
मी ऑफिस च्या लॉकर मध्ये नेहमी दोन तीन डबे ठेवतो त्याचे.
मिल्क पा. साखर, कॉफी सगळं प्रमाणात मिक्स असलेली पूड असते त्यात.

मागे वर्षापूर्वी कूर्ग ला गेलो होतो. तळकावेरी कॉफी वर्क्स मधून घेतलेली कॉफी पावडर अजून 90टक्यांपेक्षा जास्त शिल्लक आहे. क्वालिटी छान आहे.

दूध
हळद दूध जेंव्हा औषधी गुणधर्मामुळे घेतले जाते तेवढ्यापुरते च.

इतर
ताक खूप आवडते. खास करून उन्हाळा असेल तेंव्हा.
दूध, दही आणि आंब्याचा रस घालून फेटलेली मँगो लस्सी
---
https://www.practo.com/healthfeed/amp/vegetarian-v-s-whether-human-being...

ह्या धाग्यातली बरीच कारणे मला तर्कसंगत वाटली की मानव हा निसर्गतः शाकाहारी आहे.

बाकी प्रत्येकाला त्याची आवडनिवड.

माबो प्रिय जन हो शाकाहारी, मांसाहारी, व्हीगन, किटो हा वाद बाजूला राहू देत. पृथ्वी वरचे जीवन हे ऊर्जा व्यवस्थापन (एनर्जी मॅनेजमेंट) आहे. आपण फक्त आणि फक्त "सूर्य" खातो हे लक्षात घ्या. जीओ जीवस्य भोजनम् ह्या न्यायाने पृथ्वी वरचा जीव वेगवेगळ्या प्रकारचे सूर्य खातो.
असो.

चर्चा मार्गी लावूयात.

तुमच्या पैकी कोणा भाग्यवंतास जपानी चहापान समारंभाचा (Japanese Tea Ceremony - sadō/chadō ) याची देही याची डोळा फर्स्ट हँड (की फर्स्ट माऊथ म्हणावे बरें?) अनुभव आहे का?
असल्यास दुधाची तहान ताकावर (आणि आमच्या मद्य प्रेमी मित्रांसाठी शँम्पेनची तहान वाईन वर) ह्या न्यायाने तो अनुभव वाचायला आवडेल.

मी सोफ्यावर बसून आईला आरोळी मारून चहा मागवतो. गार झाला तर परत गरम करून मागत असतो. गार चहा चालत नाही मला

आपण फक्त आणि फक्त "सूर्य" खातो हे लक्षात घ्या
>>>
थोडक्यात आपल्यात आणि कोई मिल गया मधील जादूमध्ये तत्वत: काही फरक नाही.

मी सोफ्यावर बसून आईला आरोळी मारून चहा मागवतो. गार झाला तर परत गरम करून मागत असतो. गार चहा चालत नाही मला
>>> बबड्या Happy

एक अवांतर प्रश्नः
साळसुदपणा निष्पापपणाचा आव आणुन येड घेऊन पेडगावला जाणे व ईतरांना त्रास देणे हे जादुच्या तत्वामधे बसत होते का?

प्राणी-पक्षी कापून खाणे आणि भाज्या-फळे कापून खाणे या दोन्ही गोष्टी सारख्या पातळीवरच्या हिंसा मानत असाल तर माझं काही म्हणणं नाही.
>>>>>>

त्यातही बोकड बकरया गाई म्हशी गेला बाजार कोंबड्या मारणे जशी हिंसा समजली जाते तसे मुंग्यांना चिरडण्यात वा झुरळांना मारण्यात वा पालीची शेपटी तोडण्यात तितके क्रौर्य समजले जात नाही. काळवीट वा वाघ मारणे तर कायद्याने गुन्हाच ठरतो. थोडक्यात प्राणीमात्रांमध्येही आपण साईजनुसार भेद करतो Happy

असो,

जनावरांमध्ये कोणी चहा पिते का?
आमच्या जुन्या बिल्डींगमध्ये एक बोका होता त्याला चहा आणि चिकन मंचाऊ सूप फार आवडीचे होते. एवढे लाड दुसरया कुठल्या बोक्याचे आजवर पाहिले नाहीत. एका बाजूला कोंबड्यांना सप्पासप कापून रप्पारप खाणारा माणूस दुसरीकडे बोक्यला ईतका जीव लावतो Happy

Pages