अमिताभ आणि कोरोना

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 July, 2020 - 20:14

अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.

- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.

रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.

अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.

- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< भारतात आज साडेआठ लाख लोकांना संसर्ग झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात अडीच लाख, मुंबईत लाखाच्या जवळ , नवी मुंबईत दहा हजार केसेसची नोंद आहे. आपल्या आजूबाजूची, वसाहतीतली इमारत सील झाल्याचं , आपल्या ओळखीतल्याला नाही तरी ओळखीतल्यांच्या ओळेखीत केसेस मिळाल्याचं ज्याला ऐकू आलं नसेल असं कोणी नसेल. एका मायबोलीकराचं करोनाने निधन झालं. तरीही करोना आपल्या जवळपास असेल असं वाटलं नाही, ते अमिताभला झाल्यावर वाटलं? का तर अमिताभ घरातला माणूस ! म्हणजे हा प्राणी नक्की कोणत्या विश्वात राहतो?

Submitted by भरत. on 13 July, 2020 - 09:57>>> अगदी अगदी वाटले, अमिताभ काय साधा शिंकला तरी दिमतीला हजार डॉक्टर असतात. इथे गरीब जनता हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही म्हणून मरतेय. परवा टिव्ही वर घाटकोपर ला रॅमिडिसीवर(?) इंजेक्शन साठी लोकांच्या रांगा बघितल्या, कित्येक जण तर ते परवडत नाही म्हणून माघारी फिरले.
असो,

अमिताभ काय साधा शिंकला तरी दिमतीला हजार डॉक्टर असतात. इथे गरीब जनता हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही म्हणून मरतेय.
>>>>

यात दोष कोणाचा हे सांगता येईल का?
उत्तर कोणीही दिले तरी चालेन

बोकलत, अमिताभ ने नाश्ता केला हे सांगितले नाहीत अजून>>>>भरत सर ती कालची बातमी आहे. मी ही आनंददायक बातमी समजताच लगेच स्क्रिनशॉट टाकला काल दुपारी.

याचा आणि पुढच्या पोलिओ लसीच्या जाहिरातीचा काय संबंध? की लोकांना करोनाचं गांभीर्य समजायला अमिताभला करोना झालाय असं काही आहे का? तळटीप प्रतिसादातल्या आधीच्या भागा पेक्षाही अधिक केविलवाणी आहे.>>>> Proud भरत, काही माणसांना जेव्हा कोणाला विरोध करायचा असतो ना, तेव्हा ते अगदी झापड लावुन विरोध करतात, किंवा समोरच्याला काय म्हणायचे आहे ते मुद्दाम समजून घेत नाहीत. तुम्ही त्यातलेच.
की लोकांना करोनाचं गांभीर्य समजायला अमिताभला करोना झालाय असं काही आहे का>>>>>>> करोना काही व्यक्ती-जनावर-देश-धर्म पाहुन होत नाही. पण जेव्हा आपल्या आवडीची व्यक्ती देखील त्या संक्रमणात सापडलीय तेव्हा अशी प्रतीक्रिया येते. इतक्या कडेकोट सुरक्षेत रहाणारा, बाहेर देखील न पडलेल्या व्यक्तीला सुद्धा ही बाधा होऊ शकते मग गावभर बोंबलत फिरणार्‍यांनी का सावध होऊ नये असे लोक विचारतायत. तरी तुम्ही त्यातुन वाकडा अर्थ काढलातच.

अमिताभने काय समाजसेवा केलीय , किती पैसे घेतले, किती दिले असे जेव्हा विचारले तेव्हा मी वरती उत्तर दिले. तुम्ही नाही का शाहरुखला बोलल्यावर तळमळीने धावत आलात, अगदी तस्सेच !

माझ्या विधानांचा ज्याला जो अर्थ काढायचा त्याने तो काढावा आणी त्यातच सुख मानावे. मर्जी अपनी, पसंद अपनी !

इथे गरीब जनता हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही म्हणून मरतेय. >>>>> VB, हेच मोठे दुर्दैव आहे. अमिताभ असो वा जितेंद्र आव्हाड या लोकांना खाजगी दवाखाना परवडतोय, पण सामान्य माणसाला सरकारी सेवा सुद्धा दुर्लभ झालीय, कारण हजारोने संख्या वाढतीय. आमच्या इथल्या भागात ५ बिल्डिंग मिळुन ( वेगवेगळ्या अंतरावरच्या ) २५ ते ३० पेशंट आहेत.

रश्मी, अमिताभला करोना होईपर्यंत त्याचं गांभीर्य कळत नसेल (तोवर काय काय झालं त्याची जंत्री आणि आकडेवारी मी आणि इतरांनी दिली आहे) तर तो प्राणी नक्की कोणत्या विश्वात राहतो, असा प्रश्न आहे.

अमिताभने समाजसेवा केली हे तुम्ही " करोनाचं गांभीर्य समजायला तो अमिताभला व्हायला लागला का?" या प्रश्नाच्या उत्तरात लिहिलेलं दिसलं. तुम्ही सुद्धा या प्राण्याच्या शेजारी दिसता.

<तुम्ही नाही का शाहरुखला बोलल्यावर तळमळीने धावत आलात, अगदी तस्सेच !> करेक्शन - शाहरुखने पाकिस्तानला पैसे दिले हे खोटे फॉर्वर्ड तुम्ही इथे लिहिल्यावर. वारंवार तुमचं खोटं बोलणं दाखवून देताना वाईट वाटतं, पण ते करणं भाग आहे. तरीही तुम्ही सुधारत नाहीच.

अमिताभला करोना होईपर्यंत त्याचं गांभीर्य कळत नसेल
>>>>
@ भरत
कोरोनाचे गांभीर्य कळणे म्हणजे काय?
म्हणजे गांभीर्य कळलेले असे काय वेगळे करतात जे मी केले नाही?

वारंवार तुमचं खोटं बोलणं दाखवून देताना वाईट वाटतं, पण ते करणं भाग आहे. तरीही तुम्ही सुधारत नाहीच.>>>>>>> वाईट वाटुन घेऊ नका. कारण मग समोरच्या माणसाला त्याच्या चूका कधीच कळणार नाहीत, आणी तो वा ती कायम गैरसमजाच्या अंधारात रहातील. ( धाग्याला वेगळे वळण लागु नये म्हणून इथे लिहीत नाही पण थोडक्यात लिहीते. :- भाजप व मोदी व फडणवीस यांना तुम्ही एकाच बाजूने पहाता , आणी कायम टीका करता. तेच तुम्ही उद्धव ठाकरे, पवार यांच्या बाबतीत मात्र नरम असतात ) आज लोकसत्तात वाचा साखर कारखान्या विषयी .

सुधारायचा प्रश्न केव्हा येतो? जेव्हा तुम्ही चारही बाजूने विचार करत नाही तेव्हा. शाहरुखच्या ५५ कोटी प्रश्नात मी चूकले होते. मी इथे लिहीले नसले तरी त्याचे मला वाईट वाटले. पण चित्रलेखातल्या शहारुखने घेतलेल्या पाकीस्तानी झेंड्याच्या फोटोविषयी मी ठाम आहे, कारण मी प्रत्यक्ष वाचले होते, कानोकानी नाही. भलेही माझ्याजवळ पुरावा नसेल त्या लिंकेचा.

अमिताभजी लवकर कोविडमुक्त व्हावेत यासाठी मी न भूतो न भविष्य असा एक महायज्ञ करणार आहे. जे मायबोलीकर या यज्ञात सामील होण्यास उत्सुक आहेत त्यांनी मला विपु करा.
Screenshot_2020-07-13-13-07-01-357_com.android.chrome.png

यज्ञ वा पूजा करणे या देशाची प्रथा परंपरा आहे.
एखादा इस्त्रोचा प्रोजेक्ट असो वा भारतीय सैन्यातील निर्जीव शस्त्र
शास्त्रज्ञांनी आणि या देशाच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी आपल्या परंपरा पाळल्याच आहेत.
तर आता यात खटकण्यासारखे काय आहे? अमिताभला दिले जाणारे महत्व?

अरे ऋन्मेष मला काहीच नाही खटकलं. उलट मीच महायज्ञ करणार आहे. तू येणार आहेस का? जाऊ दे नको येऊ. तुला व्हाट्सएप कॉल करतो त्यात बघ.

उलट मीच महायज्ञ करणार आहे. तू येणार आहेस का?
>>
नाही.
मी नास्तिक आहे. माझा देवावर विश्वास नाही. कुठेतरी यज्ञ करून वा देवाची आरती करून अमिताभ बरा होईल हे मला पटत नाही.

तर आता यात खटकण्यासारखे काय आहे? अमिताभला दिले जाणारे महत्व?
हो,मला तर हेच खटकलं,यज्ञामुळे तिथे जमलेल्या लोकांनाच बाधा झाली तर तो ताप साध्या प्रशासनातील लोकांना होईल अमिताभ ला नाही,रच्याकने हेच का ते लोक जे सुशांत च्या मृत्यूनंतर सलमान ला ट्रोल करून काहीबाही बडबडत होते, उद्या देव न करो पण सलमान ला बाधा झाली तरी यज्ञ करणारे सुद्धा असतील

इतर वेळी कुणी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण lockdown असताना आधीच प्रशासन ,पोलीस doc यांची डोकेदुखी खूप असताना असे एकत्र जमून नि बंगल्याबाहेरची फवारणी बघायला येऊन त्यांचा त्रास का वाढवत आहेत हे लोक

मी नास्तिक आहे. माझा देवावर विश्वास नाही>>> ओके. तरीपण तू हा महायज्ञ बघायला पाहिजे असं मला वाटतंय. अमिताभ खूपच मोठी सेलिब्रिटी आहे त्यामुळे आग पण तेव्हडीच मोठी पेटवणार आहे.

अमिताभ चे जेवण झालं का
काय जेवला, आवडलं का त्याला
उरवल नाही ना काही ताटात>>> सर मी सकाळपासून याच बातमीच्या शोधात सर्फिंग करतोय. वेळ आली तर मी स्वतः उपाशी राहून कुपोषित बालक होईन. पण अमिताभजी काय जेवले हे तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहचवेन.

मी स्वतः उपाशी राहून कुपोषित बालक होईन. पण अमिताभजी काय जेवले हे तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहचवेन.>> तुम्ही नका उपाशी राहु. चांगले खात पित जा. तुमच्यासारखा हिरा कुपोषित झाला तर भुतांशी कोण लढेल.

तुम्ही नका उपाशी राहु. चांगले खात पित जा.>>>कशाला????बोकलत उपाशी राहोत की कुपोषित, अमिताभ ची बातमी लोकांना मिळाली पाहिजे,ते खूप imp आहे ,

तर आता यात खटकण्यासारखे काय आहे? अमिताभला दिले जाणारे महत्व?
हो,मला तर हेच खटकलं,या यज्ञातून जमलेल्या लोकांनाच बाधा झाली तर तो ताप ....
>>>

कन्फ्यूजिंग आहे
तुम्हाला खरे तर अमिताभला दिले जाणारे महत्व खटकले नसून ते देण्याची पद्धत खटकली आहे जी कोरोनावाढीला कारणीभूत ठरू शकते.
आणि हे खटकणे योग्यच आहे.
पण या लोकांनी अमिताभला महत्व देत आपापल्या घरून ऑनलाईन यज्ञ केला तर खटकेल का? याचे उत्तर पडताळून बघा.

@ भरत
कोरोनाचे गांभीर्य कळणे म्हणजे काय?
म्हणजे गांभीर्य कळलेले असे काय वेगळे करतात जे मी केले नाही?
>>>>

भरत आपण याचे उत्तर नाही दिले.
ते नाहीये असे समजू का?

अमिताभ काय साधा शिंकला तरी दिमतीला हजार डॉक्टर असतात. इथे गरीब जनता हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही म्हणून मरतेय.
>>>>
यात दोष कोणाचा हे सांगता येईल का?
उत्तर कोणीही दिले तरी चालेन

>>>>

ही पोस्ट VB यांची होती. पण प्रश्न सर्वांना होता ज्यांची ईच्छा आहे उत्तर द्यायची.
नुसते अमिताभला टारगेट केले की झाले का?

Pages