अमिताभ आणि कोरोना

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 July, 2020 - 20:14

अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.

- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.

रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.

अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.

- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आला रे आला स्ट्रेंजर आला
धन्यवाद निबा माझा तर्क खरा ठरवल्याबद्दल
धिंग चँग ढिचांग

आता येईल मजा
चल रे सुरू हो तू मालकाने सांगितलंय तस
एकदम शिवराळ भाषा पाहिजे काय
ते गुळमुळीत नको

Happy

या रोगट मानसिकतेची कीव येते
कसली लोचट आणि मानसिक गुलामगिरीची वृत्ती आहे ही
हिडीस>>> हे तुमचे शब्द आहेत ना. जो आधीच चिखलात लोळतोय त्याने दुसऱ्यांच्या अंगावर उडालेले शिंतोडे दाखवणं पटतं का? Rofl

निबा ला जेव्हा राग अनावर होतो
पण त्याच वेळी मायबोली वरची इमेज पण जपायची असते
तेव्हा स्ट्रेंजर येतो आणि दे दणादण शिवराळ बोलतो
सगळी भडास काढली किंवा समोरचा गप्प झाला की परत गायब होतो

हे चाच चौधरी च्या साबू को जब गुस्सा आता है तो ज्वालामुखी फटता है च्या चालीवर वाचावे Happy

Submitted by आशुचँप on 10 July, 2020 - 18:56

दोनच दिवसात प्रचिती आली
Happy

चिखलात लोळायचं सोड रे. आमटेंकडून तू काय आदर्श घेतला ते सांग की रे. की फक्त पिक्चर बघितला थेटरात जाऊन. कळू दे मायबोलीकराना काय आदर्श घेतलास.

हे असले पांचट प्रतिसाद मूळ आयडी ने पण लिहू शकला असतास
कशाला स्त्रानेजर ला खर्ची घातला
वर माझी थिएरी खरी ठरवलीस ती वेगळी
शोभत नाही हो
माबोवरचा तू इतका चतुर भामटा आहेस
इतकं बाळबोध
आरारा

मला माननीय अमिताभ यांच्याबद्दल जास्त काही माहिती नाही, पण इथे अनेक जण आमची पिढी, ४ पिढ्या वगैरे कशा माननीय अमिताभ यांचा आदर्श घेऊन मोठ्या झाल्या, त्यांनी किती केलं, किती आनंद दिला असे मुद्दे मांडलेत. तर फक्त माझ्या माहितीसाठी म्हणुन विचारतो, की जसे बाहेरच्या शिवाजीराव गायकवाड्ने तामिळ भुमीत येऊन इथली भाषा शिकली, संस्कृती आत्मसात केली, इथलाच झाला व इथल्या सामान्य जनतेसाठी अनेक समाजोपयोगी कामे केली, तसे माननीय अमिताभ यांनी काय काय व कितपत केले? त्यांना मराठी येते का? रोजच्या जीवनात मराठी वापरतात का? मराठी शाळेला देणगी वगैरे? गायकवाड जसे कावेरीच्या मुद्द्यावर तामिळनाडुची बाजु घेतो तसे बच्चनने कधी एखाद्या राजकीय मुद्द्यावर महाराष्ट्राचे जाहीर समर्थन केले आहे का?

आशूचॅम्प, तुम्हाला सल्ला वैगरे नाही दिला मी फक्त सुचविले आहे तेही एकट्या तुम्हाला नव्हे तर आपल्या सगळ्यांनाच.
ऋ इथे बहुतेक मनोरंजन आणि करमणुकीची धागे काढतो जे बऱ्याच जणांना इरिटेट होतात परंतू आधी तुमचे बहुतांश लिखाण आभ्यासपूर्ण असायचे पण हल्ली तुम्ही फक्त ऋ सोबत वाद करतानाच दिसता.

आता सल्ला देते... जो अजिबातच घेऊ नका.

प्राणिमात्रांच्या वर सुद्धा दया करणाऱ्या तुमच्या आदर्श असणाऱ्यांना कधी समजले की तुम्ही एका मनुष्याचा इतका द्वेष करताय तर त्यांना वाईट वाटेल.
ऋ चा तिरस्कार करता करता तुम्ही आता त्याच्याबद्दल कोणी थोडेतरी चांगले बोलले तरी त्यालाही उलटसुलट बोलू लागला आहात.
दुसऱ्यांना get well soon cha सल्ला देताना त्याची गरज आपल्याला पण आहे का तपासावी. गेट वेल सून.
(मला पुन्हा सांगू नका मी तपासून घेईल हो मला)

मला मजाच येत नाहीये>>> बेट्या तुझ्या मौजमजेचं नन्तर बघू आधी आदर्श काय घेतलास ते सांग. सगळे वाट बघताहेत.

तुम्हाला असे का वाटते मी द्वेष करतो किंवा तिरस्कार करतो
तुमच्या माहिती साठी आम्ही फेसबुकवर मित्र आहोत आणि अधून मधून नॉर्मल chat पण करतो एकमेकांशी
इतक्यात नाही केलं कारण मी मधल्या काळात फेसबुकवर साफसफाई करताना अनेक जणांना अंफ्रेंड केलं
त्यात माबोवरचेही अनेक जण आहेत

मी तुमचाही काही राग करत नाही पण जेव्हा हा उच्छाद मांडत होता तेव्हा वैताग आलेला तेव्हा सगळे हेच म्हणत होते इग्नोर करा इग्नोर करा
म्हणलं जे सांगतात ते किती करू शकतात इग्नोर ते बघू

आणि मी मागेही सांगितले आहे की लोकडाऊन मध्ये मला काम नाही त्यामुळे मी फावला वेळ माबोवर घालवतो
आणि याला छेडायला मला आवडत आणि त्याचीही काही तक्रार नाहीये
असती तर थेट बोलला असतं की बस कर
पण तो ते म्हणणार नाहीच इतके त्याला ओळखतो

सो फार लोड घेऊ नका
आम्ही काय एकमेकांच्या उरावर बसून मारहाण करत नाही
आणि माबोवरचा राजकारण धाग्यावरील चर्चा बघितली तर आमचे प्रतिसाद हे अद्याप सभ्य गटात मोडतात

सगळे म्हणजे कोण
तू आणि निबा का
म्हमजे सगळे मिळून एकच झाला किंवा अर्धा
आता अर्धवट लोकांसाठी मी इतके कष्ट घ्यावेत का हा एक प्रामाणिक प्रश्न मला पडला आहे

तोवर तू मजा आणायची बघ
नंतर वगैरे काही नको
तू काय राजकीय पुढारी आहेस का आश्वासन द्यायला

नई सिम्बा वेगळे आहेत
गोंधळ होऊ देऊ नका
निबा हे अभिषेक उर्फ भास्कर उर्फ रुनेमश यांनी स्वतालाच दिलेले एक विशेषण आहे जे मला जाम आवडलं
म्हणून मी त्याला प्रेमाने निबा म्हणतो;)

५० वा प्रतीसाद टाकायला आलो होतो. पण झाला ५१.
बाकी चलने दो. वाचतोय.

अरे समजू तर दे बेट्या काय आदर्श घेतलास? की त्या समाजसेवकांची नावं फक्त आपण किती ग्रेट आहोत, दुसरे किती पाण्यात आहेत हे दाखवण्यासाठी घेतलंस.

@अभिनव
पुन्हा तेच comparision.
रजनीकांत काय करतो, बाबा आमटे किंवा लष्कराचा जवान काय यांची तुलना का करावी पण.
अमिताभ लोकांना का आवडू लागला तर त्याचे मूव्ही बघूनच ना. इतरही कलाकार आवडतात ते त्यांच्या अभिनयाने किंवा मूव्ही बघूनच. लोकांना त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरेस्ट असतो. त्यामुळे त्यांचा कलाकारांबद्दल आदर, प्रेम कमी किंवा जास्त होतो पण म्हणून लोक त्यांचे मूव्ही बघणे बंद नाही करत. थेट रला नाही गेले तरी टिव्ही वर बघतच असतील ना.
माबोवर दुःखद घटना म्हणून धागा आहे त्यावर गेलेल्या कलाकारांना सुद्धा श्रद्धांजली वाहतो च ना आपण. या कलाकारांनी काय केलंय समाजासाठी त्यांना कशाला श्रद्धांजली असे नाही ना म्हणत कोणी.
इथे असे कितीतरी वेळा वाचले आहे की कंटाळा आला की हे पुस्तक वाचतो, हा मूव्ही बघतो किंवा उदास वाटले की हा कार्यक्रम बघते. म्हणजेच या कलेमधून आपल्याला काहीतरी मिळतेच ना. मग हे त्या त्या कलाकारांचे सामाजिक योगदान च आहे की.
म्हणूनच यापुढे प्लीज कलाकार = सामाजिक योगदान हे comparision nako करूया

ऋन्मेष चे खूप चाहते आहेत मायबोलीवर, कदाचीत सर्वाधिक, त्याला डुप्लिकेट id ची गरज नाही. त्याचे चाहतेच समर्थ आहेत आणि आशुचंप्स सारखांच्या कंमेंट्स मुळे ऋ न्मेष चे चाहते अजून वाढतील

याचा अर्थ आपण किती ग्रेट आहोत हे दाखवण्यासाठी त्यांची नावं घेतलीस. जर खरोखरच काही आदर्श घेतला असतास तर ही भाषा नसती तुझी. तुझ्यासारख्या माणसाकडून हीच अपेक्षा होती म्हणा. रोगट मनोवृत्ती अजून काय.

अरे बाबांनो भांडू नका. जीवनाचा आनंद घ्या. आता अमिताभजी चहा बिस्किटे घेत असतील. बातमी समजली की लगेच पोस्ट करतो ईथे

तुम्हाला असे का वाटते मी द्वेष करतो किंवा तिरस्कार करतो
तुमच्या माहिती साठी आम्ही फेसबुकवर मित्र आहोत>>>> असे आहे तर मग छान. मला तुमच्यातला वाद बघून तो इरिटेड झाल्यानंतर आलेला द्वेष आहे असेच वाटत होते. असो माबाबूदो.

मी तुमचाही काही राग करत नाही पण जेव्हा हा उच्छाद मांडत होता तेव्हा वैताग आलेला तेव्हा सगळे हेच म्हणत होते इग्नोर करा इग्नोर करा
म्हणलं जे सांगतात ते किती करू शकतात इग्नोर ते बघू>>> ओके

सो फार लोड घेऊ नका
आम्ही काय एकमेकांच्या उरावर बसून मारहाण करत नाही
>>>>>> आधीच सांगायचं ना उगाच मला किती परिश्रम पडले ते मोबाईल वरून टायपायला Proud

पुन्हा तेच comparision.
>>
मी तर पहिल्यांदाच असा प्रश्न विचारला या धाग्यावर. इतरांनी आधिच विचारला म्हणुन मी एखादा विषयावर वेगळ्या अँगलचा प्रश्न विचारु नये का?

रजनीकांत काय करतो, बाबा आमटे किंवा लष्कराचा जवान काय यांची तुलना का करावी पण.
>>
मी तुलना केलेली नाही. तुलना तेव्हा ठरली असती जेव्हा रजनीकांतचे उदाहरण देऊन मी अमिताभला काही बोललो असतो किंवा कमी लेखले असते. इथे महाराष्ट्राच्या ४ पिढ्या चुकीचा आधर्श घेऊन वाढल्या हा मुदा आला म्हणुन मी बोललो.

अमिताभ लोकांना का आवडू लागला तर त्याचे मूव्ही बघूनच ना. इतरही कलाकार आवडतात ते त्यांच्या अभिनयाने किंवा मूव्ही बघूनच. लोकांना त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरेस्ट असतो. त्यामुळे त्यांचा कलाकारांबद्दल आदर, प्रेम कमी किंवा जास्त होतो पण म्हणून लोक त्यांचे मूव्ही बघणे बंद नाही करत. थेट रला नाही गेले तरी टिव्ही वर बघतच असतील ना.
>>
तुम्हाला अमिताभ का आवडतो असे मी कुठेही विचारलेले नाही. त्याचे महाराष्ट्रासाठी सामाजीक योगदान विचारले आहे.

माबोवर दुःखद घटना म्हणून धागा आहे त्यावर गेलेल्या कलाकारांना सुद्धा श्रद्धांजली वाहतो च ना आपण. या कलाकारांनी काय केलंय समाजासाठी त्यांना कशाला श्रद्धांजली असे नाही ना म्हणत कोणी.
>>
हा प्रॉटोकॉल त्या श्रद्धांजलीच्या धाग्यावर आपण सगळेच पाळतो . पण इथे कशाला? ईथे श्र्द्धांजली आहे का? नाही ना? आमची पिढी, ४ पिढ्या व त्यांचा आदर्श हा मुद्दा कोणी आणला?

इथे असे कितीतरी वेळा वाचले आहे की कंटाळा आला की हे पुस्तक वाचतो, हा मूव्ही बघतो किंवा उदास वाटले की हा कार्यक्रम बघते. म्हणजेच या कलेमधून आपल्याला काहीतरी मिळतेच ना. मग हे त्या त्या कलाकारांचे सामाजिक योगदान च आहे की.
>>
ते कलेच्या पातळीचे योगदान झाले. मी असे सामाजीव व राजकीय योगदान विचारतोय ज्याने सामान्य माणसाच्या आयुष्यात फरक पडला असेल.

म्हणूनच यापुढे प्लीज कलाकार = सामाजिक योगदान हे comparision nako करूया
नवीन Submitted by निल्सन on 12 July, 2020 - 17:31
>>
तुम्हाला पटतेय ना हे? मग तुम्ही जरुर अमल करा त्याच्यावर. बाबा आमटे किंवा लष्कराचा जवान यांचे आदर्श घेण्याच्या ऐवजी, ज्या व्यक्तीचे कर्मभुमीसाठी सामाजीक व राजकीय योगदान शुन्य आहे, कर्मभुमीशी कुठलेही भावनीक नाते नाही, ज्याला ईथली भाषाही येत नाही, जो इथला कधीच झाला नाही, त्याचा आदर्श घेऊन इथल्या ४ -४ पिढ्या वाढल्या हे बघुन मला त्या ४ पिढ्यांमधील अशा विशिष्ट लोकांची खुप लाज वाटते आहे.

आलेले काय सुचेना राव स्ट्रेंजर ला दुसर काही
खरंच तू आहेस का आज वरण भात खाऊन आलाय
श्रावण सुरू झालाय का
तब्येत बरी नाही का
इतका मवाळ।का बोलतोयस?

Pages