अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.
- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.
रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.
अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.
- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला
वीज मंडळाने बिल चुकीचं
वीज मंडळाने बिल चुकीचं बनवलंय (अंदाजे बिलांचे क्रेडिट दिले नाही, तीन महिन्यांच्या बिलाला स्लॅब तेच ठेवले) याच पंक्तीतल्या छातीठोक थापा येऊ लागल्या..
झोपडपट्टीत स्वच्छता नसते म्हणून तिथे आजार पसरतो असे छाती ठोकपणे म्हणणे हे थाळ्या बडवून करोनाला पळवण्याइतके उच्च आहे.
मार्च महिन्यापासून आजार कसा पसरतो याच्या जाहिरातीवर सरकारने करोडोरुपये खर्च केले. बाकी काही नाही तरी मायबोली वर डॉक्टर लोकांनी लेख लिहून माहिती दिली. तरी हे असं.
अमिताभवर उगाचच एक धागा काढून तो आकडा वाढवलाय. आता अमिताभ राहिला बाजूला. प्रतिसाद वाढवायचा नेहमीचा आवडता उद्योग सुरू झालाय. त्याला हातभार लावायची इच्छा नाही.
आधीच्या ऋन्मेषचे प्रतिसाद
आधीच्या ऋन्मेषचे प्रतिसाद कुरकुरीत, चटपटीत चिवड्यासारखे खमंग असायचे. आता सवयीने येतो त्याच्या धाग्यावर, पण डब्याच्या तळाशी राहीलेल्या गाळासारखी फक्त खारट चव रहाते तोंडात.
पुर्वीची मायबोली राहीली नाही आता #पुमारानाआ
सिंम्बाची 'आता करोना आपल्यात
सिंम्बाची 'आता करोना आपल्यात पसरायला लागला' कमेंट वन ऑफ पुणेरी स्नॉब म्हणून हसुन सोडुन देणार होतो. पण बर्याच लोकांना तो (करोना) जाणते-अजाणतेपणे वर्गभेद पाळतो वाटतंय वाटुन नवल वाटलं.
माझ्या जवळचा कोणी मित्र, कोणी
माझ्या जवळचा कोणी मित्र, कोणी नातलग, मित्रांचे नातलग, फेसबूक व्हॉटसप मित्र, वा कलीग वगैरे कोणालाही खरेच कोरोना झाला नाहीये. माझ्या कानावर तरी आला नाहीये>>>>>>
जर तू वरचे स्टेटमेंट करू शकतोस तर खालची स्टेटमेंट्स सुद्धा करू शकतोस, रादर बेडूक गँग असेच लॉजिक लावते
माझ्या जवळचा कोणी मित्र, कोणी नातलग, मित्रांचे नातलग, फेसबूक व्हॉटसप मित्र, वा कलीग वगैरे कोणालाही उपास घडले नाहीत, कोणाला 1200km चालावे लागले नाही म्हणजे बाकीचे सांगतायत ते खरे असेलच असे नाही.
माझ्या जवळचा कोणी मित्र, कोणी नातलग, मित्रांचे नातलग, फेसबूक व्हॉटसप मित्र, वा कलीग वगैरे कोणालाही नोटबंदी चा त्रास झाला नाही , म्हणजे त्रास झाला म्हणणारे लोक खोटे बोलतायत.
माझ्या जवळचा कोणी मित्र, कोणी नातलग, मित्रांचे नातलग, फेसबूक व्हॉटसप मित्र, वा कलीग वगैरे कोणाचीही नोकरी गेली नाही, म्हणजे भारतात मंदी आली आहे हे खोटे आहे.
खिक्क!!!
व्हॉट्सअपवर सध्या एक मेसेज
व्हॉट्सअपवर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये अमिताभ बच्चन हे रेडिअंट लाइफ केअर प्रायव्हेट लिमीटेडच्या संचालक मंडळाच्या सदस्यांपैकी एक आहेत, त्यांच्यात करोनाची लक्षणं दिसत नसून ते असिम्टोमॅटिक आहेत. नानावटीचे कौतुक करणारा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता अशा मुद्द्यांचा उल्लेख आहे. याचवरुन आपली बाजू मांडताना रेडिअंटने तिन्ही मुद्दे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
कंपनीचे संचालक कोण?
कंपनीने आपल्या वेबसाईटवरील संचालक मंडळाच्या सदस्यांच्या यादीचा संदर्भ देत, रेडिअंट ग्रुपच्या संचाकल पदी संजय नायर, महेंद्र लोढा, नारायण शेषाद्री, अभय सोयी, प्रशांत कुमार आणि प्राची सिंग या सहा सदस्यांचा समावेश असल्याचे सांगितले आहे. अमिताभ यांचा रेडिअंटच्या संचाकल मंडळाशी काहीही संबंध नाहीय.
*अमिताभ असिम्टोमॅटिक आहेत का?*
अमिताभ हे असिम्टोमॅटिक असल्याचा व्हायरल झालेला दावाही रेडिअंटने खोडून काढला आहे. अमिताभ यांच्यामध्ये सौम्य लक्षणं दिसून येत आहे. त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अनेक रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ६५ हून अधिक वय असणाऱ्या रुग्णांना करोनाचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे प्रकृतीसंदर्भातील इतर तक्रारी असतील तर सौम्य लक्षणं असल्यास रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्याचा सल्ला दिला जातो.
अमिताभ यांनी दाखल झाल्यानंतर रुग्णालयासंदर्भात ट्विट केलं?
नानावटी रुग्णालयाने १२ जुलै रोजी पत्रक प्रसिद्ध करुन अमिताभ यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचा कोणताही व्हिडिओ शूट करुन तो पोस्ट केलेला नाही असं स्पष्ट केल्याचे रेडिअंटने म्हटलं आहे.
“नेटकरी व्हायरल होणाऱ्या मेसेजमधील या सर्व माहितीची सत्यता पडताळून पाहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. तसेच गरज नसताना निर्माण करण्यात आलेल्या या वादावरील या स्पष्टीकरणामुळे अनेकांच्या शंका दूर होतील,” असंही रेडिअंटने म्हटलं आहे.
सिम्बा नेहमीप्रमाणे एकदम चपखल
सिम्बा नेहमीप्रमाणे एकदम चपखल प्रतिसाद
झोपडपट्टीत स्वच्छता नसते
झोपडपट्टीत स्वच्छता नसते म्हणून तिथे आजार पसरतो असे छाती ठोकपणे म्हणणे हे थाळ्या बडवून करोनाला पळवण्याइतके उच्च आहे.
>>>>
पुन्हा सोयीचा अर्थ भरत
स्वच्छता नसल्याने नाही तर गर्दी असल्याने आणि ती टाळता येणे शक्य नसल्याने तिथे कोरोना पसरतो.
माझे बालपण दक्षिण मुंबईतल्या चाळीत गेले आहे. अनधिकृत अन बकाल झोपडपट्टी नाही तरी बैठ्या वस्तीतील मुलांशी क्रिकेटचे सामने खेळत लहानाचा मोठा झालोय. मला हे समजायला मायबोलीवरचे धागे वाचायची गरज नाही तर अनुभवातून अलेले ज्ञान आहे. लोकं कशी दाटीवाटीने राहतात हे जवळून पाहिलेय, त्या गल्ल्यांमध्ये फिरलोय.
अरे साधे उदाहरण घ्या, तुमच्या घरातच स्वतःचा असा स्वतंत्र शौचालय असेल ना.. कदाचित दोनही असतील.
पण अश्या वस्त्यांमध्ये किमान ५०-१०० लोकांमागे एक शौचालय असते. आणि अश्या सर्व शौचालयांमध्ये मिळून ती वस्ती रोज दिवसातून एकदा वा दोनदा जाते.
आता तुम्हीच मला सांगा की एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाने ते शौचालय वापरले. तिथे छान खोकला, थुंकला आणि मागाहून कित्येक जनता ते वापरून गेली. तर कोरोना किती वेगाने पसरेल. आणि हे टाळायचे म्हटले तरी ते लोकं कसे टाळू शकतील?? स्वच्च्छता पाळून??
जर तू वरचे स्टेटमेंट करू
जर तू वरचे स्टेटमेंट करू शकतोस तर खालची स्टेटमेंट्स सुद्धा करू शकतोस, रादर बेडूक गँग असेच लॉजिक लावते
...................................म्हणजे बाकीचे सांगतायत ते खरे असेलच असे नाही
>>>>>
@ सिंबा
एखादी गोष्ट बातम्यातून वा ईतर कुठल्याही सोर्समधून माहीत असणे आणि जाणवणे यातला फरक समजला तर पुर्ण पोस्टचे उत्तर तुमचे तुम्हालाच मिळेन
रश्मी यांच्या ज्या
रश्मी यांच्या ज्या प्रतिसादाला येक्झॅक्टली की काहीतरी लिहून quote करून अनुमोदन दिलंय तो भाग वाचायचे करावे.
Submitted by Sadha manus on
Submitted by Sadha manus on 13 July, 2020 - 19:03
>>>>>
आशूचॅम्प यांचा तो व्हॉटसप मेसेज फेक होता का?
आशूचॅम्प काही टिप्पणी?
भरत आपण यावर काही म्हणाल .. आपल्याकडे न्यूज असेल
प्लीज सर्व मिळून तो मेसेज खरा खोटा करा...
रश्मी यांच्या ज्या
रश्मी यांच्या ज्या प्रतिसादाला येक्झॅक्टली की काहीतरी लिहून quote करून अनुमोदन दिलंय तो भाग वाचायचे करावे.
>>>
तो अस्वच्छ वगैरे शब्द त्यांनी वापरलाय. माझ्यासाठी त्यातील झोपडपट्टीत कोरोना पसरतो हे महत्वाचे होते हे समजायला माझा प्रतिसाद वाचला असेलच. एक्झॅक्टली मी कश्याला म्हटले ते ही त्यात आले. आता मी वर सांगितलेय दाट वस्ती आणि सामाईक शौचालय त्याबद्दल बोला. मी या उलट परिस्थितीत राहत असेल तर दोन्ही ठिकाणी कोरोना होण्याची भिती किती यावरही बोला.
तुला वाचता येत नाही का रे?
तुला वाचता येत नाही का रे?
तुला वाचता येत नाही का रे?
तुला वाचता येत नाही का रे?
नवीन Submitted by आशुचँप on 13 July, 2020 - 20:02
>>>>>>
कश्याबद्दल म्हणत आहात? अमिताभ बच्चन हे रेडिअंट लाइफ केअर प्रायव्हेट लिमीटेडच्या .... याबद्दल का?
खरे खोट करा की राव. वाचकांनी काय समजायचे..
या धाग्यावर आलेले प्रतिसाद
या धाग्यावर आलेले प्रतिसाद पुन्हा एकदा वाच म्हणजे तुझे तुलाच कळेल
इतकाही आंधळे असू नये एखाद्याने
< मी या उलट परिस्थितीत राहत
< मी या उलट परिस्थितीत राहत असेल तर दोन्ही ठिकाणी कोरोना होण्याची भिती किती यावरही बोला>
करोना कसा पसरतो ते माहीत करून न घेतल्याचा पुरावा.
मुंबई मनपाच्या करोना संबंधी पोर्टलवर ही सगळी माहिती मिळेल. त्याची लिंकही मी मायबोलीवरच्या करोनासंबंधी धाग्यावर दिली आहे.
ते चाळीत कसं असतं ते माहीत आहे वाचून आमच्या चाळीतच मराठी माध्यमाची शाळा होती, मग माझं मराठी चुकीचं कसं असेल असले तारे आठवले.
https://youtu.be/dEX5ztRQc5I
https://youtu.be/dEX5ztRQc5I
याचवरुन आपली बाजू मांडताना
याचवरुन आपली बाजू मांडताना रेडिअंटने तिन्ही मुद्दे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
>>>>>>
मी साधा माणूस यांची हे पोस्ट वाचून कन्फ्यूज झालो आहे
तुमची पोस्ट खरी की त्यांची?
https://youtu.be/dEX5ztRQc5I
https://youtu.be/dEX5ztRQc5I
नवीन Submitted by @Shraddha on 13 July, 2020 - 20:14
>>>
थॅन्क्स फॉर शेअरींग
मानवी स्वभावाचे उत्तम उदाहरण आहे हा विडिओ आणि त्या खालच्या कॉमेंटस
लोकं अमिताभबद्दल का एवढी चर्चा करत आहेत असे म्हणून त्या विडिओचालकाने त्यावरच छान चर्चा घडवली आहे
(No subject)
अरे सोन्या माझ्या,
अरे सोन्या माझ्या,
झोपडपट्टी /अस्वच्छता/दाटी वाटी ने राहणे हे सगळे खरं आहे
त्यामुळे कोरोना पसरतो हे तुला " माहीत आहे"
पण बाब्या, पैसे द्यायची तयारी असून खाजगी हॉस्पिटल मध्ये बेड मिळत नाहीये, प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये उपचारांचे 70 हजार ते 3 लाख पर्यंत बिल येतंय वगैरे बातम्या कित्येक दिवस माध्यमात येतायत, या bracket मधले उपचार कोण घेतात बरे? मध्यम/उच्च-मध्यम/उच्च आर्थिक वर्गातले लोकच ना??
मग जेव्हा हॉस्पिटल या वेल टू do लोकांनी भरायला लागली तेव्हा तुला कोरोना आपल्या पर्यंत पोहचलाय हे " जाणवले" नाही का?? त्या साठी बच्चन आजारी पडायला लागला का?
आपली सह-अनुभूती पुरेशी जागृत असेल तर संबंध नसलेल्या दुसऱ्यावर गुदरलेला प्रसंग आपल्याला जाणवू शकतो, मात्र ती नसेल तर अगदी फर्स्ट सर्कल मध्ये (किंवा या केस मध्ये बच्चन सारख्या कोणाला) काही होत नाही तो पर्यंत आपण डीनायल स्टेट मध्ये असतो.
Uhoh
Uhoh
>>>
अहो श्रद्धा अश्या एक्स्प्रेशन्स देऊ नका.
ले मी एक्सप्लेन
म्हणजे बघा त्या विडिओचालकाने म्हटलेय की अमिताभला कोरोना झाला तर त्यात काय एवढी चर्चा करायचे. असे म्हणत त्याने स्वतः एक चर्चेला व्यासपीठ उपलब्ध करून दिला.
आता तिथे आलेले लोकं जरी याच मताचे असले तरी ते नाव अमिताभचे बघूनच आलेत. जर अमिताभच्या जागी आफताब शिवदासानी असता तर तो विडिओ कोणी पुर्ण पाहिलाही नसता. पण लोकांनी तो पाहिला.
मग त्यावर कॉमेंटही केल्या. ईतकेच नव्हे तर लोकांच्या कॉमेंत वाचून त्याही लाईक केल्या.
आता तो मूळ विडिओ काढणारा जीव, त्याने तर सर्वांच्याच कॉमेंट वाचल्या असतील अश्या आशा करतो. विडिओ बनवण्यापासून अखेरची कॉमेंट वाचेपर्यंत त्याने स्वत:च्या आयुष्यातील किती सो कॉलड बहुमूल्य वेळ यावर खर्च केला.
गंमत ईथेच संपत नाही.
मजा तर मला तेव्हा वाटली जेव्हा दर तिसर्या कॉमेंटमध्ये सुशांत राजपूतला न्याय मिळायची मागणी होती.
लॉजिकल विचार करता अमिताभच्या कोरोनाची चर्चा आणि सुशांतच्या आत्महत्येची चर्चा एकाच पारड्यात आले,
जे मुद्दे अमिताभ आणि कोरोनाबाबत विडिओत लिहिले तेच सुशांत आणि आत्महत्येबाबत लागू. ईतके जगात भारतात लोकं विविध कारणासाठी आत्महत्या करतात तर याचीच का चर्चा, हा कोण मोठा लागून गेला आहे, ब्लाह ब्लाह ब्लाह..
म्हणजे तिथे कॉमेंटायला येणारे लोकंच कन्फ्यूज आहेत नाही का
मग जेव्हा हॉस्पिटल या वेल टू
मग जेव्हा हॉस्पिटल या वेल टू do लोकांनी भरायला लागली तेव्हा तुला कोरोना आपल्या पर्यंत पोहचलाय हे " जाणवले" नाही का?? त्या साठी बच्चन आजारी पडायला लागला का?
>>>>>>
पण त्यात ओळखीचे कोण होते ज्याच्याशी मी स्वतःला रिलेट करेन.
वीआयपी लोकं मोठे सरकारी अधिकारी सुद्धा अश्या ईस्पितळात भरती होत असतील आणि त्या लोकांसोबत मी स्वतःला रिलेट नाही करू शकलो कारण ते या कोरोनाकाळात घरात बसून नसणार हे मला माहीत होते.
लगे रहो, प्रतिसाद वाढत आहेत
लगे रहो, प्रतिसाद वाढत आहेत
निरर्थक वाद घालत रहा
माघार घेऊ नकोस
मायबोलीवरचे सर्व स्वयंघोषित
मायबोलीवरचे सर्व स्वयंघोषित तज्ञ, प्रतिसाद वाढवण्यास हातभार लावण्यात स्वारस्य नाही म्हणत प्रतिसाद देणारे, एका रुन्मेषसमोर हतबल झालेले बघून विनम्रतेने अहं कसा ठेचला जातो याचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले
अरे महानायकाला'सुद्धा' तो आजार झाला म्हणून एक धागा काय काढला, सगळे नुसते तुटून पडले
सामान्यांना झाला याचे काहीच नाही का, आपल्या जवळ हा रोग आलाय हे आता कळले का, वगैरे मुद्दे म्हणजे रुन्मेष चे प्रतिसाद वाढावेत या छुप्या हेतूने काढलेले मुद्दे वाटत आहेत
एखाद्याला अमिताभ बाबत असे झाल्यावर धागा काढावासा वाटूच नये का?
कॉमेंटमध्ये सुशांत राजपूतला
कॉमेंटमध्ये सुशांत राजपूतला न्याय मिळायची मागणी होती.
लॉजिकल>> कारण ज्याने तो video बनवलाय तो सुशांत साठी CBI inquiry व्हावी म्हणून campaigning करतोय सातत्याने.
बेफिकीर आभारी आहे आपल्या
बेफिकीर आभारी आहे आपल्या प्रतिसादाबद्दल
>>>>> कारण ते या कोरोनाकाळात
>>>>> कारण ते या कोरोनाकाळात घरात बसून नसणार >>>>>
अमिताभ घरात बसून होता हे कोणी सांगितले तुला?
त्याने गेल्या 10 दिवसात मला भेटलेल्या लोकांनी स्वतः कडे लक्ष ठेवा म्हटलंय, म्हणजेच गेल्या 10 15 दिवसात तो भरपूर लोकांना भेटत असणार.
बेफिकीर आभारी आहे आपल्या
बेफिकीर आभारी आहे आपल्या प्रतिसादाबद्दल<<<
तुम्हाला नाही हो ते, ज्यांना आहे त्यांना कळले
ऐश्वर्या आणि आराध्य होम
ऐश्वर्या आणि आराध्य होम क्वारतीन आहेत असं कळलं
मग अमिताभ आणि अभिषेक का हॉस्पिटलमध्ये भरती झालेत
तो डॉकटर लोकांना धन्यवाद देणारा व्हीडिओ अमिताभ यांनी केलाच नाहीये असे हॉस्पिटल का म्हणत आहेत
बाकी सर्वाना झाला पण जयांटीला
बाकी सर्वाना झाला पण जयांटीला कसा काय झाला नाही?
रेखांटी वाचलीच म्हणायची. वॉचमनवर निभावले नी बंगला सील झाला. आयुष्यात पहिल्यांदा तिला अमिताभंकल बरोबर लग्न न झाल्याचे समाधान मिळाले असेल.
Pages