अमिताभ आणि कोरोना

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 July, 2020 - 20:14

अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.

- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.

रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.

अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.

- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला खरेच वाटते की मला तुम्हाला काही उत्तर द्यायचे आहे. मुळात माझा प्रतिसाद भरत यांच्या प्रतिसाद पटला म्हणून होता.

मला तुमच्याशी कोणताही वाद घालून माझा वेळ वाया घालवायचा नाहीये. एक म्हण आहे, झोपलेल्याला उठवता येते झोपेचे सोंग घेणाऱ्याला नाही. अन माझ्यामते तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीतले आहात. काही समजून घ्यायची इच्छा असेल तर गोष्ट वेगळी असते. तुम्ही माझे प्रतिसाद इग्नोर करू शकता☺️ हवंतर तुम्ही जिंकला असे समजा☺️

पण या लोकांनी अमिताभला महत्व देत आपापल्या घरून ऑनलाईन यज्ञ केला तर खटकेल का? याचे उत्तर पडताळून बघा>>>>>मला वाटते मी माझ्या प्रतिसादातच उत्तर दिले आहे,असो पुन्हा कॉपी करते,

इतर वेळी कुणी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण lockdown असताना आधीच प्रशासन ,पोलीस doc यांची डोकेदुखी खूप असताना>>>हे बघ
यात कनफूजिंग काय आहे???

पण या लोकांनी अमिताभला महत्व देत आपापल्या घरून ऑनलाईन यज्ञ केला तर खटकेल का? >>>>अरे यज्ञच कशाला स्वतःच्या देवघरात फोटो ठेवेनात का त्यांचा,मला काय करायचे आहे??फक्त रस्त्यावर उतरून, एकत्र जमून किंवा अजून काही करून करोना योध्दाना आणि प्रशासनाला त्रास देऊ नये,इतकंच माझं म्हणणं आहे

भरत तुमचे प्रतिसाद वाचून खरंच खूप हसायला येतं

{पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले}
अमिताभच्या पंक्तीत बसणाऱ्या लोकांना मी बापडा काय उत्तर देणार?

अमिताभ बच्चन धावला नानावटीच्या मदतीला
=============================
◆ #नानावटी_हॉस्पिटलमध्ये कोरोनावर काही रुग्णावर उपचार केले गेले असतांना 10 पैकी 7 रुग्णांनी हॉस्पिटलने प्रचंड बिलाची आकारणी केली होती म्हणून तक्रार केली असता हॉस्पिटलची प्रतिमा (Image) खराब झाली होती व सर्वदूर हॉस्पिटल व त्यांच्या डॉक्टरवर मीडिया, वृत्तपत्र व जनमानसात एकूणच रोषाचे वातावरण झाले होते, हे वाचकांना चांगले माहिती असेल।
◆ अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन हे दोघेही सध्या नानावटी हॉस्पिटलमध्ये कोरोना झाल्यामुळे ऍडमिट असून उपचार घेत आहेत। खरे तर त्यांना कोरोनाची फारसी लक्षणे नसून (Asymptomatic) ते एकदम फाईन (Fine) आहेत।
◆ त्यांच्याकडे जुहू येथे तीन बंगले असून एकूण 18 रूम्स आहेत आणि त्या रूम्स मिनी आय सी यु (ICU) असून त्यांचे 24 तास काळजी घेणारे फर्स्ट क्लास 2 पगारी डॉक्टर्स आहेत। असे असतांना दोघेही पिता-पुत्रांनी होम क्वारांटाइन (Home Quarantine) होऊन कोरोनाची खास लक्षणे नसतांना आपल्या बंगल्यावरच इलाज करायला काही हरकत नव्हती।
◆ पण ते दोघेही नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती (ऍडमिट) झालेत एव्हढेच नाही तर बिग बी (अमिताभ) ट्विट्स (tweets) करून आपल्या खास शब्दात हॉस्पिटलची तारीफ करून आभार सुद्धा मानीत आहे।
◆ आता मेख अशी की, ज्या रेडिअंट ग्रुप (Radiant Group) च्या मालकीचे नानावटी हॉस्पिटल आहे त्यात स्वतः अमिताभ बच्चन भागीदार असून सन्माननीय बोर्ड मेम्बर सुद्धा आहे। (मालकानेच मालकाचे आभार मानणे !)
◆ यावरून आपल्या लक्षात आले असेलच की, पहिल्या पॅरिग्राफमध्ये जो मुद्धा आहे त्यावर सुंदर स्क्रिप्ट लिहून आपल्या बेहतरीन अदाकारीने अमिताभने आपल्या हॉस्पिटलची खराब झालेली प्रतिमा सावरण्याचा एक हिट शो केला असे म्हणावयास हरकत नाही।
★ "दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीये।"

= भीमराव तायडे, नांदुरा (बुलडाणा)
9420452123

भरत ,
स्पॉट ऑन,
मी कशा बद्दल लिहिलंय हेच मुळात रश्मी यांना कळले नाहीये,

माणूस कोणा बरोबर स्वतः ला आयडेन्टिफाय करतो हे त्याच प्रतिसादात लिहिलेले,
जसे आमच्या बिल्डिंग मधील ज्येना बाई, मुक्ता टिळक यांना कोरोना झालाय म्हंटल्यावरच त्यांना हा संसर्गजन्य आजार आहे , तो कोणालाही होऊ शकतो वगैरे बोलायला लागल्या, तो पर्यंत हा आजार झोपडपट्टीतल्या लोकांनाच होतो असे त्यांना वाटत होते,

तद्वत, अमिताभ ला कोरोना होई पर्यंत रुन्मेष ला तो घरात आलाय असे वाटत नव्हते,
इतकाच त्याचा अर्थ,
त्यात ना अमिताभ ला शिव्या घातल्यात, ना रुन्मेष ला घातल्यात, या उगाच बेगानी शादी मैं अब्दुल्ला दिवाना बनून प्रतिसाद लिहीत सुटल्यात

का आम्हाला आहे कुतूहल
कोणाच्या तरी घरून जातच असेल ना
अनावश्यक कसा काय
आता अमिताभ ला कोरोना झाल्यावर तुला धडकी भरते जसे काही तो तुझ्या घराशेजारी राहतो
तर ते अनावश्यक नाही
आणि डबा कोण देत ते विचारलं तर लगेच अनावश्यक हा दुटप्पीपणा बरा नव्हे

तुम्हाला खरेच वाटते की मला तुम्हाला काही उत्तर द्यायचे आहे. मुळात माझा प्रतिसाद भरत यांच्या प्रतिसाद पटला म्हणून होता
>>>
@VB
तुम्ही माझ्या वा माझ्या मुद्द्याच्या विरोधात आलेल्या मुद्द्याला धरून पोस्ट लिहिता आणि ती पोस्ट खोडत मी काही प्रश्न विचारला तर टाळता.
हरकत नाही.
मलाही तुम्हाला वादात हरवण्यात रस नाही तर तो मुद्दा खोडण्यात रस होता. जे मी केले आहे Happy

अरे यज्ञच कशाला स्वतःच्या देवघरात फोटो ठेवेनात का त्यांचा,मला काय करायचे आहे??
>>>
तेच तर म्हणतोय. याचा अर्थ तुम्हाला अमिताभला महत्व देणे खटकले नसून त्या नादात सोशल डिस्टंन्सिंगची आईशी की तईशी झालेले खटकतेय.
मलाही ते पार खटकले.
तसेही मला हे होम हवन पूजा अर्चा सारेच पटत नाही.

पण काही लोकांना अमिताभला महत्व देणेही खटकले आहे. का ते त्यांनाच ठाऊक. कोणी बोलायला तयार नाही.

अमिताभच्या पंक्तीत बसणाऱ्या लोकांना मी बापडा काय उत्तर देणार?
Submitted by भरत. on 13 July, 2020 - 14:33

>>>

नक्कीच माझे मराठी तुमच्यापेक्षा कच्चे आहे. पण काही चुकत असेल तर कर्रीक्ट करा.

माझ्या मते,
खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले
या वाक्याचा अर्थ असा लागतो की अमिताभ माझ्या वरच्या पंक्तीत आहे. त्यालाही होऊ शकतो तर माझ्यासारख्या त्याच्या खालच्या पंक्तीतील कोणालाही सहज होऊ शकतो.

आज पर्यंत लाखो लोकांना कोरोना झालाय पण त्याची ग्राव्हिटी समजायला अमिताभ ला कोरोना व्हायला लागतो हे पाहून गंमत वाटली,>>> Proud हा तुमचा प्रतीसाद ! बरोबर आहे ना?

आमच्या इथे लोक लोक म्हणतायत की झोपडपट्टीतुन तो जास्त पसरतोय, कारण हे माणसे- बाया अस्वच्छ आहेत, मग यावर मी हेच म्हणत होते की मग तसे असेल तर एवढी काळजी घेणार्‍या अमिताभला मग तो झालाच कसा ? तो तर गेला नाही कुठल्या झोपडीत. तरी त्याला पण?

लोकांची मानसीकता हीच असते ( तुमची नसेल ओ, तुम्ही शहाणी माणसे ) भल्या भल्यांना काळजी घेऊनही तो होतोय, मग आपल्याला तर कुठलेच सुरक्षेचे साधन नाही. पोलीओ लसीचे उदाहरण मी त्या साठीच दिले की अमिताभने प्रचार केला म्हणून लोकांना पटले. आज दुर्दैवाने तेच घडतेय. मोठ्या लोकांना होतोय, मग आपले काय !

जाऊ दे, काय आहे, मला तुमच्या इतके डिप्लोमॅटीक बोलता, लिहीता येत नाही. मी आपली तुम्हाला माझ्यासारखेच एक मायबोलीकर समजून लिहायला गेले पण संत्री सोलणे एवढे कठिण असते ते माहीत नव्हते.

ही खालची आणि वरची पंगत काय आहे नक्की ते सांगणार का?
>>
Biggrin

जसं तुझ्यासाठी कधीतरी दारू पिणारा आणि रोजच टल्ली असणारा यांची एकच कॅटेगरी आहे,दोघेही तुझ्यामते दारुडेच असतात तसेच माझं पण या हिरो भक्तांच्या बाबत मत आहे
त्यांनी जो काही गोंधळ घालावा तो घरात घालावा हे माझं wishful थिंकिंग आहे पण प्रत्यक्षात असं होणारच नाही, माझ्यासाठी हिरोच्या भक्तांनी केलेली प्रत्येक येडेगिरी म्हणजे तद्दन मूर्खपणाच असते,अगदी ते यज्ञ असो की तुझा त्यांच्यावरच्या स्पेशल काळजीचा हा धागा असो,दोन्ही एकच
पण सध्याच्या काळात निदान प्रशासनावर ताण नको म्हणून तरी त्यांनी हे उपद्व्याप स्वतः च्या घरातूनच करावे अशी इच्छा आहे

कुठेच नाही केलं तर अत्यानंद च होईल पण त्याची शक्यता खूप कमी असेल
असो आता माझा पास
यावरून तू विषय अजून तिसरीकडे नेऊन चौथाच विषय काढशील याची 100prcnt खात्री आहे

तू विषय अजून तिसरीकडे नेऊन चौथाच विषय काढशील याची 100prcnt खात्री आहे>>
अजुन शारुख, महागुरु,सई हे महत्वाचे पत्ते बाकी आहेत.

हिरोच्या भक्तांनी केलेली प्रत्येक येडेगिरी म्हणजे तद्दन मूर्खपणाच असते,अगदी ते यज्ञ असो की तुझा त्यांच्यावरच्या स्पेशल काळजीचा हा धागा असो,दोन्ही एकच
>>>>

माझेही कधी न पाहिलेल्या देवाची पूजा करणार्‍यांबद्दल एकेकाळी असेच मत होते.
तेव्हा मी अप्रगल्भ नास्तिक होतो.
आजही मी नास्तिकच आहे. पण कालांतराने मला समजलेय की ज्याच्या त्याच्या आवडी आणि ज्याच्या त्याच्या श्रद्धा असतात. त्यांना त्यासोबत जगू द्यावे. कोणाला कर्तुत्ववान माणसे पूज्यनीय वाटतात तर कोणाला निराकार देव. आपण कश्याला कोणाला चूक की बरोबर ठरवावे जोपर्यंत त्यांची भक्ती ते स्वतापुरताच ठेवतात आणि ईतरांना त्रास देत नाहीत Happy

जोपर्यंत त्यांची भक्ती ते स्वतापुरताच ठेवतात आणि ईतरांना त्रास देत नाहीत>>>>>>

शेवटचे वाक्य अतिशय महत्वाचे आहे आणि माझी इच्छा आहे की तू हे रोज किमान 10 वेळा स्वतःलाच वाचून दाखवावेस मोठ्याने

आमच्या इथे लोक लोक म्हणतायत की झोपडपट्टीतुन तो जास्त पसरतोय, कारण हे माणसे- बाया अस्वच्छ आहेत, मग यावर मी हेच म्हणत होते की मग तसे असेल तर एवढी काळजी घेणार्‍या अमिताभला मग तो झालाच कसा ? तो तर गेला नाही कुठल्या झोपडीत. तरी त्याला पण?
>>>>

एक्झॅक्टली !

पहिल्या प्रकारातील लोकांना होताना एक खरे वा खोटे मनाला समाधान होते की नशीबाने आपण त्या परीस्थितीत नाही आहोत. आपण तुलनेत सुरक्षित आहोत.
पण आपल्यापेक्षाही परिस्थिती चांगले असलेले जेव्हा या कोरोनाच्या लपेटमध्ये येताना दिसतील तेव्हा मग ते समाधान वा तो आव गळून पडणार हे स्वाभाविकच आहे.

आता काही जणांच्या मते याला अमिताभच्या पंक्तीत स्वताला बसवणे कसे झाले हे मला अजूनही समजत नाहीये? ते समजवतही नाहीयेत Happy
चाहता आणि कलाकार एकाच पंक्तीत या दृष्टीकोनातून पाहताही हे लॉजिकही गंडलेय

शेवटचे वाक्य अतिशय महत्वाचे आहे आणि माझी इच्छा आहे की तू हे रोज किमान 10 वेळा स्वतःलाच वाचून दाखवावेस मोठ्याने
>>>

वाचून काय फायदा
आचरणात आणावे लागेल
मी तेच करतो

बर्र ईथे कोणी आहे का जो या जगात कुठल्याही व्यक्तीचा वा देवाचा चाहता वा भक्त नाहीये.
हात वर करा !

आपल्या आजूबाजूची, वसाहतीतली इमारत सील झाल्याचं , आपल्या ओळखीतल्याला नाही तरी ओळखीतल्यांच्या ओळेखीत केसेस मिळाल्याचं ज्याला ऐकू आलं नसेल असं कोणी नसेल. एका मायबोलीकराचं करोनाने निधन झालं. तरीही करोना आपल्या जवळपास असेल असं वाटलं नाही, ते अमिताभला झाल्यावर वाटलं? का तर अमिताभ घरातला माणूस ! म्हणजे हा प्राणी नक्की कोणत्या विश्वात राहतो?
>>>

गेल्या तीन महिन्यात मी जीवनावश्यक वस्तू घ्यायला घराच्या बाहेर जिथवर गेलो आहे तिथवर एकही कोरोना केस नाही.
माझ्या जवळचा कोणी मित्र, कोणी नातलग, मित्रांचे नातलग, फेसबूक व्हॉटसप मित्र, वा कलीग वगैरे कोणालाही खरेच कोरोना झाला नाहीये. माझ्या कानावर तरी आला नाहीये. हे देखील तितकेच महत्वाचे आहे, कानावर न येणे. तर एकूणच यात ईतके अवाक होण्यासारखे काय आहे?

बाकी अमिताभ घरातला माणूस हा सोयीने काढलेला अर्थ आहे. आपला मुद्दा पटवायला असा सोयीने अर्थ काढावा लागतो यातच काय ते आले Happy

Pages