Submitted by किमयागार on 9 August, 2020 - 05:13
मी मलाच शोधत फिरलो वनवास मलाही घडले
अस्तित्व टिकावे माझे इतकेच श्वास बघ उरले.
बगळ्याने गौरव केला आकाश ठेंगणे दिसले
गरुडाशी घेता पंगा मज रूप नभाचे कळले.
बहुतेक आज काटेरी शब्दांनी किमया केली
मुखवटे फेकुनी सारे हृदयात दुःख अवतरले.
मी काय तुला सांगावी वेदना उरी दडलेली
तू असा कसा मनकवडा?मन तुझ्याकडे अवघडले?
ती जादू कसली केली स्वप्नांनी माझ्यावरती?
आश्वस्त भावना झाल्या भासांशी नाते जडले.
---------© मयुरेश परांजपे(किमयागार)---------
०९/०८/२०२०
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ती जादू कसली केली स्वप्नांनी
ती जादू कसली केली स्वप्नांनी माझ्यावरती?
आश्वस्त भावना झाल्या भासांशी नाते जडले...... मस्त...
धन्यवाद chasmish
धन्यवाद chasmish
>>>>>>> बगळ्याने गौरव केला
>>>>>>> बगळ्याने गौरव केला आकाश ठेंगणे दिसले
गरुडाशी घेता पंगा मज रूप नभाचे कळले.
बहुतेक आज काटेरी शब्दांनी किमया केली
मुखवटे फेकुनी सारे हृदयात दुःख अवतरले.>>>>>>
वाह वाह!! फार सुंदर, अर्थवाही.
वाह
वाह
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
धन्यवाद तो मी नव्हेच
धन्यवाद तो मी नव्हेच
खूप सुंदर शब्दांची रचना..
खूप सुंदर शब्दांची रचना..
धन्यवाद रूपाली विशे - पाटील
धन्यवाद रूपाली विशे - पाटील madam