थालिपीठ **
१. दोन ते अडीच वाटी शिंगाड्याचे पीठ
२. दोन वाटी राजगीऱ्याचे पीठ
३.२ उकडलेले बटाटे
४.हिरव्या मिरच्या ४-५
५. आल्याचा तुकडा
६. जिरे चमचाभर
७. मीठ (सैंधव किंवा नेहमीचे )
८. दाण्याचा कूट अर्धी वाटी
९. तेल
१०.दोन तीन मोठे चमचे दही
११.Aluminium foil
चटणी**
१. अर्धी वाटी शेंगदाणे
२.अर्धी वाटी पाणी
३.अर्धी वाटी दही
४. २-३ हिरव्या मिरच्या
५.आल्याचा तुकडा
६.मीठ व साखर
७.फोडणीसाठी तूप व जिरे.
चटणी*
सर्व साहित्य मिक्सर मधून फिरवून घ्या. व फोडणी टाका. घट्ट पातळ आवडीनुसार करा मी थोडी मध्यम ठेवते .उपवासासाठी तूप जिरे फोडणी करून घाला. मी तेल- मोहरी फोडणी केली आहे कारण आमच्या घरी कोणी उपास करत नव्हते.
थालिपीठ*
मिरच्या, चमचाभर जिरे व आले मिक्सर मधून काढून पिठात टाका. सर्व साहित्य एकत्र करून थोडे पाणी घालून तिंबून घ्या.
नेहमीच्या थालिपीठा प्रमाणे. व foil च्या मदतीने थापवून तव्यावर दोन्ही बाजूला तेल घालून भाजून घ्या. Foil ला सुद्धा एक थेंब तेल लावून पसरवून घ्या म्हणजे लवकर वेगळे होऊन तव्यावर टाकताना सहज निघेल.
टाकल्यावर आच मध्यम ठेवून झाकावे व चुर् हा नेहमीचा आवाज आला की उलटून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यावे. दोन्ही बाजूला अर्धा चमचा प्रत्येकी तेल घालावे.
मी थोडी तुपाची बेरी घातली मोहन म्हणून... वाटी लोळत होती व रिकामी करून धुवायची होती म्हणून! तुम्ही एक चमचा तूप/ तेल काहीही घालू शकता.
*******
*
*
*
*
*
*
*
*
*
*
दही बटाटा व दाण्याचे कूट यामुळे खूप खुसखुशीत होते. मुलांना आवडते व वेगवेगळी पीठं पोटात जातात. नेहमीच्या थालिपीठापेक्षा पचायला हलके आहे. तसे पटकन होते.
**आम्ही उपवासाचे पदार्थ रुचीपालट म्हणून खातो. एवढ्या साहित्यात पोळीपेक्षा लहान व पुरीपेक्षा मोठी अकरा थालिपीठं झाली.
धन्यवाद
आहाहा.. मस्तच.
आहाहा.. मस्तच.
निव्वळ यासाठी उपवास करु शकते हो मी.
अह्हा तोंडाला पाणी सुटलं
अह्हा तोंडाला पाणी सुटलं थालीपीठ बघून, मी सुद्धा उपासाची भाजणी बनवून स्टोर करते ३/४ महिने
शनिवारी देते लेकाला नाश्ता म्हणून.
Mastach I use readymade
Mastach I use readymade chitale/ bedekar /kepra upwas bhajani .add bits of sabudana and dahi or buttermilk to the mix. Favourite food with chitale dahi
मस्तच दिसतंय दोन्ही!
मस्तच दिसतंय दोन्ही!
वाह छान दिसतेय. फाईव्ह स्टार
वाह छान दिसतेय. फाईव्ह स्टार लूक आलाय
मला दही वगैरे बरोबर काही आवडत नाही. फक्त तुपात बरबटलेले असावे
अन्यथा तिखट करून चहासोबत..
वाह
वाह
मस्त
ही रिक्षा
https://www.maayboli.com/node/66893
मस्त रेसिपि. उद्याच करून बघेन
मस्त रेसिपि. उद्याच करून बघेन.
मी पण रूचिपालट म्हणून
मी पण रूचिपालट म्हणून बटाट्याच्या ऐवजी 1 काकडी किसून टाकते बाकी जिन्नस तेच.
धन्यवाद चिन्मयी, मी पण !
धन्यवाद चिन्मयी, मी पण
! काय हवं ते खा लाड पुरवून घे स्वतः चे.
धन्यवाद dodo14 , कल्पना चांगली आहे.
धन्यवाद अमा, मला कुठले मिळायला केप्र , म्हणून असेच करते.
धन्यवाद वावे .
धन्यवाद ऋन्मेष. तूप / लोणी काहीही चालते मला
धन्यवाद किल्ली.
धन्यवाद म्हाळसा, जरूर करा आणि इथे सांगा व फोटो टाका.
धन्यवाद सियोना, काकडी पण ट्राय करणार पुढच्या वेळी !
सर्वांना धन्यवाद.
:तोंपासु बाहूला:
:तोंपासु बाहूला:
श्रावण महिना चालू, आता माझी चंगळ.
@अस्मिता, आम्ही चटणी साठी लाल तिखट वापरतो. थालीपिठाला चार कोपर्यात चार आणि मध्यभागी एक अशी पाच भोक. लवकर शिजते आणि खमंग होते.
कधी कधी लाल मिरच्या वापरते,
कधी कधी लाल मिरच्या वापरते, सध्या हिरव्या मिरच्या कधी मिळतात कधी नाही.
,कारण दह्यामुळे फारच ठिसूळ होते. पण पुन्हा बघते प्रयत्न करून. धन्यवाद.
तसे केले की माझे तुटते पाफा
(No subject)
नाहीतर याच्या १/३ साईजचे मधे १ भोक बिस्किट पेक्षा मोठे. टिफीन ला उपयोगी साईज.
एका तव्यावर ४ थालीपिठ. ट्राय करा. कदाचित थोडे अधिक खेळावे लागेल
छोटे पातळ कटलेट्स झाले आता तर
छोटे पातळ कटलेट्स झाले आता तर
...माझी आज्जी करायची तसे!!
गाजराची पुंगी, वाजली तर वाजली
तसेही पोटात जाणार. हाकानाका.
वाह कसलं यम्मी दिसतंय, उचलून
वाह कसलं यम्मी दिसतंय, उचलून खावंसं वाटतंय.
मी सरळ उपासाची भाजणी विकत आणून करते. चटणी करून बघेन अशी.
मस्त दिसतंय
मस्त दिसतंय
श्रावण सुरू झालाय. उपवास
श्रावण सुरू झालाय. उपवास थालीपीठ फारच गरजेचा पदार्थ.
भारी आहे हा प्रकार .
भारी आहे हा प्रकार .
मस्त!
मस्त!
धन्यवाद पाफा , अन्जुताई, अनु
धन्यवाद पाफा
, अन्जुताई, अनु, किशोर मुंढे, चिन्नु.
सर्व प्रतिक्रियांंबद्दल आभार.