तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

म्हाळसा खरेच हे ईतके सारे घेता का?>> गम्मत केली ओ..मला कुठे एवढी झेपते.. मी माझ्या एकुलत्या एक मार्गरिटा बरोबरच खूष आहे.. पोरं आजकाल तीही सुखाने घेऊ देत नाहीत.. भांडी घासता घासता एक एक घोट प्यावा लागतो.

इतके सगळे एकसाथ कोण घेईल रुन्मेष?? ते म्हाळसाजी काव्यमय लिहून दाखवत होत्या.. त्यांचे कौतुक राहिले बाजूला.. इतके सारे घेता का असे कोणी विचारेल असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नसेल...
म्हाळसा जी ... छान जमलय तुम्हाला... Happy
इथे रेसीपी टाकत राहा... आणि थोडे मागे जाल तर मस्त मस्त कॉकटेल रेसप्या आहेत...

हाहाहा भारी लिहिलंय
म्हाळसाजी

Happy Happy

भांडी घासताना मार्गारिटा चा कन्सेप्ट पण लै भारी
आवडलाय

जे दारू, बियर आवडीने पितात त्यांनी लहानपणी कधीच मँगोला प्यायलेला नसतो. तहान लागल्यावर मँगोलाची जी काय अमृतासमान चव लागायची त्याला कशाचीही सर नाही.

मँगोला अपनी जगह है, बीअर अपनी जगह है! आपआपल्या जागी दोन्ही छान आहेत.

म्हाळसा, Happy छान - आता एखादी कॉकटेल ची पण रेसिपी (लिहून) 'टाका'. Happy

अहो बोकलत, सोबतीला 'डॅनियल काकांचा जॅक', 'जिम तात्याचा बीम', 'जेम्स भाऊंचा सन', 'स्कॉट अंकलचा पीटर' अशा मित्रमंडळींना कधी घेऊन बसा नाहीतर बायको अथवा गर्लफ्रेंडसोबत ‘ब्लुमुन'च्या धुंद रात्रीत आपल्या 'जीन' बरोबर ‘चांदण्यात फिरताना’ हे गाणं म्हणतं 'मुनवॉक' करा..बघा मॅंगोला विसरता की नाही ते Happy

कोकम सरबत आणि व्होडका???

मी पण केली होती ट्राय, पण कोकम चा स्ट्रॉंग फ्लेवर बाकी सगळ्याला झाकोळून टाकतो
मी त्यामुळे रम, व्हिस्की सगळं कोकम सोबत ट्राय केलं
तितकंच बेकार लागलं

रच्याकने कोरोना काळात दारू पिताना मस्त कचकचीत लिंबू पिळून रम बर्फासोबत घ्या

हुराक बद्दल लिहलं होतं का मी इथे
भन्नाट गोवनिज प्रकार आहे

एक भाग हुराक, त्यात तीन चार बर्फाचे खडे, भरपूर लिंबू पिळून, एक ताजी हिरवी मिरची तीन चार तुकडे करून टाकावी, आणि वर चिमूटभर मीठ
किंचित पाणी आणि स्प्रइत ने टॉप अप करावे

भन्नाट ड्रिंक आहे एकदम
जे अगदीच नवशिके आहेत त्यांनी वाट्याला जाऊ नये
आणि हवी असल्यास थोड्या वेळाने मिरची काढून टाकावी
चुकून घोटासोबत गेली तर धूर येतो Happy
फेणी सारखी चव आहे पण बरीच माईल्ड, आणि लिंबू आणि मिरची मुळे आंबट तिखट आणि तुरट असे सगळे फ्लेवर जाणवतात

किती प्रमाणात घालायचे हे थोडे अंदाज घेऊन ठरवावे

एकदा खोकला कि सर्दी झाली म्हणून गरम पाण्यात ओल्ड मॉंक घेतलेली.. एकच पेग पिऊ शकलो. रमच्या वाफा नाकातून डोक्यात! झिणझिण्याच!

खरंच हा प्रकार करायला आवडेल मला. डिसेम्बर पर्यंत सगळं सुरळीत झालं तर पुण्यात पिण्याचा कार्यक्रम करूयात!

एकदा खोकला कि सर्दी झाली म्हणून गरम पाण्यात ओल्ड मॉंक घेतलेली.. एकच पेग पिऊ शकलो>>>>

कडाक्याच्या थंडीत त्यासारखे सुख नाही
अर्थात थंडी म्हणजे सिमला कुलू मनाली एवढी
तीन चार वेळा हा अनुभव घेतला आहे तिथे
बेड वर बसून रजई ओढून गरम पाण्यात रम घालून एक पेग मारायचा आणि लगेच झोपून जायचे
बाहेरून आणि आतून असे सुखद गरम लाटा आल्याचा फिल येतो

कार्ल्सबर्ग म्हणून एक बियर ब्रँड आहे... डॅनिश...
त्या बियर मध्ये थोडा क्रनबेरी ज्यूस आणि थोडी कोकोनट रम ( प्लेन रम नाही)...
जबरदस्त कॉकटेल आहे हे.. माय फेव्हरेट...

कोणताही बियर ब्रँड चालेल.. हा नसेल तर...

ते म्हाळसाजी काव्यमय लिहून दाखवत होत्या.. त्यांचे कौतुक राहिले बाजूला.. इतके सारे घेता का असे कोणी विचारेल असे त्यांना स्वप्नात देखील वाटले नसेल...
>>>>>>
अहो त्यांचे धागे बघा. ऑलमॉस्ट प्रत्येकावरच माझे कौतुकाचे प्रतिसाद आहेत.
माझा उसूलच आहे की नवीन सभासदांचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करा ... (तोंड माझे हा)

पण माझा अजूनही एक उसूल आहे - मी मद्य साहित्याचे कधी कौतुक करून दारूचे उदात्तीकरण करत नाही.
म्हाळसा यांनी त्यात ताक, मँगोला, कोकमसरबत, लिंबूपाणी, वगैरे टाकून कविता रचावी. मी पुन्हा कौतुक करायला पैला असेल.

बाई दवे
त्या आधीच्या वाक्यात एक शब्द राहिलेला.
>
मला लहानपणापासूनच मद्यपान करणार्‍या मुलींबद्दल एक अतीव आदर वाटत आला आहे. Happy

हो, तोच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे
फावल्या वेळात गिर्हाईक बसून राहिले तर त्याना त्याच ग्लासात बियर ओतून देत

अशाने मग फावले लोक वाढायला लागले मग त्यांनी तोही व्यवसाय सुरू केला

Happy

Pages