पतंजलीची प्रोडक्टस

Submitted by फेबु on 13 August, 2014 - 15:07

रामदेव बाबा यांची पतंजली ची प्रोडक्ट ऑनलाईन मागवता येतात का?असतील तर कुठून मागवता येतील?
पतंजली ची कुठली प्रोडक्टस चांगली आहेत ?तुम्ही वापरता का?अन आपला अनुभव काय आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा मला कळलं एका video मुळे कळलं की पुण्यातील नामवंत खाजगी रुग्णालतील फेमस डॉक्टर जलनेती promote करणार आहेत अजून काही दिवस त्यांना जलनेतीचे positive results मिळत राहिले तर,शोध निबंध इत्यादी लिहून>>>>>

जरूर करू देत, त्याच्या कंट्रोलिंग बॉडी च्या दृष्टीने पुरेश्या ट्रायल्स करून त्यांचे निष्कर्ष जाहीर करु देत. मात्र पुरेश्या ट्रायल न करता त्यांनी "जलनेती हे औषध आहे" असा स्टँड घेतला तर ICMR त्याच्यावर ऍक्शन घेईल.

रच्याक आयुर्वेदिक /युनानी औषधांसाठी अशी कोणती बॉडी आहे का? ( हे मी सिरिअसली माहिती हवी म्हणून विचारतो आहे)

कोणतेही औषध बाजारात येण्या पूर्वी त्या औषधाची शास्त्रीय पद्धतीने चिकिस्ता झाली पाहिजे ह्या विषयी दुमत असण्याचे कारण नाही.
त्या अगोदर त्या औषधाची जाहिरात सुद्धा केली नाही पाहिजे किंवा वातावरण निर्मिती सुद्धा केली नाही पाहिजे.
उदा: पाहिले सहा महिने सूर्य किरण कसे कॅन्सर निर्माण करतात ह्याचा ढोस माध्यम मधून चालू ठेवायचा आणि वातावरण निर्मिती झाली की त्या वर उपाय म्हणून sun cream बाजारात आणायची हा प्रकार सुद्धा गैर च आहे.
पण फक्त ते आयुर्वेद निर्मित औषध आहे म्हणून विरोध करणे,त्याची चाचणी घेण्यास सुद्धा आक्षेप घेणे,आयुर्वेद विषयी चुकीचे समज पसरवणे हे सुद्धा गैर च आहे.

पण फक्त ते आयुर्वेद निर्मित औषध आहे म्हणून विरोध करणे,त्याची चाचणी घेण्यास सुद्धा आक्षेप घेणे,आयुर्वेद विषयी चुकीचे समज पसरवणे हे सुद्धा गैर च आहे.>>>>>>>

ते केवळ पतंजली चे प्रोडक्ट आहे म्हणून,

पुरेसे प्रमाणीकरण झालेले नसताना, नसेनाका ते औषध, पण लोक बरे होत असतील तर काय हरकत आहे? अशी त्याची तळी उचलणे,
चुकीच्या पद्धतीने चाचण्या घेतलेल्या असताना सुद्धा त्याच्याकडे कानाडोळा करणे,
आणि आयुर्वेदिक औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत असे चुकीचे समज पसरवणे

हे सुद्धा चुकीचे आहे,

निसर्ग नियमानुसार मुल मोठे झाली की त्या प्र्याण्याचे असुष्य संपले पाहिजे .
40 वर्ष हे वय एक्झिट घेण्यास योग्य आहे.
Corona निसर्गाची निर्मिती असेल तर निसर्ग नियम माणसाला लागुच झाले पाहिजेत.
40 आणि त्या पुढचे corona la priy असायला हवेत.
माझे तर हे मत आहे.

ते फेअरनेस क्रीम, टूथपेस्ट वगैरे औषध कॅटॅगरीत येत नाहीत, कन्झ्युमर प्रॉडक्ट्स/ कॉस्मेटीक्स / पर्सनल केअर मधे येतात. त्यांनी चुकीचे दावे केले तर त्यांच्या विरूद्ध फॉल्स अ‍ॅडव्हर्टाईजमेंट ची केस होते.

पतंजली ने औषध बाजारात आणलय, आणी ते सुद्धा पुरेसा रिसर्च आणी आवश्यक परवानग्या न घेता, ज्यामुळे पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा गंभीर गुन्हा ठरतो.

पतंजली च्या आवळा चूर्ण ह्या प्रोडक्ट वर सुद्धा औषध लीहले आहे.
मी तर ते बघून विचारात च पडलो होतो.
केसांची वाढ करणारी आयुर्वेदिक वनस्पती त्यांच्या मते औषधी वनस्पती असा आहे.
नक्की औषध कशाला म्हणायचे ह्या बाबतीत च पतंजली वाले गोंधळलेले
आहेत.
औषध म्हणजे काय ह्याची शास्त्रीय व्याख्या काय आहे

रच्याक आयुर्वेदिक /युनानी औषधांसाठी अशी कोणती बॉडी आहे का? ( हे मी सिरिअसली माहिती हवी म्हणून विचारतो आहे)
Submitted by सिम्बा on 27 June, 2020 - 19:09

युनानी चे माहित नाही. पण आयुर्वेदिक औषधांसाठी : https://cdsco.gov.in/

इथे हा अवांतर प्रतिसाद आहे तरी औषध शी संबंध आहे म्हणून माझे मत देत आहे.
शालिय जीवनात नागरिक शास्त्र हा विषय शिकवला जातो त्या मुळे आपल्या देशातील राज्य व्यवस्था कशी चालते,प्रतेक संस्थेची कर्तव्य काय आहेत अधिकार काय आहे प्रतेक व्यक्तीला समजते.
हा विषय अजुन खोलात जावून शिकवला पाहिजे तो जीवनाला आवश्यक ज्ञान देतो .
त्या प्रमाणे मानवी शरीराची माहिती,अवयव व त्यांची माहिती.
आणि पेशी विषयी थोडक्यात वर वरची माहिती दहावी पर्यंत च्या शिक्षणात दिली जाते.
ह्या विषयात अजुन खोलवर जावून
विविध आजार त्याची कारणे,ते टाळावे कसे,आणि त्या वरील उपचार ह्याची माहिती विस्तृत पने दिली पाहिजे.
आणि त्याच बरोबर त्या आजार वरील औषध त्यांची संरचना,ती औषध कशी कार्य करतात ह्याची माहिती सुद्धा विस्तृत पने दिली पाहिजे .
आहार,प्रोटीन्स,vitamins, aani baki ghatak त्यांची रासायनिक संरचना इत्यादी सविस्तर शिकवले पाहिजे.
दहावी होई पर्यंत तो विद्यार्थी गंभीर आजार सोडून बाकी सर्व आजारांवर औषध ठरवण्यासाठी सक्षम झाला पाहिजे.
बाजारीकरण मुळे उच्च शिक्षण ही मक्कते दारी बनत चालली आहे
मेडिकल पेशा हा लोकांना लुटण्याचा धंधा झाला आहे.
फक्त पैसे असतील तर शिक्षण आणि त्या शिक्षण च्या जोरावर लूट अशी ही साखळी आहे.
ही तोडण्यासाठी शिक्षणात बदल झालाच पाहिजे.
पूर्वी संस्कृत फक्त ठराविक लोकांनी शिकायचे, वेद फक्त ठराविक लोकांनीच वाचायचे अशी रित होती त्या जोरावर बहुसंख्य जनतेवर किती तरी वर्ष राज्य केले गेले.
आता परत तीच स्थिती येत आहे फक्त स्वरूप वेगळे आहे..
बाजारीकरण हे ते संकट आहे.
गूगल चे कार्य मोठे आहे ज्ञान चे आणि माहिती चे भांडार सामान्य लोकांसाठी गूगल नी उपलब्ध करून दिले आहे .
फक्त चूक काय बरोबर काय ह्याची जाणीव असणे आवश्यक आहे.

Bharat you can add "Criticizing national policies doesn't make me antinational."

आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात यष्टीमधु मागा >> मी येकदा यष्टीमधून जात असतानी यष्टीत येक यष्टिमधु इकनारा आल्ता.

शिकेकाई चे उपयोग तर सर्वांना माहीत आहे पण शिकेकाई मग पडली आणि केमिकल युक्त शाम्पू लोकांचा लाडका झाले 50 च्या खात्री नी टक्कल पडू लागले

>> मेडिकल पेशा हा लोकांना लुटण्याचा धंधा झाला आहे.
फक्त पैसे असतील तर शिक्षण आणि त्या शिक्षण च्या जोरावर लूट अशी ही साखळी आहे.
ही तोडण्यासाठी शिक्षणात बदल झालाच पाहिजे.>>> हे सब घोडे बाराटक्केचा प्रकार आहे.
असे जनरलायझेशन चांगल्या डॉक्ट्ररांसाठी डिस्करेजिंग आहे.

डॉक्टर होण्यासाठी करोड खर्च होत असेल तर ते वसूल पण झाले पाहिजेत.
म्हणजे एकदा प्रामाणिक सरकारी अधिकारी असला की त्याला भ्रष्ट कसे बनवायचे ह्याचे विविध फंडे असतात शेवटी तो भ्रष्ट होतोच.
आरोग्य हा धंदा बनवल्या नंतर एकाधिकार शही कशी राहील.
इच्छा असून सुद्धा प्रामाणिक डॉक्टर मजबूर होवून त्यांच्या टोळी मध्ये सामील कसा होईल ह्याचे पण फंडे असतात च.
त्या मधील एक फंडा मेडिकल चे शिक्षण प्रचंड खर्चिक करणे आणि सरकारी मेडिकल
कॉलेज ची संख्या वाढू न देणे ही .
स्वतंत्र मिळाले तेव्हा किती सरकारी मेडिकल कॉलेज होती आणि आता कीती आहेत ह्याची आकडेवारी बघितली तर लक्षात येईल खासगी मेडिकल कॉलेज ला सोयीची धोरण ठरवून राबवली गेली आहेत
कॉर्पोरेट हॉस्पिटल स त्याच दिशेने जात आहेत.
हॉस्पिटल चा मालक डॉक्टर असलाच पाहिजे असा काही नियम नाही.
मोठ मोठ्या हॉस्पिटल चे मालक डॉक्टर नाहीत तर उद्योगपती आहेत. डॉक्टर नोकऱ्या करतात मार्केट पेक्षा जास्त पगारावर.

केस धुण्यासाठी शिकेकाई,कपडे धुण्यासाठी रिठा,दात साफ करण्यासाठी कडू निंबची काठी,आहारात घाणी चे तेल,

चेहऱ्याची स्किन नितळ होण्यासाठी पारंपरिक घरगुती उपाय हे आपण सर्व करतच होतो ना.
पण मार्केटिंग स्किल नी आपल्या सर्व सवयी बदलेल्या आणि आता लोकांना जाणीव व्हायला लागली आपण चुकीच्या मार्गाने जात आहे.
विविध रसायने वापरून तयार झालेल्या वस्तू मुळे नुकसान दिसू लागले.
ह्याचाच फायदा पतंजली नी उठवला आणि पारंपरिक वस्तू चे मार्केटिंग केले आणि ते यशस्वी झाले.

शोध आयडी चा
असा नवा धागा काढून ह्या वर मत व्यक्त करता येतील.
खूप मनोरंजक माहिती मिळेल.

20200630_080941.jpg
हे असले युक्तिवाद वाचताना इकडच्या काही idज ची खूप आठवण आली, कुणाला उचक्या लागल्या का??

बाकी आता पतंजलीनेच आम्ही औषध बनवलेच नाही असा स्टँड घेतल्याने हे असले लोक आता काय युक्तिवाद पुढे आणतात ते पाहणे मनोरंजक ठरेल

पतंजली चे प्रोडक्ट चांगल्या दर्जाचे नसते तर लोकांनी पैसे देवून विकत घेतले असते का. -- Hemant33 >>> I agree with this comment. Baba Ramdev's criticism falls into the tall poppy syndrome category i.e. it shows a tendency to discredit or disparage those who have achieved notable wealth or prominence. Anyone who believes that Baba Ramdev is cheating should found a group and sue him. इत्यलं.

रामदेव(किंवा पार्टनर) स्वतः काही चुका करत आहेत.त्यात त्यांच्या विरोधात एक खूप श्रीमंत परदेशी औषध कंपन्या लॉबी उभी आहे.
त्यामुळे सध्या कोणाच्याही हातात कोलीत देऊ नये, विश्वासार्ह प्रॉडक्ट खऱ्या दाव्यांसह आणि योग्य क्लिनिकल ट्रायल चे निकाल जाहीर करून विकावी असे वाटते.

विषय पतंजलीच्या औषधांचा चालू आहे बाकी जनरल प्रॉडक्ट बद्दल नाही. जनरल प्रॉडक्ट्स सुद्धा बाकी ब्रॅण्ड्स प्रमाणेच आहेत काही फार वेगळ्या दर्जाचे नाहीत. पतंजली बऱ्याच गोष्टी स्वतः न तयार करता थर्ड पार्टीकडून घेऊन विकते जो मार्ग बरेच जण अवलंबतात. गुगलवर पतंजली मेडिसिन क्वालिटी असे गुगलल्यास भरपूर लिंक मिळतील वाचायला गुणवत्तेबद्दल. कोरावर भरपूर लोकांचे अनुभव मिळतील वाचायला या बाबतीत. पतंजलीच नाही तर बहुतेक आयुर्वेदिक ब्रँड्सच्या बाबतीत हीच कथा आहे. ह्या इंडस्ट्रीवर सरकारचे म्हणावे तसे नियंत्रण नाहीये दुर्दैवाने. पतंजलींच्या रोजच्या वापरायच्या वस्तूंची गुणवत्ता चांगली असली म्हणजे त्यांची औषधेही चांगली असतीलच असे काही नाही. उदाहरणादाखल मधच घ्या. भारतातील किती कंपन्या शुद्ध मध विकत असतील? त्यात परत मर्यादेबाहेर मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविके सापडतात. सामान्य जनता जोपर्यंत आयुर्वेदाचा उदोउदो करत डोळे झाकून ह्या लोकांची औषधे खरेदी करत आहेत तोपर्यंत ह्या इंडस्ट्रीत काही चांगला बदल होणार नाही आणि सरकारकडून तर फार अपेक्षाही नाही.

ट्रॅफिक हवालदार नसेल जागेवर तर सर्व कायदे पाळणारा व्यक्ती सुध्धा कायदेभंग करतो.
रेड दिवा दिसत असेल तरी गाडी न थांबवता सरळ निघून जातो.
ही माणसाची प्रवृत्ती आहे असे म्हणायला हरकत नाही.
औषध आणि विविध खाद्य पदार्थ ह्यांचा दर्जा ठरवणारी यंत्रणा देशात उपलब्ध आहे तिचे च काम आहे दर्जा आणि दावे केलेले घटक त्या मध्ये योग्य प्रमाणात आहेत का.
तसे होत नसेल तर दोष कोणाचं.
लोकांना जोपर्यंत वाईट अनुभव येत नाही तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते .
पतंजली असू नाही तर कोणते ही प्रॉडक्ट ह्यांचे दोष निघतात च.
ह्याचा अर्थ यंत्रणा ठीक काम करत नाही.
पेप्सी,कोक मधील आरोग्य स धोकादायक घटक बघून त्यांना कीटक नाशकाच्या श्रेणी मध्ये टाका अशी पण मत व्यक्त झाली आहेत.
शेवटी विश्वास ठेवणे हेच सामान्य लोकांच्या हातात आहे.
बिसलेरी chya बाटली बंद पाण्या पेक्षा bmc chys nalani येणाऱ्या पाण्याचा दर्जा उत्तम असतो हे माहीत असून पण लोकं बिसलेरी पितात.
दोष कोणाचं.

Pages