Submitted by फेबु on 13 August, 2014 - 15:07
रामदेव बाबा यांची पतंजली ची प्रोडक्ट ऑनलाईन मागवता येतात का?असतील तर कुठून मागवता येतील?
पतंजली ची कुठली प्रोडक्टस चांगली आहेत ?तुम्ही वापरता का?अन आपला अनुभव काय आहे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कपड्याची पावडर टाईड पेक्षा
कपड्याची पावडर टाईड पेक्षा महाग आहे का>>> बहुतेक नाही. पण दर्जा चांगला आहे.
कपड्यांचा आणि भांड्यांचा
कपड्यांचा आणि भांड्यांचा साबण, तसेच कपड्यांची पावडर मस्त आहे, परवाच साबणांच्या दहा दहा वड्या घेऊन आलो. डिटर्जंटच्या दोन किलो च्या दोन पिशव्या.
टूथपेस्ट मी अजून वापरत नाही, पण घरचे वापरतात. छान आहे असे म्हणणे आहे.
ईथे वाचून पीडान्तक आणलं
ईथे वाचून पीडान्तक आणलं .
साबांचे गुडघे उठता-बसताना दूखायचे . ते आता दूखणे खूप कमी आहे - २ वापरात - असा अभिप्राय मिळाला.
काल माझंही अंग मोडून आलं होतं , पीडांतक लावल्यावर बरेच बरं वाटलं.
केश कान्ती ( मिल्क प्रोटीन ) सॅशेज आणली आहेत . एका वापरात केस बर्यापैकी मउ पडल्याचे जाणवले.
खाण्यापीण्याचे पदार्थ घ्यायची अजून मनाची तयारी नाही पण बाकी काही क्रीम्स वगैरे वापरेन म्हणते .
रच्याकने , फीनाईल साठी दोघी-तिघीनी विचरणा केली . आऑस्टॉ सान्गितलं . कधी येइल माहित नाही म्हणाली काऊन्टरवरची मुलगी . तेही चांगलं असाव बहुतेक कारण त्या बायका अगदी हळहळल्या
.
अनेक बहुराष्ट्रिय कंपन्यांना
अनेक बहुराष्ट्रिय कंपन्यांना पतंजलि चे उत्पादन यायला नको आहेत.
कारण त्यांना प्रचंड नफा कमावता येत नाही.त्यामुळे पतंजलि बदनामीचे अनेक मार्ग चोखाळले जात असावेत.
या शिवाय काही वेळा मास प्रोड्युसड करताना तृटी राहू शकतात.
मला पतंजलि चा मूळ विचार आवडतो - दर्जेदार स्वदेशी उत्पादन रास्त भावात.
सध्या मोगरा साबण वापरतो आहे, सुंदर सुवास आहे.
तूलनेत आता डव अगदी सिंथेटिक कृत्रिम वाटतो. नकोसा वाटतो!
आम्ही वापरतो त्यांचे काही
आम्ही वापरतो त्यांचे काही काही प्रॉडक्ट्स.
काल फोन केला तर काही काही वस्तू नाहियेत म्हणाले. आम्ही म्हंटलं जेवढ्या आहेत तेवढ्या पाठवा आणि बाकीचे पैसे परत करा. तर एक- दोन दिवसांत येईल म्हणाले.
दंतकांती टुथपेस्ट - मस्त
केशकांती शँपू - मस्त
बाथ सोप ( रोझ, पंचगव्य ) - मस्त
मध - मस्त.
अॅपल ज्यूस - रिअल, ट्रॉपिकानापेक्षा मस्त.
चोको फ्लेक्स - चोकोजपेक्षा मस्त
आवळा ज्यूस - मला तरी तुरट, कडवट लागला. नवर्याने प्यायला ठिक आहे म्हणत. वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे आता सरबत करून पाहीन.
अॅलोवेरा- ग्वावा ज्युस लिची फ्लेवर (टेट्रा पॅक्स) - मला कडवट लागला पण नवर्याला आवडला.
इथे कोणी ऑनलाईन मागवले आहे का ? मी १आठवड्यापूर्वी मागवले होते अजून आले नाहि.
मी आताचा लॉट संपला की अंगाचा,
मी आताचा लॉट संपला की अंगाचा, कपड्यांचा,, भांड्याचा साबण तिथुनच आणणार. कोकोनट हेअर वॉश काल वापरला. चांगला वाटलाय, केसांचा वॉल्युम बर्यापैकी कमी होऊन मॅनेजेबल वाटतायत.
चोको फ्लेक्सचं छोटं पॅकेट असतं का हॅना? लेकीला एका वेळी छोटं पॅकेट दिलं की बरं पडतं, बाकीचे फ्लेक्स सादळत नाहीत.
माहीत नाही गं. मी स्वतः अजून
माहीत नाही गं. मी स्वतः अजून दुकानात गेले नाही. नवर्याने पाव किलोचा बॉक्स आणलाय. बघते विचारून त्याला.
आमच्या घराजवळ दुकान
आमच्या घराजवळ दुकान निघालंय.
चुलत साबा फॅन आहेत पतंजलीच्या. त्यांच्या रेको वरुन कणिक आणलीय पण अजून उघडला नाही पॅक.
मध
च्यवनप्राश
केसर-बादाम साबण
मारी बिस्किटं ( गव्हाची आहेत म्हणे )
भांड्यांचा आणि कपड्यांचा साबण
बोरोसिल क्रीम - एवढी उत्पादनं वापरली ती आवडली आहेत.
गूळीसाखर साबांकडे टेस्ट करुन पाहिली. चव खूप आवडली पण ब्राऊन शुगर वाटली. शुद्ध गूळ पावडर नाही वाटली कनकसारखी. त्यामुळे ठरत नाहीये आणू की नको ते. किंमत कनकच्या निम्मी आहे !
पतंजलीची वॉशिंग पाउडर 'फ्रंट
पतंजलीची वॉशिंग पाउडर 'फ्रंट लोडिंग' वॉशिंग मशिन मध्ये वापरता येईल का?
कारण 'फ्रंट लोडिंग' साठी पाउडर वेगळी असते.
दंतकांती आणी पीडांतक वापरून पाहतो आत्ता.
मला मोगरा साबण आवडला नाही एवढा.
पिंपळे सौदागर मध्ये 'Vision Gaalaria' मध्ये आहे मोठं दुकान, तिथे कुणी एक डॉक्/वैद्य पण येतात संध्याकाळी.
आम्ही वापरतो काही
आम्ही वापरतो काही प्रॉडक्ट्स.
दंतकांती टुथपेस्ट - चांगली आहे
केशकांती मिल्क प्रोटीन शांपू - मस्त. केस मऊ होतात, गळणे कमी होते.
बाथ सोप ( रोझ,मुलतानी मिट्टी, मोगरा, लेमन) - मस्त. रोझ क्लिंझर सर्वात मस्त
वॉशिंग पावडर - प्रिमियम (डब्यातली) मुलाचा कराटेचा ड्रेस पांढराशुभ्र निघतो. मस्त. दुसर्या दोन पण छान आहेत. किंमत एकदम कमी
भांड्याचा साबण - छान. मस्त फेस होतो. किंमत कमी
बदाम तेल - डोके शांत होते. केस गळणे कमी होते.
गुलकंद - चविष्ठ
अगरबत्ती - चांगल्या आहेत
फिनेल - छान
दलिया - मस्त आणि स्वस्त
सनस्क्रिम - चांगले आहे
बिस्किट्स - चांगली आहेत. क्रिम बिस्किट पण छान
अनेक बहुराष्ट्रिय कंपन्यांना
अनेक बहुराष्ट्रिय कंपन्यांना पतंजलि चे उत्पादन यायला नको आहेत.
कारण त्यांना प्रचंड नफा कमावता येत नाही.त्यामुळे पतंजलि बदनामीचे अनेक मार्ग चोखाळले जात असावेत.
या शिवाय काही वेळा मास प्रोड्युसड करताना तृटी राहू शकतात. =+१००००
विरोध केवळ या कारणासाठी होतोय.
मला तरी पतंजलीच्या वस्तु तुलनेने जास्त चांगल्या वाटल्या. तोच दर्जा अर्ध्या किमतीत मिळत असेल तर का नाही घेणार? अर्थात माल चिनी असता तर घेतला नसता. पण इथे चांगल्या दर्जाचा देशी माल मिळतोय.
आम्ही काही प्रॉडक्ट्स
आम्ही काही प्रॉडक्ट्स वापरतो
दंतकांती टुथपेस्ट - चांगली आहे
केशकांती तेल - चांगले आहे
बाथ सोप ( रोझ, मुलतानी मिट्टी, मोगरा, लेमन, पंचगव्य, अॅलोवेरा ) - मस्त
वॉशिंग पावडर - आणलीय पण वापरली नाही
बिस्किट्स - मोनॅकोसारखी आहेत ती चांगली आहेत
तूप - एकदा आणले पण काहीच फारसा फरक जाणवला नाही नेहमीच्या गोवर्धन तुपात अन् या तुपात (किमतीत जबरदस्त फरक आहे)
टूथब्रश - चांगला आहे
फेस क्रीम - चांगले आहे
अॅलोवेरा फेस जेल - चांगले आहे
पीडांतक - चांगले आहे
बादवे
मी जिथून आणते ते टेल्को गृहिणी (आता टाटा मोटर्स) चे मूळ दुकान आहे, त्यानी पातंजलीची एजन्सी घेतली आहे. त्यामुळे चिरोटे, मेतकुट असे पदार्थ ही रामदेवबाबानीच उपलब्ध करून दिले आहेत असे समजून आणते.
तूप - एकदा आणले पण काहीच
तूप - एकदा आणले पण काहीच फारसा फरक जाणवला नाही नेहमीच्या गोवर्धन तुपात अन् या तुपात (किमतीत जबरदस्त फरक आहे) >>>
पतंजलीचे तूप स्वस्त आहे की महाग गोवर्धनपेक्षा ??
महागच महाग
महागच महाग
तुपाच्या बाबतीत मला आजवर
तुपाच्या बाबतीत मला आजवर वाईटच अनुभव आहे सगळ्याच ब्रँडचा. घरच्यासारखे तुप फक्त घरीच मिळालेय. गोवर्धनपेक्षा थोडे महाग आहे रामदेव चे तुप. बहुतेक गोवर्धन ४०० रुपये किलो असावे. मी २०० ला अर्धा किलो घेतले गेल्या आठवड्यात. लेरामदेव ४५० पर्यन्त असावे. मी एकदाच घेतलेले अर्धा किलो.
पतंजली चे तूप उत्तम आहे. वास
पतंजली चे तूप उत्तम आहे. वास आणि चव दोन्हीबाबतीत.
पेस्ट, साबण, शाम्पू यांबरोबरच कोरफड जेल रोज वापरतो आम्ही. खूपच चांगला अनुभव आहे.
आमला स्वरस आणि मध मला तरी आवडला.
गाईच्या दुधाचं तूप आम्ही विकत
गाईच्या दुधाचं तूप आम्ही विकत आणतो, गोवर्धन, पतंजली. ते चांगले वाटले.
म्हशीच्या दुधाचं मी घरीच करते आणि आईपण देते घरचे, त्यामुळे ते कधी बाहेरून विकत आणायला नाही लागत.
पतंजली चे तूप उत्तम आहे. वास
पतंजली चे तूप उत्तम आहे. वास आणि चव दोन्हीबाबतीत.>> +१००
माझा प्रश्न :- पतंजलीची
माझा प्रश्न :-
पतंजलीची वॉशिंग पाउडर 'फ्रंट लोडिंग' वॉशिंग मशिन मध्ये वापरता येईल का?
कारण 'फ्रंट लोडिंग' साठी पाउडर वेगळी असते.
कृपया मदत करा.
तुम्ही सगळे तो मोगर्याचा बाथ
तुम्ही सगळे तो मोगर्याचा बाथ सोप म्हणताय तो बॉक्स मध्ये येतो की नॉर्मल पॅकिंग असतं?? मी अजुनतरी पाहीला नाहीय दुकानात.
मोगर्याचा बाथ सोप म्हणताय तो
मोगर्याचा बाथ सोप म्हणताय तो बॉक्स मध्ये येतो की नॉर्मल पॅकिंग असतं??>>>
बॉक्समधे असतो.
मी पुढल्या वेळेला जाईन तर फटू
मी पुढल्या वेळेला जाईन तर फटू काढून आणीन (अर्थातच स्टोर वाल्याला विचारून)
विश्रांतवाडीतल्या गोडाऊन कम स्टोर मध्ये साबण, फेसपॅक वगैरंचे प्लॅटर्स्च तयार आहेत. हवा तो निवडता येतो.
फोटो इथे दिला तर त्यांची जाहीरात माबोवर होईल असं वाटतंय; जर नाहीच चालले तर त्यांची लिस्ट देईन इथे.
अगं ओजस साबण मोगरा असं माग.
अगं ओजस साबण मोगरा असं माग.
Aata washing machine sathi
Aata washing machine sathi mhanun powder nighali aahe patanjalichi useful for both frontload and topload. Cost ९५ rs half kg
Aata washing machine sathi
Aata washing machine sathi mhanun powder nighali aahe patanjalichi useful for both frontload and topload. Cost ९५ rs half kg
मी त्यांची मेंदी पण आणलीये.
मी त्यांची मेंदी पण आणलीये.
वापरली की रिजल्ट सांगीनच.
धन्यवाद Dhanashril वापरून
धन्यवाद Dhanashril
वापरून बघतो.
रंगासेठ, हो. प्रिमियम म्हणून
रंगासेठ,
हो. प्रिमियम म्हणून पावडर आहे ती वॉशिंग मशीनमधे वापरू शकता.
पतंजलीच्या आतापर्यंत
पतंजलीच्या आतापर्यंत वापरलेल्या सर्व वस्तू चांगल्या आहेत. गोड बिस्किटं आवडली नाहीत कारण त्यांना मधाचा वास आहे. पण चवीला चांगली आहेत. केश कांती मला सूट झाला नाही, च्यवन प्राश चांगले आहे.
इंट्रेस्टिंग ! बरीच उत्पादन
इंट्रेस्टिंग ! बरीच उत्पादन चांगली आहेत असे दिसते. आमच्याकडेही ह्यातील अनेक उत्पादन येतात. बिस्किटं, तेल, शॅम्पू आणि काय काय .
फ्रंट लोडींगला साधी पावडरपण वापरता येते. आम्ही खूप वर्ष वापरत आहोत. (पतंजलीची नाही, रेग्युलर सर्फ टाईप)
--
पूर्वी मायबोलीवरपण काही लोकांनी रामदेवबाबा / पंतजली प्रोडक्टची यथेच्छ टिंगल केली होती. अर्थात त्यांनी वापरल्याशी शक्यता कमीच दिसते. कदाचित विरोधी प्रचाराचे ते बळी असावेत असे आता समजता येईल बहुतेक.
Pages