मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
अगदी हेच म्हणणार होते ,
अगदी हेच म्हणणार होते , कानवले ऐकून आहे.
करंजीचा भाऊ
करंजीचा भाऊ
मुरड बद्दल लिहितो नंतर
कानवला-कान्होला-पु. कांठाला
कानवला-कान्होला-पु. कांठाला मुरड घातलेला कान- वला. (मुलगा, मुलगी परगांवास निघाली असतां त्यांनीं लवकर परत यावें म्हणून जातांना त्यांच्या जेवणांत मुरडकानवला देण्याची चाल असे त्यावरून). ॰कानवला खाणें-परगांवाहून लवकर परत येणें.
धन्यवाद
धन्यवाद
आई मला नेहमी देते निघताना पण नुसतीच मुरड म्हणतो.
लेकीन मुरडी सारखे लवकर मुरडून यावे म्हणून !!
खरंच गोड शब्द आणि त्या मागची कल्पनाही गोड
+१
+१
कानवला करताना गूळ किंवा साखर असे दोन्ही पर्याय असतात .
तुमचा अनुभव काय आहे दोन्हीबद्दल ?
कानवला म्हणजे करंजीच ना?
कानवला म्हणजे करंजीच ना?
आमच्याकडे साखरेचीच करतात, पण मला गुळाची जास्त आवडते. मोदक, पुरणपोळी, अनारसे, सातूचे लाडू, पोळीचे लाडू, कलाकंद बहुतेक पदार्थ मला गुळाचे जास्त आवडतात.
कानवला म्हणजे करंजीच ना >>>
कानवला म्हणजे करंजीच ना >>>
सामान्य अर्थाने होय.
शब्द्कोशानुसार का = हारोळी
बारकावे कोण सांगेल ?
ओल्या नारळाची करंजी गुळाची.
ओल्या नारळाची करंजी गुळाची. पण रव्याचं सारण असलेली साखरेची.
विदर्भात ओल्या नारळाची सुद्धा
विदर्भात ओल्या नारळाची सुद्धा साखरेची करतात.
आणि पुरणपोळी तर साखरेचीच करतात. आमच्या घरी गुळाची व्हायची त्याला लोक हसायचे गावी, म्हणायचे सणासुदीला साखर घेण्या एवढेही पैसे नाहीत का, एवढी काय कंजूषी करता.
मला तर गोड आवडतं. अनुभव
मला तर गोड आवडतं. अनुभव वगैरे विचार करे पर्यंत फस्त होते . मराठवाड्यात पण साखरेचीच करतात बहुतकरून.
करंजीचा भाऊ मोदक मानतात त्यामुळे आई एक मोदक तरी करते /देते. मोदक करताना एक तरी करंजी करतेच. मी पण ती परंपरा पाळते. बहीणीला भाऊ आणि भावाला बहीण म्हणून. काय योग्य दिवशी चर्चा होते आहे.
राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा सर्वांना.
अवांतर --- @ देवकी, भरत
अवांतर --- @ देवकी, भरत
WordHippo वर मुस्तकबा / बिल = future, outlook, recipient, futurity, aftertime असे दिलेय.
http://sites.middlebury.edu/arabiclinguistics/files/2012/03/arabic_word_...
इथे --- काळ, लिंग, वचन, नाम, क्रियापद यानुसार शब्दरचना बदलण्याचे अरेबिक व्याकरण नियम दिलेत + उदाहरणे.
book = किताब तर books = कुतुब
maktab = office desk तर maktaba = library
थोडक्यात अरेबिक उर्दू उगमाचे शब्द + मराठीकरण, उच्चाराच्या लिखीत स्वरूपावरून न बघता, त्यातील अरेबिक छटेसहच लक्षात घ्यावे लागेल.
मुस्तकबाल / बल / बील / बिल ---- हे चार वेगळे आयटेम पण असू शकतील.
यापेक्षा जास्त मलाही क्लिअर झालेले नाही.
जेवणातील काही पदार्थांबद्दल
जेवणातील काही पदार्थांबद्दल जुनी समीकरणे अशी होती :
भाकरी- कष्टकरी आणि गरीबाची.
पोळी- शहरी आणि श्रीमंताची.
साखर श्रीमंतांची तर गूळ गरीबाचा.
.. आता गेल्या वीस वर्षात बघा. एकंदरीत आरोग्याचे प्रश्न जसे वाढले तसे वरच्या विधानांना काही अर्थ उरलेला नाही. बरेच शहरी लोक हळूहळू भाकरीकडे वळले.
किमतीच्या बाबत कधीकधी गुळाने साखरेच्या दुप्पट एवढी पण मजल मारलेली असते.
सेंद्रिय( खर्याखुर्या) गुळाच्या किमती बघून तर अवाक व्हायला होते !
करताय का मग सर्वांसाठी ! >>>>
करताय का मग सर्वांसाठी ! >>>> खाता येतात फक्त. करताना करंज्या येतात. मुरड नाही जमत. कातणे फिरवते.
काय असतो मुरडकानवला? >>>> खाऊगल्लीत हल्लीच पिळापिळाचे डिझाईनवाल्या करंज्या होत्या त्या.... दुमड घातल्यावर मुरडून बंद केलेली. निरोपाच्या गोडाला करतात. कानवला करंजी टेक्निकल फरक नाही माहीत.
काय योग्य दिवशी चर्चा होते
काय योग्य दिवशी चर्चा होते आहे.
राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा सर्वांना. >>>>>> + १११११११११.
सुंदर योगायोग !
साखरेतही मिश्रीला चव असायची,
साखरेतही मिश्रीला चव असायची, पांढऱ्या शुभ्र स्फटिक साखरेपेक्षा.
आता मिळणाऱ्या मिश्रीला ती चव येत नाही.
गुळाचे गोड पदार्थ जास्त खमंग
गुळाचे गोड पदार्थ जास्त खमंग आणि चविष्ट वाटतात, पिवळट / तपकिरी रंगही छान येतो.
खरवस पण. चीक + साखर + दूध ऐवजी चीक + गूळ + नारळाचे दूध.
साखरेचे पदार्थ गोरे दिसतात. बाकी गोडखाऊ असल्याने गपागप खायचे माहीत.
शब्द्कोशानुसार का = हारोळी
बारकावे कोण सांगेल ? >>>>> आपला प्रश्नार्थक का? का हा?
साखर श्रीमंतांची तर गूळ
साखर श्रीमंतांची तर गूळ गरीबाचा.>>>
काही पदार्थ दोन्ही समप्रमाणात घालून करतात ते जुन्या समीकरणानुसार मध्यमवर्गीय असावे . गंमत केली हं.
मला आता फुलोऱ्यावरच्या पर्फेक्ट करंज्यांंची आठवण येत आहे. फुलोऱ्याचा मान त्यांनाच मिळायचा , महालक्ष्मी विसर्जन केल्यावर खायला मिळायच्या. कमी बाखर /सारण असलेल्या करंज्यांंना चुलत आजोबा 'फुंकन्या' म्हणायचे.
अवांतर पुरे करते. Sorry.
कारवी
कारवी
कानवला/ करंजी/ हारोळी यातील बारकावे / फरक कुणाला माहित आहेत का ?
अरे वा! कुमारसर्,कोडे
अरे वा! कुमारसर्,कोडे नेहमीप्रमाणेच छान.भरत नेहमीप्रमाणेच प्रथम क्रमांकावर.
बाकी मस्त चर्चा चाललेय!
मस्त चर्चा चालली आहे.. हारोळी
मस्त चर्चा चालली आहे.. हारोळी हा शब्द पहिल्यांदाच ऐकला.
कारवी
कारवी
कानवला/ करंजी/ हारोळी यातील बारकावे / फरक कुणाला माहित आहेत का ? >>>>>>>
मला नक्की नाही माहीत. आम्ही करंज्याच म्हणतो. गूळ/साखर/रवा/खोबरे/खाज्याच्या/वाफवलेल्या/तळलेल्या कुठलेही व्हर्जन असेल तरीही.
कानवला = मोठा आकार + तुम्ही म्हणताय तशी मुरड + मुरड घातल्याने येणारा एका बाजूला कानासारखा आकार
करंजी = मध्यम आकार + मुरड नाही म्हणून कडा जुळवून, दाबून बंद करायच्या -- त्यामुळे येणारा करंज बीचा आकार
हारोळी = अजून लहान आकार --- मग एकत्र गुंफून हार करून देवांना / डोहाळतुली / मुलांच्या वाडीभरणाला गळ्यात घालणे. या साठी योग्य आकाराची ती हारोळी ---- हा अंदाज आहे.
कारवी धन्यवाद, हारोळी नव्हते
कारवी धन्यवाद, हारोळी नव्हते माहिती . सगळ्या करंज्या असायच्या आमच्यासाठी.
खूप छान चर्चा झाली.
काही पदार्थ दोन्ही समप्रमाणात
काही पदार्थ दोन्ही समप्रमाणात घालून करतात ते जुन्या समीकरणानुसार मध्यमवर्गीय असावे Happy . गंमत केली हं. >>> @ मी_अस्मिता
आम्ही पण गूळ-साखर निम्मेवालेच. चव आणि सारणाचा ओलसरपणा नीट जमून येतो इति घरातल्या सुगरणी, आम्ही अंधानुकरणी.
कमी सारणाच्या करंज्या = खुळखुळा
Sorry. अवांतर नव्हे...... परीक्षा संपल्यावरचा विरंगुळा आहे हा. दुसर्या पेपरच्या आधीचा. यातच माबोची गंमत आहे. कोणाकडूनही कधीही काहीतरी शिकता येतेच. चुकीचे समज स्पष्टीकरणासह दूर होतात.
कारवी धन्यवाद, हारोळी नव्हते माहिती >>>> अजून कुमार सरांचे उत्तर यायचेय. मी माझ्या समजुतीप्रमाणे संगितलेय. चुकीचेही असू शकते.
कारवी धन्यवाद,
कारवी धन्यवाद,
सुरेख सांगता.
सर्वांचा उत्तम सहभाग .
म्हणजे चक्क बरोबर आहे? अजून
म्हणजे चक्क बरोबर आहे? अजून काही तपशील असतील तर सांगा जरूर.
अहो, हा प्रश्न नव्हता
अहो, हा प्रश्न नव्हता
मला पूर्ण माहिती हवी होती .
मिळाली, धन्यवाद !
आज कोणी नाही इथे? श्रमपरिहार
आज कोणी नाही इथे? श्रमपरिहार दिन?
माझ्याकडे आहे एक
माझ्याकडे आहे एक
पण, लागोपाठ मी नको
द्या कोणी
कुमारसर,जरा सर्वसामान्यांसाठी
कुमारसर,जरा सर्वसामान्यांसाठी पण द्या ना!
हो
हो
पुढचे सोपे असेल !
पण आधी तुम्ही द्या !
Pages