अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.
- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.
रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.
अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.
- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला
साजूक तुपासरख्या मनावर विपरीत
साजूक तुपासरख्या मनावर विपरीत परिणाम होतील ना तुमच्या.
हिहीही काहीही हा स्ट्रेंजर
हिहीही काहीही हा स्ट्रेंजर
तुझ्यासारखे कैक येऊन गेलेत रे बाळ
माबो वर अॅडमीन किती आहेत?
माबो वर अॅडमीन किती आहेत? कुठे आहेत काही माहीती?
तक्रार नाही करायचीय खरच, ते 2010-2011 मध्ये होत होत्या तश्या गझलेच्या स्पर्धा होतात का अजून हे विचारायचय !
कवितेच्या पण स्पर्धा असताता का?
आधीच सांगायचं ना उगाच मला
आधीच सांगायचं ना उगाच मला किती परिश्रम पडले ते मोबाईल वरून टायपायला Proud
Submitted by निल्सन on 12 July, 2020 - 17:42
>>>>
आपल्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद निल्सन
प्रतिसादांचे कष्ट फुकट जात नाहीत. त्यातील विचार योग्यच होते.
कलाकारांना मिळणारा पैसा प्रसिद्धी चाहत्यांचे प्रेम जणू काहीही कष्ट न करता आयते मिळालेले असते अश्याप्रकारे त्यांना टिकेला सामोरे जावे लागतेच. त्यांच्या चाहत्यांनाही प्रसंगी या रोषाला सामोरे जावे लागते.
ज्यांना बच्चन परीवार जगले की मेले काही फरक पडत नाही त्यांनी खुशाल धागा इग्नोर करावा.
पण अमिताभच्या चाहत्यांना त्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना करायची असेल तर त्याला आडकाठी का?
ईथे असे कोण म्हणतेय की सामान्य माणसे मरावेत आणि बच्चन कुटुंबीय जगावेत?
पण सेलिब्रेटी म्हटले की वाद आलाच. तो मानवी स्वभाव आहे. त्यांच्यावर टिप्पणी करणे आपण आपला हक्कच समजतो. त्यामुळे आपला ईतर राग आणि फ्रस्ट्रेशन त्यांच्यावर निघून आपल्या मनात जे साचलेले असते त्याचा निचरा होतो. मला वाटते हे देखील सेलिब्रेटींचे समाजासाठी ते देत असलेले अप्रत्यक्ष योगदानच आहे.
ईथून ज्यांना वाद घालायचा आहे त्यांनी बेझिझक घालावा.
ज्यांना बच्चन कुटुंबियांसाठी प्रार्थना करायची आहे वा अपडेट्स द्यायचे आहेत त्यांनी या वादाकडे दुर्लक्ष करावे.
लाईफ सिंपल आहे. नको त्या वादात शक्ती खर्च करून कॉम्प्लीकेटेड करू नका _/\_
आज पर्यंत लाखो लोकांना कोरोना
आज पर्यंत लाखो लोकांना कोरोना झालाय पण त्याची ग्राव्हिटी समजायला अमिताभ ला कोरोना व्हायला लागतो हे पाहून गंमत वाटली,
अर्थात लोक स्वतःला कुणाबरोबर आईडेंटिफाय करतात, या वर आहे सगळे,
मुक्ता टिळक याना कोरोना ने गाठले , बातमी ऐकल्यावर एक वरिष्ठ नागरिक बाई " म्हणजे 'आपल्या सारख्या' लोकांपर्यंत पोहोचला कोरोना आता, काहीच सेफ राहिले नाही आताशा" अशी रिऍक्शन देत्या झाल्या.
निदान एक वर्ग तरी आत्तापर्यंत कोरोना च्या धोक्यापासून निवांत होता हे जाणवून गंमत वाटली,
रुन्मेष अशा वर्गाचे प्रतिनिधित्व करतोय
अंबानी, अदानी, मोदी (नीरव),
अंबानी, अदानी, मोदी (नीरव), चोक्सी, विजय मल्ल्या वगैरे लोकांच्या घरात करोना शिरण्याची मी वाट पाहत आहे. कसा काय शिरला नाही अजून? आमचे बच्चन साहेब आणि बाकी लेखक कलाकार इत्यादी चांगले लोकच कसे काय सापडतात त्याला? एकही माजोरडा उद्योगपती किंवा घोटाळा करून पळालेला भामटा किंवा उद्दाम राजकीय नेता सापडलेला नाही करोनाच्या तडाख्यात. हे कसे काय करोनापासून सुरक्षित आहेत? नाही म्हणायला दाउद इब्राहीमला करोना झाल्याची बातमी होती पण ती सुद्धा अफवा निघाली नंतर.
परिचित, काही नवीन किस्सा लिहा
परिचित, काही नवीन किस्सा लिहा की राव ! बरेच दिवस झाले तुमचा धागा नाही आला
>> उद्दाम राजकीय नेता
>> उद्दाम राजकीय नेता सापडलेला नाही करोनाच्या तडाख्यात<<
ते आव्हाढ साहेब करोनाच्या तडाख्यातुन सुटल्यावर मवाळले बहुतेक...
जोकिंग अपार्ट; सुरक्षित तटबंदि, सोशल डिस्टंसिंग इ. चं काटेकोर पालन करुनहि करोनाची लागण होते यावरुन मुंबईतल्या ग्रेव सिच्युएशनची कल्पना यावी. आत्ता पर्यंतच्या बातम्या डायरेक्ट एक्स्पोज झालेल्यांबाबत होत्या, आणि आता हे. काळजी घ्या लोकहो...
अनेक लहान मोठ्या गावांमधून
अनेक लहान मोठ्या गावांमधून कोरोनाबद्द्लच्या गैरसमजाचे पर्यावसान, बाधित लोकांना टोकाचे नैराश्य येण्यापासून ते त्या लोकांनी थेट आत्महत्येचे पाऊल ऊचलण्यापर्यंतच्या अनेक दुर्दैवी आणि थोड्या जागरूकतेने टळू शकतील अशा घटनांमध्ये होत आहे.
तसेच ह्या गैरसमजांतून काही बाधित व्यक्तींना त्यांच्या सामाजिक वर्तुळातील लोकांकडून अमानवीय वागणूक सुद्धा मिळत आहे.
अमिताभ बच्चनला कोरोनाची लागण होण्याची, त्यांच्या हॉस्पिटलायझेशनची, त्यांना फारसा त्रास होत नसल्याची आणि पुढे जाऊन व्यवस्थित बरे होऊन घरी येण्याच्या बातम्या घेऊन वाहिन्यांच्या लोकांच्या कानीकपाळी ओरडण्याची अपसाईड वरच्या दोन गटातील लोकांमध्ये धोडा धीर निर्माण होण्यात होईल असे मला वाटते.
कोणीतरी म्हंटलेच आहे ना.... Corona is a great leveler.
आत्ता पर्यंतच्या बातम्या
आत्ता पर्यंतच्या बातम्या डायरेक्ट एक्स्पोज झालेल्यांबाबत होत्या, आणि आता हे. >> अनुमोदन. सर्वांनी काळजी घ्या. बच्चनसाहेबांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. लहान बच्चन सदस्यांना त्रास होत नाहीये तर ते बरे होतील अशी आशा.
करोनाची भयानकता सर्वांनाच समजली आहे. ऋन्मेषला ती समजली नाहीये हे सांगायचा उगाच अट्टाहास नको. मानवी स्वभावच आहे हा. भयानकता समजलेली असतेच, पण ते जेव्हा आपल्याला महत्वाच्या वाटणार्या व्यक्तींबाबत होते तेव्हा त्याची तीव्रता खूप वाढते. ती व्यक्ती तुमची जवळची नातेवाईकच असायला हवी असं नाही.
अवांतरः
अमेरिकेत अजुनही बरेच आहेत ज्यांना 'मास्क वापरा' म्हटल्यावर मानवी हक्कांवर गदा आणली असे अजुनही वाटत आहे. परवाच आमच्या गावातल्या एका स्त्री बसचालकाचे एका बाईने यावरुन नाक फोडले कारण तिने त्या बाईला 'मास्क लाव' असे म्हटले व तो वाद वाढला. अशा लोकांना यातली भयानकता समजलेली नाही आणि आम्ही रहातो ते राज्य अॅरिझोना जगात सध्या वाढणार्या रुग्ण संख्येत १ नंबरवर आहे.
आणि आशुचँप, तुम्हाला ऋन्मेषचे
आणि आशुचँप, तुम्हाला ऋन्मेषचे धागे, त्याचे विचार आवडत नाही ते ठीक आहे त्यावर विरोध करणे काहीच चूक नाही. पण तुमचे त्याला उद्देशुन लिहिलेले प्रतिसाद , त्यातली भाषा आपण घरच्या नोकरमाणसाबरोबरही बोलणार नाही इतके हेटाळणीचे असतात. सर्वच धाग्यात.
सुनिधी तुम्ही घरी नोकर
सुनिधी तुम्ही घरी नोकर।माणसांशी असे बोलता??
फारच वाईट वर्तन करताय मग
आम्ही आम्हाला घरी येणाऱ्या मावशींशी अगदी चांगल्या पद्धतीनेच बोलतो, कुठेही नोकर मालक अशी भावना आणत नाही
तुम्ही आणत असाल तर कृपया आपल्या वर्तनात सुधारणा घडवून आणा, एक मनुष्य म्हणून इतके नक्कीच करू शकता अशी आशा करतो
आम्ही रहातो ते राज्य अ
आम्ही रहातो ते राज्य अॅरिझोना जगात सध्या वाढणार्या रुग्ण संख्येत १ नंबरवर आहे.>>>>>>
याचा कृपया संदर्भ देणार का, कुठल्या अधिकृत आकडेवारीचा
सुनिधी तुम्ही घरी नोकर
सुनिधी तुम्ही घरी नोकर।माणसांशी असे बोलता??
फारच वाईट वर्तन करताय मग
>>>>
म्हणजे तुम्ही माझ्याशी वाईट वर्तन करत आहात तर
वरच्या दोन गटातील लोकांमध्ये
वरच्या दोन गटातील लोकांमध्ये धोडा धीर निर्माण होण्यात होईल असे मला वाटते.
>>>>>
हायझेनबर्ग
+७८६
काल माझ्या मनात अगदी हाच विचार आला.
अमिताभचे आणि सर्वच बच्चन कुटुंबियांचे बरे होणेही या दृष्टीने फार गरजेचे आहे.
आशुचँप >> नो कमेंट्स. अशा
आशुचँप >> नो कमेंट्स. अशा बालीश प्रतिसादावर उत्तर देण्यात उपयोग नाही. तरीपण सॉरी, मी प्रतिसादात स्ट्राँग शब्द वापरले.
अरिझोना ची आकडेवारी ही दर मिलीयन लोकांमधे सर्वात जास्त रुग्ण वाढ या गणितावर आहे. एकुण संख्या यावर नाही.
https://www.nytimes.com/2020/07/08/briefing/arizona-mary-trump-facebook-...
नाही रे बाबा, मित्राला शिव्या
नाही रे बाबा, मित्राला शिव्या देऊ शकतो पण कामवाल्या मावशींना देऊ का आपण
मला आठवतयं मी तर आमच्याकडे जनाबाई होत्या त्यांच्या कडेवर बसून सगळीकडे हिंडत असे, नंतर त्या थकल्या, त्यांच्या मुली घरकामाला येत पण आमचे कायम जिव्हाळ्याचे संबंध होते, मी तर दहावीच्या परिक्षेच्या आधी नमस्कार करून गेलेलो त्यांना.
आजही आमच्या घरी ज्या येतात कामाला त्यांना घरचेच सदस्य म्हणून वागवतो, माझा मुुलगा त्यांना मावशी म्हणतो.
नोकरमाणसांशी हेटाळणीने बोलणाऱ्या व्यक्ती मला अतिशय नापसंत आहेत.
अरिझोना ची आकडेवारी ही दर
अरिझोना ची आकडेवारी ही दर मिलीयन लोकांमधे सर्वात जास्त रुग्ण वाढ या गणितावर आहे. एकुण संख्या यावर नाही.
>>>>>>>
तरीदेखील काळजीचेच कारण आहे, माझा सख्खा धाकटा भाऊ तुमच्याच शहरात आहे फिनिक्स ला. त्याला विचारलं तर सगळे ठीक आहे म्हणतो. आता कदाचित आम्ही जास्त काळजी करू नये म्हणून म्हणत असावा.
आणि भाषेचे काही मनावर घेऊ नका, मी माझे फ्रर्स्ट्रेशन निबा वर काढतोय असे समजा. ज्या दिवशी तो मला म्हणेल आता बास त्या दिवशी मी त्याला उद्देशून शेवटचा प्रतिसाद देईन. तोवर सगळ्यांनी इग्नोर करावे ही नम्र विनंती
नोकरमाणसांशी हेटाळणीने
नोकरमाणसांशी हेटाळणीने बोलणाऱ्या व्यक्ती मला अतिशय नापसंत आहेत.
>>>
हो सहमत आहे
तुमच्या जनाबाईंचा उल्लेख वाचून कभी खुशी कभी गम मधील दाईजान आठवल्या.
असो विषय कोरोना आणि अमिताभ आहे.
मी शाहरुखचे दोनच चित्रपट
मी शाहरुखचे दोनच चित्रपट आवडीने बघू शकतो
चक दे आणि स्वदेस.
पहिला अप्रतिम प्लॉट आणि शारूख वर कमी फोकस
दुसरा अप्रतिम संगीत आणि हलकी फुलकी मांडणी.
हो, नक्कीच काळजीचे कारण आहे.
आशुचँप,
हो, नक्कीच काळजीचे कारण आहे. पण निदान लोक बिंधास्त तोंड उघडं टाकुन फिरायचे ते आता तोंड झाकुन हिंडतात. दुकानात मोजुनच आत सोडतात तोवर लांब लांब बाहेर उभे रहायचे रांगेत. (पार्शपार्श्वभुमी:कडक उन्हाळा चालु आहे, आज ११५ फॅ आहे. त्यामुळे जरा कमी हिंडत असावेत लोक)
भावाचे नाव काय? त्याला सांगा काहीही लागलं तर संपर्क करायला.
ऋन्मेष, अवांतर संपले. आता फक्त बच्चन व करोना.
आज अमिताभचे फोटो लावून होमहवन
आज अमिताभचे फोटो लावून होमहवन आणि पूजापाठ करणारे लोक टीव्हीवर दिसले. प्रसिद्धी मिळावी म्हणून हे लोक असं करतात की ते खरंच मूर्ख असतात. अमिताभला झाला तर कोणालाही होईल सगळ्यांकडे अमिताभ एवढा नोकरांचा ताफा आहे का. आमिर, रेखा यांना घरातल्या नोकरांमुळे धोका निर्माण झाला. रेखाकडे तर म्हणे अठ्ठावीस का काय स्टाफ आहे. याही परिस्थितीत स्वतःची कामे स्वतः करायला या लोकांना जमत नसतील तर सामान्यांनी अशा लोकांना का डोक्यावर चढवून ठेवावे. अमिताभचे तीन बंगले आहेत आणि ते तिन्ही सॅनिटाईझ केले गेले. तीन बंगले असून पिता पुत्र हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. घरच्या घरी उपचार होऊ शकले नसते का. इकडे सर्वसामान्यांना सांगणार शक्यतो घरीच उपचार घ्या मग यांचे हे लाड कशासाठी. माझ्या ऑफिस मधल्या मुलीचे वडील वारले नुकतेच कारण त्यांना कोणतेही हॉस्पिटल दाखल करून घ्यायला तयार नव्हते, वय सत्तर आसपास. मग अमिताभ वयस्कर आहे तर त्याला मरायला मोकळं सोडायला काय हरकत आहे. तो चित्रपटात काम करून काही समाजकार्य करत नाही, बक्कळ पैसे घेतो त्याचे. जोपर्यंत या लोकांना साम्यान लोकांसारखी वागणूक मिळत नाही तोपर्यंत हे लोक सुधारणार नाहीत पण भारतीय मीडिया हे कधीच होऊ देणार नाही, हे सगळे फार संतापजनक आहे.
नोकरांचा प्रश्न मलाही पडलेला.
नोकरांचा प्रश्न मलाही पडलेला.
आमच्या सोसायटीतच कंपलसरी सर्वांकडे मोलकरीण बंद आहेत. कारण बाहेरून येतात. जर एखाद्या श्रीमंत माणसाकडे बंगल्यातच सर्वंट क्वार्टर असतील तर तो नोकरचाकर ठेऊ शकतो. कारण हे एखाद्या मोठ्या फॅमिलीसारखेच झाले. तर अमिताभचे नोकर कुठे राहायचे हे बघावे लागेल.
ऐश्वर्या आणि आराध्या घरातच ट्रीटमेंट घेणार आहेत असे ऐकण्यात आलेय. अमिताभला डीक्टरांनीच हॉस्पिटलमध्ये भरती होण्यास सांगितले कारण कॉम्प्लिकेशन येण्याची भिती.
बाकी एखादी श्रीमंत व्यक्ती आपल्या पदरचे पैसे खर्च करून व्हिआयपी ट्रीटमेंट मिळवत असेल तर आक्षेप घेण्यात अर्थ नाही असे मला वाटते.
तसेच अमिताभ बरेच सरकारी जाहीरातीतही झळकताना दिसतो. त्यामुळे त्याबदल्यात सरकार त्याला काही फॅसिलिटी देत असेल तर ते सुद्धा वावगे ठरू नये.
>>>>>>> पण भारतीय मीडिया हे कधीच होऊ देणार नाही, हे सगळे फार संतापजनक आहे.>>>>>>>
बाकी मिडीया म्हणाल तर येस्स ! त्यांचा सध्या एकच फंडा असतो.
जो बिकता है वो दिखता है
जे खरे तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने असे नसायला हवे.
पण याचे आता आपण काही करू शकत नाही. कारण हे सर्वच राजकीय नेत्यांच्या आणि बड्या हस्तींच्या सोयीचे आहे.
सगळे न्यूज चॅनेल अमिताभमय
सगळे न्यूज चॅनेल अमिताभमय झालेत... कुली मध्ये कसा वाचला वगैरे दळण दळणे चालू आहे...
(No subject)
नवीन Submitted by चंपा on 13
नवीन Submitted by चंपा on 13 July, 2020 - 01:35 >>> +१
that's what I was talking about yesterday
इथेही वाद पेटला का? अरे
इथेही वाद पेटला का? अरे अमिताभच का, कोणालाच अगदी माझा एखादा हितशत्रु जरी असेल तरी त्याला करोना होऊ दे किंवा व्हावा असे मला वाटत नाही. त्यामुळे वाद थांबवा. प्रार्थनेत ताकद असते. अमिताभसकट सगळे बरे व्हावेत अशी प्रार्थना करा, बस! भांडू नका.
आज पर्यंत लाखो लोकांना कोरोना
आज पर्यंत लाखो लोकांना कोरोना झालाय पण त्याची ग्राव्हिटी समजायला अमिताभ ला कोरोना व्हायला लागतो हे पाहून गंमत वाटली,>>>>>> लिहीणार नव्हते तुमचा प्रतीसाद बघुन, कारण बेडुक म्हणून हेटाळणी केली होती तुम्ही आमची. ( तुम्हाला मी- माझा यांनी उद्देशुन लिहीले होते, मी नाही ) असो !
एका प्रसिद्ध न्युज पेपर मध्येच आले होते की पोलीओ लस पार खेड्यापाड्यापर्यंत पोहोचावी आणी परीणामकारक व्हावी म्हणून सचीन तेंडुलकर व अमिताभ या दोघा लोकप्रिय व्यक्तींची मदत घेण्यात आली. दोघांनी या जाहीरातीचे पैसे घेतले नव्हते. आश्चर्य म्हणजे १०० टक्के यश मिळाले. कारण आपल्या आवडत्या कलाकार व क्रिकेटर्स ने काही जाहीरात केली की लोकांना ती लगेच पसंत पडते. या दोघांनी निदाम काही अंशी चांगले काम केले, पण इतर कोल्ड ड्रिंक्स व पानम्साला सारख्या जाहीराती मध्ये जेव्हा हे लोक काम करतात, त्याचे ही अनुकरण होते हे मोठे दुर्दैव आहे.
तळटिपः- लिंक मागणार्या लोकांकरता, हे सर्व लोकसत्ता मध्ये छापुन आले होते.
<आज पर्यंत लाखो लोकांना
<आज पर्यंत लाखो लोकांना कोरोना झालाय पण त्याची ग्राव्हिटी समजायला अमिताभ ला कोरोना व्हायला लागतो हे पाहून गंमत वाटली.......>
याचा आणि पुढच्या पोलिओ लसीच्या जाहिरातीचा काय संबंध? की लोकांना करोनाचं गांभीर्य समजायला अमिताभला करोना झालाय असं काही आहे का? तळटीप प्रतिसादातल्या आधीच्या भागा पेक्षाही अधिक केविलवाणी आहे.
काल ट्विटर वर ऐश्वर्या राय ट्रेंड होत होती. मीडियावाल्यांना दुसरी स्फोटक बातमी मिळेपर्यंत हा विषय पुरला. हा धागाही त्याच प्रकारातला आहे.
< पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.>
याबद्दल सिम्बा आणि आशुचँप यांनी मांडलेला मुद्दा पुढे वाढवून - भारतात आज साडेआठ लाख लोकांना संसर्ग झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात अडीच लाख, मुंबईत लाखाच्या जवळ , नवी मुंबईत दहा हजार केसेसची नोंद आहे. आपल्या आजूबाजूची, वसाहतीतली इमारत सील झाल्याचं , आपल्या ओळखीतल्याला नाही तरी ओळखीतल्यांच्या ओळेखीत केसेस मिळाल्याचं ज्याला ऐकू आलं नसेल असं कोणी नसेल. एका मायबोलीकराचं करोनाने निधन झालं. तरीही करोना आपल्या जवळपास असेल असं वाटलं नाही, ते अमिताभला झाल्यावर वाटलं? का तर अमिताभ घरातला माणूस ! म्हणजे हा प्राणी नक्की कोणत्या विश्वात राहतो?
मी लहानपणी अमिताभला अमिता
मी लहानपणी अमिताभला अमिता बच्चन बोलायचो.
Pages