तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

कर्ल्सबर्ग एलिफंट माझा सगळ्यात आवडता ब्रँड
तोडच नाहीये त्याला
त्यापुढे बिरा, magnam, अल्ट्रा सगळे फिके

राव पाटील यांचा आवडलेला प्रतिसाद -
प्रस्तुत प्रश्नात महोदयांनी केवळ दारू विचारले असल्याने दारूच्या वर्गीकरणात येणाऱ्या सर्व (माझ्या अनुभवातील) पेयपान पद्धती-
१. व्हिस्की: ६० चा पेग, त्यात थंड पाणी, असल्यास बर्फ. सोबत खायला भेळ/ boil अंडे/ खारेदाणे. माझे आवडते लसूण चना फ्राय. एक पेग किमान १५ मिनिट तरी संपवू नये. जेवणाआधी बसले असाल तर कोरडे चिकन. चिप्स कधीच नाही. एखाद दुसरा जुना मित्र असावा सोबत, बारचं आधारलेलं वातावरण, हातात गुंडांग गरम किंवा किंग्स.
२. बिअर: उन्हाळ्यात chilled असावी, पण कधी कधी kf स्ट्रॉंग असेल आणि पाऊस/ थंडी असेल तर सामान्य तापमानाची बिअर बेस्ट लागते. मला मगमधून घ्यायला आवडते, बाटली तोंडाला लावून मोठा घोट घेता येत नाही. हळू हळू प्यावी. टॉप to बॉटम मारायला हरकत नाही, पण त्यात मजा अशी नाहीये. सोबत खायला भरपूर काहीतरी. पण शक्यतो तळलेले पदार्थ टाळतो मी. ग्रुपच्या मित्रांसोबत घ्यायचे पेय. कॉलेजच्या आठवणी काढत प्यावी.
३. वोडका: मला तरी वोडका फार स्ट्रॉंग वाटते, वोडका म्हटली की मुलींशी संबंध लावणाऱ्यांचा राग येतो. Smirnoff vanilla in pineapple juice. माझं आवडतं कॉम्बिनेशन. 3 पेग आणि माणूस ढगात. सोबत खायला काही नसले तरी चालेल. (मध्ये ऑफिसच्या पार्टीत काही अतिउत्साही मुलींनी वोडका शॉट्स मारले, तकीला पद्धतीने.. अगदी अंगठ्याच्या बेचक्यात आणि ग्लासच्या कडांना मीठ लावून लिंबाच्या चकत्या समोर ठेवून वगैरे.. फार वाईट वाटलं. तकीला चे संस्कार वोडकावर!)
४. तकीला: कंसात लिहिल्याप्रमाणे, फक्त मिठासोबत मी चाट मसाला पण ठेवतो थोडा. आणि जिभेला न लागू देता सरळ घशात ओतण्याचे प्रयत्न. निव्वळ पार्टी ड्रिंक. नाचणार असलो तरच पितो.
५. Wine: नेहमी जेवणं झाल्यावर पिलो आहे, हलके हलके चढते, सोबत कुणाच्यातरी डोळ्यांची नशा, आणी त्या डोळ्यांत देखील wine ची नशा असेल, तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. Wine सोबत गाणी ऐकू नयेत, शक्यतो मित्रांसोबत पिऊ नये. फक्त प्रेयसी असावी, तिचे सुंदर डोळे असावेत आणि तुमच्या मनात भरपूर प्रेम. एक सुलाची बाटली आरामात, हळू हळू एकमेकांच्या डोळ्यांच्या नशेत हरवून जात संपवावी. पुढचे काही सांगणे नलगे!
६. जीन: लिंबू सरबतात घालून. फार कमी प्यायलो आहे, पण अनुभव छान होता.
७. रम: ओल्ड monk बद्दल पट्टीच्या पिणाऱ्यांना सांगायची गरज नाही. कडक ड्रिंक. कोक मधून आवडते. सांभाळून पितो. झोपायची सोय जवळ करून, सकाळचा अलार्म लावून, जेवण तयार असेल तेव्हाच पितो.
८. ब्रॅण्डी: झकास ड्रिंक. फक्त mansion house. इतर ब्रँड माहीत नाहीत, ट्राय करण्याचा प्रश्न नाही. Sprite मधून, खायला फुटाणे, किंवा इतर काहीपण.
९. Bacardi plus: rum mixed drink. पुण्यात विचारलेली तेव्हा समजलं, फक्त कर्नाटकात मिळते. जेव्हा मित्र आणि त्याची फॅमिली असेल सोबत तेव्हा घेतलेली, मस्त होती. बीच वर बसून ५ लोकांनी २५ बाटल्या उडवल्या. ड्रिंक ऑफ द मोमेंट, बैठक सोडल्यावर जास्तीत जास्त १५ मिनिट लागतात विसरायला की आपण पिलो होतो. खायला काही नको, फक्त मित्रांची खेचत हसत खिदळत प्यायची.
१०. लास्ट बट मोस्ट फेवरीट: स्कॉच: gentlemans ड्रिंक. स्ट्रिक्टली, दारूच्या काचेच्या ग्लासातच प्यावी. प्लास्टिक ग्लासात स्कॉच ओतून तिचा अपमान करू नये. मी ६० चा पेग, त्यात तेवढंच किंवा थोडं कमी पाणी, बर्फाचे २ खडे घालून पेग बनवतो, खायला चिकनची काहीतरी आटोपशीर डिश (बऱ्याचदा, चिकन / फिश कोळीवाडा) किंवा prawns. कौशिकीची ठुमरी- याद पिया की आये, किंवा गझल. असेल तर शांतपणे बसू शकणारा आणि माझ्या तोंडून निघणाऱ्या प्रत्येक शेरावर खरी दाद देणारा मित्र. स्कॉच नेहमी पीत नाही, पण पितो तेव्हा रॉयल कारभार, चार भिंतीत पिण्याचा प्रकार नाही हा. किंवा ट्रीपला गेलोय, समोर शेकोटी आहे, बांबूच्या खुर्च्या, सोबत आपली प्रेयसी, आणि अजून एखादं मित्र कपल. जबरदस्त अनुभव.

ताजा कलम: व्हिस्की, रम आणि ब्रांडी सुद्धा, एकट्याने पिलो आहे. पण फार कमी वेळा, एकट्याने प्यायची इच्छा होतच नाही. पिऊन गाडी चालवत नाही शक्यतो. चालवली तरी ऑफ द हायवे. मोकळा रस्ता आणि मॅक्स स्पीड 40. जास्तीत जास्त ५ किलोमीटर अंतर असेल तेव्हाच.
कुणालाही पिण्याचा आग्रह करत नाही. चढतेय असं वाटलं, आणि जबाबदार वागण्याचे बंधन असेल तर पिणे थांबवून, जेवण करून(च) झोपतो. मित्र सोबत असतील तर मात्र खूप पितो, पण गोंधळ वगैरे आजवर घातला नाही.

सरतेशेवटी गालिबच्या ओळी,

नफस न अंजुमन-ए-आरजू से बाहर खिंच
अगर शराब नहीं इंतजार-ए- सागर खिंच!
(आपल्या इच्छांच्या गगर्दीतून, आत्म्याला बाहेर खेचू नकोस, जर दारू नसेल आता तर वाट पहा- समुद्राइतकी वाट बघ, पण दारू पी)

आणि अजून एक, जौकचा दारूपासून दूर राहण्यासाठी-
ए जौक देख दुख्तर-ए-रज को मुंह ना लगा,
छूटती नहीं है मुंह से ये काफर लगी हुई!

-राव पाटील

Submitted by राव पाटील on 15 June, 2018 - 10:49

सुरवात सिल्वर टकिला ने
मग ग्लेन्मोरन सिन्ग्ल मॉल्ट ऑन द रॉक्स ,
जेवण
सान्गता: कोनियाक २ भाग, थन्ड पाणी ३ भाग.

Submitted by च्रप्स on 31 July, 2020 - 19:16>>> अहाहा! छान लिहिलंय की.. Wink

अर्थात.. छानच लिहलय...
तीन पेग झालेत.. शुद्धलेखनाच चुका माप करा आज...
चियार्स...

लोकहो.. आज कोणा कोणाकडे टेबल सजणार आहेत?
आमच्याकडे आज ग्रिल्ड पायनॅपल मार्गरिटा.. त्यामुळे आज अननस भाजणार आणि मुकेश वाजणार Happy

आज घुलाम अली वाजेल... एक स्वस्त वाली व्हिस्की आहे... शेवटचे 120ml उरले आहेत..
आज बहुतेक संपवू...

शेवटचे 120ml उरले आहेत..
आज बहुतेक संपवू...
>>>
कितीजण संपवणार आहात १२० ml?
सुदाम्याची व्हिस्की का?

अनेक दिवस हा धागा आणि त्यावरचे अपेयपानाचे प्रतिसाद वाचून उद्विग्न झालो आहे.मला काही तुमच्या आनंदाच्यामध्ये यायचं नाहीए पण कसं वाटतं हे? सभ्य घरातले लोक अपेयपानाचे समर्थन करतात हे काही मनाला पटत नाही. समाजाने निषिद्ध ठरवेलेल्या गोष्टी टाळा मित्रांनो.या धाग्यावरुन रजा घेतो.कुणाला वाईट वाटले असल्यास क्षमस्व पण माझ्यासारख्या जेष्ठ व्यक्तीला बोलल्यावाचून रहावले नाही म्हणून लिहले.

मी या विकांताला सुखा सुखा
असेही श्रावण सुरू असल्याने सहचारिणी साथीला नसते
त्यामुळे एकट्याने बोर होते
आणि काही आणलं पण नाहीये

आशु तुमच्या नावाचा एक पेग आम्ही घेऊ... चियर्स...
केशव अरे रजा नका घेऊ... फारच मनावर घेतले तुम्ही... सगळेच दारू पिऊ लागले तर दारूच्या किमती आकाशाला भिडतील.. न पिणाऱ्यांचे आम्ही आभारच मानतो...

धागा जोरात सुरुय!

काल मॅप्रो रोझ सोबत स्मर्नऑफ ट्राय केली, कातिल टेस्ट जमलेली!

एक जाहीर कबुली आणि धागाकर्त्याचे व भन्नाट प्रतिसादकांचे आभार्स (विशेषतः आशुचॅम्प व राव पाटील)..
कोणासाठी काही असो, पण माझ्यासाठी हा धागा मोठा विरंगुळा मिळण्याचे साधन आहे गेलं दीड वर्ष ! इथे ड्राय स्टेट असलेल्या आखाती देशात वास्तव्यास असल्याने पेयपानाची तल्लफ आली की मी हा धागा उघडून वाचत बसायचो ! (कुणाचं काय तर कुणाचं काय ! Happy )

तर असो , माझ्या २ विटा : "तुम्ही दारू कशी पिता ?"

"एखाद्या रात्री राशिद भाई ना बोलवायचं, मैफिलीची तयारी आणि सहकाऱ्यांचा पिण्याचा व ऐकण्याचा दमसास अंदाज घेऊन अगदी मारुबिहागापासून सुरुवात करायची , "तरपत रैना दिना" झालं कि मग मूड सेट होऊ लागतो, ठेवणीतला यमन काढायचा "कैसो कि करिये " झोकदारपणे घोळवून झालं की "आओ आओ बलमा" सुरु व्हायच्या आत थोडं थांबायचं (कुणीतरी लगेच कोक स्टुडिओ मधलं व्हर्जन भारीये वगैरे सुरु करायचा धोका असतो ,तसं झालंच तर त्याची "ग्लेनफ़िडीच मध्ये थम्सअप टाकतो का भाड्या " म्हणून बोळवण करायची आणि त्याऐवजी "ऐसो सुघर सुंदरवा बालमवा" सुरु करायचं, द्रुत मध्ये तराणा लावायचा म्हणजे मग कोणाला "यमन वर आधारित चित्रसंगीत" असल्या चोथा आठवणी येत नाहीत, फक्त ऐकत राहायचं आणि दाद देत चषक भरत राहायचे .. आता धुंदी चढू लागलेली असते त्याबरोबर रात्र चढू लागली कि पुरिया धनश्री सुरु करायचा, हां इथे मात्र विलंबित नको मध्य लयीत "पायलिया झंकार मोरी" सुरु करायचं मात्रेच्या एकेक आवर्तनाबरोबर माना डोलू लागल्या की भावना मदिरेबरोबर सहज वाहू लागतात , कुणाच्या खोल आत रुतलेल्या आठवणी येतात, खपली धरलेल्या जखमा उघड्या होतात आणि पायलिया म्हणलं कि त्या रुणझुणत्या नुपूरांची शोभा वाढवणारीचा पदन्यास डोळ्यांसमोर फेर धरू लागतो, इथे तुमची कसोटी असते, एवढा उंच बांधलेला मनोरा पडू नाही द्यायचा, समय बलवान है सांगत त्या आठवणीतल्या व्यक्तीची तितकीच असह्य अवस्था सांगायला कौशिकी येतेच चारुकेशी घेऊन "सैंय्या मोरा रे " सुरु होतं आणि मग त्या आळवणीत सगळा निचरा होऊन जातो आणि मग एकदम लख्ख होऊन जातं निरभ्र ! आता जरा जरा हलकं घ्यायचं कारण पावलं आणि डोळे जड व्हायला सुरु झालेले असतात.. अशा अवेळेस लावायचा १० मिनिटांचा हंसध्वनी "लागी लगन पती सखी संग" आणि मग राशिद भाई आपलं विमान हळू हळू जमिनीवर आणायला सुरुवात करतात. एव्हाना मध्यरात्र उलटून गेलेली असते बस्स एक आखरी अशी फर्माईश सुरु झालेली असते पण एकदम ह्या व्यावहारिक जगाला सामोरं जायचं कसं हा तुम्हाला प्रश्न पडलेला असतो अशा वेळेस पटकन भैरवी चा आधार घ्यायचा आणि "जय शारदा भवानी" सुरु करायचं म्हणजे मग आपले वीर "भाई अगली बार गोवा" म्हणत कर्तव्यच्युत न होता "स्साला ये जिंदगी" म्हणत सज्जन पापभिरू माणसांसारखे गपगार होतात किंवा असंच पुढच्या मैफिलीची तयारी करायला लागतात : कोणाला बोलवायच मग मालिनी बाई की अश्विनी भिडे, किशोरीताई, की एकदम वसंतराव-कुमार-भीमण्णा ! "

हे धागाकर्ते कुठे गेले? मागच्या गणपतीला त्यांची आणि हाब यांची चांगलीच जुंपली होती. घेतलं का घर त्यांनी शेवटी?

रश्मिनतेज

भारी हं. एकदा असा चान्स आलेला. जगजीत सिंग ह्यांचा नागपुरात लाइव्ह कॉन्सर्ट होता, तेव्हा कुठल्याश्या हॉटेलमध्ये . अप्रतीम माहोल जमलेला. गझल, कडाक्याची नागपुरची थंडी अन व्हिस्की (ब्लेन्डर्स की ब्लॅकडॉग आठवेना आता, १० वर्स झालीत/)

Pages