काल आमचे लाईट बिल आले
फक्त रुपये २१ हजार ७५० फक्त
- वाशी, नवी मुंबई
आज सकाळीच आंघोळ करून तक्रार करायला गेलो.
तर हि भली मोठी रांग !
सोशल डिस्टंसिंगच्या आईशीची तैशी...
तक्रारीची रांग वेगळी आहे का बघायला पुढे गेलो. तर आत गेलेली एक बाई बडबडत बाहेर आली...
"काही फायदा नाही रांगेत उभा राहायचा. जे आलेय ते बिल आधी भरा मग आम्ही ॲडजस्ट करू असे म्हणताहेत"
हे ऐकून रांगेतल्या एका बाईच्या अंगतले त्राणच गेले. तिने तिथेच बसकन मारली. म्हणाली, कुठून भरू? साठ हजार रुपये बिल आलेय...
मला माझे दुख छोटे वाटू लागले. तिच्याबद्दल तितकेच वाईट.
जर तिचे उत्पन्नच नसेल तितके तर कुठून भरणार या आर्थिक चनचनीच्या काळात ईतके बिल?? कर्ज काढावे का आता??
माझीही अडचण अशी झालीय की हे भाड्याचे घर आहे आणि पुढच्या महिन्यात घर बदलतोय. त्यामुळे आता जास्तीचे पैसे भरण्यात काहीच अर्थ नाही. मुळात लॉकडाऊनमुळे अडकल्याने होम लोन आणि घरभाडे एकत्र जात असल्याने पैश्याचीही बोंबच आहे.
माझ्या बिलावर एक नजर टाकता असे आढळले,
गेले दोन महिने जे सरासरी बिल येत होते, पाच पाच हजार जे आम्ही वेळेवर भरले होते. त्याचा या बिलात काही हिशोब नव्हता.
त्यानंतर तीन महिन्याचे युनिट एकत्र काढलेत ते जरा जास्त वाटत आहेत.
तसेच ते एका महिन्याच्या बिलपद्धतीनुसार आकारले आहेत.
म्हणजे पहिले १०० युनिट ३ रुपये ३००-५०० युनिट ७ रुपये नंतर १०-१२ रुपये... वगैरे वगैरे.. असे तीन महिन्यांचे तीनदा झाले पाहिजे होते. पण एकत्रच आकारणी केल्याने ५०० युनिटनंतरचे सारे १०-१२ रुपयांनी कॅलक्युलेट केले होते.
आता ज्या बाईचे ६० हजार बिल आले तिचे काय केले देवासच ठाऊक. याचा अर्थ नुसते ईतकेच नाही तर आणखीही भले मोठे गोंधळ घातले आहेत.
आधीच कोरोना, लॉकडाऊन, वाढती महागाई. घटलेले वा थांबलेले उत्पन्न त्यात हा वीज कंपनीचाच तडाखा!
काय करावे सामान्य माणसांनी?
आता ईथले स्थानिक लोकं नगरसेवक आमदार खासदार मंत्रीसंत्री यांच्याकडे धाव घेण्याची चर्चा करत होते. शक्य तितके मी सुद्धा त्यांच्यात सामील होईन. पण ठरवलेय की बिल मात्र भरणार नाही. बघूया लाईट कापायला आले की असा पवित्रा घ्यायचा विचार करतोय.
आपल्याकडे काय स्थिती आहे? अशीच असेल तर आपण काय करणार आहात?
हो त्या काही जणांना थयथयाट
हो त्या काही जणांना थयथयाट करू दे ना
तुम्हाला वाटत असेल की माझे २१७५० चे बिल त्याच थयथयाटातले आहे तर ते देखील खुशाल वाटू दे
पण याचाच अर्थ उरलेल्या काही जणांचे बिल खरेच जास्त आलेय.मला त्याची कारणे सांगा
ज्यांची बिलं जास्त आलीत
ज्यांची बिलं जास्त आलीत त्यांनी स्वतः त्याची कारणं शोधून काढायला हवीत ना. ज्यांची बिलं ठीक आहेत (९०%?) त्यांना विचारून काय फायदा. निदान ज्यांना आपली बिलं जास्त वाटताहेत त्यांनी त्यांच्या बिलाचे डिटेल्स शेअर केल्याशिवाय इतर कोणी कशी काय मदत करू शकेल?
माझं बिल २१ हजार आहे आता सांगा मला बिल जास्त का आहे?या प्रश्नात समाधानकारक उत्तर देण्यासाठी पुरेशी माहिती नाहीय
मी स्वतः ७ जणांना बिलाची
मी स्वतः ७ जणांना बिलाची आकडेमोड समजून घ्यायला मदत केलीय. या सगळ्यांना वाटत होतं की त्यांची स्पेशल केस आहे आणि त्यांचं बिल अवास्तव जास्त आहे. पण त्यांचं बिल नजरेसमोर ठेऊन वाचत गेल्यावर त्यांचा गैरसमज दूर झाला. आमच्या सोसायटीच्या व्हाट्सएप गृप वर मी फेमस झालोय.
तुमच्या सोसायटीत पालथे घडे
तुमच्या सोसायटीत पालथे घडे नाहीत म्हणजे!
अमितव, बिल अतिशय तर्कसंगत आहे
अमितव, बिल अतिशय तर्कसंगत आहे. लोकं न वाचताच, समजून घ्यायचा प्रयत्न न करताच मेसेज वर मेसेजेस पाठवत सुटलेत
{माझ्या बिलावर एक नजर टाकता
{माझ्या बिलावर एक नजर टाकता असे आढळले,
गेले दोन महिने जे सरासरी बिल येत होते, पाच पाच हजार जे आम्ही वेळेवर भरले होते. त्याचा या बिलात काही हिशोब नव्हता.
त्यानंतर तीन महिन्याचे युनिट एकत्र काढलेत ते जरा जास्त वाटत आहेत.
तसेच ते एका महिन्याच्या बिलपद्धतीनुसार आकारले आहेत.
म्हणजे पहिले १०० युनिट ३ रुपये ३००-५०० युनिट ७ रुपये नंतर १०-१२ रुपये... वगैरे वगैरे.. असे तीन महिन्यांचे तीनदा झाले पाहिजे होते. पण एकत्रच आकारणी केल्याने ५०० युनिटनंतरचे सारे १०-१२ रुपयांनी कॅलक्युलेट केले }
आम्हांला पण या बिलावर एक नजर मारू द्या.
अमितव, बिल अतिशय तर्कसंगत आहे
अमितव, बिल अतिशय तर्कसंगत आहे. लोकं न वाचताच, समजून घ्यायचा प्रयत्न न करताच मेसेज वर मेसेजेस पाठवत सुटलेत
>>>>
मग बेस्ट कसले पैसे परत करणार आहे?
आम्हांला पण या बिलावर एक नजर
आम्हांला पण या बिलावर एक नजर मारू द्या
>>>>
तुम्हाला कल्पना आहे की मी भाड्याच्या घरात राहतो आणि ते बिल डिटेल्स मी देणार नाही म्हणून तेच धरून बसला आहात
पण बिल बरोबर आहेत तर बेस्ट परत क्सले पैसे देणार आहे ते उत्तर तुमच्याकडेही नाही
>>बेस्ट'ने दिलेल्या
>>बेस्ट'ने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेतल्यानंतर जादा बिलाची रक्कम परत दिली जाईल.
हे त्या बातमीमधून कॉपी पेस्ट केलंय.
हे वाक्य समजून घ्यायला मदत हवी असल्यास सांगा
Consumer number, name address
Consumer number, name address हे डिटेल वगळून शेअर करा.
मी माझ्या पहिल्या पोस्टरमध्ये दिलेली माहिती द्या.
'बेस्ट'च्या वीज ग्राहकांना
'बेस्ट'च्या वीज ग्राहकांना तरी दिलासा मिळणार आहे. 'बेस्ट'ने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेतल्यानंतर जादा बिलाची रक्कम परत दिली जाईल. परंतु, अंदाजित बील कमी आलेल्यांकडून प्रत्यक्ष वीज वापरानुसार रक्कम आकारली जाईल. तसेच १५ जूनपासून रेडझोन वगळता इतर भागात मीटर रीडिंग घेण्याचे काम सुरू होईल,
ही रक्कम कोणालाही परत मिळेलच की! बिटिंग अराउंड द बुश करायचं तर व्हॉअॅप वर गिर्हाईक मिळेल. इकडे माठांचा भाव कमी झालाय हल्ली.
प्रत्यक्ष मीटर रीडिंग
प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेतल्यानंतर जादा बिलाची रक्कम परत दिली जाईल.
>>>
थोडक्यात जूनचे बिलही प्रत्यक्ष रीडींग वर आधारीत आहे असेलच असे नाही.
मग कॅलक्युलेशन कश्याच्या आधारावर बरोबर आहे?
म्हणजे गंमत बघा
आधीच्या दोन बिलांसारखे सरसरी बिलही नही आणि प्रत्यक्ष रीडींगवरही नाही. मग अले कुठून
हे डिटेल वगळून शेअर करा.
हे डिटेल वगळून शेअर करा.
>>>>
काही डिटेल वगळले तरी कुठलेही डिटेल आपण भडेकरू असताना असे सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करावेत का?
भाडेकरूचा काय संबंध? आणि शेअर
भाडेकरूचा काय संबंध? आणि शेअर नका करू. त्या साईट वर जा आणि स्वतःचं स्वत: बघा की!
>>आधीच्या दोन बिलांसारखे
>>आधीच्या दोन बिलांसारखे सरसरी बिलही नही आणि प्रत्यक्ष रीडींगवरही नाही. मग अले कुठून
हे तुमचं गृहीतक चुकीचे आहे. एकतर बिल प्रत्यक्ष रीडिंगवर आधारित असणार. तसं असेल तर कॅल्क्युलेशन बरोबर असणार.
जर जुनचंही बिल सरासरीवर आधारित असेल आणि ते प्रत्यक्ष वापरापेक्षा जास्त आहे असं पुढे लक्षात आलं तर बेस्ट पैसे परत करेल
भरत तो देणार तर काहीच नाही
भरत तो देणार तर काहीच नाही आणि फाट्यावर फाटे मात्र फोडत राहील
याचीच तीन घरे आहेत मुंबईत असेही म्हणाला होता एकदा
सगळ्या घरी जास्त बिल आलंय का हे तो बोलत नाहीये
भाड्याच्या घरात राहतो म्हणून बिल शेअर करणार नाही म्हणे
याचं कारण ही पण थाप च आणि अजून एक धागा आणि भरपूर प्रतिसाद नावावर
हेतू साध्य
अटेंशन सिकिंग चा आजार विकोपाला गेला की असं करतात बहुदा
माझ्याकडून या धाग्यावर
माझ्याकडून या धाग्यावर पूर्णविराम.
गुड नाईट
{अटेंशन सिकिंग चा आजार
{अटेंशन सिकिंग चा आजार विकोपाला गेला की असं करतात बहुदा}
हो. असंच दिसतंय.
आशूचॅम्प, माझे मन लहान
आशूचॅम्प, माझे मन लहान मुलासारखेच निरागस आहे. अटेंशन सिकर सुद्धा मी तसाच आहे. तुम्ही मोठे झालात आणि दुनियादारी व तहजीब शिकलात. मला आहे तसाच राहू द्या
असो,
याचीच तीन घरे आहेत मुंबईत असेही म्हणाला होता एकदा
सगळ्या घरी जास्त बिल आलंय का हे तो बोलत नाहीये
>>>>>
एक घर बंद असते. कधीतरी वडील राहायला जातात. तिथे बिलाचा जास्त राडा नाही.
एक भाड्याने दिलेय. आम्ही भाडेकरूला विचारायला गेलो नाही ना तो सांगायला आला.
एक घर विकून आता नवीन घेतले आहे. तिथे शिफ्ट होईपर्यण्त या भाड्याच्या घरात आहोत. त्या नवीन घरात लायटींगचे काम करायचे बाकी आहे.
एकूणात ज्या बिलाचा फटका बसला ते सांगितले.
आता ऐका
मुळात मी ईथे मला मदत करा असेही कोणाला बोललो नाही. उलट लोकांनाच विचारले तुमच्याकडे काय परीस्थिती आहे. चर्चेला धागा उघडलेला. ज्याला मदतीची गरज आहे त्याला कदाचित चर्चेतून मदतही मिळेल. आजही आमच्या घरात त्या साठ हजार बिल आलेल्या बाईने काय केले असेल हाच विषय निघतो.
असो
पण महाराष्ट्रभर ईतका गदारोळ झाला असूनही ईथे काही जण वीजमंडळ वा सरकारचे समर्थन करत करू लागले. आता मला या लोकांचे हेतू माहीत नव्हते. कारण ईथे काही लोकं एखाद्या राजकीय पक्षाचे अजेंडे घेऊन लिहीतात. त्यामुळे त्यांच्या हेतू आणि तटस्थेबद्दल मला नेहमीच शंका असते. ईथेही ती शंका आहे माझ्या मनात तर माझे आणि माझ्या घरमालकाचे डिटेल्स न देणेच उत्तम.
तरीही मी आवाहन करतो की महाराष्ट्रभर जो बिलाचा गोंधळ आहे तो जनतेचा फुकटचा कांगावा आहे हे सिद्ध करून दाखवावेच !!
महाराष्ट्रभरातल्या जनतेचं
महाराष्ट्रभरातल्या जनतेचं माहीत नाही. एक माणूस मात्र नक्कीच कांगावा करतंय.
<एक भाड्याने दिलेय. आम्ही भाडेकरूला विचारायला गेलो नाही ना तो सांगायला आला>
समजा त्या भाडेकरूलाही वाटलं की त्याचं बिल अव्वाच्या सव्वा आलं आणि त्याने ते भरायचं नाही, वीज मंडळ वाले लाइन कापायला आले तर त्यांना प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय घेतला तर चालेल का?
आपण एक महिन्याने घर सोडणार आहोत मात्र विजेचे बिल भरणार नाही, वर वीज मंडळाच्या कर्मचार्याशी पंगा घे असं वॉचमनला सांगितलंय हे स्वतःच्या घरमालकाला सांगितले का?
आपण एक महिन्याने घर सोडणार
आपण एक महिन्याने घर सोडणार आहोत मात्र विजेचे बिल भरणार नाही, वर वीज मंडळाच्या कर्मचार्याशी पंगा घे असं वॉचमनला सांगितलंय हे स्वतःच्या घरमालकाला सांगितले का?
>>>>
तो विनोद होता हो
मीटर रीडींग घ्यायला न येणारे कर्मचारी आता लाईट कापायला आले तर त्यांना तो मारलेला टोला होता
लॉकडाउनमध्ये त्यांनी घरोघर
लॉकडाउनमध्ये त्यांनी घरोघर फिरून रीडिंग घ्यायला हवं होतं?
छान छान.
लॉकडाउनमध्ये त्यांनी घरोघर
लॉकडाउनमध्ये त्यांनी घरोघर फिरून रीडिंग घ्यायला हवं होतं?
>>>
नाही.
तुम्हाला काय वाटते?
ते तहजीब म्हणजे काय रे भाऊ?
ते तहजीब म्हणजे काय रे भाऊ?
तुझ्या इंग्लिश प्रमाणे माझं मराठी पण खराब आहे
याचा एखादा वाक्यात उपयोग करून सांगणार का?
मीटर रीडींग घ्यायला न येणारे
मीटर रीडींग घ्यायला न येणारे कर्मचारी आता लाईट कापायला आले तर त्यांना तो मारलेला टोला होता>>
मायबोली वर मारलेले टोले वीज मंडळापर्यंत पोहचतील काय?
मायबोली वर मारलेले टोले वीज
मायबोली वर मारलेले टोले वीज मंडळापर्यंत पोहचतील काय?
>>>>
ईथे मोदी गांधी काँग्रेस भाजपा यांवर वाद घालणारयांना हे समजवाल का जरा. ते थांबले तर मी माबोच सोडतो
तहज़ीब
तहज़ीब
स्त्रीलिंग
सभ्यता, शिष्टता।
ईथे मोदी गांधी काँग्रेस भाजपा
ईथे मोदी गांधी काँग्रेस भाजपा यांवर वाद घालणारयांना हे समजवाल का जरा.>>
त्यांना समजावनं कोणालाच शक्य नाही.
पण वाढीव वीज बीलासंदर्भातला हा धागा पाहुन माझ्यासारखे अनेक सर्वसामान्य वाचक काही माहिती मिळेल या अपेक्षेने इथली चर्चा वाचत असतील. त्यांची थोडी निराशाच होत असेल.
माझ्यासारखे अनेक सर्वसामान्य
माझ्यासारखे अनेक सर्वसामान्य वाचक काही माहिती मिळेल या अपेक्षेने इथली चर्चा वाचत असतील
>>>>
का निराशा होईल ?
त्यांना त्याचे जास्तीचे बिल योग्यच आहे आणि ते का हे कळले असेलच ना या चर्चेतून..
हो ना माझेही बिल जास्त आले
हो ना माझेही बिल जास्त आले आहे पण कांगावा न करता आपण काय करू शकतो हे इथल्या धागाकर्ता सोडून अन्य लोकांच्या पोस्ट वाचून कळले
हीच ती तहजीब
Pages