Submitted by मामी on 13 May, 2020 - 00:42
दुसर्या एका धाग्यावर विषय निघाला तेव्हा या विषयावर अनेक सुंदर व्हिडिओज, टिव्ही शोज वगैरे आहेत हे लक्षात आलं. या सगळ्यांची इथे नोंद करू.
भारत अथवा भारताबाहेरील विविध प्रेक्षणीय स्थळं, किल्ले, समुद्रकिनारे, प्राचीन शहरं, आधुनिक आणि नेहमीची लाडकी शहरं, म्युझियम्स, नद्या, जंगलं, हॉटेल्स, हटके ठिकाणं आणि हॉटेल्स ...... सर्व काही येऊ द्या.
सध्या काही काळापुरती तरी भटकंती फार फार मर्यादित असेल तर आपण घरीच बसून नेत्रसुख घेऊयात.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फारएन्ड मस्त प्रतिसाद!! पूल
फारएन्ड मस्त प्रतिसाद!! पूल पार करताना नदीचं नाव बघायची सवय मलापण आहे. इथून पहिल्या पहिल्यांदा म्हैसूरला जाताना कावेरी पार करताना छान वाटायचं उगाचच. नवीन नदी आपल्यासाठी म्हणून>>> मला पण! मला प्रवासच आवडतो आणि तोही ट्रेनचा
https://youtu.be/F8cYhngAZfI
https://youtu.be/F8cYhngAZfI
हे गिलगिट बाल्टीस्तान आणि हुंजा दरी यांचा अप्रतिम विडोओ. जरूर पहा. यातला रोपवे ब्रीज खूप डेंजर आणि खूप अंतरावर फळ्या असलेला आहे. अत्यंत निसर्ग रम्य , मी तीन वेळा पाहिला.
अश्विनी के यांच्या चित्रामुळे इथेही शेअर करावा वाटला.
मी अस्मिता खुपच सुंदर व्हीडीओ
मी अस्मिता खुपच सुंदर व्हीडीओ.
धन्यवाद मेघ
धन्यवाद मेघ
हा यलोस्टोन पार्कचा विडिओ यातले गरम पाण्याचे झरे अतिशय सुंदर, अप्रतिम रंग आहेत. शिवाय Back ground music सुद्धा खूप छान आहे. Amazing places on our planet. Truly amazing.
https://youtu.be/2QtdEq2tsh8
नक्की पहा. अद्भुतरम्य आहेत. मी सबस्क्राईब केले आहे कधीच आणि टिव्हीवर बघते 4K असल्याने मजा येते.
<<<बाय द वे मी ट्रान्झअल्पाईन
<<<बाय द वे मी ट्रान्झअल्पाईन ने ख्राइस्टचर्च ते आर्थर्स पास पर्यंत गेलो आहे.<<< लकी बाबा तुम्ही!! खुपच छान आहे तो प्रवास.
बीबीसीची भारतातल्या चार टॉय ट्रेन्सची सिरीज पण मस्त आहे. बीबीसी किंवा DW सारख्या content making industry वाल्यानी बनवलेले विडिओ प्रोफेशनल असतात, त्याला स्क्रिप्ट असते. ट्रेन व्यतिरिक्त माहैती सुद्धा पुरवतात. पण हौशी लोकांचे विडिओ बघायला कंटाळा येतो.
DW चे एक्वेडोर, लॅटिन अमेरिकेचे छान आहेत. दुर्दैवाने अमेरिकेचे विडिओ आम्ही बर्याच आशेने बघायला घेतले. पण खुपच कंटाळवाणे वाटले. त्यतल्या त्यात रॉयल गॉर्ज चा मोटरमनच्या केबिनम्धुन घेतलेला छान आहे.
भारतातला गुवाहाटी-आगरतला एक घाट आहे caccar नावाचा. त्याचे monsoon मधले अनेक विडिओ आहेत. पण सगळे अमॅचुअर कॅटेगरीतले...
इथे Switzerland मधल्या
इथे Switzerland मधल्या Bernina रेल्वे चा एक छोटासाच पण मस्त व्हिडीओ आहे.. https://www.youtube.com/watch?v=1sDPsZ9x1gw
माझ्या सजेशन मध्ये आला हा
धन्यवाद, बघते.
मला रोडट्रीप्स आवडतात, म्हणून
मला रोडट्रीप्स आवडतात, म्हणून सहज सर्च करताना हा सापडला. एकदम साधा माणूस आहे पण व्हीडिओज मोठे आणि इंफॉर्मेटिव्ह असतात.
https://www.youtube.com/user/TravelingRobert/videos
वा! इंटरेस्टिंग विषय ...
वा! इंटरेस्टिंग विषय ...
ट्रॅव्हल-एक्सपी माझंही आवडतं चॅनल आहे. ट्रेनप्रवासही आवडतोच.
फारएण्ड, मस्त प्रतिसाद.
ट्रान्स-अल्पाइन ट्रेनने ख्राइस्टचर्च ते ग्रेमाऊथ प्रवास केला आहे. मस्त, निवांत गाडी आहे ती. आणि एकदम नयनरम्य प्रवास.
तरीही, अर्धा प्रवास खंडाळा घाट आणि उर्वरित प्रवास हिमालयातून, असं फीलिंग आलं मला.
यात कुठलीही चेष्टा किंवा खोचकपणा नाही. खरंखुरं मत.
आपल्याकडचे काही ट्रेनप्रवास खरंच तेवढेच सीनिक आहेत, पण टुरिझमच्या दृष्टीने तशी फार जाहिरात केली जात नाही. शिवाय ट्रेन्सचा अंतर्भाग एकूण प्रवासाच्या अनुभवात खूप भर घालत असतो. त्या ट्रेनसारख्या चकाचक ट्रेन्स आपल्या देशात अजून नाहीत. हा मुख्य भाग आहे. असो.
अमॅझॉन प्राइमवर एक ट्रेनजर्नीची डॉक्युमेंटरी सापडली आहे. (ब्रिटिश रेल्वे जर्नीज) ती वॉचलिस्टमध्ये टाकून ठेवली आहे.
गेल्या वर्षी आम्ही स्कँडिनेव्हिआला जाऊन आलो, तेव्हा शक्य तितके ट्रेन प्रवास करायचे असं ठरवलं होतं. लांब अंतराचे आणि वेळखाऊ प्रवास बाद केले. पण छोटे, छोटे १५-२० ट्रेन प्रवास केले.
ती टूर प्लॅन करताना Rick Steve's Europe या यूट्यूब चॅनलचा उपयोग झाला होता.
नेटफ्लिक्स वर हे सर्व
नेटफ्लिक्स वर हे सर्व अमेरिकेतील नॅशनल पार्क्स पहा.... भन्नाटच The national parks adventure ... it is documentary
अरे वा! मस्त. बघेन नक्कीच.
अरे वा! मस्त. बघेन नक्कीच. रेव्यु, धन्यवाद.
अर्धा प्रवास खंडाळा घाट आणि
अर्धा प्रवास खंडाळा घाट आणि उर्वरित प्रवास हिमालयातून >>> आम्ही गेलो तेव्हा तेथे स्प्रिंग होता पण बर्फ नव्हता त्यामुळे अगदी असे वाटले नाही पण प्रवास एकदम सीनिक आहे.
बाय द वे, साधारण जुलै-ऑगस्ट मधे हलक्या पावसातील खंडाळा घाटातील रेल्वे प्रवास - किंवा एकूणच नेरळ ते लोणावळा प्रवास- हा जगातील सर्वात सीनिक प्रवासांपैकी आहे. फक्त तो कमी गर्दीत आरामात असा क्वचितच करता येतो. गर्दी नको असेल तर एसी चेअर कार मधे आणि तेथे आपण बाजूच्या वातावरणाशी फटकून बंदिस्त जागे असतो. मी पूर्वी अनेकदा संध्याकाळी सिंहगड एक्स्प्रेसने दारात उभे राहून हा प्रवास केलेला आहे.
सध्या हातात चहा घेउन इथे उभे आहात असे समजा
>>> सध्या हातात चहा घेउन इथे
>>> सध्या हातात चहा घेउन इथे उभे आहात असे समजा Happy>>> कसला प्रचंड चढ आहे!!!! फॅन्टॅस्टिक
खंडाळ्याचं महत्त्व मुंबई
खंडाळ्याचं महत्त्व मुंबई ,पश्चिम आणि पूर्व उपनगराच्या उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना जास्तीच असते. आम्ही जातो नेहमी इथे पावसाळ्यात.
मागच्या वर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मधल्या वारी गेलो होतो. डेक्कन एक्सप्रेसने दहाला ( उशिरा पोहोचलो. ) आम्ही धरून फक्त पाच जण उतरले. आता त्या विडिओत दाखवलेल्यापेक्षाही फलाट सुंदर दिसत होते. रंगीत फरशी घातली आहे. शिवाय वळणाचा फलाट. बाहेर पडून मुंबई रोडने तलावापर्यंत चालत गेलो. थोडा पाऊस, गारवा आणि तलावामागच्या डोंगरावर ढगात लपंडाव खेळणारे बंगले असे मस्त दृष्य दिसत होते. तीनचार ओटो तिथे नाक्यावर उभ्या होत्या. राजमाची पॉइंटला जाऊन परत रेल्वे स्टेशनला सोडायचे दीडशे रुपये सांगितले. " किती वेळ थांबणार?"
साडे अकराची पनवेल passenger पकडायची आहे." १२० ला तयार झाला.
"तुम्ही इथलेच?"
"नाही, उ प्रदेशचे. पण आता इथेच राहतो. "
राजमाची पॉईंटला आणि खालच्या घाट रोडला जाऊन परत आलो. फारच आल्हाददायक वातावरण.
खंडाळा स्टेशनला येऊन पळसदरीचे तिकिट काढले आणि फलाटावर गाड्या पाहात होतो. कुठल्यातरी गाडीतून चहावाला उतरला व जागेवरच गरम चहा मिळाला. पनवेल passenger वेळेवर आली आणि पुन्हा पाऊस पाहात पळसदरीला निघालो. गाडीत कुणी नव्हतेच. आणलेला डबा खात खिडकीची मज्जा. साडेबारा ते पावणे दोन पळसदरी धरण, ओढा, मठ पाहून दोनची मुंबई लोकल 'भेटली'.
फारसे हातपाय न हलवता पाऊसपर्यटन रेल्वेमुळे!
सध्या हातात चहा घेउन इथे उभे आहात असे समजा Happy - by फारएण्ड
नै तर काय!!
फारेन्ड, व्हिडिओ मस्त आहे.
फारेन्ड, व्हिडिओ मस्त आहे.
Srd ... फारच मस्त. पळसदरीला अनेकवेळा गेले आहे पण त्यालाही खूप काळ लोटला. शाळेत असताना एक वर्षासहल पळसदरीला केली होती. ती माझी पहिली वर्षासहल होती - त्यावेळी ती संकल्पनाच मला नविन होती. फार मजा आली होती. पळसदरी स्टेशनवरून चालत कुठेतरी जंगलात धबधब्याखाली भिजलो होतो. पाऊस होताच. मग कोणत्यातरी शाळेत कपडे बदलले आणि डाळ भात बटाट्याची भाजी चपाती असं जेवण सगळ्या सहलकर्यांना ओळीत बसवून दिलं होतं. ते जेवण इतकं चविष्ट लागलं त्या दिवशी.
खंडाळा स्टेशनला नाही पण
खंडाळा स्टेशनला नाही पण राजमाची पॉइंटला आता पेड टॉइलेट सुरू आहे. क्याफे आहेच.
आणि माकडांनी हल्ला करून ढापण्यासाठीच मक्याची कणसं.
>>>>>>सध्या हातात चहा घेउन
>>>>>>सध्या हातात चहा घेउन इथे उभे आहात असे समजा<<<<<
मस्त!!
शाळेत भूगोलाच्या पुस्तकात
शाळेत भूगोलाच्या पुस्तकात मॉस्को ते व्ह्लाडिवोस्टॉक अशी ट्रेन आहे आणि त्या प्रवासाला १० दिवस लागतात असे वाचले होते
तेव्हापासून हा प्रवास करायचा हे ठरवले होते. बकेट लिस्टवर टाकले आहे.
ट्रान्ससैबेरीयन रेल्वेने
ट्रान्ससैबेरीयन रेल्वेने प्रवास करायचा आहे.आमच्याही बकेटात आहे.
सध्या मी गुगल मॅप वरच इकडे
सध्या मी गुगल मॅप वरच इकडे तिकडे फिरतोय.
>>>>मॉस्को ते व्ह्लाडिवोस्टॉक
>>>>मॉस्को ते व्ह्लाडिवोस्टॉक अशी ट्रेन आहे आणि त्या प्रवासाला १० दिवस लागतात <<<<
ह्या लॉकडाउनच्या काळात हा प्रवास करुन झाला. मस्त आहे. साधारण १०००० किमीचा प्रवास आहे.
रशियामधे वेगवेगळ्या रेल्वे कंपन्या आहेत. त्यामुळे ह्या १० दिवसात अनेक वेगवेगळ्या कंपनीच्या विभागातून गाडी जाते. आपल्या इकडे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक ईंजिन जाते, कर्मचारी काही ठराविक अंतरावर बदलतात. तिकडे प्रत्येक ठिकाणी पुर्ण ईंजिनच बदलते. ह्या बदलासाठी ३०-४५ मिनिटांचे थांबे असतात. गाडीचा सरासरी वेगही कमी आहे. त्यामुळे दहा दिवस लागतात. त्यांच्या गाडीत आंघोळ करायला शॉवर पण असतो.
त्या नंतर काही इतर रशियाशी संलग्न पूर्व-युरोपातील प्रवासही बघितले. तिथे पण ही ईंजिन बदलण्याची भानगड आहे. एके ठिकाणी तर कहरच होता. एका देशातून दुसर्या देशात जाताना मार्गाचे गेजच बदलले. मग काय त्यानी गाडीचा चाकांचा सेटच बदलला. त्यासाठी ट्रेन यार्डात न्हेली.
>>> ह्या लॉकडाउनच्या काळात हा
>>> ह्या लॉकडाउनच्या काळात हा प्रवास करुन झाला. मस्त आहे. साधारण १०००० किमीचा प्रवास आहे.<<<<
Can you please write in detail about your journey?
Did you do the route through Mongolia or Manchuria (China) or Russia?
Did you stop in the cities on the way? Novosibirsk, Irkutsk?
Lake Baikal is also on my bucket list.
एकूणच नेरळ ते लोणावळा प्रवास-
एकूणच नेरळ ते लोणावळा प्रवास- हा जगातील सर्वात सीनिक प्रवासांपैकी आहे. - फारएण्ड
पण याच्या विरुद्ध सीन असणारा हडपसर -नीरा जेजुरी प्रवासही ( पुणे सातारा मार्गावर) मजेदार वाटतो. झाडे नाहीत. फक्त धोंडे. वळणे घेत गाडी धावते .
>>एकूणच नेरळ ते लोणावळा
>>एकूणच नेरळ ते लोणावळा प्रवास->> धाग्याचे नाव ...परदेशी प्रवास
कुठे लिहिलंय? "धाग्याचे नाव .
कुठे लिहिलंय? "धाग्याचे नाव ...परदेशी प्रवास?"
कुणाला तरी भारत परदेश असेल त्यांच्यासाठी.
भारत अथवा भारताबाहेरील विविध
भारत अथवा भारताबाहेरील विविध प्रेक्षणीय स्थळं, किल्ले, समुद्रकिनारे, प्राचीन शहरं, आधुनिक आणि नेहमीची लाडकी शहरं, म्युझियम्स, नद्या, जंगलं, हॉटेल्स, हटके ठिकाणं आणि हॉटेल्स ...... सर्व काही येऊ द्या. >>>
हे धाग्याच्या माहितीतून.
घरबसल्या भटकंती
घरबसल्या भटकंती
परदेशी प्रवास
29 June, 2020 - 19:33 मामी
56 गंमत केली ... असं मु़ख पृष्ठावर आहे
असं अगदी धाग्याच्या विषयाला
असं अगदी धाग्याच्या विषयाला चिकटून प्रतिसाद लिहावे म्हटले तर कित्येक दोरखंडांचं सुतळ / दोरा होईल.
ग्रुप ओडिअन्स : परदेश प्रवास'मध्ये लेख गेला आहे. तो 'प्रवास भारतातला' असा आणखी धागा लागेल. प्रवास कुठेही 'केलेला/न केलेला /बकेट लिस्टीतला असे तीन प्रकार आणखी लागतील.
बाकी मजा समजली. आणि आमची उडी नेरळ खंडाळा लोणावळा लहानपणी होती. आताही आहे कारण मुंबई ठाणे बोरिवलीसाठी वीकेंड मजा इतक्याच परिघात जमते.
Can you please write in
Can you please write in detail about your journey? ----
२ वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बघितले. एक खास पर्यटकांसाठी असलेली प्रायवेट ट्रेन आणि दुसरी सरकारी सर्वसामान्य प्रवासाची ट्रेन.
प्र्रायवेट ट्रेन https://www.youtube.com/watch?v=1NtdmNVNosA ह्या ट्रेनला मधे मधे थांबे आहेत आणि तिथे पर्यटकांसाठी विशेष कार्यक्रम आहेत.
doc7austin’s DreamlinerCentral ह्या चॅनेलचा १० भागात विभागलेला प्रवास. ह्या माणसाला ट्रेन्सबद्दल खास जिव्हाळा आहे. माझा भाऊ रेल्वेत असल्याने त्यालादेखिल खास जिव्हाळा आहे त्यामुळे हा ट्रेन्सची माहिती देत असलेली आम्हाला आवडली. दुसर्या कुणाला त्याचा कंटाळा येउ शकतो. बरं हा बिलकुल बडबड करीत नाही. जी माहिती द्यायची ती कॅप्शन मधे टाकतो. त्यामुळे देखिल कुणी बोर होउ शकेल. पण ट्रेन बरोबर हा आजुबाजूच्या परिसराची माहितीही देतो.
Did you do the route through Mongolia or Manchuria (China) or Russia?
मंगोलियातून गेलो.
Did you stop in the cities on the way? Novosibirsk, Irkutsk?
Many Irkutsk, Ulan Bator, Novosibirsk, Ekaterinburg, St Peterberg, Moscow, Helsinki were well-known names. Other places we heard first time, so now I don't remember their names.
ट्रान्स सैबेरियन प्रवासावर
ट्रान्स सैबेरियन प्रवासावर याच नावाचा बेन किंग्जले चा चित्रपट आहे. चांगला आहे.
vt220 - आपल्याकडेही प्रवासात इंजिने बदलतात अनेकदा. इलेक्ट्रिक-डिझेल असे बदल तर होतातच. पूर्वी पुणे स्टेशनवर होत - आता दौंडपर्यंत विद्युतीकरण झाल्याने सोलापूर लाइनवरच्या गाड्यांना पुण्यात बदलावे लागत नसेल. तसेच मध्य रेल्वेकडे बहुधा अजूनही विजेच्या इंजिनांची कमतरता असल्याने अनेक गाड्या (उदा: इंद्रायणी) थेट मुंबईहून डिझेल इंजिने लावूनच येतात. पण खूप लांबच्या प्रवासाला मधे इंजिने इतरही कारणांनी बदलतात बहुधा.
Pages