अव्वाच्या सव्वा लाईट बिल

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 June, 2020 - 11:45

काल आमचे लाईट बिल आले
फक्त रुपये २१ हजार ७५० फक्त

- वाशी, नवी मुंबई

आज सकाळीच आंघोळ करून तक्रार करायला गेलो.
तर हि भली मोठी रांग !
सोशल डिस्टंसिंगच्या आईशीची तैशी...

तक्रारीची रांग वेगळी आहे का बघायला पुढे गेलो. तर आत गेलेली एक बाई बडबडत बाहेर आली...
"काही फायदा नाही रांगेत उभा राहायचा. जे आलेय ते बिल आधी भरा मग आम्ही ॲडजस्ट करू असे म्हणताहेत"

हे ऐकून रांगेतल्या एका बाईच्या अंगतले त्राणच गेले. तिने तिथेच बसकन मारली. म्हणाली, कुठून भरू? साठ हजार रुपये बिल आलेय...

मला माझे दुख छोटे वाटू लागले. तिच्याबद्दल तितकेच वाईट.
जर तिचे उत्पन्नच नसेल तितके तर कुठून भरणार या आर्थिक चनचनीच्या काळात ईतके बिल?? कर्ज काढावे का आता??

माझीही अडचण अशी झालीय की हे भाड्याचे घर आहे आणि पुढच्या महिन्यात घर बदलतोय. त्यामुळे आता जास्तीचे पैसे भरण्यात काहीच अर्थ नाही. मुळात लॉकडाऊनमुळे अडकल्याने होम लोन आणि घरभाडे एकत्र जात असल्याने पैश्याचीही बोंबच आहे.

माझ्या बिलावर एक नजर टाकता असे आढळले,
गेले दोन महिने जे सरासरी बिल येत होते, पाच पाच हजार जे आम्ही वेळेवर भरले होते. त्याचा या बिलात काही हिशोब नव्हता.
त्यानंतर तीन महिन्याचे युनिट एकत्र काढलेत ते जरा जास्त वाटत आहेत.
तसेच ते एका महिन्याच्या बिलपद्धतीनुसार आकारले आहेत.
म्हणजे पहिले १०० युनिट ३ रुपये ३००-५०० युनिट ७ रुपये नंतर १०-१२ रुपये... वगैरे वगैरे.. असे तीन महिन्यांचे तीनदा झाले पाहिजे होते. पण एकत्रच आकारणी केल्याने ५०० युनिटनंतरचे सारे १०-१२ रुपयांनी कॅलक्युलेट केले होते.

आता ज्या बाईचे ६० हजार बिल आले तिचे काय केले देवासच ठाऊक. याचा अर्थ नुसते ईतकेच नाही तर आणखीही भले मोठे गोंधळ घातले आहेत.

आधीच कोरोना, लॉकडाऊन, वाढती महागाई. घटलेले वा थांबलेले उत्पन्न त्यात हा वीज कंपनीचाच तडाखा!
काय करावे सामान्य माणसांनी?

आता ईथले स्थानिक लोकं नगरसेवक आमदार खासदार मंत्रीसंत्री यांच्याकडे धाव घेण्याची चर्चा करत होते. शक्य तितके मी सुद्धा त्यांच्यात सामील होईन. पण ठरवलेय की बिल मात्र भरणार नाही. बघूया लाईट कापायला आले की असा पवित्रा घ्यायचा विचार करतोय.

आपल्याकडे काय स्थिती आहे? अशीच असेल तर आपण काय करणार आहात?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रामाणिक विचार केला तर वीज निर्मिती खर्च एका युनिट चा आणि ती एक युनिट वीज आपल्या घरा पर्यंत पोचवण्याचा वितरणाचा खर्च बघितलं तर भारतात वीज स्वस्त च आहे.

आमच्याकडे एक टेस्टर आहे तो इलेक्ट्रॉनिक वस्तूंना लावला की वाह मोदीजी वाह असा आवाज येतो
असा आवाज आला की मगच ती वस्तू वापरतो
मध्ये एक लायटिंग ची माळ आणली होती त्याला टेस्टर लावला तर देशद्रोही म्हणून ओरडला ना वसकन
ती माळ मग जवळच्या गणेश मंडळाला देऊन टाकली Happy

खोलीत कोणीच नसताना पंखा/एसी चालू ठेवणे.
विनाकारण टीव्ही चालू ठेवणे.
ही सवय असेल तर उपकरण भारतीय असू नाही तर चीन चे
वीज बिल वाढणार च

खोलीत कोणीच नसताना पंखा/एसी चालू ठेवणे.
>>>
मागे वाचनात आलेले की परदेशातील लोकं ऑफिसहून निघतात तेव्हाच घरचा एसी रिमोट कंट्रोलने चालू करतात आणि मग त्यांना घरी पोहोचेपर्यण्त घर थंड मिळते.

खरे आहे का हे?

आमच्याकडे एक टेस्टर आहे तो इलेक्ट्रॉनिक वस्तूंना लावला की वाह मोदीजी वाह असा आवाज येतो
>>>

धागा राजकारणावर नेऊ नका
मी सुरुवातीपासून तेच टाळत आहे.

आणि अवाच्या सवा उपकरणे वापरली नाहीत तर बिल ही बेताचे येते असा अनुभव
>>>>

एका मध्यमवर्गीय घराला आणि त्या राहणीमानाला साजेसे जे गरजेचे आहे ते वापरतो.

रिमोट कंट्रोलने चालू करतात आणि मग त्यांना घरी पोहोचेपर्यण्त घर थंड मिळते.
व्यक्ती तितक्या प्रकृती .
असतील काही लोक तशी.
वीज,पाणी,अन्न ही नैसर्गिक संपत्ती आहे.
वीज निर्माण करण्यासाठी नैसर्गिक स्तोत्र वापरले जाते प्रदूषण होते ते वेगळेच.
त्या मुळे विनाकारण त्याचा वापर करून उधळपट्टी करणे योग्य नाही.
म्हणूनच वीज दराचे स्लॅब आहेत.जेवढं जास्त वापर तेवढं युनिट दर जास्त.

आयपीएल चे सामने रात्री फ्लड लाईट्स मध्ये खेळवले जातात
दिवसभराचे नैसर्गिक उन्ह आणि प्रकाश सोडून
कित्येक आयटी कंपन्या चे ग्लास औटर असते, हे जिथे प्रकाश कमी असतो अशा देशात ठीक पण आपल्याकडे ते प्रचंड गरम होते आणि त्याला तेवढे पॉवरफुल एसी बसवावे लागतात आणि दिवसभर अमाप वीज खेचत राहतात

त्यामुळे आपल्या देशात उधळपट्टी बद्दल न बोलणेच योग्य

वरती एक निबा म्हणलं की मध्यमवर्गीय गरजा आहेत तितकी वीज
आता ही गरज आहे का नाही हे कुणी ठरवायच तर त्यांनीच
म्हणजे बाकीच्यांची लक्झरी यांची गरज असू शकते किंवा याना गरज वाटते पण ती उधळपट्टी असू शकते

प्रत्येक जण हेच बोलत राहिला तर मग येणारच ना वीजबिल अमाप
मग कशाला कांगावा करावा

आयपीएल चे सामने रात्री फ्लड लाईट्स मध्ये खेळवले जातात
>>>>

या वाक्यापासून सुरू झालेल्या एकूणच पोस्टचा आम्हाला आलेल्या अव्वाच्या सव्वा लाईट बिलाशी असलेला संबंध समज्ला नाही.

कि हि पोस्ट अवांतर आहे?

आमच्याकडे एक टेस्टर आहे तो इलेक्ट्रॉनिक वस्तूंना लावला की वाह मोदीजी वाह असा आवाज येतो
यात राजकारण कुठं दिसलं खरंच आहे माझ्याकडे टेस्टर
या कधी तरी घरी

>>>>>>

ओके बसला माझा विश्वास
माझ्या वीजबिलावर संशय घेणारयांचा देखील यावर विश्वास बसायला हरकत नाही.
फक्त तुमच्या पोस्टचा संदर्भ घेऊन कोणी राजकारण सुरू करू नये म्हणून अशी पोस्ट टाळा म्हटले ईतकेच Happy

ऋन्मेऽऽष, अजून फक्त ३६ प्रतिसाद उरलेत मग तुझा हा पण धागा २०० गाठेल. १०० कोटींचा बिसिनेस झाला नाही की पिक्चर कसा फ्लॉप मानला जातो तसं २०० प्रतिसाद आले नाही तर तुला स्वतःलाच तुझा धागा फ्लॉप वाटायला लागेल त्यामुळे चर्चा सुरु ठेव....अगदीच गरज लागली तर राजकारण आण यातपण मग ५०० पर्यंतही जाईल.....बघ तुझे लक्ष्य काय आहे त्याप्रमाणे चर्चा वळव Wink

परदेशातील लोकं ऑफिसहून निघतात तेव्हाच घरचा एसी रिमोट कंट्रोलने चालू करतात आणि मग त्यांना घरी पोहोचेपर्यण्त घर थंड मिळते. >> ऋन्मेष, असे करता येते. पण त्याकरता एसीचा थर्मोस्टॅट ती सोय असलेला घ्यावा लागतो. तो वायफायला जोडलेला असतो व मग अ‍ॅपने फोनवरुन त्याला चालवता येते. (आमच्याकडे नाहीये म्हणा).

सुनिधी ओके. माहितीबद्दल धन्यवाद. बहुधा माबोवरच हे वाचले होते
माझ्यासाठी लंडन अमेरीकेतील माहिती मिळायचे दोनच स्त्रोत आहेत.
एक शाहरूख-चोप्रा-जोहर यांचे पिक्चर आणि दुसरे मायबोली Happy

सिम्पल प्रोग्रॅम करता येते- कि संध्याकाळी सहा नंतर टेम्प इतके असू दे.. मग एसी आपोआप चालू होतो... वाय फाय किंवा ऍप ची गरज नाही...

>>वाय फाय किंवा ऍप ची गरज नाही...<<
असं नाहि ते. वाय-फाय डाउन अस्लं तरी थर्मोस्टॅट चालु रहातो, आणि स्केड्युल फॉलो करतो. पण वाय-फाय बाकि गोष्टिंकरता आवश्यक आहे, इंन्क्लुडिंग रेग्युलर सॉफ्टवेर्/फर्मवेर अपडेट्स. नेस्ट थर्मोस्टॅट (आणि आता गुगल) ने तर क्रांती घडवलेली आहे. घराच्या आत-बाहेर जाण्याच्या (उठण्या-झोपण्याच्या) ठराविक वेळांनुसार स्केड्युल सेट करता येतंच, त्याव्यतिरिक्त जियोफेंसिंगने घराच्या सिक्युरिटि पासुन झाडांना पाणी देण्यापर्यंत अनेक रुटिन टास्कची सोय करता येते. शिवाय, सिरी, अलेक्सा, गुगल हात जोडुन उभे असतांतच... Happy

बोनस म्हणजे दर महिना अखेरीला घराचं एनर्जी कंझंप्शन किती, नॅशन्ल अ‍ॅवरेज काय, युनिट्स मधे वाढ/घट कशामुळे झाली, सेल्फ-लर्निंग, इको मोडमुळे किती बचत झाली इ. ची माहिती पुरवली जाते. जी सुरवा-सुरवातीला आवडिने वाचली जाते पण नंतर टॉस केली जाते... Wink

तर तुला स्वतःलाच तुझा धागा फ्लॉप वाटायला लागेल त्यामुळे चर्चा सुरु ठेव....अगदीच गरज लागली तर राजकारण आण यातपण मग ५०० पर्यंतही जाईल.....बघ तुझे लक्ष्य काय आहे त्याप्रमाणे चर्चा वळव>>>>

त्याने शाहरुख आणून सिद्ध केलंय आता लक्ष्य
आता 500 पार व्हायलाच हवा

बाई दवे बाई ते शाखा ला किती आलंय बिल? जमतंय ना भरायला त्याला? काही प्रॉब्लेम नाही ना?

बाई दवे बाई ते शाखा ला किती आलंय बिल? जमतंय ना भरायला त्याला? काही प्रॉब्लेम नाही ना?
>>>>

खरेच कल्पना नाही. बरेच सेलिब्रेटींनी त्रस्त ट्वुईट केलेय बिलाबद्दल. पण शाहरूखने काही म्हटले नाही अजून. अर्थात तो शाहरूख आहे. भारतातील सर्वाधिक आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत् कलाकार. त्याला माहीतही नसेल आपले वीजबिल किती येते. या कामासाठी माणसे नेमली असतील.

अर्थातच माणसे नेमली असणार
वीज बिल हातात घेऊन, घाम पुसत शरूख रांगेत थांबलाय हे बघायला मजा आली असती खरं तर
Happy

प्रतिसाद वाढवण्यासाठी काय वाट्टेल ते Happy
नवीन Submitted by आशुचँप on 9 July, 2020
>>>>

मी तर फक्त उपमा द्यायला शाहरूखचा उल्लेख केलेला.
तुम्हीच विचारले वर शाहरूखला किती बिल आले??

अरे म्हणलं इतका तू विव्हळत असतोस त्याच्या नावाने म्हणलं बोलत असाल फोन वर सुख दुःखाच्या गप्पा
इतकी प्रसिद्धी त्याचा पीआर वाला पैसे घेऊन पण करत नसेल
Happy
त्यामुळे तुला निदान किमान घरी चहा पाण्याला बोलवत असणार

बाकी धाग्याचे म्हणलं तर कायतरी करून प्रतिसाद वाढले म्हणजे झालं
असाही तुला कुठं काय देणं घेणं असतं विषय,मुद्दा, संदर्भ याच्याशी
नावावर जास्त प्रतिसाद लागले की काम झालं
की पुढला धागा विणायला मोकळा
आता ते म्हागृ आणि झपाटलेला बाहुला उर्फ स्वजो यांनाही आण की
त्यांनी काय पाप केलंय

शाहरुख सूर्य ??????
Happy Happy Happy

मग कशाला त्याला विजेचे बिल येईल? उलट तोच घर बसल्या इमेसीबी ला वीज पुरवत असेल
आणि चिडला वगैरे की विद्युत जनित्र जळत असतील

त्याची पोरं तर केवढी नशिबवान
त्यांचा जन्माच्या कित्येक वर्षे आधीपासूनच त्यांच्यावर नाटक लिहून झालाय
सूर्याची पिल्ले Happy

Pages