विकास दुबे अटक व मृत्यू

Submitted by अश्विनीमामी on 8 July, 2020 - 02:36

विकास दुबे, भीतिदायक गुन्हेगार, ह्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंद झालेले आहेत व २.५ लाख रुपयांचे सरकारी इनाम पण अटकेसाठी जाहीर झाले आहे. मागील आठवड्यात बिक्रू खेड्यामध्ये( उत्तर प्रदेश) पोलिसांची एक पार्टी ह्यास पकडायला गेली होती पण विकास दुबे ह्याला आधीच खबर मिळाल्या मुळे त्याने व्यवस्थित प्लॅन करून( छपरावर मारेकरी वाट बघत उभे करून!!!) आलेल्या पोलीस पार्टीतील सिनीअर ऑफिसर श्री. मिश्रा ह्यांच्यासकट आठ लोकांचे शिरकाण केले व पोबारा केला. आलेल्या पोलिसांसमोर एक जेसीबी उभा करून ठेवला होता. ह्याच्या घरावरून त्याच जेसीबीने नांगर फिरवून ते आता जमीनदोस्त केले आहे. व एस युव्ही गाड्यांची तोड फोड करून ठेवली आहे संतापलेल्या पोलिसांनी; व त्याचे शेजारी , घरी काम करणारे लोक ह्यांना अटक झाली आहे.

ह्याचा संरक्षण प्रमुख अमर दुबे ह्याची पण आज घडीला गोळी घालून हत्या झाली आहे. ह्याचे मागील आठवड्यातच लग्न झाले होते व ते विकासनेच करवून दिले होते. विकास बाईबाजी वगैरे मध्ये लक्ष घालत नाही त्याची एक बायको आहे व एक मुलगी जे लखनौ मध्ये होते व बिक्रू कांड घडण्या आधी त्याने बायकोला फोन करून त्यांची पळून जायची व्यवस्था करवली होती. ह्या बायको अन मुलगी दोघींची मनःस्थिती काय असेल. त्या अमर दुबेच्या नववधूचे काय?

जे पोलीस अधिकारी कांडात वारले त्यांनी पोलिसातच ह्या गुन्हेगाराला मदत करणारे हस्तक व फितूर लोक आहेत असे पत्र आपल्या बॉसला लिहीले होते. जे जालावर व्हायरल झाले आहे व त्यांच्या मुलीने पण दुजोरा दिला आहे की असे पत्र होते. पण पोलिसांत ह्याचे रेकोर्ड नाही.
विकास ह्यास तिथला लोकल गब्बर सिंगच म्हणतात व रहिवाशी घाबरून असतात. गावातील पाण्याचे हात पंप आटल्यावर त्यांच्या विहिरीचे
पाणी मागायला तो जनतेचा छळ करत असे. व अगदी गयावया करायला लावी. असे आजच्या पेपरात आहे. आता हा पळपुटा गुन्हेगार गाजियाबाद ( दिल्ली जवळ ) एका हॉटेलमध्ये दिसल्याचे सी सी टीव्ही रेकॉर्डिंग मिळाले आहे. तलाश जारी है! चौबे पूर पोलिस स्टेशन मधील पोलिस व अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत.

सर्व संदर्भ : एन डी टीव्ही न्यज व टाइम्स ऑफ इंडिया पेपर. डेव्हलपिंग स्टोरी.
==================================================================================

ही सर्व घटना शोलेच्या स्क्रिप्ट सारखी वाटली म्हणून माझा ह्या घटनेतील रस वाढला. कारवाई करायला गेलेले पोलीस पथक
अंतर्गत दगाफटक्यामुळे शहीद झाले हे आजिबात पटलेले नाही. विकास ह्यास अटक व्हावी व शिक्षा पण व्हावी ह्या साठी हा फॉलो अप बाफ.
उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था ह्यावर ही घटना हे एक भाष्य आहे , सद्य सरकारने आता त्याला एका आठवड्यात पकडण्याचा प्रण केला आहे. बघू, तो शरण येतो की काय होते ते....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

99 percent lok encounter che samarthan ch करतील.
तोच व्यवहारी आणि योग्य मार्ग आहे.
जो गुंड आहे हे जगजाहीर आहे त्या विषयी वेगळे पुरावे देवून कोर्टात कायद्या च खीस पाडायची गरज नाही.

उलट सरकार नी इथेच न थांबता सर्व त्याची मालमत्ता ताब्यात घेतली पाहिजे.
सर्व बँक अकाउंट सील केले पाहिजेत

आणि हा नियम अलिखित सर्व गुंडांना लागू केला पाहिजे.

जो गुंड आहे हे जगजाहीर आहे>>>>>
जगजाहीर झाल्यावर त्याचा एन्काऊंटर झाला
पण जगजाहीर होण्या आधी त्याला शिक्षा का झाली नाही?
हा मूळ प्रश्न आहे.

आपली सडकी व्यवस्था.
हेच कारण आहे..
आणि ही सडकी व्यवस्था खूप वर्षा पासून आहे.
प्रशासन पण वाईट काम करायला घाबरत नाही त्यांचा इथल्या सडक्या व्यवस्थेवर ठाम विश्वास आहे काही ही करा काही शिक्षा होणार नाही.

दुबे चे दोन साथीदार पकडले आहेत ठाण्या मध्ये.
बगुया त्यांना काय शिक्षा होते आहे.
किती लोकांची नाव त्यांच्या कडून माहिती पडतील.
न्यायव्यवस्था किती चुस्त आहे हे दोन दिवसात च माहीत पडेल.
जामीन वर सुटले अशी मोठ्या अक्षरात बातमी येईल.

विमान अपहरण 1998 झाले होते आज ते निर्दोष सुटले.
म्हणजे निर्दोष लोकांना विनाकारण 20 वर्ष तुरुंगात राहवे लागले.
ही आपली लोकशाही आणि न्याय व्यवस्था.

अवांतरः
योगी महाराजांच मुळ नाव लिहिणार्‍यांना सोनीया गांधींच मुळ नाव लिहिलं की कसं वाटेल?>>>>>>
सोप्प आहे !
Antonio mayno

त्यात काय एवढं Happy

म्हणजे निर्दोष लोकांना विनाकारण 20 वर्ष तुरुंगात राहवे लागले.
ही आपली लोकशाही आणि न्याय व्यवस्था.
>>>>

निर्दोष सलमाननेही बरेच भोगले आहे Sad

सर्वच राजकारण्यांचा दुबेला पाठिंबा होता. माजी आमदारही त्याला राखी बांधत आणि अभिमानाने त्या सर्वांना सांगत की विकास माझा भाऊ आहे. दुबे आणि त्याचे साथीदार रस्त्याने जात असताना मान वर करण्याचीही गावकऱ्यांना परवानगी नव्हती. त्या सर्वांना नमस्कार करणे बंधनकारक असे. जो नमस्कार करणार नाही त्याला मारहाण केली जात असे.

विकास याच्या निवासस्थानात तो एकटात राहत होता. त्याची पत्नी रिचा आणि मुलगा लखनौमध्ये राहण्यास होते. त्याच्यासमवेत कायम त्याचे साथीदार असत. त्याच्या निवासस्थानाबाहेर कायम महागड्या गाड्या उभ्या दिसत. कोणीही विरोधात आवाज केल्यास दुबेचे साथीदार त्या व्यक्तीला मारहाण करीत. अनेक वेळा दुबेचे साथीदार किरकोळ कारणांवरुन गावकऱ्यांना जबर मारहाण करीत. या भागात दुबेची सत्ता असल्याची परिस्थिती होती. त्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात जमिनी बळकावल्या होत्या. या भागावर त्याची निरंकुश सत्ता होती.

बिकरु गावातील रहिवाशीही आता मोकळेपणाने बोलू लागले आहेत. येथील रामपाल म्हणाला की, आमचे दुस्वप्न संपले आहे. आम्हाला कायम दहशतीखाली राहण्याची सवय लागली होती. आताही आम्हाला वाटते की तो सगळ्यांना पाहत असेल. त्याच्याविरोधात बोलल्यास तो आमचा छळ करेल, अशी भीती अजूनही आम्हाला सतावते.

या चकमकीप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अधिकृत निवेदन जाहीर केले आहे. पोलिसांच्या निवदेनानुसार, पोलिसांचे पथक विकास दुबेला घेऊन जात होता. कानपूरनजीक पोचल्यानंतर पोलिसांच्या गाडीसमोर अचानक गाई आणि म्हशींचा कळप आला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून गाडी उलटली. या अपघातामुळे गाडीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बेशुद्ध झाले. मात्र, विकास दुबे हा शुद्धित होता. तो पोलिसांचे पिस्तुल घेऊन पलायन केले.

पाठीमागून दुसऱ्या गाडीतून आलेल्या पोलिसांनी हे पाहिले आणि त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी दुबेचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर दुबे हा पिस्तुलातून गोळ्या झाडू लागल्या. यामुळे पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात दुबे हा जखमी होऊन खाली पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे.

पाठीमागून दुसऱ्या गाडीतून आलेल्या पोलिसांनी हे पाहिले आणि त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांनी दुबेचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर दुबे हा पिस्तुलातून गोळ्या झाडू लागल्या. यामुळे पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात दुबे हा जखमी होऊन खाली पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले, असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे. >>>>>>>

नाही , पोलिसांचा तो खोटा रिपोर्ट आमच्या सहिष्णु गँग ला कुठल्याही परिस्थिती मंजूर नाही !
आता आम्ही सुप्रीम कोर्टात केस टाकणार , आणि खोटी चकमक करणाऱ्या पोलिसांना आणि योगी ला अडकवणार !

निर्दोष सलमाननेही बरेच भोगले आहे^^^^^^

हो ना गरीब बिचारा
इतका कुत्र्यासारखा बडवला म्हणे लॉक अप मध्ये
बेक्कार जागी मारलं असेही काही जणांनी नाव न सांगण्याचा अटीवर खुलासा केला आहे

असेही काही जणांनी नाव न सांगण्याचा अटीवर खुलासा केला आहे
>>>
अफवा अश्या पसरतात

असो. विषयावर बोलूया Happy

असो. विषयावर बोलूया>>>>

हे कधीपासून करायला लागला तू????

विषय दुबे चा चाललेला असताना सलमान खान ला घुसडणार
आणि आता साव असल्याचा आव आणून विषयावर बोलू म्हणे

असली दूटप्पेगिरी बरी जमते

ओह हे आधी बोलायचं ना मग
ते पोलीस सांगत होते शरूख जर हाती लागला असता ना त्यालाही पायात काठी घालून, उलटा टांगून मारला असता म्हणे

केवळ पैसे चारले सगळ्यांना म्हणून वाचला

विकास दुबेबरोबर सगळी गुपितं गडप झाली.

इथं सलमान खानचं नावपण आलं. अत्यंत माजोरी माणूस. कदाचित अफाट पैसा आणि प्रसिद्धी यामुळं त्याच्या अंगात हा गुण आला असेल. काळवीट शिकार प्रकरणात अधिका-यांशी तो अतिशय उद्धट भाषेत आणि गुर्मीत बोलत असे. तपास अधिका-यांवर कमालीचं दडपण आणलं होतं. त्यांनी नंतर राजीनामा दिला.

विषय दुबे चा चाललेला असताना सलमान खान ला घुसडणार
>>>>

ते उदाहरण होते.
ते देखील उपरोधाने दिलेले. ईथला कायदा काय आहे हे दाखवायला.
अवघड आहे Happy

दुबे चे आताचे वय 45 वर्ष जरी पकडले तरी गुंड शही चा वारसा नसलेले व्यक्ती ला नमांचीन गुंड होण्यासाठी, प्रशासन ,नेते ह्यांना सुद्धा आपल्या प्रभावात ठेवण्याची takat येण्यासाठी 20 ते 25 वर्ष तरी जातील .
ह्याचा अर्थ दुबे ला मोठा करण्याचे काम हे 20 वर्षापूर्वी पासून आता पर्यंत जे जे सरकार होते त्या सर्वांचे आहे.योगी नी त्याचा शेवट केला .
पण त्याला गुंडगिरी करण्यासाठी मदत कोणी कोणी केली हे ओळखा.
हे समाजवादी किंवा मायावती चे च काम असणार.

शेखर गुप्ता उत्तर प्रदेशातले सत्ताधारी - माफिया आणि जातीची समीकरणे मांडताहेत.

जी जात सत्तेत नसते त्यांच्या गुंडांच्या टोळया तयार होतात. गेल्या ३० वर्षांत ब्राह्मण मुख्यमंत्री झालेला नाही.

पण हे खूप चिंताजनक आहे ..
राजकीय नेते,प्रशासन,आणि गुंड ह्यांची साखळी निर्माण होणे खूप चिंताजनक बाब आहे.
आणि ह्या मध्ये प्रत्येकाचा आर्थिक लुबाडणूक हा सामान स्वार्थ आहे
दयावान बनण्यासाठी मग त्याला जातीचा ,धर्माचा मुलामा दिला जातो.
गुंड हा गुंड च असतो त्याला त्याच प्रकारची treatment dili Javi.
खूप नशीबवान आहोत आपण महाराष्ट्रात
आहोत असे जाती ,धर्माच्या आडून गुंडाचे चे समर्थन जनता करत नाही.

https://twitter.com/realshooterdadi/status/1281967325390888961
Dadi Chandro Tomar
@realshooterdadi
यो महिंद्रा TUV कैसी गाड़ी है बालकों

Manoj Thakur
Flag of India
@manoj_jai_hind
·
14h
Replying to
@realshooterdadi
TUV गाड़ी सही नही होती है, पलट जाती है
भैंसों का झुंड देखकर , ज़्यादा
Winking face with tongue

गुंडाला मारले म्हणून जे पोलिस वर आरोप करत आहेत ते गुंड गिरीचे समर्थक आहेत
समर्थन देण्यासाठी त्यांना funding सुद्धा झाले असेल

<< गुंडाला मारले म्हणून जे पोलिस वर आरोप करत आहेत ते गुंड गिरीचे समर्थक आहेत
समर्थन देण्यासाठी त्यांना funding सुद्धा झाले असेल >>

------ गुन्हेगाराला मारले ते त्याने केलेल्या अनेक गुन्ह्यांमुळे किंवा ८ पोलिसांची हत्या केली म्हणून नाही...

तर आपले पितळ उघडे पडायला नको... म्हणून व्यावस्थित रितीने कट करुन मारले. आता पुढे काय ? कोर्टाबाहेर झटपट न्याय आणि ते ही ज्यांनी कायद्याचे रक्षण करायला हवे त्यांच्याकडूनच होत असेल तर परिस्थिती अराजकतेकडे वाटचाल करत आहे.

>>>>>>तिकडे त्यांचा बिझनस सुरळीत चालू ठेवतील, आणि त्यांचे पालनपोषण करणार्‍यांचे इकडे आपण गुणगान गात राहू.

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 July, 2020 - 03:>>>
हा प्रतिसाद आवडला आहे,

म्हणजे अगदी भरत नि लिहिला आहे वाटावे इतका लॉजिकल लिहिला आहे,

>>>>> +७८६ Happy

काही मूर्खांना काळा आणि पांढरा हे दोनच रंग दिसतात का? मोदी सरकार विरोधात बोललं तर तुम्ही काँग्रेसी, नक्षली किंवा देशद्रोही!
एन्काऊंटर विरुद्ध बोललं की तुम्ही गुंडांना सपोर्ट करता? खरंच देशाची येणारी पिढी एवढ्या पोकळ विचारांची असेल तर कठीणच आहे..

Pages