विकास दुबे अटक व मृत्यू

Submitted by अश्विनीमामी on 8 July, 2020 - 02:36

विकास दुबे, भीतिदायक गुन्हेगार, ह्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंद झालेले आहेत व २.५ लाख रुपयांचे सरकारी इनाम पण अटकेसाठी जाहीर झाले आहे. मागील आठवड्यात बिक्रू खेड्यामध्ये( उत्तर प्रदेश) पोलिसांची एक पार्टी ह्यास पकडायला गेली होती पण विकास दुबे ह्याला आधीच खबर मिळाल्या मुळे त्याने व्यवस्थित प्लॅन करून( छपरावर मारेकरी वाट बघत उभे करून!!!) आलेल्या पोलीस पार्टीतील सिनीअर ऑफिसर श्री. मिश्रा ह्यांच्यासकट आठ लोकांचे शिरकाण केले व पोबारा केला. आलेल्या पोलिसांसमोर एक जेसीबी उभा करून ठेवला होता. ह्याच्या घरावरून त्याच जेसीबीने नांगर फिरवून ते आता जमीनदोस्त केले आहे. व एस युव्ही गाड्यांची तोड फोड करून ठेवली आहे संतापलेल्या पोलिसांनी; व त्याचे शेजारी , घरी काम करणारे लोक ह्यांना अटक झाली आहे.

ह्याचा संरक्षण प्रमुख अमर दुबे ह्याची पण आज घडीला गोळी घालून हत्या झाली आहे. ह्याचे मागील आठवड्यातच लग्न झाले होते व ते विकासनेच करवून दिले होते. विकास बाईबाजी वगैरे मध्ये लक्ष घालत नाही त्याची एक बायको आहे व एक मुलगी जे लखनौ मध्ये होते व बिक्रू कांड घडण्या आधी त्याने बायकोला फोन करून त्यांची पळून जायची व्यवस्था करवली होती. ह्या बायको अन मुलगी दोघींची मनःस्थिती काय असेल. त्या अमर दुबेच्या नववधूचे काय?

जे पोलीस अधिकारी कांडात वारले त्यांनी पोलिसातच ह्या गुन्हेगाराला मदत करणारे हस्तक व फितूर लोक आहेत असे पत्र आपल्या बॉसला लिहीले होते. जे जालावर व्हायरल झाले आहे व त्यांच्या मुलीने पण दुजोरा दिला आहे की असे पत्र होते. पण पोलिसांत ह्याचे रेकोर्ड नाही.
विकास ह्यास तिथला लोकल गब्बर सिंगच म्हणतात व रहिवाशी घाबरून असतात. गावातील पाण्याचे हात पंप आटल्यावर त्यांच्या विहिरीचे
पाणी मागायला तो जनतेचा छळ करत असे. व अगदी गयावया करायला लावी. असे आजच्या पेपरात आहे. आता हा पळपुटा गुन्हेगार गाजियाबाद ( दिल्ली जवळ ) एका हॉटेलमध्ये दिसल्याचे सी सी टीव्ही रेकॉर्डिंग मिळाले आहे. तलाश जारी है! चौबे पूर पोलिस स्टेशन मधील पोलिस व अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत.

सर्व संदर्भ : एन डी टीव्ही न्यज व टाइम्स ऑफ इंडिया पेपर. डेव्हलपिंग स्टोरी.
==================================================================================

ही सर्व घटना शोलेच्या स्क्रिप्ट सारखी वाटली म्हणून माझा ह्या घटनेतील रस वाढला. कारवाई करायला गेलेले पोलीस पथक
अंतर्गत दगाफटक्यामुळे शहीद झाले हे आजिबात पटलेले नाही. विकास ह्यास अटक व्हावी व शिक्षा पण व्हावी ह्या साठी हा फॉलो अप बाफ.
उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था ह्यावर ही घटना हे एक भाष्य आहे , सद्य सरकारने आता त्याला एका आठवड्यात पकडण्याचा प्रण केला आहे. बघू, तो शरण येतो की काय होते ते....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई पोलीस नी एवढे गुन्हेगार यमसदनी पाठवले ते पण विकास दुबे त्यांच्या समोर काहीच नाही. असे अत्याधुनिक हत्यारांनी लेस असलेले.
पोलिस ची जीवित हानी झाली नाही कारण
नियोजनबद्ध कारवाई.
आता मात्र तसे घडलेले दिसत नाही.
कारवाई गुप्त न रहण्यामुळे पोलिस जीवाला मुकले.

घटना सगळ्या कोलोंबियातील नार्कोस मालिके सारख वाटतय.
येवढ्या मोठ्या संख्येने शहरी गुंडांनी पोलिसांची हत्या केल्याचे हे पहिलेच उदाहरण असावे.

हम्मम,
विकास दुबे ऐवजी इम्रान शेख वगैरे नाव असते तर लोकांची रिऍक्शन काय झाली असती?
अर्णब ने किती थयथयाट केला असता??

रवीशचा व्हिडिओ रिपोर्ट खरेच चांगला आहे. अजून काही माहिती असली तर लिहा. आपला तो हा हॅरिसन फोर्ड चा एक सिनेमा आहे त्यात हे एफ बी आय चे लोक कोलंबियात जातात व तिथे त्यांच्या दोन तीन कार्स वर छपरावरून गोळीबार होतो. दोन चार एफ बी आय एजंट मरतात. फोर्ड वाचतो पण धक्का बसलेला असा परत येतो. पुढे ती अमेरिका असल्याने विमान वाहक नौके वरून डिरेक्ट कोलंबिअन ड्रग लॉर्ड च्या घरावर मिसाइल सोडतात व घर बेचिराख होते. हा पूर्ण सिक्वेन्स फार जबरी घेतला आहे. ( चित्रपट क्लिअर एंड प्रेझेंट डेंजर. )

जे वारले त्यांचे कुटुंबीय काय करत असतील कसे जगत असतील घाबरत.

त्या भागात बस मध्ये चढले व विकास भैया म्हटले तर तिकिट पण घ्यावे लागत नाही. कोणी त्याच्या विरुद्ध साक्षच द्यायला येत नाही. पहिले जे हत्याकांड पोलिस स्टेशन मध्ये घुसून केले तेव्हा स्टेशन इन चार्ज च पळून गेला. अटक झाल्यावर ही त्याला लगेच जामीन मिळाला आहे. व कानपूर भागातील १० मेजर गुन्हेगार लोकांच्यात त्याचे नाव नाही.

पण दरारा आहे.

मुंबई पोलीस नी जशी संघटित गुन्हेगारी मोडून काढली तशी ही उत्तरेची राज्य गुन्हेगारी मोडून काढत नाहीत त्यांना पोसतात आणि गुन्हेगारांना बळकट करतात.
कशाला पाहिजे साक्षी आणि पुरावे.
एन्काऊंटर हा ह्या वरील योग्य उपाय आहे.

अमा एक नम्र विनंती. लेख पुन्हा एडिट करावा छोटे छोटे टायपो एरर राहिलेत (कदाचित मोबईल ने लिहिल्यामुळे असावेत जसे की इनाम २.५ रुपये )

अमा एक नम्र विनंती.>> धन्यवाद जेम्स बाँड जी. आपण सांगितलेले बदल केले आहेत.

फिल्मी सीरीअसली मला तेच पोटेन्शल वाटले पण लोकांचे जीव जायला नको होते आणि घरे उध्वस्त होउ नयेत. गुन्हेगारीचे कोलॅटरल डॅमेज.

. ह्या बायको अन मुलगी दोघींची मनःस्थिती काय असेल. त्या अमर दुबेच्या नववधूचे काय?>>>>
गुन्हेगाराच्या कुटुंबातील सदस्य कसे रहात असतील वगैरे काळजी आपण करण्याची गरज आहे का? त्यांना गुन्हेगाराने केलेले गुन्हे दिसत नाहीत का? मूकपणे ते ही त्या गुन्हेगाराला साथच देत असावेत!!!

गेलेल्या पोलिसांच्या कुटुंबातील लोकांच काय? ते बिचारे किती दुःखी असतील.......

आज सकाळीच उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने हमिदपूर जिल्ह्यात चकमकीत विकास दुबेचा जवळचा सहकारी अमर दुबेला ठार केलं. या हत्याकांडानंतर तिवारी आणि शर्मा दोघांना निलंबित करण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री विकास दुबेच्या ठिकाणावर छापा मारण्यात येणार होता. पण त्याआधीच त्याला माहिती मिळाली. या कारवाई दरम्यान आठ पोलिसांना मृत्यू झाला. विनय तिवारी आणि के.के.शर्मा या दोघांवर विकास दुबेला छापेमारीची कारवाई होण्याआधीच माहिती दिल्याचा आरोप आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात आयपीसीच्या कलम १२० बी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कानपूरचे एसएसपी दिनेश कुमार यांनी ही माहिती दिली.

अमर दुबेचा खात्मा
उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा जवळचा सहकारी अमर दुबे याला पोलिसांनी ठार केलं आहे. बुधवारी सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने हमिदपूर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत अमर दुबेला ठार केलं. विशेष पथकाचे महानिरीक्षक अमिताभ यश यांनी ही माहिती दिली आहे. अमर दुबे एक फरार आरोपी होता.

विकास दुबेच्या टोळीकडून आठ पोलिसांची गोळीबार करुन हत्या करण्यात आली होती. या प्रकऱणात अमर दुबेदेखील आरोपी होता. पोलिसांना मोस्ट-वॉण्टेड आरोपींची एक यादी काढली असून यामध्ये अमर दुबेचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं.

राज्यांकडे हजारो पोलिस ची मजबुत सुरक्षा यंत्रणा असताना 50 ते 60 गुंड लोक असलेली गुंडाची टोळी कायद्या ला आव्हान देते ह्याच
कारण भ्रष्ट प्रशासीय यंत्रणा.आणि राजकीय लागेबांधे
नाही तर अशा गुंड टोळ्यांना नष्ट करायला
किती सा वेळ लागेल.

आठ पोलीस ठार झाल्याने बातमी वर आली. अन्यथा असे गुंडाराज देशात काही भागांत चालूच असावे.>>>
अज्ञानात सुख असतं.
खरंच अशा घटना पाहू गेलं तर भविष्याची चिंता वाटते. आपण कुठं चाललो आहोत???

लवकरच यावर पिक्चर निघेल
आणि त्याच्या परीक्षणावर आपण चर्चा करत असू की असे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणे योग्य की अयोग्य?

दुबे घरात

2 किलो स्फोटके, बंदुका मिळाल्या

मिनी दाऊद दिसतोय

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार मुख्य आरोपी विकास दुबे याला अटक करण्यात आली आहे. उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर विकास दुबे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.

पोलिस नोयडामध्ये गळ टाकून बसले होते पण हा मध्यप्रदेशात महाकाल मंदिरात गेला होता. तिथे पावती फाडली. काउंटरवर नाव विचारल्यावर 'विकास दुबे' सांगितले. काउंटरवरच्याला संशय आला व त्याने पोलिसात कळवले. अटक झाली. इतक्या सहजासहजी अटक होवू शकत नाही. नाव खरे सांगितले जाऊ शकत नाही. ज्या अर्थी हे झाले त्या अर्थी त्या विकास दुबेने अश्या प्रकारे सरंडर केले आहे. त्याचे साथीदार मारले जातायत. त्यांला सहाय्य करणार्‍या पोलिसदलातील लोकांवर कारवाई होतेय. ह्यामुळे सरंडर झाला असेल तो 'टेररिस्ट'.

>>>>>गुन्हेगाराच्या कुटुंबातील सदस्य कसे रहात असतील वगैरे काळजी आपण करण्याची गरज आहे का? त्यांना गुन्हेगाराने केलेले गुन्हे दिसत नाहीत का? मूकपणे ते ही त्या गुन्हेगाराला साथच देत असावेत!!!

गेलेल्या पोलिसांच्या कुटुंबातील लोकांच काय? ते बिचारे किती दुःखी असतील.......>>>

मुद्दा थोडा वेगळा वाटतोय,
बळी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना सहानुभूती आहेच, त्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे हे मान्य आहे,
पण तसे असताना , गुन्हेगाराच्या कुटुंबियांनासुद्धा मानसिक धक्का बसलेला असू शकतो.
कुटुंबीयांचा कसलाही संबंध/कल्पना/मूक संमती सुद्धा नसताना गुन्हेगाराची कुटुंबे उध्वस्त झाल्याची खूप उदाहरणे आहेत.

या स्पेसिफिक केस मध्ये नवरा/मुलगा गुंड आहे हे माहीत असणारच, पण नक्की काय स्केल वर उद्योग चालू आहेत हे माहिती नसण्याची शक्यताही आहे,
आपण खलांची व्यंकटी सांडो - खलाचे खलत्व जाऊ दे म्हणतो, इकडे तर खलाच्या कुटुंबियांबद्दल बोलतोय.
असो...

इतक्या सहजासहजी अटक होवू शकत नाही. नाव खरे सांगितले जाऊ शकत नाही......
>>>>>
सहमत.
वातावरण निवळले की त्याला जामीन मिळेल. आणि लोक विसरून जातील

गुन्हेगाराच्या कुटुंबातील सदस्य कसे रहात असतील वगैरे काळजी आपण करण्याची गरज आहे का? त्यांना गुन्हेगाराने केलेले गुन्हे दिसत नाहीत का? मूकपणे ते ही त्या गुन्हेगाराला साथच देत असावेत!!!

गेलेल्या पोलिसांच्या कुटुंबातील लोकांच काय? ते बिचारे किती दुःखी असतील.......>>> त्यांच्या बद्दल काळजी व्यक्त केलीच आहे ताई. मिक्ष्रा ची
मुलगी जी असे पत्र लिहीले होते म्हटली तिला पण धोका आहेच. व इतर बायका व माणसांचे एक व्यक्ती म्हणून्पुढे काय होईल इतकेच कुतुहल आहे.
व कोणी २५ जूनला लग्न व ७ - ८ जुलैला नव्रा असा जावा हे भयानकच आहे. ते सर्व च गुन्हेगार असले तरीही. तो मुलगा ह्याचा शॅडो होता. ( बाहुबली!!) नाट्य मयतेचा ग्राफ बघा.

उज्जैनला पकड ले म्हणे आज सकाळीच वाचले पण चक्क काम होते म्हणून इथे येता आले नाही. फरीदाबाद हून इथे कसा काय आला?
मला तर वाटले होते त्याला पंजाबातून पाकिस्तानात धाडतील, मग कराच्ची हून बोटीने बँकोक व तिथे थोडॅ महिने लपवून मग विलायत.
लंडन मध्ये प्रकट होतील विकास भैया!!! पण पकडे गये है. आता शरण येतो का जामीन घेउन पळून जातो बघू.

Pages

Back to top