सवय

Submitted by मन्या ऽ on 19 July, 2020 - 10:23

सवय

एखाद्याला बाबारे तु जसा आहेस तसाच रहा! अस म्हणुन आपण स्विकारतो(?) त्या माणसाला आपल्या आयुष्यात..
मग तो मनुष्य कोणीही का असेना. आई-वडिल,भाऊ/बहीण, नवरा-बायको अगदी कोणीही!
पण कालांतराने आपल्याला त्याच माणसांच्या बारीक-सारीक गोष्टी का बर खटकु लागतात? का होत असाव अस?
विचार केल्यानंतर देखील मला मिळालेली उत्तरे. मला स्वतःलाच पटत नाहीत.
पहिलं उत्तर सवय!
जुनी लोक म्हणतात " जित्याची खोड मेल्याशिवाय सुटत नाही." पण हे खरं मानलं तर
शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेला 21 दिवसांचा दावा! तो कसा खोटा ठरवावा?
जाऊदे. मरुदेत.. तो सवयीचा विचार करता करता "माझी अतिविचार करायची." सवय मला परत लागायची..

-दिप्ती भगत
१४ मे,२०२०

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मन्या फार म्हणजे फार त्रोटक लिहीलयस. याचा विस्तार केलेलं तुझं म्हणणं नीट ऐकायला आवडेल.
एखाद्याची सवय तर होतेच पण संघर्षाला तेव्हा सुरुवात होते जेव्हा आपण त्या व्यक्तीला 'टेकन फॉर ग्रांटेड' करु लागतो आणि जजही करु लागतो. एखादी व्यक्ती ओळखीची झाली की / अ‍ॅक्सेसिबल झाली की आपल्याला तिला जज करण्याचा हक्क मिळतो हा जो आपला ग्रह होतो तो चूकीचा असतो. मला तर वाटतं, की आपल्यात व समोरच्या व्यक्तीत नेहमी एक पातळ दुराव्याचा पडदा जरुर ठेवावा. ज्यामुळे आदर अबाधित रहातो. अर्थात मला ते जमत नाही. पण एकंदर हे नीरीक्षण आहे.

एखादी सवय लागायला 21 दिवस लागतात सातत्याने केलं तर
>>>>>>>
हो पण काय कुठली सवय काहीही कॅटेगराई़ज न करता सरसकट २१ दिवस हा आकडा शास्त्रज्ञांनी हिंदू मायथोलॉजीमधून घेतल्यासारखे वाटतेय Happy

पण कालांतराने आपल्याला त्याच माणसांच्या बारीक-सारीक गोष्टी का बर खटकु लागतात? का होत असाव अस?>> जसे जसे तुम्ही पूर्ण अ‍ॅड्ल्ट होण्याकडे वाटचाल करता तसे तसे इतरांची गरज कमी होत जाते. मग पहिले ज्या बाबी प्रेमाखातर दुर्लक्षित होत्या त्या खटकू लागतात नॉर्मल आहे हे. फुकट काँप्रमाइज करणे मन मारून जगणे वगैरे वेस्ट आहे.

पन फेस बुक स्टेट स पण नाही इतक्या कमी शब्दांचा धागा का बरे काढला असावा ह्यांनी?

@ॠन्मेष, कुठलीही सवय डेव्हलप होण्यासाठी कमीत कमी 18 ते 90 जास्तीत जास्त दिवस लागतात.. सरा‌सरी 60 दिवस.. यातले सुरुवातीचे काही दिवस खूप महत्त्वाचे असतात.. तेच हे 21 दिवस.

@ मंजूताई, २१ दिवसच असं नाही.. वर म्हटले तसं हे दिवसांच गणित प्रत्येकाच वेगवेगळे असू शकतं‌. ते प्रत्येकाच्या कॅपाबिलिटीनुसार बदलत जाते..

@सामो, फार त्रोटक लिहील्या गेलंय. मान्य.. हा पिटुकला लेख माझ्या मनातले वेगवेगळे धावते विचार एकत्र बांधून ठेवायचा एक केविलवाणा प्रयत्न आहे.असं तु म्हणू शकते.. यात वेगळं असं सांगण्यासारखं काही नाही.. Happy
<<<दुराव्याचा पडदा जरुर ठेवावा. ज्यामुळे आदर अबाधित रहातो. अर्थात मला ते जमत नाही. >>>> हे मला सुद्धा हे जमत नाही.. Happy

@अमा, मनात सुरू असणारे रॅण्डम विचार असेच कुठेतरी लिहून ठेवावेत असं वाटलं.. Happy