Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 14 July, 2020 - 05:52
नशिबी असून काटे जपणे फुलास आहे
छळले कधी फुलाने छळतो सुवास आहे
कळले नसे कुणाला जळते उरात जेही
कळले तरी तसेही पडले कुणास आहे
भलते विचित्र काही करतो विचार मीही
मरणे खुशाल आता जगणे उदास आहे
हळुवार पावसाने भरते विहीर केव्हा
हळुवार पावसाने भरले दुखास आहे
म्हणता जपून खारे रडलो भरून डोळे
घडले बरेच होते मजला उपास आहे
सरला कधी तमाशा सगळे उठून गेले
पटले कधी कुणाला हसणे खुमास आहे
निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- अनुराग
(ललगालगालगागा ललगालगालगागा)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्ही कधी गझलरंंग
तुम्ही कधी गझलरंंग
कार्यक्रमात सादरीकरण केले आहे का?
कसलं भारी लिहीताय!
मला संगीताची काहीही जाण नाहीये, तरी अस वाटतय की
तुमच्या गझलांना चाल लावली जाऊ शकते.
तुम्ही कुठे सादरीकरण वगैरे करत असाल वा केलेली असतील
तर कुठे बघता यईल निलेश??
मला फक्त युट्युब वरच गझल्ररंग चॅनल माहीत आहे.
@प्रगल्भ
@प्रगल्भ
पाहिले, खूप खूप धन्यवाद
मी आता पर्यंत फक्त fb आणि मायबोली वरच टाकल्या आहेत ( आणि मित्रांचे व्हाट्सएप ग्रुप)
कोणी व्हीडिओ बनवन्या एवढं आपलं कुठे नशीब
https://www.youtube.com
https://www.youtube.com/channel/UCatCMc4Oofr0l2oiMHWzkkA
हे यवतमाळ च्या एका कलाकाराच युट्युब चॅनल आहे.
यांच्या गझल व्हिडीओज मध्ये कमेंट टाकून बघा.
तो रिप्लाय सुद्धा देतो.
आणि त्यांच्या डिस्क्रिप्शन मध्ये गझल सेंड करण्यासाठी लिंक देतो.
तुम्ही कमेंंट टाकून बघा. युट्युब वर तुमचा फोटो(तुमची संमती असल्यास) सकट तुमची गझल तो सादर करेल.
माझ्या एका कमेंट ला लाईक मारला होता.
आणि जे कुणी सादरीकारणासाठी बोलतात त्यांना तो लिंक बाबतीत रिप्लाय करतो.
आई शप्पथ मला खूप आतून वाटतय तो तुमची गझल सादर करेल.
प्लिज ट्राय करा निलेश !!
तुम्हाला वृत्ताचीवगैरे जाण आहे म्हणून मागे लागतोय
बघतो प्रयत्न करून धन्यवाद
बघतो प्रयत्न करून
धन्यवाद
मी विचाराल आहे वाट बघुयात
मी विचाराल आहे
वाट बघुयात
धन्यवाद
धन्यवाद
"धन्यवाद" ----> असाईनमेंट
"धन्यवाद" ----> असाईनमेंट आली
nobinobita1857@gmail.com ----> मेल करा डीटेल्स द्यायचे आहेत
आय.एम.पी.
पाठवल्या.
पाठवल्या.
"पाठवल्या" ---> मेल्स
"पाठवल्या" ---> मेल्स बघाता का
३ पाठवलेत तुम्हाला
धन्यवाद.
धन्यवाद.
तुम्हाला रिप्लाय दिला आहे
@निलेश मि वाचलय!
@निलेश मि वाचलय!
आज दुसरी असाइंमेंट येऊ शकते बर का हा! हा! हा! (गझलमित्र कडून) वेगळी गझल तयार ठेवा
मी मेल करतो त्यांंनी होकार दिलाय पण कशावर पाठवायची याबद्दल बोलणी सुरु आहेत
व्हॉट्स अॅप का मेल इ.
नक्की
नक्की
>>>>कळले नसे कुणाला जळते उरात
>>>>कळले नसे कुणाला जळते उरात जेही
कळले तरी तसेही पडले कुणास आहे
वाह!