बासुरीवाला

Submitted by जाई. on 13 August, 2020 - 03:39

"यशोमती मैया से पुछे नंदलाला , राधा क्यो गोरी मैं क्यू काला "

आज इतक्या दिवसांत बासुरीवर हे सूर ऐकले. करोनापूर्व काळात एक बासुरीवाला रोज बासुरीवर वेगवेगळी गाणी वाजवत सकाळी रस्त्यावर फेरफटका मारायचा. ऑफिसच्या आवराआवरीची वेळ आणि त्याची यायची वेळ जवळपास सारखीच असायची. आणि गाण्यातही व्हरायटी ! कधी परदेसी परदेसी जाना नहीं तर कधी अजीब दास्ता है ये . माझं घर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असल्याने त्याचा चेहरा कधी दिसला नाही पण सूर मात्र कानावर जरूर पडत.

नंतर लॉकडाऊन आला . वर्क फ्रॉम होम कधीही केव्हाही सुरू झालं आणि वेळाच बदलून गेल्या. त्याचबरोबरीने त्या वेळेना असलेलं सिंक्रोनायझेशन पण हरवलं . गेल्या 3 ते 4 महिन्यात एकदाही बासुरीचे सूर ऐकायला मिळाले नाहीत . लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या उत्साहात , नंतरच्या कंटाळ्यात , त्याही नंतरच्या वैतागात आपण हे सिंक्रोनायझेशन मिस करतोय हे लक्षातच आलं नाही. कळत नकळतपणे माणसं , भवताल कुठे कशी जोडल जात हे विसरूनच जायला झालं. कुठेतरी काही हरवूनच गेलं.

करोनाने हे सगळं हिरावून घेतलं म्हणायचं तर करोनापूर्व काळात आपण ह्या गोष्टीला तितक कधी महत्व दिले होते का हा प्रश्नही पडला. करोनाने हे सगळं बंद झालं की आपल्याला ह्या म्हटलं तर लहान असलेल्या गोष्टीची किंमत दाखवून दिली असा पेच पडलाय आता. किती सहजपणे आपण गोष्टी गृहीत धरतोय हे ही नीटच कळत गेलं.

आज इतक्या दिवसांत तो बासुरीवाला पुन्हा आला . त्याचे सूर आजही तसेच परफेक्ट होते. पण आज त्या सुरांनी हे संकट टळेल , कुठंतरी हे सगळं पुन्हा नीट चालू होईल , फिर वो सुबह आयेगी असा विश्वास वाटला आणि बरच वाटलं .

त्या बासुरीवाल्याला मी कधी पाहिलेलं नाही . पण त्याचे सूर ओळखीचे आहेत. उद्या परवा परत आला की धावत जाऊन एक छोटी का होईना बासुरी विकत घेईन . वेडगळपणाच वाटलं तर असू दे पण बाहेरचा आणि आतील भवताल जिवंत ठेवायला हे गरजेचं आहे हे मात्र नक्कीच .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भावना पोचल्या. छान उदाहरण आहे.
>>>>पण बाहेरचा आणि आतील भवताल जिवंत ठेवायला हे गरजेचं आहे हे मात्र नक्कीच .>>>
मस्त!!

भावना पोचल्या. छान उदाहरण आहे.
>>>>पण बाहेरचा आणि आतील भवताल जिवंत ठेवायला हे गरजेचं आहे हे मात्र नक्कीच .>>>
मस्त!!

लेख आवडला.
बोकलत छान वाजवलीत हो, ही माझी आवडती ट्युन आहे. सध्या शंकर टकरची क्लँरिनेट खूप ऐकते. Newly found music love !!.धन्यवाद जाई.

हे बघू शकता जाई.
He learned in India and US. So best of both the world's.
हे फ्युजन Moments and Centres with shankar Tucker.
https://youtu.be/od5gvwQRl-Y
देवोकेदेव महादेव मधले...
https://youtu.be/0_w4-1MX2f0
शंकर महादेवन आणि शंकर टकर जुगलबंदी....
https://youtu.be/UV1XXjf7W0o
चल चल सखी
https://youtu.be/HiA_zU_NP94
यात एक तुकडा अप्रतिम आहे.
तुम्हाला आवडले तर श्रुती box channel बघु शकता आणि माटीबानी पण. पंजाबी गाण्यांच्या भडिमारात फारच सुखद वाटतो हा बदल. मी तर फारच वेडी झाले आहे या आणि सगळ्याच माटीबानी ग्रुपची, आशा आहे तुम्हालाही आवडेल. Happy
Take care. Enjoy.