आमच्या समोरच्या घरात राहणार्या कुटुंबातील चारपैकी तीन जणांना कोरोना झाला.
नुकतीच बातमी कानावर आदळली. आणि जाणवले कोरोना चार फूटांवर आला.
अगदी चार दिवसांपूर्वीच मी स्वत:ला आणि स्वतःच्या कुटुंबाला फार सुरक्षित समजत होतो.
अर्थात कारणही तसेच होते. या कोरोनाकाळात आमच्या कॉलनीत वा शेजारच्या पाजारच्या कॉलनीत जिथवर मी जीवनावशयक वस्तू घ्यायला जात आहे, तिथवर कोणालाही कोरोना झाल्याची बातमी आजवर आली नव्हती. याच कारणासाठी फुकटचे घरभाडे जात असूनही घर बदलायचीही घाई करत नव्हतो.
पण कोरोना अचानक अगदी दारात उभा राहिला. ते ही ईतक्या जवळ आणि ईतक्या लवकर की दारात उभा असलेला कोरोना आता कधीही घरात येईल अशी स्थिती बघता बघता कधी झाली समजलेही नाही.
आजवर ईतरांसाठीच प्रार्थना करत होतो आता ती वेळ आपल्यावरही येऊ शकते हे जाणवले,
आणि सोबत आणखी एक गोष्ट जाणवली की उद्या शिरलाच घरात कोरोना तर काय करावे याबाबत आपल्याला जुजबीच माहिती आहे. कुटुंबातील एक वा अनेक व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह झाल्यास नेमके काय करावे, हे स्टेप बाय स्टेप माहीतच नाही.
सरकारी ईस्पितळात भरती व्हायचे की प्रायव्हेट शोधायचे, तिथे खर्च किती येतो, मला झाला तर मी सरकरीत जाईन, पोरांना झाला तर त्यांना चांगले हॉस्पिटल बघू, पण पोरांची काळजी कोण घेते तिथे, जवळचे सरकारी वा प्रायव्हेट चांगले कोरोना हॉस्पिटल कुठले, त्यांना अॅप्रोच कसा करायचा... एक ना दहा शंका आणि चिंता, कित्येकाची उत्तरे नाहीत. कदाचित आसपासच शोधली तर मिळतीलही पण आजवर फक्त कोरोनापासून वाचावे कसे याचीच माहीती घेत होतो. पण वाचू शकलो नाही आणि झालाच कोरोना तर कुठे धावपळ करायचे याचा स्वत:कडे प्लानच नाही. जणू सरकारच आपल्याला मार्गदर्शन करणार या हिशोबातच होतो. किंवा कोरोनासंदर्भात जास्त बातम्या वा माहिती गोळा केले तर उगाच टेंशन येईल या विचाराने ते टाळत होतो.
पण आता हळूहळू नव्हे लगेचच कोरोना झाल्यावर पुढे काय याची शक्य तितकी माहिती घ्यायला सुरू करत आहे. त्याचसोबत समोरच्या घरात आलेला कोरोना चार पावले चालून आपल्या घरात येऊ नये यासाठीही काय करता येईल याचा विचार चालू आहे. एक घरातल्या घरात तात्काळ मिटींगही झाली. आणि दुसरा आता हा धागा.
चांगला अनुभव आहे . इथे
चांगला अनुभव आहे . इथे दिल्याबद्द्ल धन्यवाद.
चेकलिस्ट उपयुक्त आहे.
असेच लोक बरे होत राहोत आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत राहोत !!
पियू , चांगलं लिहिलंत.
पियू , चांगलं लिहिलंत.
हे डाॅ काय म्हणतात पहा ...
हे डाॅ काय म्हणतात पहा ....WHO ने करोनाचा बाऊ केला आहे...कुमार, कामां, यात किती तथ्य आहे?
https://www.facebook.com/100002367187033/posts/3076138869141656/
हे डॉक्टर कुठल्या रोगाला
हे डॉक्टर कुठल्या रोगाला कॉन्स्पिरसी थिअरी म्हणत नाहीत हा संशोधनाचा विषय ठरेल.
स्वाईन फ्लू ही ह्याच
स्वाईन फ्लू ही ह्याच घराण्यातला लक्षणे ही सारखीच त्यावेळस ही लोक काही दिवस मास्क लावून फिरलेच की पण ऐवढा हाहाकार माजला नव्हता ......काय गोलमाल आहे काही कळत नाही
महेशकुमार, ते कसले डॉक्टर
महेशकुमार, ते कसले डॉक्टर आहेत? डिग्री कुठली हे शोधा. मग गोलमाल कुठे आहे ते कळेल.
पियू, थँक्स हे इकडे
पियू, थँक्स हे इकडे लिहिल्याबद्दल. मी मामी यांच्या धाग्यावर अन इकडे सुद्धा विचारले होते की वेळ आलीच अन जावे लागले तर काय काय घेऊन जातात.
भारतदा गुगल तर सांगत आहे ते
भरतदा गुगल तर सांगत आहे ते एक नावजलेले डाॅ आहेत व तसेच सगळ्यात जास्त भाषेत पुस्तक प्रकाशित होण्याचा त्यांचा वर्ड रेकॉर्ड पण आहे ही बघा लिंक ..
https://biswaroop.com/about-drbiswaroop/
हे वाचाhttps://undark.org
हे वाचा
https://undark.org/2018/06/06/aids-denialism-quackery-facebook-youtube/
महेशकुमार हा व्हिडीओ सुद्धा
महेशकुमार हा व्हिडीओ सुद्धा बघा
भारतात नाही तर जगात असे खूप
भारतात नाही तर जगात असे खूप डॉक्टर आहेत ते असे दावे करत असतात.
कॅन्सर हा अतिशय सिंपल रोग असून तो सहज ठीक होवू शकतो.
पण कॅन्सर ही मोठी आर्थिक उलाढाल आहे म्हणून योग्य उपचार करून दिले जात नाहीत.
डॉक्टर नी दावा केलाय कोणताही कॅन्सर सहज बरा करू शकतो.
अशा डॉक्टर ना त्रास दिला जातो,त्यांच्यावर केसेस होतात,त्यांच्या उपचार ला मान्यता दिली जात नाही.
अशा अनेक चर्चा असतात इंटरनेट वर
चायना स्टडी वाचा.
चायना स्टडी वाचा.
पियू, चांगला अनुभव, माहिती
पियू, चांगला अनुभव, माहिती दिल्यबद्दल धन्यवाद.
#कोविड_एक_अनुभव
#कोविड_एक_अनुभव
ज्याने २-३ महिने धुमाकूळ घातलाय त्या कोरोनाची भेट झालीच . तसही ह्या मित्राला, नातेवाईक यांना झालाय आणि अशी लांबून भेट होतीच कोरोनाची.कंपनी मधल्या मित्राला कोरोना झाला आणि माझं quarantine चालू असताना १० व्या दिवशी ताप आल्यावर कुठे तरी मनात धाकधूक चालू झाली.पण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर थोड हायसं वाटल, कोरोनाचा ताप एवढ्या दिवसांनी शक्यतो येत नाही.पण जर लक्षणं आली तर मात्र टेस्ट करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगून prescription दिलं.
दुसऱ्या दिवशी मात्र अचानक घश्यात कफ येणं आणि खोकला चालू झाला.म्हणून टेस्ट करण्या शिवाय गत्यंतर नव्हतं. मग टेस्ट करून परत २४ तास संपले ते positive रिपोर्ट येऊनच(पहिला धक्का)..सो थोडं हबकायला झालंच. आता पुढे काय करायचं आणि कसं? परत एकदा डॉक्टरांशी बोलून हॉस्पिटल मध्ये admit व्हायचं ठरवलं. गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये जाण्यापेक्षा , प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये मित्र असल्या मुळे तिथेच ऍडमिट व्हायचं ठरवलं.मग ऍम्ब्युलन्स कंपनीने दिल्यामुळे ती चिंता मिटली. आयुष्यात ambulance मध्ये बसायची पहिली वेळ.
हॉस्पिटलला गेल्यावर मात्र डॉक्टरांनी ऍडमिट करतानाच सांगितलं,"५ दिवसांत बरा होऊन बाहेर पडणारेस!" हे ऐकुन बरं वाटलं. सगळ्या फॉर्मलीतीज पूर्ण झाल्यावर लगेच ट्रिटमेंट चालू झाली. ट्रिटमेंट म्हणजे फक्त व्हिटॅमिन गोळ्या , गरम पाणी , लक्षणं जशी असतील तशी औषधे, सलाईन्स , इंजेक्शन चालू होती. ५ व्या दिवशी डॉक्टर येऊन सांगून गेले उद्यापासून २४ तास under observation मग डिस्चार्ज. पण दुसऱ्या दिवशी सकाळ पासून खोकला आणि धाप लागणं सुरू झालं.खोकला आला की छातीत दुखणं सुरू झालं. धाप लागत असल्यामुळे ५ मिनिट चालणं पण मुश्किल झालेलं.मग छातीच CT scan केल्यावर लक्षात आलं की न्युमोनिया ची सुरुवात झालेली होती(दुसरा धक्का). मग डॉक्टरांनी परत ती औषधे चालू केली.हे होऊन दोन दिवस जातायात तर त्याच दिवशी संध्याकाळी ताप येऊन ऑक्सिजन लेव्हल ८५ पर्यंत खाली गेली.(तिसरा धक्का) मग लगेच डॉक्टरांनी आयसीयू मध्ये शिफ्ट करून ऑक्सिजन चालू केला.२ दिवस ऑक्सिजनमास्क ऑक्सिजनची लेव्हल होई पर्यंत होताच. मग २ दिवस under observation ठेवून काही त्रास नाही बघून १३व्या दिवशी डिस्चार्ज होऊन घरी आलो.पुढचे १४ दिवस सर्दी खोकला कमी कमी होत गेला. आणि १४ दिवस पूर्ण झाल्यावर टेस्ट केल्यावर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर जीव भांड्यात पडला. सेल्फ quarantine चा आठवडा पूर्ण झाल्यावर मात्र हलका व्यायाम सुरू केला. आणि एवढे दिवस मात्र अनुलोम,विलोम, कपालभाती चालूच होत जेवढं जमेल तेवढं.
या १४ दिवसात लोकांच्या नजरा बदलल्या. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी मात्र पूर्ण १४ दिवस नाश्ता आणि जेवणाची जबाबदारी घेतलेली.आणि मी फक्त कधी तरी शाळा कॉलेजात असताना संघाचं काम केलेलं हीच काय ती ओळख.
हा सगळा त्रास तरुणांना पण होऊ शकतो , सो कोणी सांगत असेल तर तरुणांना काही होत नाही तर फार मोठा गैरसमज आहे हा.आणि असेच माझ्याच वयाचे ५-६ पेशंट होते हॉस्पिटलला.
सो काळजी घेणं खूप महत्त्वाचे.आता हळू हळू सगळं नॉर्मल होतंय. थोडा थकवा जाणवतोय अजुन पण तो ही निघून जाईल.
एवढं सगळं होत असताना positive राहणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून जवळ जवळ महिनभर बातम्या बघायचं बंदच केलं. खूप साऱ्या लोकांचे मेसेजेस ,कॉल्स चालू होते कधीच त्यांनी एकटं वाटू दिलं नाही. हे करत असतानाच स्वामींचा तारक मंत्र होताच. ज्यामुळे फार काही त्रास जाणवला नाही.
थोडं मागे वळून बघितल्यावर काही गोष्टी करायला हव्या होत्या अस वाटतयं:
१. social distancing must
२. Use of sanitizer ,soap water frequently.
३. दुसऱ्याची वस्तू शक्यतो वापरणं टाळा, जर नसेल शक्य तर वस्तू वापरल्यावर हात sanitize करणं
४. जी माणसं घरच्या बाहेर पडतायत त्यांनी steam घेणं must..
५. आणि काही लक्षणं दिसत असतील तर मात्र लगेच डॉक्टरांना भेटा. अंगावर काही काढू नका.
आणि लास्ट बट नॉट द लिस्ट हा मंत्र लक्षात ठेवा "मी बरा होणारच!"
धन्यवाद!
- अक्षय देपोलकर
बापरे! सुखरूप बाहेर पडला
बापरे! सुखरूप बाहेर पडला वाचून हुश्श झालं.खरंच पण आता जास्त काळजी घ्यायला हवी.
तुम्ही बरे झालात हे वाचून बरं
तुम्ही बरे झालात हे वाचून बरं वाटलं.
आई पण सांगत होती कि बरं झाल्यावर पण थकवा जाणवतोय.
- अक्षय देपोलकर
- अक्षय देपोलकर
यांचा अनुभव आहे तो
छान शब्दबद्ध केला आहे. माहितीपुर्ण पोस्ट
माझी आई,बहिण, तिचे पती आणि
माझी आई,बहिण, तिचे पती आणि भाऊ सगळे बरे झालेत आता. गगन(भाऊ) ने पण नर्सिंग केलेले आहे. तो खासगी दवाखान्यात जॉब करतोय. बहिणीला आणि त्याला दोघांनाही कोरोना ड्युटी सुरु झाली पीपीई किट वगैरे घालून, 7 ते 8 तास पाणी, खाणे किंवा ईतर काहीही करता येत नाही.
ऋ हा धागा काढल्याबद्दल
ऋ हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद
कल्पना नव्हती की पूर्ण धागा आणि सारे प्रतिसाद मला वाचावे लागतील
सध्या पुण्यात आहे मी कुटुंबाबरोबर
माबोकरांना त्यांच्या अनुभवानुसार काही प्रश्न:
पप्पांना ताप आलाय. रक्त, लघवी इत्यादी तपासण्या केल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार.
ते डायबेटिक आहेत, सुगर वाढली आहे.
त्यांनी पप्पांना होम quarantine होण्याचा सल्ला दिलाय.त्याच्यासाठी जे डॉक्टर सांगतील ते आम्ही करणार आहोत.
१. ह्या स्थितीत मी, बहीण आणि आई ह्यांनी काय काळजी घ्यावी? आम्हाला लक्षणे वा इतर आजार नाहीत.
2. प्रतिबंधात्मक उपाय जसे की व्हिटॅमिन गोळ्या घेणं, म्हणजे नेमक्या कोणत्या गोळ्या?
3. काढा घेणे?
4. कोविड मेडिकल पॉलिसी की जरूर नाही?
5. इतर उपयुक्त माहिती.
तुमच्या वडिलांची कोरोना चाचणी
तुमच्या वडिलांची कोरोना चाचणी केली आहे का?
2. प्रतिबंधात्मक उपाय जसे की
2. प्रतिबंधात्मक उपाय जसे की व्हिटॅमिन गोळ्या घेणं, म्हणजे नेमक्या कोणत्या गोळ्या? >>>
सध्या हाय रिस्क झोन मध्ये येणाऱ्या लोकांना प्रेव्हेंटिव्ह मेजर म्हणुन आठवड्याला एक इव्हरमेक्टिन देतात असे एका डॉक्टर कडून कळाले. तेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून त्यांच्या सल्ल्याने औषधं, व्हिटॅमिन्स घ्यावीत. इथे अथवा इतर सोमीवर क्राऊड अथवा ओळखिच्याने सांगितले तरी ते डॉक्टरच्या सल्ल्या शिवाय काही घेऊ नका.
वडील आयसोलेट होतील, त्यांची काळजी कशी घ्यायची ते डॉक्टर सांगतीलच. तुम्ही इतरांनीही खबरदारी म्हणुन घरात एकमेकांपासून शक्य तितके सोशल डिस्टनसिंग पाळा.
व्यायाम, योग, प्राणायाम सुरू ठेवा, सकस आहार घ्या.
हे काढा, व्हिटॅमिनच्या गोळ्या
हे काढा, व्हिटॅमिनच्या गोळ्या हा काय प्रकार आहे? कुठलं व्हिटॅमिन कमी झालं असेल ते बघुन गोळ्या घ्यायला लागतील ना? ऑल पर्पज व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्या आणि जास्तीची व्हिटॅमिन डिपॉझिट होत असतील कुठे तर त्याचं काय?
बहुतेक करून vitamin c देतात
बहुतेक करून vitamin c देतात जे पाण्यात विद्राव्य आहे, डिपॉझीट होत नाही म्हणतात. आणि झिंक सप्लिमेंट देतात. याचं माहीत नाही. व्हिटॅमिन D पण देतात जे मेदात विद्राव्य आहे आणि जास्त घेतल्यास टॉक्सिसिटी होऊ शकते. असे झाल्याच्या केस बद्दल कालच वाचले.
म्हणुन व्हिटॅमिन्स सुद्धा डॉकच्या सल्ल्यानेच घ्या.
@mrunal:
@mrunali :
केली आहे चाचणी वडिलांची. आज रिपोर्ट येणार आहे.
@मानव:
धन्यवाद. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार च कोणतीही औषधे घ्यायचे ठरवले आहे. व्हिटॅमिन गोळ्यादेखील
Pages