शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. जनसंख्यास्फोट? >> लोकसंख्यावाढ होते. अर्थ एकच !
२. निरक्षरता?
बरोबर !

लोकसंख्यावाढ ही सर्वत्र होतेच. ती प्रमाणाबाहेर झालीय हे दाखवायला स्फोट वापरले.

anjali_kool यांनी लोकसंख्यावाढ हेच लिहिले होते पण नंतर संपादीत केले.

४ उपासमार
५ बेरोजगारी
आता थांबतो

मागील दोन विज्ञान खेळांच्यामुळे मेंदूला बर्‍यापैकी शीण झाला होता. म्हणून हा पेपर तुलनेने सोपा काढला. आतापर्यंतची उत्तरे वेगाने आलेली आहेतच, कारण सर्व विद्यार्थी तयारीचे आहेत ! Bw

आता विशेष प्राविण्य मिळवण्यासाठी शेवटचा प्रश्न आहे…..

माल्थसवाद >>>> होय !
माल्थस हे लोकसंख्याशास्त्राचे जनक.
....
सर्वजण छान.
३ व १० साठी भरत यांना विशेष प्राविण्य.
धन्यवाद.

गूढ शब्दकोडी:
कृपया स्पष्टीकरणासहीतच उत्तरे द्यावीत.

१. प्रशंसा करुन पुरुष झाला माकड. (३)
२. उगाच गुंफ मध्येच नको म्हण. (५)
३. खाऊ उलटा पाडा आणि दोन्ही बाजूंना लावा. (४)
४. अवजारामध्ये तल्लीन होऊ, होईल मनोरंजन. (४)
५. दोन प्राणी अदृश्य करी. ( २, ३) अथवा (३, २)
६. कानात काज उलटवल्यास इथे कर भरतात. (५)
७. निष्णात प्रशंसा करून बगळा फिरून थंड. (५)
८. पाण्याने गच्च भरलेला तांब्या डोक्यावर घेऊन चालल्यास आपला देश उमगतो. (५)
९. रहदारी हवा पालट करते, तू कशाला काठी काढते? (४)
१०. फळ आलाप घेते तेव्हा दिशा बदला. (३).

१. प्रशंसा करुन पुरुष झाला माकड. (३)
माकड = वानर ---- > वा = प्रशंसा + नर = पुरुष

२. उगाच गुंफ मध्येच नको म्हण. (५)
उगाच = विनाकारण
विण = गुंफ
नाकार = नको म्हण

दोन्ही बिंगो.
विण मध्ये नाकार : वि(नाकार)ण

Pages