शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डबोले
समास
असे घेता येईल
पण कुमार सरांनी याला चूक/बरोबर काहीच सिग्नल दिला नाही ---
फसवणूक
भुरळ
बाकीच्या शब्दांच्या अर्थावरून काढलेत

डबोले
समास
बरोबर !
आता मूळ फक्त सांगा !

मान्य झालेली उत्तरे ---
* दोन अक्षरी ३ शब्द. ( माया, दया , भ्रम )
* तीन अक्षरी ६ ( कपट, अविद्या , करुणा, डबोले , समास , भुरळ)
* पाच अक्षरी २. (सृष्टीप्रपंच, फसवणूक )

आता मूळ फक्त सांगा ! >>>> किती अक्षरी ते देणार का आमचे आम्हीच ठरवू? १०-१२ अक्षरे वगैरे??
? प्रकृती / प्रतीसृष्टी / मायाप्रपंच ?

तुम्हाला अकरा शब्द तयार करायचे आहेत. त्यापैकी एक मूळ शब्द असून बाकीचे दहा त्याचेच शब्दकोशातील अर्थ आहेत.

सर्वजण छान !
देवकी यांच्या सूचनेचे पालन केले आहे Bw

यावेळचे शब्दकोशातले असूनही कठीण नाही गेले. मस्त होते.
@ भरत त्या ब्रँडवाल्या चित्राचे उत्तर मिळाले का? निदान संख्या तरी ?

छापील शब्दकोश चाळत बसणे ही एक मजा असते. त्यातूनच असे काही हाती लागते. जेव्हा त्यातील ‘माया’वर नजर पडली तेव्हा इतके अर्थ पाहून एकदम चकितच झालो.
आणि त्यातूनच या कोड्याचा जन्म झाला.

जरूर ! किती सालचा मिळाला ते नंतर सांगा.
................................................

एका शब्दाचे अनेक अर्थ हा कुतूहलाचा विषय असतो. २० वर्षांपूर्वी मी एका मध्यम आकाराच्या ‘ऑक्सफर्ड’च्या प्रस्तावनेत वाचले होते, की set या शब्दाचे तब्बल 156 अर्थ आहेत. त्यांचा हा शब्द तेव्हा या बाबतीत प्रथम क्रमांकावर होता.

ते अर्थ एकदा डोळ्याने बघायची उत्सुकता होती. तेव्हा तसा छापीलचाच जमाना होता. एकदा एका ग्रंथालयात बृहद अर्थात महाऑक्सफर्डचे बावीस खंड ओळीने मांडून ठेवलेले पाहिले. मग अधाशासारखा S मध्ये गेलो आणि सेट च्या अनेक पानांवरून नजर फिरवली.

छान होते कोडे.
माया वरून आतड्याची माया आणि मायावी राक्षस पण आठवले.

कमर्शियल ब्रेक इतकं लहान कोडं.

ही प्रसिद्ध मराठी गायिका मराठीत येण्यापूर्वी हिंदीत प्रसिद्ध होती.

नाही. तुम्ही या बाई "या ही कविता" ऐकलीय का? ती साधना सरगमने गायलीय.

खूप मागे जावं लागेल.
मराठीत एका विशिष्ट प्रकारच्या गीतांसाठी ही गायिका ओळखली जाते.

Pages