Submitted by किमयागार on 21 July, 2020 - 00:41
तुला वाटते का मला आठवावे
उराशी जरा भास माझे जपावे
जरी भंगली लाख स्वप्ने तुझी ती
तरी लोचनी स्वप्न माझे उरावे
तुझी याद येता कधी सांजवेळी
तुझे गीत मी सारखे आळवावे
फुलांनी फुलावे ऋतुंनी सजावे
तुझे श्वास हृदयात माझ्या रुजावे
अशी कोणती प्रेरणा ही तुझी की
पुन्हा इंद्रियांना नवे भान यावे
तुझ्या रोमरोमांतुनी सांडणारे
तुझे चांदणे तू मला पांघरावे.
तुला सांगतो गूज 'मयुरेश' त्याचे
तुझे गूज ही तू तया ऐकवावे.
--------©मयुरेश परांजपे----------
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर
सुंदर
धन्यवाद द्वैत
धन्यवाद द्वैत
"तुझे श्वास हृदयात माझ्या
"तुझे श्वास हृदयात माझ्या रुजावे" --> निःशब्द!!
शेवटचे दोन खयाल तर अतिहृद्य
नावातच किमयागार !
आयुष्यात तुला काय हवं ते सगळं
आयुष्यात तुला काय हवं ते सगळं मिळो !
खरं तर मला कल्याणमस्तू म्हणायचं होत
पण तेवढी माझी लायकी नाहीये रे :"(
इंद्रियांना चांदणे सुंदर!!!
इंद्रियांना
चांदणे
सुंदर!!!
खूप खूप धन्यवाद प्रगल्भ जी
खूप खूप धन्यवाद प्रगल्भ जी
धन्यवाद रोहित कुलकर्णी जी
धन्यवाद रोहित कुलकर्णी जी