काल आमचे लाईट बिल आले
फक्त रुपये २१ हजार ७५० फक्त
- वाशी, नवी मुंबई
आज सकाळीच आंघोळ करून तक्रार करायला गेलो.
तर हि भली मोठी रांग !
सोशल डिस्टंसिंगच्या आईशीची तैशी...
तक्रारीची रांग वेगळी आहे का बघायला पुढे गेलो. तर आत गेलेली एक बाई बडबडत बाहेर आली...
"काही फायदा नाही रांगेत उभा राहायचा. जे आलेय ते बिल आधी भरा मग आम्ही ॲडजस्ट करू असे म्हणताहेत"
हे ऐकून रांगेतल्या एका बाईच्या अंगतले त्राणच गेले. तिने तिथेच बसकन मारली. म्हणाली, कुठून भरू? साठ हजार रुपये बिल आलेय...
मला माझे दुख छोटे वाटू लागले. तिच्याबद्दल तितकेच वाईट.
जर तिचे उत्पन्नच नसेल तितके तर कुठून भरणार या आर्थिक चनचनीच्या काळात ईतके बिल?? कर्ज काढावे का आता??
माझीही अडचण अशी झालीय की हे भाड्याचे घर आहे आणि पुढच्या महिन्यात घर बदलतोय. त्यामुळे आता जास्तीचे पैसे भरण्यात काहीच अर्थ नाही. मुळात लॉकडाऊनमुळे अडकल्याने होम लोन आणि घरभाडे एकत्र जात असल्याने पैश्याचीही बोंबच आहे.
माझ्या बिलावर एक नजर टाकता असे आढळले,
गेले दोन महिने जे सरासरी बिल येत होते, पाच पाच हजार जे आम्ही वेळेवर भरले होते. त्याचा या बिलात काही हिशोब नव्हता.
त्यानंतर तीन महिन्याचे युनिट एकत्र काढलेत ते जरा जास्त वाटत आहेत.
तसेच ते एका महिन्याच्या बिलपद्धतीनुसार आकारले आहेत.
म्हणजे पहिले १०० युनिट ३ रुपये ३००-५०० युनिट ७ रुपये नंतर १०-१२ रुपये... वगैरे वगैरे.. असे तीन महिन्यांचे तीनदा झाले पाहिजे होते. पण एकत्रच आकारणी केल्याने ५०० युनिटनंतरचे सारे १०-१२ रुपयांनी कॅलक्युलेट केले होते.
आता ज्या बाईचे ६० हजार बिल आले तिचे काय केले देवासच ठाऊक. याचा अर्थ नुसते ईतकेच नाही तर आणखीही भले मोठे गोंधळ घातले आहेत.
आधीच कोरोना, लॉकडाऊन, वाढती महागाई. घटलेले वा थांबलेले उत्पन्न त्यात हा वीज कंपनीचाच तडाखा!
काय करावे सामान्य माणसांनी?
आता ईथले स्थानिक लोकं नगरसेवक आमदार खासदार मंत्रीसंत्री यांच्याकडे धाव घेण्याची चर्चा करत होते. शक्य तितके मी सुद्धा त्यांच्यात सामील होईन. पण ठरवलेय की बिल मात्र भरणार नाही. बघूया लाईट कापायला आले की असा पवित्रा घ्यायचा विचार करतोय.
आपल्याकडे काय स्थिती आहे? अशीच असेल तर आपण काय करणार आहात?
हो, आजच ऑफिसमध्ये ही चर्चा
हो, आजच ऑफिसमध्ये ही चर्चा झाली...माझ्या एका मैत्रिणीला जून चे ५०००/- लाईट बिल आहे...नेहमी २२०/- ते २५०/- दरम्यान असते. मार्च, एप्रिल , मे च लाईट बिल तीने वेळेवर ऑनलाईन भरल होत..तक्रार करायला गेल्यावर तिलाही तेच सांगितलं की आधी हे बिल भरा मग पुढच्या बिलात adjust karato.
Mseb नी msg cha dhadaka लावला
Mseb नी msg cha dhadaka लावला होता .
तुम्ही च तुमचे रीडिंग घ्या आणि आम्हाला पाठवा.
लॉक down mule karmchari reading sathi येवू शकत नाही.
https://www.sakaltimes.com
https://www.sakaltimes.com/pune/pune-msedcl-provides-power-bill-breakup-...
If U have received high
If U have received high consumption bill Or High amount Bill please visit below Link.....& Check your all Bill details.
https://billcal.mahadiscom.in/consumerbill/
ह्यात तुमचे ३ महिन्याचे बिल
ह्यात तुमचे ३ महिन्याचे बिल पुर्ण दिलेले आहे. मागची बिल adjust केलेली आहेत.
ह्यात तुमचे ३ महिन्याचे बिल
ह्यात तुमचे ३ महिन्याचे बिल पुर्ण दिलेले आहे. मागची बिल adjust केलेली आहेत.
मी तीनही महिन्यात रिडींग घेऊन
मी तीनही महिन्यात रिडींग घेऊन पाठवले होते व माझे बिल रीडिंग इतकेच आले आहे. वीज मंडळ एसेमेस पाठवत होते की रिडींग पाठवा म्हणून.
बाकी वीज मंडळाचा एकूण कारभार आधीच उल्हास असा आहेच, त्यात आता बघायला नकोच...
इथे फक्त वीज बिलाबद्दल
इथे फक्त वीज बिलाबद्दल लिहायचे का. आमचा MTNL landline चार महिने झाले बंद आहे. दर महिन्याला शिस्तीत बँकेतून आपोआप वळते होतात बिलाचे पैसे. बँकेला सांगितले पैसे देऊ नका तर बँक म्हणते आम्ही तसे करु शकत नाही. जवळचे mtnl ऑफिस आग लागल्यामुळे बंद आहे. विलेपार्ले येथे हलवले आहे असे चौकीदार म्हणाला. गूगल वर पार्ले येथील नंबर कोणी उचलत नाही. आता पैसे भरत राहावे की पार्ले येथे जाऊन यावे या विचारात आहे.
बाकी MTNL चा बिनलाजेपणाचा अनुभव आधी इंटरनेट घेतले होते तेव्हा आला होता. इंटरनेट त्यांच्याकडून बंद असूनही सगळ्यांकडून प्लॅनप्रमाणे पैसे घेत होते.
बँक पेमेंट स्टॉप करू शकते.
बँक पेमेंट स्टॉप करू शकते. त्यांना पत्र द्या.
ECS आहे आणि बँक म्हणते तुम्ही
ECS आहे आणि बँक म्हणते तुम्ही MTNL ला सांगा. त्या अकाउंट मधून गॅसचे बिल पण जाते आणि एका बँकेचे व्याज येते. हे सर्व दुसरीकडे हलवून अकॉउंट बंद करावे लागेल किंवा MTNL गाठावे लागेल. MTNL चे काम एका फेरीत झाले तर बरे.
Ecs बँकेला बंद करता आलं
Ecs बँकेला बंद करता आलं पाहिजे. माझ्या इन्शुरन्स साठी मी केलेलं.
https://maharashtratimes.com
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/electricity-bills-a...
एम टी एन एल चा गेल्या
एम टी एन एल चा गेल्या वर्षभरात असाच अनुभव आहे. आमच्या भागातले काही फोन महिनोनमहिने डेड आहेत. / होते. केबल फॉल्ट असं सांगितलं जात होतं. रजिस्टर केलेली कंप्लेंट रिझॉल्व्ड म्हणून दाखवतात. बिलात सूट मिळत नाही.
पुणे MSEB : ECS असेल तर
पुणे MSEB : ECS असेल तर MESB नी एप्रिल मध्ये bill चे पैसे बॅकेतुन घेतले नाहीत. म्हणुन मे मध्ये बिल आले तेव्हा एप्रिल आणि मे चे पैसे बिल आल्यावर लगेच भरले. त्यानंतर due date ला MESB नी एप्रिल आणि मे च्या बिल चे पैसे बॅकेतुन काढुन घेतले. यात मे महिन्याच्या बिलात एप्रिल चे बिल पण आहे. (एप्रिल चे पैसे दोनदा गेले) मे महिन्यात एकंदरीत ५ महिन्याचे बिल गेले. जर हे सगले पैसे क्रेडिट केले तर ठिक आहे नाहितर MSEB च्या चकरा आहेत.
स्थानिक नगरसेवकाला गाठा. सोबत
स्थानिक नगरसेवकाला गाठा. सोबत हाच इश्शू असलेले इतर कोणी लोक असतील तर एकत्र जा. लेखी निवेदन द्या.
याबाबत ग्राहक पंचायती मार्फत
याबाबत ग्राहक पंचायती मार्फत एकत्र येवून पाठपुरावा करता येइल का हे देखील बघावे.
>ECS आहे आणि बँक म्हणते
>ECS आहे आणि बँक म्हणते तुम्ही MTNL ला सांगा.
इथे जर अकाऊंटमध्ये पुरेसा बॅलन्स ठेवला नाही तर काय होईल?
म्हणजे ह्या महिन्याचे बिल गेले आहे पण पुढच्या वेळी असे होऊ नये ह्यासाठी क्लिअरिंग डेटच्या अगोदरच पैसे दुसर्या अकाऊंटमध्ये ट्रान्स्फर केले तर?
नगरसेवकाला गाठायचे ठरवायला
नगरसेवकाला गाठायचे ठरवायला हवे. नाहीतर फायदा काय त्यांचा. मुंबईत असतो तर वडिलांनीच कोणाकोणाला पकडले असते. ईथले समदुखी कोणाला गाठताहेत हे बघायला हवे आणि त्यांच्यासोबत जायला हवे.
हे ग्राहक पंचायत मार्फत कसे जायचे काही आयड्या? ऑनलाईन मेलबाजी करता येते का त्यांना? प्लीज कोणाकडे काही लिंक असेल तर द्या ना..
वीज मंडळ एसेमेस पाठवत होते की
वीज मंडळ एसेमेस पाठवत होते की रिडींग पाठवा म्हणून.
>>>>
अन्यथा ते सरासरी बिल पाठवणार होते.
ते त्यांनी पाठवले. आणि आम्ही भरले.
पण आता रीडींग घेऊन बिल पाठवताना स्वताच आधी पाठवलेल्या बिलांचा हिशोब स्वतालाच नाही का करता येत. आणि युनिट आकारणी करताना तीन महिन्यांची एकत्र न करता ते युनिट तीन तुकड्यात विभागून नाही का करता येत.
म्हणजे सगळा डेटा तुमच्या सिस्टमवर फिड आहे. तरीही उगाच गोंधळ घालून मग नंतर तो निस्तरत बसायला काय अर्थ आहे?
या अश्या गलथान कारभाराला पाठीशी घालता कामा नये. उद्या यातून आत्महत्येचे प्रकरण झाले तर कोण जबाबदार. तसेही या देशात जीवाला मानसिक ताणाला किंमत नाहीयेच असे वाटू लागलेय
बिल 3 महिन्यांनी आले असले तरी
बिल 3 महिन्यांनी आले असले तरी ते महिन्या महिन्याचेच केल्क्युलेत झाले असणार
ऑटो सॉफ्ट वेअर मुले दंड , लेट चार्जेस हेही कदाचित आले असणार
हे ग्राहक पंचायत मार्फत कसे
हे ग्राहक पंचायत मार्फत कसे जायचे काही आयड्या? ऑनलाईन मेलबाजी करता येते का त्यांना? प्लीज कोणाकडे काही लिंक असेल तर द्या ना..
Website : www.mumbaigrahakpanchayat.org
E-mail : mpanchayat@gmail.com
---------------------------------------------------------
आमचा MTNL landline चार महिने झाले बंद आहे. दर महिन्याला शिस्तीत बँकेतून आपोआप वळते होतात बिलाचे पैसे. ....
MTNL आणि त्यांचे कर्मचारी हा एखाद्यासाठी Ph.D. करण्याचा विषय होऊ शकतो!!!
काही वर्षांपूर्वी माझ्याकडेही MTNL चे TriBand connection होते. इंटरनेटला स्पीड अजिबात मिळत नसे. अक्षरशः YouTube वरचे video 144p resolution मध्येसुद्धा अडकत अडकत चालायचे. तक्रार केल्यावर त्यांचे महान (!) लाईनमन घरी यायचे, mtnlmumbai.in ही त्यांची वेबसाईट उघडून दाखवायचे आणि इंटरनेट चालू है! असे सांगून तक्रार बंद करून टाकायचे. त्यांच्यासाठी mtnlmumbai.in म्हणजेच संपूर्ण जग!!!
प्रिय ग्राहक, लॉकडाऊन नंतर
प्रिय ग्राहक, लॉकडाऊन नंतर मीटर रिडिंग नुसार दिलेल्या वीज देयकामधील ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महावितरणने ‘https://billcal.mahadiscom.in/consumerbill/’ या लिंकवर देयकाचा सविस्तर तपशील उपलब्ध करून दिला आहे. आपले वीजदेयक वेळेत भरून सहकार्य करा. महावितरण.
YouTube वरचे video 144p
YouTube वरचे video 144p resolution मध्येसुद्धा अडकत अडकत चालायचे. तक्रार केल्यावर त्यांचे महान (!) लाईनमन घरी यायचे, mtnlmumbai.in ही त्यांची वेबसाईट उघडून दाखवायचे आणि इंटरनेट चालू है! असे सांगून तक्रार बंद करून टाकायचे. त्यांच्यासाठी mtnlmumbai.in म्हणजेच संपूर्ण जग!!!
लाईन मन ही जुनी 40 ते 45 च्या पुढची लोक असायची त्यांचे ज्ञान फक्त फोन लाईन पुरतेच.
इंटरनेट विषयी संपूर्ण अज्ञान त्या मुळे कॉन्ट्रॅक्ट basis var navin mule नेमली होती ती लाईन मन बरोबर असायची इंटरनेट च्या तक्रारी सोडवण्यासाठी.
मलाही लॉकडाऊन मध्ये सरासरी
मलाही लॉकडाऊन मध्ये सरासरी बिल भरलेलं असूनही 4000 च्या आसपास बिल आले. तीन महिन्याचे साधारण 630 युनिट्स झालेले आहेत. बिल बघून मलाही धक्का बसला पण बिल बरोबर आहे.
MSEDCL च्या वेबसाईट वर bill calculator आहे. त्यात 630 युनिटसचे बिल 8000 च्या आसपास येते. त्यातून लॉकडाऊन मध्ये भरलेली बिले वजा केली तर 6000 च्या आसपास बिल येते.
पण महिन्याचे सरासरी 210 युनिट्स धरून बिल काढले, तर महिना 2000 च्या आसपास म्हणजे तीन महिन्याचे 6000 येते. त्यातून लॉकडाऊन मध्ये भरलेली बिले वजा केली तर 4000 रुपयेच येतात.
लॉकडाऊन काळात सगळे घरी असल्याने आणिउन्हाळ्यामुळे (दिवसरात्र फॅन चालू वगैरे) सरासरी बिल नेहमीपेक्षा जास्त येऊ शकते.
आज एका वृत्तवाहिनीवर दाखवत
आज एका वृत्तवाहिनीवर दाखवत होते हे प्रचंड वीजबिल प्रकरण. मी पूर्ण बघितली नाही बातमी.
लॉकडाऊन काळात सगळे घरी
लॉकडाऊन काळात सगळे घरी असल्याने आणिउन्हाळ्यामुळे (दिवसरात्र फॅन चालू वगैरे) सरासरी बिल नेहमीपेक्षा जास्त येऊ शकते.
>>>
कित्येकांना बिल काही पटीत आलेय.
आताच एका फेसबूक फ्रेंडची सातपट बिलाची पोस्ट वाचली.
लोकं व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत की हे वीज बिल आलेय की कोरोनाचे हॉस्पिटल बिल आलेय.
साठ हजार बिल घराचे नाही तर एखाद्य छोट्याश्य कंपनीचे येत असावे...
हे प्रकरण जास्त बिलाचे नाही तर काहीच्या काही बिलाचे आहे...
त्यामुळे बिलात घोळ नाही. नेहमीपेक्षा जास्त आले ईतकेच वगैरे हे मुद्दे कृपया चर्चेला घेऊ नका. आणखी त्रास होतोय
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=pj6Z6qzL0U8&feature=youtu.be अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलेले जुन २०२० चे बिल नक्की बघा.
तापसी पन्नू पण चिडली - पोस्ट
तापसी पन्नू पण चिडली - पोस्ट केलाय....
काय पोस्ट केलाय तापसीने?
काय पोस्ट केलाय तापसीने?
जून महिन्यात एप्रिल आणि मे
जून महिन्यात एप्रिल आणि मे च्या तिप्पट युनिटस कंन्झ्युम केल्याचे आलेय. एकही नवीन उपकरण घेतलेले नाही की एप्रिल/मे पेक्षा उन्हाळा अति वाढलेला नाही. जून महिन्यात सलग बराच वेळ लाइट जाणेही भरपूर झालेय.
सरासरी काढताना फक्त बेरीजच करायची नसते, भागाकारही काढायचा असतो हे शिकवले नाहीये का वीजमंडळाच्या कर्मचार्यांना?
फक्त युनिट तिप्पट आले असले तरी बिलातला फरक नेहमीपेक्षा २५०-३०० जास्त इतकाच आहे. तेवढ्यासाठी मी वीजमंडळाच्या हपिसाचे खेटे घालणार नाही. ते वाचवण्यासाठी गर्दीत जाऊन करोना घेऊन घरी येण्यापेक्षा ते गेलेले बरे.
सोसायटीमधे अनेकांना वाट्टेल ते बिल आलेच आहे.
Pages