(हा दिवस आहे इंग्लिश मध्ये.पण लिहिणारीला तितकं फाडफाड इंग्लिश येत नाही त्यामुळे आपण मराठीतच वाचूयात.ही शाळा आणि मुलं पूर्णपणे काल्पनीक आहेत.असं करणारी खरी मुलं तुमच्या आजूबाजूला असल्यास तो योगायोग समजावा).
टीचर गोड आवाजात: "हॅलो मुलांनो.न्यू इंडिया ग्लोबल कॉम्पिटिशनल इंटरनॅशनल स्कूल च्या ऑनलाईन वर्गात मी मिथिला मॅम तुमचे स्वागत करते. आजचा क्लास मी घेणार आहे.क्लासवर देखरेख आणि तुम्हाला मदत करण्यासाठी पूर्ण क्लास भर शकुंतला मॅम मॉनिटर म्हणून हजर असतील.आपण चारही तुकड्यांचा क्लास एकत्र घेतो.मुलांनी त्यांचे व्हिडीओ चालू करू नये, आणि चॅट बॉक्स मध्ये काहीही लिहू नये.हे कळलं असेल तर आपण आता मुख्य विषयावर जाऊया ना?"
120 मुलं: (सर्व सूचना विसरून आवाज ऑन करून खच्चून ओरडतात) हो...........
टीचर(त्यांच्या जागी बसल्या बसल्या कपाळावर हात मारून घेतात.)
मॉनिटर टीचर कडक आवाजात: "कोणीही आवाज चालू करायचा नाहीये.कॅमेरा चालू करायचा नाहीये.क्लास चालू असताना समोर नाश्ता खायचा नाहीये.तुमच्या आजूबाजूला जर क्लास ऐकायला बघायला पालक बसले असतील तर त्यांनी सभ्य कपड्यात असायचं आहे.कोणीही मूल पूर्ण क्लास ला त्रास देत असेल तर आम्हाला त्यांना आजच्या वर्गातून बाहेर काढावं लागेल आणि आजची हजेरी लागणार नाही."
गाण्याचा क्लास चालू.
टीचर गोड आवाजात: "तर मुलांनो, आज आपण दिल है छोटासा हे हिंदी गाणं गायला शिकलो.मी गाऊन दाखवते.(इथे 2-3 पालकांनी 'हॅ हॅ हॅ.. आज गाऊन घातलाय होय मॅम नी' असा चिकट झालेला जोक मारला.)
"तर मुलांनो, आता तुम्ही गा बरं."
120 मुलं(आवाज ऑन करून तारस्वरात): "दिल है छोटासा...छोटी सी आशा..."
मॉनिटर मॅम(या आता कॉम्प्युटरमागे दीर्घ श्वास घेतायत)
"तुम्ही सगळ्यांनी आपापलं गायचं आहे.आवाज ऑन करून नाही.हेच सगळं मी काल पण सांगितलं होतं.आज परत सांगतेय"
(इथे 3-4 पालक आसुरी हास्य करून 'आम्हाला सांगत असता ना, मुलं नाजूक असतात, त्यांच्या अंगावर ओरडू नका, परत परत सांगू नका.आता गं लबाडे.. स्वतः ओरडतीयस ती?' असे पुटपुटतात.)
योगा क्लास चालू.
टीचर: "तर मुलांनो.आता आपण योगासने शिकणार आहोत.तुम्ही तुमचे कॅमेरा ऑन करा.आणि माझ्यामागे योगासनं करा.श्लोक पासोडकर,तुझे फक्त पाय दिसतायत, कॅमेरा नीट फिरव."
(श्लोक पासोडकर कॅमेरा ऍडजस्ट करता न आल्याने गरागरा फिरवतो आणि 120 मुलं आणि 2 टीचरांना गंजीफ्रॉक आणि 3 इंच बॉक्सर मध्ये टीव्ही बघत सोफ्यावर लोळत पडलेले त्याचे बाबा दिसतात.)
मॉनिटर टीचर(अतिशय कौशल्याने हसू आवरत): श्लोक पासोडकर, तुमच्या पालकांना ड्रेस कोड पाळायला सांगा."
(इथे श्लोक पासोडकर च्या बाबांना शाळेच्या व्हॉटसप ग्रुप वर याबद्दल 100 मेसेज येऊन त्यांचा अब्रूचा पुरता फालुदा झालेला असतो.ते टीव्हीचा मोह सोडून आत पळतात.)
"आयुषी सिन्हा, तुझ्या व्हिडीओत अंधार आहे.लाईट लाव."
(इथे आयुषी सिन्हा ची आई वायूवेगाने पळत येऊन मागच्या टेबलावरचा पसारा उचलून आत पळते.)
कराटे क्लास चालू.
कराटे सर: "मुलांनो आज आपण बेसिक किक शिकणार आहे."
मॉनिटर मॅम: "आणि विशेष गोष्ट अशी की आज सरांचा आणि आपल्या वर्गातल्या उज्वल मेहरा चा वाढदिवस आहे."
120 मुलं: (चॅट बॉक्स मध्ये आणि आवाज चालू करून हॅप्पी बड्डे उज्वल! हॅप्पी बड्डे सर!!" ओरडतात.)
मॉनिटर मॅम(आता या कॉम्प्युटर मागे एक स्ट्रेस बॉल दाबतायत): "कोणीही उज्वल मेहरा ला आणि सरांना हॅप्पी बड्डे करायचं नाहीये.मी केलंय ना?तुम्हाला हे मी काल आणि परवा वैभवी आणि वेद च्या बड्डे ला पण सांगितलं होतं.तुम्ही लक्षात का ठेवत नाहीये?120 जणांनी मेसेज चालू केले तर आपण वेळेत क्लास कसा संपवणार?"
आता सामुदायिक जीवन(याला सध्या evs म्हणतात) चा वर्ग चालू.
टीचर: "तर मुलांनो,साप अंडी देतात.पाल अंडी देते.सर्व पक्षी अंडी देतात.ज्यांना कान असतात ते पिलांना पोटातून जन्म देतात आणि ज्यांना कान नसतात ते अंडी घालतात.अंडी उबवायला त्यावर बसावं लागतं.पण मासे अंड्यावर बसत नाहीत कारण पाण्यात बसता येत नाही.शनया पाटील,आवाज का ऑन केलायस?"
शनाया: "मॅम, घुबड काय करतं?अंडी देतं का प्रेग्नन्ट होतं?त्याला कान आहेत."
टीचर:"शनाया, नीट ऐकत का नाहीस?मी सगळे पक्षी अंडी देतात म्हटलंय ना?"
मॉनिटर मॅम: "शनाया आणि बाकी सगळे, टीचर काय सांगतात नीट ऐकून मग प्रश्न विचारत जा.धैर्य सक्सेना, तू चॅट बॉक्स मध्ये काय लिहिलंयस?"
(इथे सगळे चॅट बॉक्स वाचतात.धैर्य सक्सेना ने 'आय वॉन्ट टू किस हर' लिहिलंय.)
मॉनिटर मॅम(आता यांचा हल्क व्हायलाच आलाय): "धैर्य सक्सेना, तुझा आवाज आणि व्हिडीओ चालू कर.पालकांना बोलाव.तू काय लिहिलंयस?कुठून शिकता हे सगळं?मागे टीव्ही चालू आहे का?तुला मला क्लास मधून आताच्या आता बाहेर काढावं लागेल."
धैर्य सक्सेना:"सॉरी मॅम, मी मित्राशी बोलत होतो.चुकीच्या विंडोत लिहिलं."
(इथे धैर्य सक्सेना चे आईबाबा 'धरणी गिळेल तर बरं' असे चेहरे करून त्याच्या आजूबाजूला उभे आहेत.धैर्य सक्सेना चे टीव्ही राईट्स किमान 1 महिना जप्त होणार आहेत.)
टीचर(आता यांचा पण धीर सुटत आलाय):"बरं मुलांनो, आपण विषयाकडे वळू. उद्या मला नॅचरल आणि मॅन मेड फायबर च्या सगळ्या प्रकारचा एक एक नमुना दाखवायला आणायचा आहे."
मॉनिटर मॅम:"मुलांनो, नीट ऐका. कपड्याचे नमुने दाखवून परत पालकांना द्यायचे आहेत.कोणीही काहीही कापायचं नाहीये.कागदावर फेव्हीकोल ने चिकटवायचं नाहीये.पूर्ण नमुने आणायचे आहेत.नमुने योग्य डिसेंट कपड्याचे हवेत.अंडरवेअर्स चालणार नाहीत."(या मॅम 120 चोरांना एकदम चांगल्या ओळखणाऱ्या अलिबाबा आहेत.)
मध्येच काही मुलांच्या घरातले लाईट जातात.
मॉनिटर मॅम:"मुलांनो, मला 'लाईट गेलेत' वगैरे मेसेजवर सांगू नका.नेटवर्क वेगळं बॅटरीवर चालणारं वापरायचा प्रयत्न करा.नेटवर्क आलं की गुपचूप 'मी आलो' वगैरे चॅट बॉक्स मध्ये न लिहिता परत या."
टीचर:"तर मुलांनो, तुम्ही काल आणलेले वेगवेगळ्या पानांचे नमुने मला कॅमेरा ऑन करून न बोलता दाखवा."
(इथे कॅमेरा ऑन केल्यावर दिव्या शहाणे आणि तिचा मोठा भाऊ बॅटरी मॉडेम ची खेचाखेची आणि मारामारी करताना 120 मुलं आणि टीचर ना दिसतात.)
मॉनिटर मॅम:"दिव्या शहाणे,बिहेव्ह युवरसेल्फ.मी तुला आणि तुझ्या दादाला दोघांनाही दादाच्या मॉनिटर मॅम ना सांगून क्लास मधून बाहेर काढीन.मॉडेम मध्ये ठेवा.दोघांना सारखी रेंज येईल.आणि गुपचूप क्लास मध्ये लक्ष द्या."
इथे कॅमेरा ऑन करून सात्त्यकी बॅनर्जी ची आई येते.
आई:"मॉनिटर मॅम,12.30 वाजले?क्लास कधी संपणार?आम्हाला जेवायचंय.सात्त्यकी च्या बाबांना आणि मला मीटिंग आहेत."
मॉनिटर मॅम(मनात:"एक नंबरची चोंबडी स्नॉब मेली!!") जाहीरपणे गोड आवाजात: "तुम्ही सगळे जेवायला जाऊ शकता.आम्ही क्लास वेळेत संपवायचा प्रयत्न करत असतो.मुलं उशीर करतात. तर मुलांनो, तुमची जेवायची वेळ झाली की तुम्ही काहीही न सांगता, बाय न म्हणता निघून जाऊ शकता.तुम्हाला जेवतानाही टीचर काय म्हणतात ऐकता येईल.इथे आवाज ऑन करून विचारायची गरज नाही."
आई:"थँक्स मॅम."(मनात: काहीही केलं तरी ओरडता ना तुम्ही आमच्या मुलांना.म्हणून विचारावं लागतं.)
टीचर:"तर मुलांनो, आता आपण पौष्टिक अन्न आणि अन्न दर्जा पिरॅमिड याबद्दल शिकूया."
1.00 दुपार
(आता मुलं भूक लागली म्हणून समोर बाकरवडी, शेव,चिप्स घेऊन बसली आहेत.)
मॉनिटर मॅम:(आता यांचा धीर सुटत आलाय.)"मुलांनो, आजचा क्लास संपला आहे.सर्वांनी उद्या वेळेवर, आधी नाश्ता तयारी आवरून क्लास ला बसायचं आहे.क्लास मध्ये डिसेंट कपडे घालायचे आहेत.लोळत क्लास अटेंड करायचा नाहीये.पालकांनी डिसेंट कपडे घालून ड्रेसकोड पाळायचा आहे.कोणीही चॅट विंडो चालू करून फी बद्दल, नेटवर्क बद्दल प्रश्न विचारायचे नाहीयेत.तुम्हाला प्रश्न विचारायला वेळ दिला जाईल त्यातच, शिकवलेलं नीट ऐकून जे कळलं नाही तितकेच प्रश्न विचारायचे आहेत.हॅप्पी बड्डे विश करायचं नाहीये.स्टे होम स्टे सेफ."
छान लिहले आहे.
छान लिहले आहे.
मुले काही कारण नसताना आवाज ऑन करतात आणि सगळ्याना घरातले background आवाज ऐकवतात . ऑनलाईन शिकवायचा अनुभव नसल्याने टिचर पण लगेच मुट करु शकत नाहीत . हे ११- १२ वीच्या क्लास मध्ये पण होते. लहान मुलाच्या क्लास मध्ये धमालच असेल.
(No subject)
हा! हा! हा! खूप मस्त लिहिलय
हा! हा! हा! खूप मस्त लिहिलय , खूप हसलोय
मला फक्त एक सांगा झूम मिटींग मध्ये आपण मित्राशी प्राय्व्हेट चाट केला तर झूम मिटींग घेणार्या ऑर्गनायझर सर ला आमचं प्राय्व्हेट चॅट दिसत असलं का? कारण दोन तीन मिटिंग मध्ये फालतू प्रश्न(बडबड) करणार्या वर्गातल्या दोन पोरी आणि एका पोराच्या मातुल घराण्याचा संपुर्ण उद्धार आमच्या प्राय्व्हेट चॅट मध्ये झाला होता. (अर्थात इकडे आमच सुरू असल तरी अजून कोण ना कोण करत असणारच की)अत्ता ते सगळ आठवतय. पण अजून तर सर, मॅम कोणतेच शिक्षक काय बोलत नाहीयेत कुणाला. पण क्लासमधल्या सर्वांचे नंबर सर आणि मॅम नी त्यांच्या मोबाईल मधून उडवलेत बहुदा. कारन चार पोरी आणि सहा पोरांना व्हिचारलं होतं कि सर आणि मॅम च डिपी , बायो दिसतय का पण सगळे म्हणालेत काहीच दिसत नाहीये.
बाकी लेक्चर्स आमचे पण सुरू आहेत. कोणताही शिक्षक आत्तापर्यंत काहीही बोलला नाहीये कोणत्याही विद्यार्त्तथ्याला हा! हा! हा!
मागंं एक पोरगं वेबिनार मधल्या चॅट बॉक्स मध्ये विचारत होतं कि "तीन पत्ती" खेळायच का. (त्याला प्राय्व्हेट ला विचारायच असल पण ते ग्लोबल वर पडलव्हत) ते वेस्ट व्हर्जिनीयाच्या माणूस ला काय कळल माहीत नाय. पण आमचे सर ओरडले तेला. तु जाऊ शकतोस. इथे फक्त सिरीयस लोकांनी बसावं. हे पण अत्ता आठवल थॅंक्स अनु ताई
मला झूम मीटिंग मधलं काहीच येत
मला झूम मीटिंग मधलं काहीच येत नाही रे प्रगल्भ.☺️☺️
मुलं स्वतः झूम आणि गुगल मीट च्या मीटिंग मध्ये जातात, अटेंड करतात, बाहेर येतात.झूम बद्दल असुरक्षित वगैरे बराच गवगवा ऐकला आणि मग म्हटलं जाऊदे, सध्या काही शिकायची गरज नाही.
मी अजूनही स्काइप आणि वेबेक्स मीटिंग च्या अश्मयुगीन काळात आहे.
हा खरच दिव्य प्रकार आहे.
हा खरच दिव्य प्रकार आहे.
छान लिहले आहे.
छान लिहले आहे.
टीचरची दया आली.
टीचरची दया आली.
लॉकडाउनमध्ये आमच्या नातलगांची एक झूम मीटिंग झाली. मीटिंग जॉइन केल्यावर माझा वेब कॅम बिघडलाय असा शोध लागला. मग फोनवरून जॉइन करताना पासवर्ड चालेना. आवाज जाईना. असं काय काय झालं. आम्ही टीव्ही बघतात तशी पीसीवर मीटिंग पाहिली. फोनवरून दोन वाक्य बोललो.
झूममध्ये जो बोलू लागेल त्याचा कॅमेरा फोकसमध्ये येतो. भारी टेक्नॉलॉजी आहे.
गुगल आणि स्काइप मीट्स केल्या नाहीएत.
अरे देवा आता कुणाला विचारू हा
अरे देवा आता कुणाला विचारू हा! हा! हा!
पण तो तीन पत्ती वाला सीन 'Gotomeeting app' अॅप वर झाला होता.
मी तेव्हापासून कोणालाच काय बोलत नाही चॅट मधे
सर ना पण प्रायव्हेट ला क़्वेरीज विचारतो .
पण या लेखा मुळे मला पण आमच्या मिटींग बद्द्ल च्या काही गमतीदार किश्यांबद्द्ल लिहावं वाटतय
पण जर मी लिहीलच तर सगळ्यात वर तुमच्या या लेखाची लिंक टाकून
खाली ... अनु ताईंच्या प्रेरणेने असं लिहीणार बघा
"झूममध्ये जो बोलू लागेल
"झूममध्ये जो बोलू लागेल त्याचा कॅमेरा फोकसमध्ये येतो. भारी टेक्नॉलॉजी आहे"--> ते झूम बद्दल च वाचून बाकीच्या शिक्षकांनी वापरायच बंद केलय ... Gotomeeting app वरच आता चाललय भरत दादा
अरे पण एक सर अजून झूम वरच घेत आहेत. ते कायम म्हणतात कि झुम चे युजर फिचर्स ऑर्गनायझर साठि चांगले आहेत
असं चालतं?
असं चालतं?
नक्की लिही प्रगल्भ
नक्की लिही प्रगल्भ
आमच्या मुलांच्या शाळेचे
आमच्या मुलांच्या शाळेचे ऑनलाइन क्लास नाहीत हे किती बरं आहे!! पीपीटी पाठवतात. त्यात प्रश्न वगैरे असतात. उत्तरंही असतात शेवटी. ते प्रश्न वहीत सोडवायचे. एखाद्या यूट्यूब व्हिडिओची लिंक असते. शाळेच्याच एखाद्या टीचरने शिकवलेला धडा असतो व्हिडिओत.
एक नणंद शिक्षिका आहे मुंबईत. तीही जाम वैतागलेली आहे या ऑनलाइन क्लासला. पण आता काय करणार!
हहपुवा, खूप मस्त लिहीले आहे
हहपुवा, खूप मस्त लिहीले आहे
मस्त लिहिलंय अनु,
मस्त लिहिलंय अनु,
नशिबाने आमच्याकडे ऑनलाईन सेशन्स नाहीयेत, अप लोड केलेल्या असाईनमेंट्स सोडवा आणि गप्प बसा असा प्रकार आहे ,त्यामुळे सुख आहे,
पण भाचे मंडळीत ज्युनिअर KG लेवल ला ऑनलाईन टिचिंग चा मुलांचा छळ चालू झालाय, भाचा आणि त्या वयाची मुले स्वतः चे स्वतः unmute करून बोलून mute करायला शिकलियेत.
बाकी ऑनलाईन प्रकार चे किस्से थोड्या वेळाने लिहितो
झूम बद्दल काही विचारायचं
झूम बद्दल काही विचारायचं असल्यास बिनधास्त विचारा मला.
2 वर्षांपूर्वी 6000 लोकांना वेबेक्स वरून झूम वर migrate केलंय आणि ह्या दोन वर्षांत 8000 ॲक्टिव्ह युजर्स ना हेल्प करतोय.
"झूम बद्दल काही विचारायचं
"झूम बद्दल काही विचारायचं असल्यास बिनधास्त विचारा मला."--->'संदेश' मधे पाठवल आहे
सेम आमच्या पोराच्याच शाळेत
सेम आमच्या पोराच्याच शाळेत इतके उद्योग सुरू असतात
एकदा पोरांनी बाईंनाच रिमूव्ह केलं
पिटी चे शिक्षक तक्रार करतात की मुलं मधेच निघून जातात ती परत येतच नाहीत
बाईंनी प्रश्न विचारले की आणि येत नसेल उत्तर तर मुलं सरळ मिटोंग लिव्ह करतात आणि नंतर साळसूदपणे लाईट गेली होती म्हणून सांगतात
स्क्रीन शेअर केला तर त्यावर रेघोट्या मारतात
अक्षरशः दया येते शिक्षकांची
अफलातून लिहिलंय!
अफलातून लिहिलंय!
छान. मुलगा लहान आहे त्यामुळे
छान. मुलगा लहान आहे त्यामुळे फक्त एक तास ऑनलाईन क्लास असायचा.
मुलं चॅट करतात कारण त्यांना एकमेकांशी बोलायला मिळत नाही हे कारण उमजुन आमच्या शाळेच्या टीचरनी एक तास फक्त चॅट सेशन आयोजित केला. त्यात मुलं पोकिमॉन कार्ड किंवा घरात बसुन जे काय तयार केलेलं असेल/ शेअर करायचं असेल ते शेअर करू शकतात. पोरांना मजा आली त्या सेशनला. तुम्ही पण सजेस्ट करुन बघा. अर्थात त्याने चॅट कमी झालं का काय कल्पना नाही, पण एकुणच चॅट बंद होईल हे वाटणे फारच सैनिकी आहे.
मला पगार मिळत असुनही अशी एकही झूम (झूम कशाला!... मिटिंग रुम मध्ये तोंडाला तोंड लावलेली) मिटिंग आठवत नाही ज्यात मी व्हॉट्सॅप चेक केलं नाही, काही भलतंच सर्च केलं नाही की मेल चेक केली नाही. मग भले जिरं का चघळलं असेल! ही तर लहान मुलं!
काय शिकवायला हवे, कसे
काय शिकवायला हवे, कसे शिकवायला हवे हा काथ्या शाळेच्या व्हॉटसप ग्रुपवर सर्व पालक इतके कुटतात(रोज 1000 पोस्ट) की यात आम्ही पडत नाही ☺️☺️मुली मुली एकमेकांना वेगळे व्हिडीओ कॉल करतात वीकेंड ला.
मजा येते पण ऐकायला. शिक्षक खरंच चांगलं शिकवतात.
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
शिक्षक, मुलं सगळेच या प्रकाराला नवखे आहेत सध्या... त्यामुळे ही मजा मजा होत असणार.
मस्त
मस्त
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
आमच्याकडे पण हेच चालू आहे ..
आमच्याकडे पण रोजचा सोहळा आहे .. मुलगी लहान असल्यामुळे कोणाला तरी सोबत बसणं कंपलसरी आहे .. कोणी unmute असेल तर ताबडतोब watsapp group वर पोस्टी पडतात, unmute वाल्यानी त्या वाचल्यावर एकमेकांचा केलेला उद्धार पण ऐकू येतो (अग /अरे ए, बावळट तू unmute (वर?) आहेस )
एकदा असेच खूप messages आले , तेव्हा मी नवऱ्याला जाऊन विचारलं- बघ आपण तर नाही ना , त्याने एकदम कॉन्फिडन्टली सांगितलं "नाही नाही , मुलगी टीचर सांगतील तेव्हाच unmute करतेय" आणि स्वतः च्या लॅपटॉप मध्ये डोकं घातलं. watsapp group वर जेव्हा आमचा पण नावानिशी उद्धार झाला तेव्हा कळालं की , आमच्याच लेकी ने unmute करून दंगा घातला होता .
भारीच लिहिले आहे. हहपोदू
भारीच लिहिले आहे. हहपोदू
मांजर नाही का आले इथे ?
मांजर नाही का आले इथे ?
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
मांजर नाही का आले इथे ? Proud
मांजर नाही का आले इथे ? Proud >> ते कुत्री / मांजर आहे...बाहेर बांधले असेल.
अनु, फार छान मांडलेस
आतापर्यंत हा फोटो
आतापर्यंत हा फोटो सगळ्यांकडे पोचलाच असेल
खरी गंमत
https://twitter.com
https://twitter.com/igiveupnotso/status/1294500790757859329
Pages