क्रोशाचे ब्लॅन्केट

Submitted by sneha1 on 16 July, 2020 - 13:45

हे लेकीसाठी केले, मागच्या वर्षी Happy

crochetblanketresized.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

wow... great.. Happy

मस्त आहे आणि मेहनतीचं काम आहे. मला पहिल्या मुलाच्या वेळी एका ऑफिसमधल्या मैत्रीणीने विणून दिली होती त्याची आठवण आली.

Happy

धन्यवाद सगळ्यांना.
चिन्मयी, खूप मेहनत नाही गं. लोकरीचे आहे त्यामुळे पटापट वाढले, आणि लॉन्ग टर्म प्रोजेक्ट होते. रोज थोडे थोडे करायची.
वेका, आता माझी लेक हाय स्कूल ला जाईल Happy

धन्यवाद!
मामी, झाले की दाखवा आम्हाला.
अनया, ती खूष झालीच. आणि रंग आणि त्याचे क्रम तिनेच निवडले आहेत Happy

भारी दिसतय. एव्हड मोठं ब्लँकेट त्या एव्हड्या छोट्या सुईवर कसं विणतात ?? की लहान लहान भाग करून ते एकत्र जोडतात?

मस्तं! मी पण सध्या granny square blanket करत आहे.

>> एव्हड मोठं ब्लँकेट त्या एव्हड्या छोट्या सुईवर कसं विणतात ?? की लहान लहान भाग करून ते एकत्र जोडतात?
Crochet मध्ये knitting सारखं सगळे टाके सुयांवर नसतात. Current एक टाका फक्त हूकवर असतो. ब्लँकेटचं डिझाईन जसं असेल त्याप्रमाणे लहान लहान भाग करून ते एकत्र जोडता येतात पण. Granny square blanket ला तसंच करतात.

धन्यवाद सगळ्यांना Happy
पराग, ५ फूट बाय ५ फूट आहे हे. राखी म्हणते तसं एका वेळी एकच टाका असतो सुईवर. आणि हे सलग केले आहे, छोटे भाग न जोडता. मध्यभागी सुरु करून मग वाढत गेले आहे. करताना कोचावर सगळा पसारा घेऊन बसायची.
राखी, आहे ग्रॅनी स्क्वेअरच, पण सलग आहे. एक पांढरी लेयर, मग रंग बदलून दुसरी असे केले आहे.
मला आवडते हे ग्रॅनी स्क्वेअर पॅटर्न. करायला अगदी सोपे आहे .

खूपच छान आहे. ईथे फार थंडी नसल्याने मी स्कार्फ, विशेषतः कॉटन थ्रेडचे, केले आहेत. यू ट्यूब मुळे नवे स्टीच शिकायला मिळाले त्यामुळे जुना छंद नव्याने निर्माण झाला आहे

Sneha1, कदाचित माझ्यासाठी नवीन असेल, बर्याच वर्षांनी सुरुवात केली म्हणून, फोटो टाकते आज

rr38 , फार सुंदर आहेत दोन्ही. शेल स्टिच तर फारच सुंदर दिसतो आहे.

punekarp , हे अगदी साधे ग्रॅनी स्क्वेअर चे पॅटर्न आहे.
बेसिक प्रकार असा असतो:
https://www.crochetspot.com/how-to-crochet-granny-squares-step-by-step/
ह्यच्यापासून पुढे खूप गोष्टी करता येतात. जर ग्रॅनी स्क्वेअर ब्लॅन्केट गूगल केले तर खूप नमुने मिळतील.
इथे काही नमुने आहेत.
https://justbrightideas.com/giant-granny-square-baby-blanket-patterns/

हे असं काहीतरी करून बघायचे आहे. ते मोठे ब्लॅंकेट नंतर पण सुरुवातीला अगदी छोटा रुमाल वगैरे. एक सुई पूर्वी घरात होती पण आता कुठे आहे माहित नाही. डोळ्यांना फार ताण येत नाही ना कारण ऑपेरेशन करून नंबर घालवलाय तो परत नाही आणायचाय.

Champa, if you do with wool then it will be easier. Also, when I did it I wasn't looking at it all the time, I was looking at TV and knitting simultaneously. Sorry for English typing.

ब्लँकेट ? _/\_

आमच्याकडे सेम डिझाइन आणि रंगसंगतीचा रुमाल (?) आहे. १ बाय १ फूट

Pages