सोप मेकींग

Submitted by अस्मिता. on 14 June, 2020 - 18:30

सोप मेकींग

खूप खूप दिवसापासून मनात होते सोप मेकींग आणि candle मेकींग शिकायचे आणि मुलांनाही शक्यते शिकवायचे. खूप विडीओ पण पाहिले पण सामान आणने झालेच नाही. आणि हे मागे पडत गेले. पण आता घरीच जायबंदी झाल्यामुळे पुन्हा शिकावे वाटले आणि प्रयोग करायचे ठरवले. मुलीलाही खूप उत्साह आहे याबाबत. आमच्या घराजवळ Michaels नावाचे मोठे दुकान आहे. ते छंदीष्ट लोकांचे नंदनवन आहे. मी आणि मुलगी तिथे तासन्तास रमू शकतो. त्यांचे एक कुपनही मिळते अधूनमधून मग ते आम्ही आमच्या छंदाच्या प्रयोगासाठी वापरतो. कधीतरी काही खूप छान बनवतो आणि कधी सगळे वाया जाते किंवा अपेक्षेप्रमाणे बनत नाही. पण ह्या प्रक्रियेत ऐवढी मजा येते की आम्ही पुन्हा पुन्हा काही ना काही करत रहातो/ घेत रहातो. काही माहिती नसताना एकदम पैसे घालून वेगवेगळ्या वस्तू गोळा करण्याऐवजी मला वाटले की मी किट घ्यावे, ज्यात सर्व साबन बनवता येईल. फार काही पर्याय दिसले नाही मग आम्ही एक बेसिक सोप मेकींग किट घेतले. कुपन जोडून ते सोळा डॉलर ऐवजी बारा डॉलरला मिळाले. त्यात सात साबण बनतील असेही लिहिले होते पण प्रत्यक्ष पाचच बनतील असे लक्षात आले.... नाही तर फार पातळ वड्या झाल्या असत्या. शिवाय तीन इसेन्स आणि स्क्रब पावडर एक बिनकामाचा लूफा आला त्यासोबत. त्या तिन्ही इसेन्स पैकी एकाला Mortin चा वास आणि अजून एक विचित्रच वास होता त्यामुळे आम्ही ते बाद केले. शिवाय भाची कडे सुंदर इसेन्शयल oil चा सेट आहे . ती ते वापरूया म्हणाली.
मला सुगंधाचे चक्क वेड आहे त्यामुळे मी उठसुठ तिला "इसेन्शयल ओईल वाढे माय करते" Happy ! मी घेणार आहेच तोपर्यंत वाढे माय Wink ! नवीन नाद लागलाय.

फूड कलर घरात असूनही घर पालथे घालून सुद्धा सापडला नाही. मुलीनं स्वतः च्या क्राफ्ट साठी नेऊन कुठे ठेवला काय माहिती !

तर आम्ही काही चुकले तर एकदम सगळंच वाया जाईल म्हणून सुरवातीला दोनच साबण करायचे असे ठरवले. पण मगं मुलगाही आला आमचा उत्साह बघून ... मुलीने/ आदिश्रीने orange zest आणि orange essence हे दोन्ही वापरले. देवकीने/भाचीने गुलाबाच्या पाकळ्या आणि rose essence नव्हते म्हणून tea tree essence वापरले. आणि मुलाने / निरंजनने lavender essence आणि जांभळ्या रंगासाठी घरात BlackBerry होत्या त्या गरम करून पिळून त्याचा काळसर निळा रंग वापरला.
किटमध्ये एक मोठी वडी होती त्याचे हवे तितकेच तुकडे मायक्रोवेव्हमध्ये साधारण चाळीस सेकंद गरम केले. Box वरच्या सुचनेनुसार वीस सेकंद करायचे होते पण आमची वडी पूर्णपणे वितळली नाही मग पुन्हा ठेवले. पूर्ण पातळ झाल्यावर सोबतच मिळालेल्या मोल्ड मध्ये ओतले. आणि गरम असतानाच हवे ते essential oils आणि रंग, स्क्रब आणि झेस्ट घातले. त्याला उगाच उदबत्तीच्या काडीने ढवळून सारखे केले. सगळ्यात अवघड स्टेप आली मग वाट बघणे Wink , तीस ते चाळीस मिनिटे वाट बघणे. आणि तोपर्यंत मोल्डला हात न लावणे (हे नंतर वाचले आणि खूपदा झाले का नाही बघायला हात लावलाच) .
ते थंड होतच नव्हते आणि मुलगी सारखे "चेक" करत होती म्हणून उचलून फ्रिजमध्ये ठेवले. काही वेळाने तयार झाले त्यावरील सुचनेनुसार मोल्डवर अंगठा दाबून हळूहळू ठोकत काढायचे होते. पण आमचे जबरदस्त गच्च बसले आणि खूप आपटले तरीही निघतच नव्हते. मग बाजूने सुरीने फिरवले पण मुलीला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता. आणि तुकडे पडले असते तर बाबाला Father's Day ला काय देणार हाहि प्रश्न होता. मग आम्ही कुल्फीची आयडिया वापरली व मोल्डवर गरम पाणी सोडले. आणि एकदाच्या साबणा बाहेर आल्या. साबणांची quality खूप खास नाही पण मजा खूप आली. एक वापरून पाहिले , वाईट नाही शिवाय फार कोरडी वाटत नाही त्वचा. पुढच्या वेळी चांगल्या दर्जाचे सामान वापरायचा प्लॅन आहे. एक छंद म्हणून छान आहे आणि उपयुक्त सुद्धा आहे सोप मेकींग.

फोटो स्टेप बाय स्टेप
*
20200611_183648.jpg
*
20200611_183655.jpg
*
20200611_185308.jpg
*
20200611_184233.jpg
*
20200612_112632.jpg

*
20200612_112858.jpg
*
20200612_113223.jpg
*
20200612_130827.jpg
*
20200612_130830.jpg

*
20200612_130843.jpg

*
20200612_141846.jpg

धन्यवाद Happy !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. मलाही हा उद्योग करायचाय एकदा. त्या 5 मिनट क्राफ्ट वर इतके tempting videos असतात की फार मोह होतो हे सगळं करून बघायचा. अजून एक आहे, resin क्राफ्ट, ते पण फार सुंदर दिसतात.

धन्यवाद... beginner साठी किट बेस्ट आहे . करून पहा खूप मजा येते. Happy
आम्ही पण 5 min craft फार बघतो, मुलीमुळे Happy !

झक्कास!!!
साबणाचे काय व्हायचे ते होवो, आपला वेळ आणी आनंद सत्कारणी लागण्याशी मतलब. पुढील उपद्व्यापाला ( Wink ) शुभेच्छा.

खूप सुंदर कल्पना, स्वतः केलेल्या वस्तु मुळे मानसिक आनंद भरपूर मिळतो व बच्चे कंपनी पण नवीन करण्या साठी प्रोत्साहित होतात. लॉक डाऊन मध्ये एक चांगला उपक्रम. फोटो पण खुप छान.

>> झक्कास!!!
साबणाचे काय व्हायचे ते होवो, आपला वेळ आणी आनंद सत्कारणी लागण्याशी मतलब
++++++++
लगे रहो Happy

Bharich

खुपच मस्त. मला तुमच्या आध्यात्मिक लेखांवर काय प्रतिक्रिया द्यायची ते कळत नाही. पण इथे देउ शकते. छान झाले आहेत साबण. आणि त्यासाठी हवे ते चांगले सुगंध उपलब्ध आहेत. माझे कामच ते आहे त्यामुळे एकदम ओळखीचे वाट ले. असेच लिक्विड सोप, हँड वॉश,
बनवता येतील.

पिंटरेस्ट साइट वर सोप मेकिन्ग च्या भरपूर रेसीपी आहेत. व अमेझॉन वर पण किट्स उपलब्ध असतात. करून बघा.

बरेच मोठे आहेत की साबण. मला वाटत होतं अगदी बारकुडे मेडीमिक्स सारखे हॉटेलात मिळतात तसे असतील.
साबण आणि लेख दोन्ही खूप छान.

गंमत म्हणून जसा साबण तयार केलात त्या प्रमाणे तुम्ही केलेल्या साबणाची किँमत देखील काढून त्याची तुलनात्मक ( cost comparison) किंमत बाजारातील साबणाशी केली पाहिजे.

वा मस्त!
हे ५ मिनिट्स क्राफ्ट वाले साबणं तयार करायचे कधीपासनं मनात आहे पण केल्या काही जात नाही हेही तितंकच खरं.
अमेझॉन वर क्लिअर ग्लिसरीन/ प्लेन सोप्स चे बार मिळतात अक्षरशः किलो च्या मापात, इसेंशिअल तेलं तर आहेत म्हणता; पाहा करून प्रयोग. शुभेच्छा! Happy

हायला मी हे पैल्यांदा ऐकतोय आणि पाहतोय. घरच्या घरी साबण बनवा. ते ही दिसायला छान...
.
आपल्याकडे ईथे मुंबईत असे काही किट मिळते का?
दिवाळीला काय ते दरवेळी चकल्या लाडू किल्ला कंदील बनवायचे.. यावेळी साबण बनवायला मजा येईल. पोरांसाठी त्यांच्या आवडीचे शेप्सही करता येतील.

मस्तच ग
तो ऑरेंजझेस्ट वाला सहीये

Pages