सोप मेकींग

Submitted by अस्मिता. on 14 June, 2020 - 18:30

सोप मेकींग

खूप खूप दिवसापासून मनात होते सोप मेकींग आणि candle मेकींग शिकायचे आणि मुलांनाही शक्यते शिकवायचे. खूप विडीओ पण पाहिले पण सामान आणने झालेच नाही. आणि हे मागे पडत गेले. पण आता घरीच जायबंदी झाल्यामुळे पुन्हा शिकावे वाटले आणि प्रयोग करायचे ठरवले. मुलीलाही खूप उत्साह आहे याबाबत. आमच्या घराजवळ Michaels नावाचे मोठे दुकान आहे. ते छंदीष्ट लोकांचे नंदनवन आहे. मी आणि मुलगी तिथे तासन्तास रमू शकतो. त्यांचे एक कुपनही मिळते अधूनमधून मग ते आम्ही आमच्या छंदाच्या प्रयोगासाठी वापरतो. कधीतरी काही खूप छान बनवतो आणि कधी सगळे वाया जाते किंवा अपेक्षेप्रमाणे बनत नाही. पण ह्या प्रक्रियेत ऐवढी मजा येते की आम्ही पुन्हा पुन्हा काही ना काही करत रहातो/ घेत रहातो. काही माहिती नसताना एकदम पैसे घालून वेगवेगळ्या वस्तू गोळा करण्याऐवजी मला वाटले की मी किट घ्यावे, ज्यात सर्व साबन बनवता येईल. फार काही पर्याय दिसले नाही मग आम्ही एक बेसिक सोप मेकींग किट घेतले. कुपन जोडून ते सोळा डॉलर ऐवजी बारा डॉलरला मिळाले. त्यात सात साबण बनतील असेही लिहिले होते पण प्रत्यक्ष पाचच बनतील असे लक्षात आले.... नाही तर फार पातळ वड्या झाल्या असत्या. शिवाय तीन इसेन्स आणि स्क्रब पावडर एक बिनकामाचा लूफा आला त्यासोबत. त्या तिन्ही इसेन्स पैकी एकाला Mortin चा वास आणि अजून एक विचित्रच वास होता त्यामुळे आम्ही ते बाद केले. शिवाय भाची कडे सुंदर इसेन्शयल oil चा सेट आहे . ती ते वापरूया म्हणाली.
मला सुगंधाचे चक्क वेड आहे त्यामुळे मी उठसुठ तिला "इसेन्शयल ओईल वाढे माय करते" Happy ! मी घेणार आहेच तोपर्यंत वाढे माय Wink ! नवीन नाद लागलाय.

फूड कलर घरात असूनही घर पालथे घालून सुद्धा सापडला नाही. मुलीनं स्वतः च्या क्राफ्ट साठी नेऊन कुठे ठेवला काय माहिती !

तर आम्ही काही चुकले तर एकदम सगळंच वाया जाईल म्हणून सुरवातीला दोनच साबण करायचे असे ठरवले. पण मगं मुलगाही आला आमचा उत्साह बघून ... मुलीने/ आदिश्रीने orange zest आणि orange essence हे दोन्ही वापरले. देवकीने/भाचीने गुलाबाच्या पाकळ्या आणि rose essence नव्हते म्हणून tea tree essence वापरले. आणि मुलाने / निरंजनने lavender essence आणि जांभळ्या रंगासाठी घरात BlackBerry होत्या त्या गरम करून पिळून त्याचा काळसर निळा रंग वापरला.
किटमध्ये एक मोठी वडी होती त्याचे हवे तितकेच तुकडे मायक्रोवेव्हमध्ये साधारण चाळीस सेकंद गरम केले. Box वरच्या सुचनेनुसार वीस सेकंद करायचे होते पण आमची वडी पूर्णपणे वितळली नाही मग पुन्हा ठेवले. पूर्ण पातळ झाल्यावर सोबतच मिळालेल्या मोल्ड मध्ये ओतले. आणि गरम असतानाच हवे ते essential oils आणि रंग, स्क्रब आणि झेस्ट घातले. त्याला उगाच उदबत्तीच्या काडीने ढवळून सारखे केले. सगळ्यात अवघड स्टेप आली मग वाट बघणे Wink , तीस ते चाळीस मिनिटे वाट बघणे. आणि तोपर्यंत मोल्डला हात न लावणे (हे नंतर वाचले आणि खूपदा झाले का नाही बघायला हात लावलाच) .
ते थंड होतच नव्हते आणि मुलगी सारखे "चेक" करत होती म्हणून उचलून फ्रिजमध्ये ठेवले. काही वेळाने तयार झाले त्यावरील सुचनेनुसार मोल्डवर अंगठा दाबून हळूहळू ठोकत काढायचे होते. पण आमचे जबरदस्त गच्च बसले आणि खूप आपटले तरीही निघतच नव्हते. मग बाजूने सुरीने फिरवले पण मुलीला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता. आणि तुकडे पडले असते तर बाबाला Father's Day ला काय देणार हाहि प्रश्न होता. मग आम्ही कुल्फीची आयडिया वापरली व मोल्डवर गरम पाणी सोडले. आणि एकदाच्या साबणा बाहेर आल्या. साबणांची quality खूप खास नाही पण मजा खूप आली. एक वापरून पाहिले , वाईट नाही शिवाय फार कोरडी वाटत नाही त्वचा. पुढच्या वेळी चांगल्या दर्जाचे सामान वापरायचा प्लॅन आहे. एक छंद म्हणून छान आहे आणि उपयुक्त सुद्धा आहे सोप मेकींग.

फोटो स्टेप बाय स्टेप
*
20200611_183648.jpg
*
20200611_183655.jpg
*
20200611_185308.jpg
*
20200611_184233.jpg
*
20200612_112632.jpg

*
20200612_112858.jpg
*
20200612_113223.jpg
*
20200612_130827.jpg
*
20200612_130830.jpg

*
20200612_130843.jpg

*
20200612_141846.jpg

धन्यवाद Happy !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा मस्तच लेख आहे.
साबण सुंदर दिसतायत. ऑरेंज झेस्ट वाला तर छानच वाटेल वापरायला.

डोंबिवलीत सर्वोदय भांडार वाले दुकान आहे(होते, आता माहीत नाही) तिथे बर्याच वर्षं आधीपासूनच साबण आणि भांड्याचा लिक्विड सोप बनवायचे किट मिळायचे.आम्ही तो किट आणि खोबरेल तेल वापरून एक गुलाबी साबण भरपूर प्रमाणात बनवायचो.(फार काही स्किन मऊ करणारा वगैरे नाही पण फेस छान यायचा.)टीपॉल नावाचा निळा भांड्याचा सोप मिळायचा तो खूप महाग होता.मग त्याची बाटली रिकामी झाली की घरी बनवलेला लिक्विड सोप खूप दिवस चालायचा.
सोपं मेकिंग किट आता अमेझॉन वर पण मिळत असतील.

धन्यवाद अन्जूताई Happy ,
धन्यवाद पाथफाईंडर, माझाही तोच मतलब असतो Happy !
धन्यवाद संजीव वाशीकर सहमत, मुलांसाठी खरंच खूप छान आहे. तुम्ही म्हणता तसे cost calculate करून पाहिले , महाग पडलेत पण आनंद मोलाचा आहे, हळूहळू cost effective बनवताही येईल.
धन्यवाद अनु ...नक्कीच टाकणार.
धन्यवाद वेका Happy !
धन्यवाद वावे Happy !
धन्यवाद सायो Happy !
धन्यवाद मिनल Happy !
धन्यवाद अज्ञातवासी Happy ! सुगंधी प्रतिक्रियेबद्दल खास आभार.
धन्यवाद VB Happy !
धन्यवाद धनवन्ती Happy !
धन्यवाद मामी Happy !
धन्यवाद मी चिन्मयी Happy ! खूप मजा आली.
धन्यवाद किल्ली Happy !
धन्यवाद देवकी Happy !
धन्यवाद जुई Happy !
धन्यवाद अमा...मी तुमच्या (आणि बर्याच जणांच्या) प्रतिक्रियेसाठी वाट पाहिली त्या लेखांवर, सोप मेकींग ने आईस ब्रेक झाला म्हणायचा Happy ! तुमचा व्यवसाय माझा स्वप्नातील व्यवसाय आहे. तुम्हाला काही नवीन माहिती असल्यास जरूर सांगत जा ,मला आवडेल. मला अगं तुगं म्हणा प्लीज ! युट्युबवर पण आहेत , धन्यवाद Happy !
धन्यवाद चिन्नु Happy !
धन्यवाद जाई Happy !
धन्यवाद जाई Happy !
धन्यवाद श्रवु Happy !
धन्यवाद कुमार सर Happy !
धन्यवाद चंपा Happy ! फार मोठे नाहीत साधारण मध्यम आहेत.
धन्यवाद योकु Happy ! करणार आहे प्रयोग, गोट मिल्क सोप बेस पण पाहिला मी तर !!
धन्यवाद ऋन्मेष Happy ! अगदी जरूर ट्राय कर . It is a total win -win. मुलांना मजा नाही आली तर माझे नाव बदल Lol !
तुला मुलांना आवडतील असे मिकी /परी वगैरे सिलीकोन मोल्ड मिळतील. Try Amazon.
धन्यवाद अवलताई Happy !
धन्यवाद सनव Happy !
धन्यवाद स्वाती२ Happy !

अनु.....मलाही ते टीपॉल ऐकल्यासारखे वाटते आहे.

डोंबिवलीत सर्वोदय भांडार वाले दुकान आहे(होते, आता माहीत नाही) तिथे बर्याच वर्षं आधीपासूनच साबण आणि भांड्याचा लिक्विड सोप बनवायचे किट मिळायचे.आम्ही तो किट आणि खोबरेल तेल वापरून एक गुलाबी साबण भरपूर प्रमाणात बनवायचो. >>> दुकान कुठलं माहीती नाही, पण long long yr ago आम्ही चाळीतले सर्व पब्लिक असे प्रयोग करायचो म्हणजे आमच्या आया करायच्या, आम्ही बघायचो, माफक मदत करायचो. पाम तेलापासून पण साबण केलेला भांडी घासायचा, किती ढवळावं लागायचं टबात ते आठवतंय. पण त्या साबणाला तो पाम तेलाचा वास यायचा तो नाही आवडायचा. त्यामुळे तो प्रयोग नंतर मागे पडला. पण लिक्विड सोप प्रयोग पुढे केला गेला. नंतर तोही मागे पडला हे आठवतंय.

मुलांना मजा नाही आली तर माझे नाव बदल Lol !
>>>>
सॉरी फार अवांतर... पण अगदीच राहावले नाही म्हणून.. मी माझ्या बायकोचे लग्नाआधीचे नाव (तिच्या मर्जीनुसार) बदलून अस्मिता ठेवले होते. तर कोणाचे तेच नाव कश्याला बदलू Proud
आणि गंमत ईथेच संपत नाही. तुमचा माबो आयडी "मी_अस्मिता" आहे तर तिचा "मी अस्मिता" Happy

मी स्वतः थोडे वर्ष preschool and Montessori teacher होते. मला स्वतःला मुलं आणि असे उद्योग आवडतात. रंग, स्पर्श, रस, गंध या जाणीवा रिफाईन करता येतात आणि Fine motor skills साठी सुद्धा खूप चांगले आहे हे.
सर्वांचे आभार.
ऋन्मेष हो का...आणि माझ्या भावाचे अभि आहे Lol ! तो तुझ्या एवढाच आहे आणि त्याचे मुलही तुझ्या मुलांएवढीच आहेत. त्या आहेत का मायबोली वर, वा...तरीच मला आयडी घेता आला नाही. Happy फारच सारखा आहे की आयडी तर आमचा.
छान आठवण अन्जूताई Happy ! मिळून केल्यावर तर मजा द्विगुणित होते.

अरे वा कित्ती इंटरेस्टिंग आहे ,तुमचं लिखाण खूप विविधता पूर्ण असतं. प्रत्येक वेळी नवीन आणि माहिती पूर्ण असतं. कधी निसर्गावर,कधी मनाचे स्फुट, कधी गाण्यातला कवीच्या मनातल्या भावना सांगणारा,कधी गुरुं बद्दल माहिती सांगणारा असा नवीन नवीन विषय आणि विचार घेऊन येणारा तुमचा लेख असतो.

Kashvi तुम्ही माझे सर्व (एवढूशे) लेख वाचले आहेत, तुमचे विशेष आभार.
सामो धन्यवाद.
हरचंद पालव धन्यवाद. जमले तर करून बघा. तसे वाया काही जात नाही, आणि मजा येते.

Pages