महिन्यातून एकदा ऑफिस संपल्यानंतर ऑफिसच्याच टेरेस वर रात्री जमून भोजनाचा आनंद घेत उशिरा पर्यंत गप्पा मारणे हा आमचा त्या वेळचा प्रघात होता. आमचा 4 मित्रांचा चमू होता. त्यातलाच एक मुस्लिम मित्र घरून सामिष पदार्थ घेऊन यायचा आणि त्याचा आस्वाद घेत आमच्या गप्पा रंगायच्या. एका रात्री असाच तो मित्र याखनी पुलाव घेऊन आला होता. टेरेस कडे जातच होतो तेवढ्यात मी पाहिले की आमच्याच ऑफिसचा एक सीनियर डेव्हलपर एकटाच काम करत बसला होता. मी त्याला आमच्या सोबत यायचा आग्रह केला. तो आधी तयार नव्हता पण नंतर तयार झाला. त्या रात्री गप्पा अचानक भुतांच्या विषयावर आल्या. अर्थातच आम्ही ऐकीव कथा मीठ मसाला लावून एकमेकांना सांगत होतो. आमचा तो सीनियर डेव्हलपर बाजूला शांत बसून आमच्या गप्पा ऐकत होता. रात्र जशी वाढली तसं आम्ही आवरायला घेतलं आणि खाली निघणार तेवढ्यात तो मित्र म्हणाला की त्याला एक अनुभव सांगायचं आहे. त्याच्या अनुभव कथनानंतर आम्ही परत कधीच टेरेसवर रात्री जेवण करायचं धाडस केलं नाही.
अभयची (सीनियर डेव्हलपर) काम करायची पद्धत अजब होती. तो दुपारी 1 वाजता ऑफिसला यायचा आणि रात्री उशिरा पर्यंत काम करत बसायचा. तो एकलकोंडा होता आणि प्रोजेक्टवर एकटाच काम करणं पसंत करायचा. एका रात्री तो असाच उशिरा पर्यंत काम करत बसला होता. रात्री 1 वाजता तो घरी जाण्यास निघाला. तो एका अवघड प्रोजेक्ट वर काम करत होता आणि निघतानी पण एका क्लिष्ट लॉजिक बद्दल विचार करत होता. आमचं ऑफिस 8व्या मजल्यावर आहे. लिफ्ट मधून खाली येत होता तेवढ्यात लिफ्ट चौथ्या मजल्यावर थांबली. लिफ्टचा दरवाजा उघडला. समोरच्या पोर्च मध्ये अंधुक प्रकाश होता आणि एक लहान मुलगा फुटबॉल लाथेने भिंतीवर मारायचा खेळ खेळत होता. मुलगा पाठमोरा होता. थोड्यावेळाने लिफ्टचं दार बंद झालं आणि लिफ्ट बेसमेंटच्या पार्किंग मध्ये आली. तो त्याच्या गाडीकडे निघालाच होता की त्याला अचानक धक्का बसला. त्याने थोड्यावेळ पूर्वी पाहिलेले दृश्य तो परत आठवू लागला. रात्रीच्या एक वाजता एक कमर्शियल बिल्डिंग मध्ये लहान मुलगा कसा असू शकतो. ते पण अशा मजल्यावर जो खूप वर्षे बंद आहे. होय, इमारतीतले बाकी मजले इतर कंपनीच्या ऑफिसेसनी व्यापले होते. एकच चौथा मजला रिकामा होता. बरीच वर्षे तो असाच रिकामा पडला होता. इमारतीची लिफ्ट मध्ये पण 4 आकडा डिझेबल केला होता. म्हणजे लिफ्ट कधीच चौथ्या मजल्यावर थांबत नसे. अभयला पार्किंग मध्येच दरदरून घाम फुटला. एवढ्या रात्री पूर्ण पार्किंग रिकामे होते आणि त्याची गाडी बरीच आत होती. तो घाबरला होता आणि गाडीकडे जाण्याची त्याची हिंमत नव्हती. तो गाडी कडे न जाता धावत बिल्डिंगच्या security gate कडे गेला. तिथे एक security guard कडे बघून त्याला जरा बरे वाटले. तिथे जाऊन तो थोडा वेळ बसला. गार्डला वाटले की त्याची तब्येत ठीक नाहीये. गार्डनी त्याची विचारपूस केली. तो काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. त्याने गार्ड कडे पिण्यास पाणी मागितले. त्याचा आणि गार्डचा संवाद पुढे देत आहे,
गार्ड - ' सर आपकी तब्येत ठीक है ना? हॉस्पिटल जाना है क्या? मै लेके जा सकता हु'
अभय - 'नही'
मधला काही काळ शांत गेला. केवळ आजूबाजूला माणसाच अस्तित्वच त्याला समाधान देत होतं. गार्ड त्याच्या हालचाली न्याहाळत होता. त्याच्या अस्वस्थ हालचालीवरून गार्डला काही शंका आली. थोड्यावेळाने गार्डनी त्याला विचारले,
गार्ड - 'सर आपने कुछ देखा क्या? '
ह्यावर अभय शांत बसला. त्याला सांगावे की नाही ह्या विचारात तो होता.
गार्ड - ' चौथा माला? '
अभय आ वासून त्याला पाहताच राहिला. गार्डच्या लक्षात आले की ' चौथे माले' ची केस आहे. त्याने पुढे सांगायास सुरू केले की बिल्डिंग मध्ये काम करत असलेल्या हाउस किपिंग, security सगळ्यांना चौथ्या माजल्या बद्दल माहिती आहे आणि सगळे तिथून दूर राहतात. बिल्डिंग administration कडून त्यांना सक्त ताकीद होती की काम करत असलेल्या कर्मचार्यांसोबत ह्या बाबतीत कोणी काही अफवा(? ) नाही पसरवणार.
ह्या नंतर अभय गार्ड सोबत पार्किंग मध्ये गेला आणि नंतर घरी. त्या नंतर तो बरेच दिवस ऑफिसला नाही आला. ह्या घटने बद्दल तो कंपनीच्या काही सीनियर लोकांशी बोलला. त्याला काही दिवस घरून काम करायची सूट मिळाली. नंतर तो ऑफिसला येऊ लागला पण एकटं थांबणं टाळू लागला. सर्वात उशिरा ऑफिस मधून बाहेर पडणारा आमचाच ग्रुप असायचा म्हणून तो एवढ्यात थांबू लागला होता.
त्याचा हा अनुभव ऐकून अर्थातच आम्ही सगळे खूप घाबरलो होतो. त्या रात्री लिफ्ट मधून खाली जातांनी हृदयाची धडधड प्रमाणा बाहेर वाढली होती. चुकून जरी लिफ्ट चौथ्या मजल्यावर थांबली असती तर एक दोघांचे तरी हृदय बंद पडले असते.
तुमचे पण असे काही अमानवीय अनुभव असतील तर इथे टाकावेत.
भुतंखेतं
Submitted by जिन्क्स on 26 July, 2020 - 12:38
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एक मोठा लांबलचक धागा ऑलरेडी
दोन मोठे लांबलचक धागे ऑलरेडी आहेत
एकात 2000 झालेत
हा दुसरा
https://www.maayboli.com/node/66431
भूतराजा भूतराजा
तुमचे पण असे काही अमानवीय
तुमचे पण असे काही अमानवीय अनुभव असतील तर इथे टाकावेत>> बोकलत यांना बोलवा.
बोकलत यांना बोलवा.>> धाग्याची
बोकलत यांना बोलवा.>> धाग्याची वाट लागेल मग..
खरोखर घडली असेल तर एकदम डेंजर
खरोखर घडली असेल तर एकदम डेंजर कथा आहे. चांगल्या रितीने मांडली आहे..
एक सुचना : आमचा 4 मित्रांचा चमू होता. त्यातलाच एक मुस्लिम मित्र घरून सामिष पदार्थ घेऊन यायचा .
-- येथे मुस्लिम लिहीण्याची गरज वाटत नाही. कथेचा नंतर कोठल्याही धर्माशी संबंध येत नाही त्यामुळे ह्या शब्दाची गरज नव्हती.
भारी लिहिलंय पण त्या इमारतीचा
भारी लिहिलंय पण त्या इमारतीचा नाव-पत्ता दिला तर आणखी भारी होईल.
अनुभव भारी आहे
अनुभव भारी आहे
बोकलत यांना बोलवा.>>
बोकलत यांना बोलवा.>>
नाही .नाही . थोडा तरी आदर दाखवा
बोकलत यांना आवाहन करा. असे पाहिजे.
कामाचार्यांसोबत ह्या बाबतीत
कामाचार्यांसोबत ह्या बाबतीत कोणी काही अफवा------->>>>.
बापरे. कामाचार्य
जायलाच पाहिजे तिथे
हा बघा आलोच. मी काही
हा बघा आलोच. मी काही वर्षांपूर्वी एका कंपनीत काम करायचो तिथे सुद्धा तिसरा मजला असाच भकास आणि अंडर कन्स्ट्रक्शन होता. कंपनीच्या ऍन्यूअल फंक्शनची प्रॅक्टिस करायला आमचा ग्रुप जायचा तेव्हा गेलो होतो तिथे एक दोन वेळा. खूपच भकास जागा. सतत आपल्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे असा भास व्हायचा. रात्री सिक्युरिटीला तिथे कोणीतरी फिरण्याचा आवाज यायचा. रात्र झाली की कोणी फिरकायला मागत नसे त्या एरियात.
बापरे. कामाचार्य
बापरे. कामाचार्य
कर्मचार्यांसोबत असं पाहिजे होतं. बदल केला आहे.
अनुभव भारी आहे>>>>++११११
अनुभव भारी आहे>>>>++११११
रात्र झाली की कोणी फिरकायला
रात्र झाली की कोणी फिरकायला मागत नसे त्या एरियात.>>> पण मी माझी नाईट शिफ्ट असताना मुद्दाम रात्री दोन वाजता तिथे गेलो होतो. सगळीकडे सामसूम होती. सुई पडली तरी आवाज येईल येईल एव्हडी पीन ड्रॉप शांतता होती. मी गेल्याचे समजताच त्या शक्तीने आपल्या हालचाली सुरू केल्या. सोसाट्याचा वारा सुटला दरवाजे जोरजोरात वाजायला लागले. अदृश्य रुपात ती शक्ती वेगाने माझ्याभोवती फिरू लागली. मी त्या शक्तीच्या हालचाली सहज पकडू शकत होतो पण मी तसं जाणवून न देता तसाच पुढे जात राहिलो. थोडं पुढे गेल्यावर मला एक अंधारी अडगळीची खोली दिसली. त्या खोलीकडे जाताच ती शक्ती अजून पिसाळली. आता वेगवेगळे चित्रविचित्र आवाज काढायला लागली. मी त्या खोलीत प्रवेश करताच दरवाजा धाडकन बंद झाला आणि ती अमानवीय शक्ती माझ्यासमोर प्रकट झाली.
क्रमशः...
नाही .नाही . थोडा तरी आदर
नाही .नाही . थोडा तरी आदर दाखवा
बोकलत यांना आवाहन करा. असे पाहिजे.>>
साधे आहेत हो ते. फक्त हाक मारली तरी धावत येतात. बघा आता इथे येऊन धागाच ताब्यात घेतला.
(No subject)
साधे आहेत हो ते. फक्त हाक
साधे आहेत हो ते. फक्त हाक मारली तरी धावत येतात.>>.>>
हे मला माहित नव्हते. मला नेहमी वाटायचे
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम्। पूजां श्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर॥
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं। यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्मतु।
पण आपण हा दुसार्यांचा धागा हाय जॅॅक करत आहोत, हे बरंं नाही.
बोकलत , तुम्ही एक नवा धागा काढा . तेथे आपण यथेछ धुमाकूळ घालू .
बोकलत हे मायबोलीच्या अमानवीय
बोकलत हे मायबोलीच्या अमानवीय नावाच्या फांदीवरले वेताळ
आहेत.
आणी स्वतः संचार करायला मोकळे होतात.
अमानवीय फांदीवर जो कोणी लटकायला येतो, त्याला ते मोठ्ठाले झोके देतात.
धाग्याचा ऑलरेडी विचका झालेला
धाग्याचा ऑलरेडी विचका झालेला आहेच. तेव्हा सर्वांचेच चालू द्यात.
@रश्मी, भारीच
@रश्मी, भारीच