(एक छोटुकली गोष्ट)
"अहो ऐकताय न लवकर तयारी करायला हवी. आता सगळे येऊ लागतील. कोणाला काय द्यायचय सगळा हिशोब चोख करायला हवा. सगळी दमून भागून येतील. सगळ्यांचे समाधान करायला हवं. ऐयकताय ना?" तिने वळून बाजुला बघितले "ती" मोकळीच!
तो कधीच बाहेर पडलेला. रात्रीच गार वारा सुटलेला. मग तसाच तो निघाला. तो जसजसा पुढे जाऊ लागला; आकाशातल्या ढगांना आपला रंग चढवू लागला. गहिरा गडद भरीव...
वाटेत भामाबाईची झोपडी लागली. नातवाला झोपवत होती ती. मग त्याने आपले हात लांब करून झोपडीवर अंधार केला. उद्या लवकर उठून निघायचय तिला. थोडी झोप हवीच तिला.
अशाच मग कितीतरी भामा...
मग थोडा अजून पुढे झाला. तात्याबा अंधारातच डोळे बारीक करून शेताकडे डोळाभर बघत होता. आता काही दिवस भेट होणार नव्हती. " पेरलेलं नीट वर आण रे बाबा" तात्या नमस्कार करत म्हणाला. मग "त्या"ने आपले हात वर करून "असेच होवो" म्हटलं न पुढे झाला.
असेच मग कितीतरी तात्याबा...
काकड आरतीची वेळ झाली न आळंदीतली घंटा त्या सावळ्याने हलवायला सुरुवात केली. "चला उठा आज पालखी निघणार आटपा चला." एक एक वारकरी जमु लागले तसे त्याच्या अंगात वेगळच बळ येऊ लागलं. रामकृष्णहरी च्या गजरात तो डोलू लागला. पाल़खी निघाली. हा सगळ्यात पुढे. घ्यायलाच आला होता न तो.
वारी पुढे सरकू लागली. एक एक गाव, नदी, डोंगर, घाट सगळे जिवंत करत; नादमय करत; शुचिर्भूत करत वारी पंढरीची वाट चालू लागली. वाटाड्या तोच होता चुकायची भिती नव्हतीच. सगळे नाचत गात; किर्तन, अभंग गात आनंदे पोहोचलेच पंढरपुरी. मंदीरात पोहोचले.
अन मग तो उलटा वळला. रखुमाईने "ती" पुसून लख्ख करून ठेवलेली. त्या विटेवर जाऊन उभा राहिला. रखुमाईने विचारलं "दमलात का?"
तेव्हढ्यात एकच आनंदकल्लोळ उसळला "विठठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल।" तो हसला म्हणाला "पावलो बघ!"
सुंदर कथा!
सुंदर कथा!
वा वा! अप्रतिम!
वा वा! अप्रतिम!
Hans Anderson ची परीकथा !
Hans Anderson ची परीकथा ! आणि Roald Dahl ची स्टाइल ! What a combination !!!
धन्यवाद श्रद्धा, वावे,
धन्यवाद श्रद्धा, वावे, प्रभूदेसाई __/\__
प्रभूदेसाई माझं इंग्रजी, इतर भाषांचं वाचन नाही। तुम्ही उल्लेख केलेली मंडळी बडी दिसतात। शोधून वाचते। पण इतकं मोठं काही नाही हो लिहित मी
अप्रतिम.... मोजक्या शब्दात
अप्रतिम.... मोजक्या शब्दात देवदर्शन घडवलेत
प्रथम Roald Dahl वाचा.
प्रथम Roald Dahl वाचा. नमुना म्हणून हे पुस्तक वाचा.
Charlie and the Chocolate Factory
ह्या च्यावर सिनेमा पण आला होता. पण विकत घेऊ नका, चतकोर पुस्तक आणि अव्वाच्या सव्वा किंंमत. वाचनालायांतून आणून वाचा
किंवा ह्या लिंकवर जाऊन एक के बाद एक असे पहा
https://www.youtube.com/watch?v=fM66POefeQA&list=PLZ-F4pjbka7EIKKAwh83RD...
छान आहे गं गोष्ट! आवडली
छान आहे गं गोष्ट! आवडली
आवडली , छोटी व गोड !
आवडली , छोटी व गोड !
किती सुंदर..
किती सुंदर..
खूप आवडली
माऊली माऊली
Khup sundar
Khup sundar
खूप छान गोष्ट! माऊली _//\\_
खूप छान गोष्ट! माऊली _//\\_
मस्त जमलीये.
मस्त जमलीये.
अतिशय आवडली कथा! आसपास
अतिशय आवडली कथा! आसपास घडणाऱ्या घटनांनी मन खूप हळवं झालं आहे सध्या! शेवटच्या वाक्याला डोळ्यात पाणी आलं! खूप निर्मळ लिखाण :)
अगदी गहिवर दाटून आला मनात....
अगदी गहिवर दाटून आला मनात.....
कित्ती दिवसांनी लिहीलेस ग...
कित्ती दिवसांनी लिहीलेस ग...
खूप खूप छान आहे कथुकली
क्या बात है!! अप्रतिम.
क्या बात है!! अप्रतिम.
खूप गोड आणि सकारात्मक! अतिशय
खूप गोड आणि सकारात्मक! अतिशय आवडली
अवल खूप सुंदर लिहीलीय.. आवडली
अवल खूप सुंदर लिहीलीय.. आवडली,,
मस्त गं अवल... "त्या" च्या
मस्त गं अवल... "त्या" च्या बाजूने वाचताना मजा आली. छान कल्पना!
छान कथा
छान कथा
सुंदर!
सुंदर!
वाह! मस्त!
वाह! मस्त!
सर्वांना धन्यवाद __/\__
सर्वांना धन्यवाद __/\__
खरं तर कथा हा लेखनप्रकार अन विषय दोन्ही माझ्या क्षमतेतले नाहीत। एका मैत्रिणीने आग्रह केला म्हणून हे लिहिलं गेलं। तरीही तुम्हा सगळ्यांना आवडलं, थँक्यु
मला खुप आवडलं अवल
मला खुप आवडलं अवल
खुप छान लिहिलयं ...
खुप छान लिहिलयं ...
वाह! आवडलं
वाह! आवडलं