Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
पण हा लॉकडाऊन जास्तीत जास्त
पण हा लॉकडाऊन जास्तीत जास्त लोकांची दारू सोडवावे हिच मनापासून ईच्छा
<<
अमेरिकेतील प्रोहिबिशन.
आपल्या माहितीसाठी व ज्ञानवृद्धीसाठी सविनय सादर.
टी.एल.डी.आर. आधिच देतो : असल्या दारूबंद्या करून दारू जात नाही.
(*TLDR : Too Long Didn't Read : आजकालच्या इन्स्टन्ट माहिती जमान्यात लिहिलेला लेख्/संदर्भ उतारादेखिल वाचण्याची तसदी न घेणार्यांसाठी 'सार' द्यायची पद्धत निघाली आहे. याला टीएल्डीआर म्हणतात)
बादवे, यातील हा परिच्छेद चित्तवेधक आहे :
The Ku Klux Klan talked a great deal about denouncing bootleggers and threatened private vigilante action against known offenders. Despite its large membership in the mid-1920s, it was poorly organized and seldom had an impact. Indeed, the KKK after 1925 helped disparage any enforcement of Prohibition.[99]
आता कू क्लक्स क्लॅन हे अती अती अतीच उजवे होते, याबद्दलच्या लिंका देण्यात ज्यूस नाही.
प्रमाणाची मला कल्पना नाही.
प्रमाणाची मला कल्पना नाही. थंडाई की काय दुधाचे सरबत असते त्यातून देणारयांनी दिलेले. पुढचे बरेचसे आम्हाला (मी आणि माझ्या मित्राला) आठवतही नाही. कधी गप्पांमध्ये विषय निघतो तेव्हा जनता किस्से सांगते आमचे.
माफक प्रमाणात घेतलेली भांग शरीराला कही फायदा देत असेल तर ठिक अन्यथा कश्याला घ्यायची.
त्यानंतरही मला बरेच जणांनी सांगितले की भांगेची नशा सर्वात वाईट पुढे कधी पुन्हा घेऊ नकोस
फायदा होण्यासाठी नाही
फायदा होण्यासाठी नाही
एकदा अनुभव घ्यायचा आहे
खूप जणांकडून किस्से ऐकलेत
जिम बीम चिप बॉरबॉन आहे म्हणून
जिम बीम चिप बॉरबॉन आहे म्हणून मी कोक घालून पितो...
लवकर लॉकडाऊन संपो... आपण वर्चुअल मेहफिल जमवू...
मी डबल ब्लॅक चे दोन पेग अगदी
मी डबल ब्लॅक चे दोन पेग अगदी राखून ठेवले आहेत
लॉक डाऊन संपेल किंवा कोरोना चे सावट गेले की उघडणार आहे
करोनाचे विषाणु घश्यातून पुढे
करोनाचे विषाणु घश्यातून पुढे फ़ुफ़ुसात जाऊ नए म्हणून गरम पेय प्यायचे असे बोलतात मग त्याला पर्याय म्हणून घोटभर हे अपेय सरकवले घश्यात तर त्यातील अल्कोहोल सॅनिटायझर इफेक्ट देईल का !
― एक भाबडा प्रश्न
------------
लॉक डाऊनच्या काळात खरंच सगळी पियक्कड़ मंडळी आपापला स्टॉक संपल्यावर एकही थेंब न घेता राहु शकली तर ते व्यसन सुटले म्हणावे की मुळातच ज्या गोष्टीमुळे थोडं हळहळण्या पलीकडे काही फारसे घडले नसेल तर त्याला व्यसन तरी का म्हणावे ?
एकदा अनुभव घ्यायचा आहे
एकदा अनुभव घ्यायचा आहे
खूप जणांकडून किस्से ऐकलेत
>>>>
मग जो पिणार असेल त्याच्या सोबत राहून अनुभव घ्या.
भांग पिणे म्हणजे स्वत:चा माकड करणे आणि लोकांना मजा देणे. त्यांना छान अनुभव मिळतो. माझ्या तर लक्षातही नाहीये त्या चढलेल्या काळात केलेले माकडचाळे.
मला आता शेवटचा घोट घेऊन सव्वा
मला आता शेवटचा घोट घेऊन सव्वा महिना झाला
कपाटात डबल ब्लॅक आहे पण कंट्रोल केलं।आहे
किमाम पान पण खायची सवय होती रात्री जेवण झाल्यानंतर
पण तेही बंद होऊन जमाना झाला
तल्लफ येते पण असे विद्रावल सिम्तम्स काय जाणवले नाहीत
कारण आपण कुणीही कोणत्याही
कारण आपण कुणीही कोणत्याही गोष्टींच्या आहारी गेलो नाही. अनेक लोकांना कोणतेही व्यसन असते, झोपताना बाम लावण्यापासून ते बालिश धागे विणण्यापर्यंत.. आपण कोणतीही अमुक एक गोष्ट सवयीने केल्याशिवाय राहू शकतो म्हणजेच आपण आहारी गेलो नाही!
हो ना
हो ना
चांगलं वाटतंय त्यामुळे
शौक आणि व्यसन यातली सीमारेषा ओळखून त्याच्या आत राहिल्यामुळे
असेही मी आजवर कधीच रु म्हणतो तसे स्वतःचे माकड होऊ दिले नाहीये दारू पिऊन
कायमच एक प्रमाणात प्यालो
हलके नशा पुरेशी असते, त्यांनतर कितीही प्यालो तरी काय उपयोग नसतो, ते केवळ शरीरावर वर अत्याचार असतो
जिम बीम चिप बॉरबॉन आहे म्हणून
जिम बीम चिप बॉरबॉन आहे म्हणून मी कोक घालून >>>>>>अरे देवा,मी हे मगाशी पण रु च्या कोणत्यातरी धाग्यावर वाचले,आणि बॉरबॉन बिस्कीट वाटलं मला,
ते सुद्धा बिस्कीट दारूमध्ये बुडवून वगैरे असं काहीतरी विचित्रच आलं डोळ्यासमोर आणि ते काही पचनी पडेना शेवटी ते सगळं उपहासाने लिहिलं असावं समजून सोडून दिलं
होतं
कुछ तो गुनाह किए होंगे हमनें
कुछ तो गुनाह किए होंगे हमनें भी..
वरना विस्की के मौसम में
काढ़ा कौन पीता है...
आता कशाला काढा पिताय
आता कशाला काढा पिताय
मधल्या काळात स्टॉक करून ठेवलाय आता
डबल ब्लॅक उघडला का ?
डबल ब्लॅक उघडला का ?
हो निम्मा उरलाय
हो निम्मा उरलाय
उरलेला आता पूर्ण लॉक डाऊन संपेल त्या दिवशी जल्लोष करायला ठेवला आहे
पावसाळ्यात कुमक म्हणून दारूगोळ्याच्या कोठारात
ओल्ड मॉंक आणि बकर्डी ब्लॅक भरून ठेवली आहे
शिवाय गोवन स्पेशल हुराक पण आहे
याला म्हणतात दूरदृष्टी ..
याला म्हणतात दूरदृष्टी ..
अजिंक्यराव अजून पण स्टॉक करून ठेऊ शकता... वेळ गेलेली नाही...
गावी आलोय, इथं काहीच शक्य
गावी आलोय, इथं काहीच शक्य नाही. आता पुण्यात पुन्हा पोचल्यावरच पुनःश्च हरिओम! येते २ महिने पण इकडेच निघणार बहुधा..
गावी तर स्थानिक चवीची मिळत
गावी तर स्थानिक चवीची मिळत असेल की
महुआ... पण मी फक्त पुण्यातच
महुआ... महाराष्ट्र- तेलंगण बॉर्डरपासून ४० किमीवर, जंगलांनी वेढलेलं आहे माझं गाव, गोंड माडिया लोकांच्या अस्सल भट्टीत बनते मोहाची दारू तिथे. वासानं फेफरं येईल असा कडक माल!
पण मी फक्त पुण्यातच पिणारा आहे, गावाकडे माझी ओळख अगदी विरुद्ध टोकाची आहे !
महुआ प्यायची आहे एकदा
महुआ प्यायची आहे एकदा
आठवण
आठवण
पाऊस हुलकावणी देतोय
पाऊस हुलकावणी देतोय
आज तुंबाड पाऊस पडेल म्हणून बेत करावा त्या दिवशी अगदी छटाकभर पाऊस
मग रम खुलत नाही राव
कुठे पावसाची वाट बघताय...
कुठे पावसाची वाट बघताय...
ओल्ड मॉंक ला माहोल लागत नाही... ओल्ड मॉंक स्वतःच माहोल बनवते...
अय अय अय
अय अय अय
काय हे
दारू कशी प्यायची याच शिक्षण ललितलेखन मध्ये ??
मी तर म्हणतो एवढे रिप्लाय आलेच आहेत तर, एक शिबीरच घेऊन टाकू यावर.
आमच्या सारख्या नवख्यांसाठी
वीकेंडला आमच्या इथल्या
वीकेंडला आमच्या इथल्या दारूच्या दुकानात ओल्ड माँक दिसली. दोघांनी एकमताने आणली लगेच. आता मित्र मंडळी कधी बोलावता येतील याची वाट पाहतोय
आता मित्र मंडळी कधी बोलावता
आता मित्र मंडळी कधी बोलावता येतील याची वाट पाहतोय Happy>. अहं एक मैं और एक तूच करा.
दारू कशी प्यायची याच शिक्षण
दारू कशी प्यायची याच शिक्षण ललितलेखन मध्ये ?? Lol दारू कुठेही चालते
परवाच एका मित्राच्या लग्नाला
परवाच एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. खेड्यावर लग्न. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने स्वतः होऊन त्याच्या शेतातल्या कामचलाऊ खोपटात आम्ही चौघे पोचलो. हळदीचा कार्यक्रम दुपारिच आटोपलेला. मदिरेच्या योग नव्हता खरं तर. पण अस्मादिकांनी त्यांच्या अट्टल मित्रासोबत नेत्रपल्लवी करून गाडी काढलीच. सांधायकलचे ४.३०-५ झाले असतील. चाळीसगावला पोचून दारूचे दुकान शोधण्यात तासभर लागला. शटर बंद होता होता दुपटीपेक्षा जास्त पैसे मोजून ओल्ड मॉंकचा खंबा घेतला. याबाबतीतही एक गम्मतच आहे. ह्या भागात rc, rs, OC, आणि सर्वाधिक चालणारा मॅकडॉल .. मोठ्या मेहनतीने ओल्ड मॉंक भेटला. परत येताना ताजे मासे आणि चिकन फ्राय घेतलं. दुपारी पाऊस येऊन गेला असला तरी आभाळ तेव्हा निरभ्र झालेलं. काळोख व्हायला लागला तसे शेतात पोचलो. एव्हाना बाकी दोघांनी नवरदेवाला फोन करून थोडाफार मसाला, प्लेट्स आणि एका तव्याची सोया करून ठेवली होती. पुण्याला जुजबी कूकिंग अनुभव असलेला मी. मासे फ्राय करायला बसलो. अर्थात खोपटाच्या बाहेर थोडा आडोसा होता. तिथं एक बारकी चूल होती. खोपटात काही सुकी लाकडे होती. आम्ही तिथेच मैफिल जमवली. नवरदेव सुद्धा येऊन बसला. मग होस्टेलच्या आठवणी जागवत, सिप बाय सिप ओल्ड मॉंकचा आस्वाद घेत मासे फ्राय करत झकास पैकी ३ तास मजा केली.
(काल्पनिक: मित्राचे लग्न पुढच्या महिन्यात आहे. सदर प्रसंग "घडवून" आणायची इच्छा असल्याने अट्टल मित्राला पाठवण्यासाठी लिहिलेला आहे.)
माझा नवरा काही दारू पित नाही
माझा नवरा काही दारू पित नाही त्यामुळे मला एकटीलाच ही जबाबदारी पार पाडावी लागते.. मग दर शुक्रवारी आपल्या फ्रिझर मधली ‘ब्रिझर’ घेते , आनंदाने ‘१०० पाईपची’ तुतारी वाजवते, कोरोनाच्या आठवणींना ‘स्मरणॲाफ’ करून टाकते आणि मस्त टकटक ‘टकीला’ मारत ‘जाॅनी वाॅकरच्या’ चालीत बेडवर जाऊन गुमान झोपते
म्हाळसा खरेच हे ईतके सारे
म्हाळसा खरेच हे ईतके सारे घेता का?
मला लहानपणापासूनच मद्यपान करणार्यांबद्दल एक अतीव आदर वाटत आला आहे.
Pages