पतंजलीची प्रोडक्टस

Submitted by फेबु on 13 August, 2014 - 15:07

रामदेव बाबा यांची पतंजली ची प्रोडक्ट ऑनलाईन मागवता येतात का?असतील तर कुठून मागवता येतील?
पतंजली ची कुठली प्रोडक्टस चांगली आहेत ?तुम्ही वापरता का?अन आपला अनुभव काय आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दन्तकान्ती पेक्षा डाबर चा "डाबर रेड" वापरा. बेश्ट आहे. पण सवय व्हायला वेळ लागेल, तिखट आहे >>>>>>+१

आंवला सरस आणले आहे, सकाळी कोमट पाण्यातून घेते, केसगळतीवर ऊपाय म्हणून. फरक नाही जाणवला काही.

दण्तकांतीमुळे दातदुखीवर आराम मिळतो हा स्वानुभव. डेण्टिस्टकडे जायचा मुहुर्त मिळेपर्यंत सध्या तिच्याच जीवावर तग धरलाय.

काल केशकांती (एलोवीरा) शॅम्पू पहिल्यांदा वापरला. केस ड्राय झाल्यासारखे वाटले. कंडीशनरही संपलेला. नेहमी पॅन्टीन शॅम्पू कण्डीशनर वापरतो. पण संपला नसता तरी पतंजलीच्या शॅम्पूवर पॅन्टीनचे कंडीशनर चालते का या शंकेने कदाचित लावले नसते.

https://indianexpress.com/article/india/ramdev-ayurvedic-corona-kit-no-g...
पतंजलीने कोरोनावर म्हणून एक औषध बाजारात आणले आहे. परवानगी घेताना ते सर्दी खोकल्यासाठी आहे असं सांगुन जाहिरात मात्र कोरोनाबद्दल केली. आयुष मंत्रालयाने त्यांना अशं नाई कलायचं असं समजावलं.

आता कळतंय की औषधा चं ट ट्रायल फक्त लक्षणे नसणार्‍या किंवा सौम्य लक्षणे असणार्‍यांवरच घेतलं होतं. गंभीर लक्षणे, श्वसनसंस्थेचे गंभीर आजार असणार्‍यांना वगळलं होतं. राजस्थानमधल्या एका इस्पितळात दाखल झालेल्या रुग्णांवर याची चाच णी केल्याचा दावा केला आहे. तिथे रुग्णांना अ‍ॅलोपथीची औषधे दिली जात होती.

राजस्थान सरकारपाठोपाठ पतंजलीच्या कोरोनिलला महाराष्ट्रातही झटका लागला आहे. पतंजलीच्या कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सनं क्लिनिकल ट्रायल घेतली का याची माहिती घेण्यात येईल असं सांगतानाच देशमुख यांनी नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही असं स्पष्ट केलं आहे.

असं करायला नको होतं त्यांनी.
नुसतं इम्युनिटी बूस्टर म्हणून विकलं असतं तरी खपलं असतं औषध.
पतंजली ची काही प्रोडक्ट मी वापरते, मला आवडतात आणि आतापर्यंत सूट होतात.
पण सध्या जे काही चालू आहे ते मात्र आवडत नाहीये.प्रसिद्धी आणि पैश्याचा मोह एका चांगल्या उद्देशाने चालू झालेल्या चेन ला बरबटत जातो.

मोदीजी आणि पतंजलीजी 2 जी आरोप जनतरमन्तरपासून जवळचे मित्र आहेत ( ज्याबद्दल नंतर कोर्ट बोलले की 2 जी आरोप हे ह्यांना झालेले भास होते म्हणून )

दोघे किती खरे बोलतात हे दोघांनाही माहीत आहे Proud

म्हणूनच सकाळी पतंजली ने औषधची जाहिरात लावली ,
आणि मोदीजीनी संध्याकाळी ती तात्काळ बंद केली.

याच धाग्यावर दुसऱ्या पानावर रामुने इबोलाचे औषध शोधलं होतं म्हणे त्याची चर्चा आहे. अर्थातच पतंजलीची ती लिंक आता काम करत नाहीये. आता कोरोनावर शोधलं आहे, उद्या दुसरी कोणती साथ आली तरी त्याचाही फॉर्मुला तयारच असेल. आपल्या देशात शासकांची छत्रछाया असेल तर काहीही खपून नेता येते. एवढं मोठं धाडस देशात दुसऱ्या कोणाला का करता येत नाही याचा पण जरूर विचार करावा. ज्यांना आपल्या आणि आपल्या जवळच्या लोकांच्या गात्रांची काळजी असेल त्यांनी पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांना चुकूनही हात लावू नये. त्यांची बाकीची वाण-सामानाची जिन्नसे जरूर वापरून पहा पण औषधांपासून फर्लांगभर लांब रहा.
अशीही आपल्याकडील बहुसंख्य पब्लिक "चु"' आहेच, बनवणारेही मुबलक आहेत. सोमीवर त्या औषधाची भलामण करणारे लोक पाहिल्यावर पुरेपूर प्रचिती येते. असो,आपुनको क्या? लालाजीके धंदे का टाइम है अभी !

म्हणूनच वाईट वाटतं.त्यांची किराणा, स्वच्छता प्रॉडक्ट आवडीने वापरणारे बरेच आहेत.त्यावर धंदा चालतो.
करोना चे औषध, इबोला चे औषध या गिमिक ची गरज नाही.
स्वाइन फ्लू च्या वेळी गिलोय 'स्वाइन फ्लू वरचे भरोसेमंद औषध' म्हणून विकले नव्हते.तरी गिलोय, तांबे निर्मित टेंडरनेस धूप हे सर्व जोरदार विकले गेले होते.
साधे सरळ इम्युनिटी बूस्टर म्हणून विकावे.योग्य चाचण्या करून.

Modern रासायनिक औषधांचा शोध किंवा वापर पण pandemic च्या काळातच लागलेला आहे. आपण गुलामगीरीत होतो त्यामुळे आपल वैद्यकशास्त्र पूर्णपणे नामशेष झालेलं आहे Sad प्रत्येक रासायनिक औषधाचे side इफेक्ट्स असतात. साधं खोकल्याच औषध खाऊन झोप येते तेच ज्येष्ठमध चघळत बसलं तर काही side effect नाही पण खोकला मात्र बरा होतो.

कोणतेही औषध हे "रसायनाच" असते,
नको तेव्हा नको तितक्या प्रमाणात कोणतेही रसायन घेतलेत तर त्रास होणारच.
आयुर्वेदिक औषधात असणारी रसायने शुद्ध स्वरूपात आणि कॉनसन्ट्रॅटेड स्वरूपात मॉडर्न मेडिसिन मध्ये वापरली गेली आहेत. ज्येष्ठमध सुद्धा त्याचेच उदाहरण.

Without proper consultation, overdosage of mulethi powder may cause bloating or water retention in the body by reducing potassium and spiking sodium levels in the body. Excessive intake of this powder can even lead to hypermineralocorticoidism, which in turn causes moderate hypertension and hypertensive encephalopathy.

It is strictly advised not to take mulethi powder during pregnancy or breastfeeding without doctor’s knowledge as it can cause preterm delivery in pregnant women and can lead to abnormal allergic effects in the new-born baby as the medicine may get secreted through breast milk.

https://m.netmeds.com/health-library/post/mulethilicorice-powder-benefit...

त्यामुळे कोणत्याही औषधाला साइडइफेक्ट नाही असे सर्टिफिकेट देण्याची घाई करू नये.

liquorice side effects
असं शोधलं तर आणखी छान छान दुष्परिणाम वाचायला मिळतील

ज्येष्ठमध चघळून कोणाला दुष्परिणाम झालाय असं माझ्या तरी बघण्यात नाही. घरातलं ज्येष्ठमध संपलं असेल तर डॉक्टर कडे जाऊन खोकल्याच औषध आणावं लागलं तर त्यांनी लिहून दिलेला controlled dose घेऊन सुद्धा मी गाढ झोपते नाहीतर आळस वाटत राहतो.

घरातलं ज्येष्ठमध संपलं असेल तर>> छे. असे काही डॉक कडे जायचे मग पुन्हा मेडिकलची पायरी चढायची शिवाय दामदुप्पट खर्च. बरे इतके करून झोप येणार आणि आळसही. त्यापेक्षा नव्याने ज्येष्ठ मध घेणे कितीसे खर्चिक, त्रासदायक असावे? उगीच Modern रासायनिक औषधांचा सोस बरा नव्हे.

Simba plus one. At molecular level all are chemicals only. They may be plant based or artificially produced. Liquorice extract is widely used in pharma/ food products. In small qty though.

नव्याने ज्येष्ठ मध घेणे कितीसे खर्चिक, त्रासदायक असावे - इथे ज्येष्ठमधाला काय म्हणतात माहीत नाही. Courier नी मागवायला किमतीपेक्षा जास्त खर्च कुरियर चा. स्टॉक संपला की जावं लागतं Sad तसेच throat infection असेल तर antibiotics बरोबर खोकल्याच औषध पण लिहून देतात.

Thank you, मानव आणि वावे Happy
किती जणांना विचारलं असेल! शेवटी नाद सोडला Sad मी काय म्हणते ते त्यांना कळत सुद्धा नव्हते आणि कदाचित मला नीट सांगता येत नव्हते.

Civilization & culture जर कुंठित किंवा stagnant झाले तर ते गढूळ पाणी उपसून काढून पूर्ण झाडाझडती घेऊन सतत वाहाते, शुद्ध आणि उपयोगी राखावे लागते. यासाठी सततचे retrospection जरुरीचे असते.

Pages