अमिताभ आणि कोरोना

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 July, 2020 - 20:14

अमिताभला कोरोना झाला ही बातमी धडकी भरवणारी आहे.
काही महिन्यांपूर्वी कोरोना जगात थैमान घालत होता तेव्हा आपण भारतात सुरक्षित आहोत असे वाटत होते. जेव्हा त्याने भारतात आपले हातपाय पसरयला सुरुवात केली तेव्हा धारावीसारखे दाट वस्तीचे आणि गर्दीचे परीसर जास्त धोकादायक आहेत, पोलिस आणि आरोग्य कर्मचारयांना लागण व्हायची जास्त भिती आहे, आपण मध्यमवर्गीय जोपर्यंत पोटापाण्यासाठी म्हणून नाईलाजाने बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्या घरी सुरक्षित आहोत असेच वाटत होते. पण खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले आणि घाबरायला झाले. जोपर्यंत कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.

- अमिताभ पाठोपाठ अभिषेक बच्चन देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जया बच्वन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांना लागण झाली नाहीये.

रेखाचा बंगलाही तेथील सुरक्षा कर्मचारयाला कोरोना झाल्याने सील करण्यात आला. त्यामुळे एकूणच बॉलीवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला अश्या बातम्या येत होत्या. पण यावरून विनोद सुचणारयांच्या रोगट मानसिकतेची किव येत होती. असो.

अमिताभच्या आणि अभिषेकच्याही तब्येतीसाठी एकत्र प्रार्थना करूया. थोडे मनावरचे दडपण निवळेल.

- आज सकाळच्या बातमीनुसार ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला Sad

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जया बच्चन चे ठीक आहे पण अभिषेक पॉसिटीव्ह असताना ऐश्वर्या कशी निगेटिव्ह? नक्की कसा पसरतोय हा कोरोना... भीतीदायक आहे हे....

एक गोष्ट समजली नाही - "माझ्याशी संपर्कात आलेल्या लोकांनी टेस्ट करा" असं का ट्वीट केलं त्यांनी? त्या भागातील लॉकडाऊन संपला का? जनसंपर्क (पब्लिक अपियरंसेस) सुरू झाले आहेत का? त्यांच्या संपर्कात फक्त माहितीचे, बोटावर मोजता येतील इतकेच लोक असायला हवे ना?

बाकी, लवकर दोघांना बरे वाटू दे.

लोकडोवन आता सुरु झालाय... आधी नव्हता- तेंव्हा लोक भेटले असू शकतात... गेल्या दहा दिवसात कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्याना टेस्ट करुन घ्यायला सांगतायत ते...

खुद्द अमिताभलाही कोरोना होऊ शकतो तर तो आपल्यापैकी कोणालाही होऊ शकतो हे जाणवले.
कोरोना आपल्या जवळच्या व्यक्तीला वा बिल्डींगमधील कोणाला होत नव्हता तोपर्यंत तो लांबचा पाहुणा वाटत होता. आज कोरोना आपल्या घरात आल्यासारखे वाटले.

सर्व लोक असाच विचार आणि निष्काळजी पणा करत राहिले आणि रूग्णांची संख्या वाढली अस नाही वाटत. काळजी घ्या.

<लोकडोवन आता सुरु झालाय... आधी नव्हता- तें >
महाराष्ट्रात २२ मार्चच्या मध्यरात्री लॉकडाउन लागू झाला. १ जूनपासून काही काही गोष्टी पुन्हा सुरू होत आहेत.

अमिताभ ने पब्लिक अ‍ॅपिअरन्सेस केले नसावेत. पण भेटीगाठी झाल्या असतील.

मी शेवटचे घंटा वाजवताना बघितले होते. ॲपिअरन्स बद्दल म्हणाल तर सिनियर सिटीझन म्हणून परवानगी नाही.

रोज एकातरी बॉलिवूड कलाकाराची 'करोना पॉझिटिव ' ,अशी बातमी अस्ते, नक्की काय करताहेत ही लोकं, शूटिंग वगैरे चालू आहेत का?
'ब्रीद' अशी नविन वेब्सिरीज आली ना अभिषेक ची आत्ताच, ड्बिंग स्टुडिओ बंद केलाय आता तात्पुरता जिथे तो ड्बिंग करत होता, त्याला करोना झाल्यामुळे.

बच्चन लोकांचं एकत्र कुटुंब आहे का? बहुतेक अभिषेक मुळे अमिताभ ला झाला असणार एका घरात रहात असतील तर, वयामुळे जास्त रिस्क.

देशभरात 8 लाख लोकांना लागण, 22 हजार मृत्युमुखी
महाराष्ट्रात लाखभर लोकांना लागण त्याचे काही नाही
आणि अमिताभ ला झाला की धडकी भरते
घरात आलाय असे वाटते

या रोगट मानसिकतेची कीव येते
कसली लोचट आणि मानसिक गुलामगिरीची वृत्ती आहे ही
हिडीस
Sad

<<< देशभरात 8 लाख लोकांना लागण, 22 हजार मृत्युमुखी
महाराष्ट्रात लाखभर लोकांना लागण त्याचे काही नाही
आणि अमिताभ ला झाला की धडकी भरते
घरात आलाय असे वाटते

या रोगट मानसिकतेची कीव येते
कसली लोचट आणि मानसिक गुलामगिरीची वृत्ती आहे ही
हिडीस
Sad

नवीन Submitted by आशुचँप on 12 July, 2020 - 12:47 >>>+१११११

अगदी अगदी हेच मनात आले होते जेव्हा काल रात्री बातमी वाचली अन आता माबोवर पण हेच Sad

आता बहुतेक जेवायला बसले असतील. डाळ भात लोणचं भाजी पापड असेल की कोंबडी बोकड? दुपारी ac लाऊन झोपतील की फक्त फॅन लावून? खूपच काळजी वाटते. कोरोना एव्हड्या मोठ्या सुप्रसिद्ध लोकांना झालाच कसा?

आज सकाळी बातम्या लावल्या तर अर्धी लोक हास्पिटलच्या बाहेर आणि अर्धी जलसावर sensitization बघत/दाखवत. Uhoh
तब्येत कशी आहे, रात्री झोपले की नाही , त्यांना खायला काय देतायेत. फक्त सकाळी पोट साफ झालं की नाही ते मात्र सांगितले नाही.

आणि अमिताभ ला झाला की धडकी भरते
घरात आलाय असे वाटते
या रोगट मानसिकतेची कीव येते
कसली लोचट आणि मानसिक गुलामगिरीची वृत्ती आहे ही
हिडीस

>>>>>>

मला अमिताभ, शाहरूख, सचिन हि माणसे खरेच घरची वाटतात. यांना बघत, यांच्याकडून शिकत, यांचा आदर्श ठेवत मी आणि माझी पिढी मोठी झालीय. यांनी आजवर मला अफाट आनंद दिलाय. हे बंध या भावना अश्या त्रयस्थ व्यक्तीला सांगून समजणार नाही. आणि मला त्या समजावण्याची ईच्छाही नाही. जर कोणाला यात ईतके काही घाणेरडे वाटत असेल तर खुशाल वाटू दे. तो त्यांचा प्रश्न आहे.

सुंदर आदर्श आहेत
तुझ्यासारख्या लोकांकडून अजून काही अपेक्षित नव्हतंच वेगळं
आणि तुझी पिढी वगैरे म्हणून जनरल बोलू नकोस
तुझ्या वयाच्या सुजाण लोकांचे आदर्श वेगळे आहेत आणि तुझ्या तर बाबा आमटे, प्रकाश आमटे, अभय बंग यांची नावेही कानावरून गेली नसतील कधी
तुम्ही तद्दन फिल्मी लोकांचेच घ्या आदर्श आणि त्यांच्याच आरत्या ओवाळत रहा कायम
घरात फोटो ठेऊन रोज पूजा पण करत असशील रोज
आता जा तिथे हॉस्पिटलच्या बाहेर जाऊन बसा रस्त्यावर अमिताभ च्या तब्येतीसाठी प्रार्थना करत
येड्याचा बाजार नुसता Sad

तुझ्या तर बाबा आमटे, प्रकाश आमटे, अभय बंग यांची नावेही कानावरून गेली नसतील कधी
तुम्ही तद्दन फिल्मी लोकांचेच घ्या आदर्श आणि त्यांच्याच आरत्या ओवाळत रहा कायम
>>>>

ज्यांना अमिताभ आवडतो त्यांना बाबा आमटे वा अभय बंग हे आवडत नाही वा त्यांच्याबद्दल आदर प्रेम आपुलकी नाही हा निष्कर्श का काढता? अजून यात देशाच्या रक्षणार्थ सीमेवर शहीद झालेले जवानही आणा. म्हणजे तुमच्या पोस्टला आणखी वजन येईल.

यातही दोन प्रकारचे लोक असतात
१) आपल्याला सिनेमा वा क्रिकेट आवडत नाही तर ईतरांच्या आवडीनिवडींवर आक्षेप घेत त्यांना हलके लेखत फिरायचे.

२) आपणही सिनेमे बघत एंजॉय करायचे पण अश्या चर्चेत मात्र उलटाच आव आणायचा.

एखाद्याला सचिन अमिताभ आवडत असतील तर ते वाह्यात आणि थर्डक्लास लोकंच आहेत हा निष्कर्श अति वाटत नाही?

हे मागे एका धाग्यावर टाकलच होतं, परत टाकतोय
>>>

लोकांना सिनेमा चुतिया नाही बनवत तर आनंद देतो.
आणि तो या देशातच नाही तर सर्व देशांत आहे.
फक्त अपल्याच देशातील कलासंस्कूतीला नावे ठेवायची फॅशन आहे तशी पोस्ट वाटते ती..

लोचट मानसिकता काय,हिडीस काय.. का पण असे वाटते? असे लिहायची खरचं गरज होती का? केवळ आणि केवळ ऋन्मेशला टार्गेट करण्यासाठीच का?
जर आम्हाला लिहायचा अधिकार आहे असे असेल तर त्यालाही जे वाटते ते लिहायचा अधिकार आहेच ना. इग्नोर करणे आहेच की आपल्या हाती.
अमिताभ आवडतो किंवा आदर्श वाटतो म्हणून लगेच आमटे परिवार वा इतर कोणाशी comparison केलंच
पाहिजे का?
ऋन्मेश आणि त्याच्या हेटर्सच्या वादात कधीच पडणार नव्हते पण आजचे प्रतिसाद अनावश्यक वाटले.
याआधीही अमिताभ बद्दल इथे खूप लिहले गेले आहे. तो बऱ्याच जणांना आवडतो. आपल्या जवळचा वाटतो. इथे अमिताभ वरची जी चर्चा आहे त्यात नेहमीच त्याचे कौतुकच केले गेले आहे मग ते त्याच्या अभिनयाचे असो वा त्याच्या भाषेवरील प्रभुत्व असेल किंवा माणूस म्हणून असेल. अमिताभ हा असा नट आहे जो चार पिढ्यांचा आवडता नट आहे.
मग असा इतकी दशके जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या माणसाबद्दल आस्था वाटावी यात काही चुकीचे आहे का?
ऋन्मेष असाही धागा वेताळ म्हणून प्रसिद्ध आहेच मग त्याने या ब्रेकिंग न्युज वर धागा काढणे अपेक्षितच होते.
तसेही त्याच्या म्हणण्यात थोडेफार तथ्य आहेच. इतके दिवस कोरोनाची भीती होतीच पण जर हा कोरोना अमिताभच्या घरात शिरू शकतो तर आपल्या का नाही हा विचार येणे स्वाभाविक आहे.

इग्नोर करणे आहेच की आपल्या हाती."">>>>>>

तुमच्या नाहीये का मग
तुम्ही करा की इग्नोर
जे काय ते मी आणि निबा बघून घेऊ
अगदीच त्रास होत असेल तर अडमिन कडे तक्रार करा

दुसर्यांना इग्नोर करण्याचा सल्ला देण्यापूर्वी आधी आपण तो अमलात आणला तर बरे होईल

आवडणें आणि आरत्या गाणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे तुझ्या गावीही नसेल
असेही तुझ्याकडून अपेक्षाही नाही
अजून काय काय आदर्श घेतोस दारुड्या शाहरुख कडून तेही सांग
तो राहिला होता पोस्टची संख्या वाढवायला
आता 100 पार करूनच थांबू

एखाद्याला अमिताभ आवडत असेल तर बिघडलं कुठे. बाबा आमटे यांच्याबद्दल सगळ्यांनाच आदर आहे. प्रत्येक आवडत्या कालाकाराबद्दल बोलताना बाबा आमटे यांच्याबद्दल काय सांगितलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? एखाद्याबद्दल एव्हडा द्वेष आहे म्हणून त्याचं प्रत्येक वाक्य उचलून काहीतरी बावळटासारखं बरळायलाच पाहिजे का? कसली दळभद्री मानसिकता आहे.

Pages