पाऊस

Submitted by rajeshnaik65 on 14 July, 2020 - 03:08

बेधुंद वारा
संतत जलधारा

भिजूनी चिंब
न्याहळी प्रतिबिंब

सुखद हा गारवा
हातात तुझा हात हवा

झुगारून सारी बंधने
उमगती अबोल स्पंदने

झिरपता केसातून ओहोळ
उठवती आठवणींचे मोहोळ

थेंब थेंब अलगद झेलता
विसरवी साऱ्या जगाला

खरच पावसा किती ही तुझी हुकूमत
स्वप्नांनी फुलवी रित्या मनाचा आसमंत

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>खरच पावसा किती ही तुझी हुकूमत
स्वप्नांनी फुलवी रित्या मनाचा आसमंत>>> वाह!!! हुकुमत अगदी चपखल शब्द!