©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.
पुढील भाग रविवार दि. १४ जून रोजी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.
भाग ६ - https://www.maayboli.com/node/75016
"मनू मी काय बोलावं असं तुला वाटतय?"
"मला माहिती नाही पर्वणी, पण मला जे बोलायचंय ते बोलून झालंय."
"मी जे बोललेय ना, ते फक्त तुझ्यावर विश्वास ठेवून, आणि त्यात एकही शब्द खोटा नाहीये... तरीही तू मलाच आज कंपनीच्या बाहेर काढायला निघाला आहेस?"
"आता माझं ऐकशील?" मनूचा स्वर आता बदलला.
"हो ऐकतेय ना..."
"एका पुरुषाने माझ्या बायकोवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिची त्या नात्यात फसवणूक झालीये, हे स्पष्ट दिसतंय. आता कित्येक वर्षांनी तो पुरुष तुझ्या समोर येतोय. त्याची तुला सहानुभूती वाटतेय, आणि तू त्याची सेवा करायला त्या गलिच्छ वस्तीत जातेय. ओके? पर्वणी तू किती चुकतेय, तू किती मूर्ख ठरतेय या सगळ्यात हे तुला कळतंय? पण तुझ्यापेक्षा मूर्ख मी आहे, कारण त्याच्यावर तू जितकं प्रेम केलंय ना, त्याच्या कित्येक पटीने मी तुझ्यावर प्रेम केलंय. कळल? आणि हे तुला सांगण्याची गरज नाही. तू कायम म्हणतेस ना, मनू तू खूप बदललाय, कुणामुळे बदललो? मला तू विनाबदल स्वीकारलं असतं?"
मनू थांबला, आणि त्याने पुन्हा बोलायला सुरवात केली.
"मी इतका मूर्ख आहे ना, लग्नाच्या आधीच तुला दोन वचने देऊन ठेवलीत. तुझ्या कुठल्याही निर्णयावर मी कधीही शंका घेणार नाही आणि आपल्या आयुष्याचा अंतिम निर्णय तुझा असेल. एक नवरा म्हणून थोडाफार हक्क असेलही माझा, पण तुझ्यावर तो गाजवण्याची माझी इच्छा नाही.
त्याला भेटण्यापासून मी तुला रोखणार नाही. मी फक्त एवढीच प्रार्थना करतोय, की तू कायम सुखरूप असावी. मात्र, या आंधळ्या मनस्थितीत त्याला बरं वाटावं, म्हणून एखाद्या क्षणी तू आजपर्यंत कमावलेलं सर्वस्व उधळून देशील, ज्याची प्रचंड शक्यता आहे, असं झालं तर मी एक नवरा किंवा एक मित्र म्हणून तुझं हित जपू शकलो नाही, हे कायम टोचत राहीन."
मनू एका दमात सगळं बोलला, आणि त्याने दीर्घ श्वास घेतला.
"माझं सर्वस्व फक्त पैसा नाहीये रे. त्याला माझं सर्वस्व हवंय, पण पैसा नाही. त्याला मी हविये. ते दिलं तर चालेल..."
पर्वणी प्रेतवत थंडपणाने म्हणाली.
...पर्वणीच्या या वाक्याने आता मनू मात्र पूर्णपणे हादरला. त्याचा शांतपणा, थंडपणा कुठल्याकुठे पळून गेला.
"पर्वणी... मी माणूस आहे ना ग? खरंच आहे ना ग माणूस? पर्वणी, मला जीव आहे ग. तू माझा जीव आहेस. मी काय पाप केलंय ना आजपर्यंत, खरंच कळत नाही. कुठली ही शिक्षा मिळतेय मला नाही कळत."
मनूने पुढच्याच क्षणी स्वतःला सावरलं, आणि वज्रवतपणे तो म्हणाला.
"तू जो निर्णय घेशील, तो मला मान्य असेल. नेहमीप्रमाणे. मात्र उद्याच तुला MD पद सोडावं लागेल."
"ओके. थँक्स." पर्वणी म्हणाली, आणि झराझरा आत निघून गेली.
मनू सुन्नपणे बसून राहिला. कितीतरी वेळ...
'ययाती राजा, देवयानीशी लग्न करून कायमचा अतृप्त झालेला. कायम हळूहळू दुःखात, निराशेत बुडालेला...
आम्ही त्रिकोणाच्या दोन बाजू झालो आहोत. सुरुवात सोबत केली, पण आता फक्त दुरावा येतोय. प्रेम असं असतं?
दशरथाने कैकेयीला दोन वचने दिलीत, आणि स्वतःला मरणाच्या दारात आणून सोडलं. माझंही असच होईल?
मनू, पहिला मानव, किंवा माणूस. माणुसकीला आकार देणारा... मात्र आज त्यालाच माणूस म्हणून जगता येऊ नये?'
मनूच्या मनातलं विचारचक्र थांबत नव्हतं. मात्र पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला सावरून वकिलाला फोन केला.
"लेले, झोपलात का?"
"नाही मनूसाहेब. बोला ना?"
"कंपनीच्या MD ने लेटरहेड वर समजा राजीनामा दिला, तर कोण MD होऊ शकत?"
"तश्या तांत्रिक बाबी बऱ्याच आहेत, पण तुमच्या कंपनीचा विचार करायचा झालाच तर या केसमध्ये तुम्ही लगेचच सूत्रे हातात घेऊ शकतात. पण चेयरमन, MD आणि सीइओ पद एकाच माणसाकडे ठेवायला नको, असा सल्ला मी देईन.''
"थँक्स लेले." मनूने फोन कट केला.
मनूने त्यानंतर कितीतरी वेळ स्विमिंग पूलमध्ये घालवला.
इकडे पर्वणीची अवस्था वेगळी नव्हती.
'त्याने मला हेमलकडे जाण्यापासून रोखलं असतं तरी चाललं असतं. तो त्याचा हक्कच होता...
पण आज त्याने माझ्या असहायतेचा वापर मला कंपनीतून बाहेर काढण्यासाठी करावा?
मनू, एक वेडा माणूस, माझ्या प्रेमात वेडा झालेला... एक मला जगातली सगळ्यात चांगली वाटणारी व्यक्ती मनात इतकं विष घेऊन इतकी शांत राहू शकते.
मनू, तू नवरा म्हणून कधीही हक्क गाजवला नाहीस, पण तू नवरा म्हणूनच राहणार नाहीस, याचा मी स्वप्नातही विचार केला नाही.
मी चुकतेय, मी प्रचंड चुकतेय... पण मला जे करायचंय, ते मी करेन. मला जे बरोबर वाटतंय, ते मी करेन. मग मला लोक वेडी म्हटले तरी चालतील.
मनू, आजपर्यंत तू सगळं पर्वणीसाठी केलंस. आज मी तुला हवं ते करेन. कळू तरी दे मला, मी किती उध्वस्त होईल ते... अर्धवट कि पूर्ण?'
विचारांच्या तंद्रीत तिला केव्हा झोप लागली कळलंच नाही.
दुसऱ्या दिवशी ती उठली, तीच मुळी अशक्तपणाने... तिला प्रचंड थकवा जाणवत होता. ती कशीबशी उठली, आणि तिने टेबलावर एक कागद बघितला.
कंपनीचं लेटरहेड!
आणि त्यावर तिचा राजीनामा....
त्याबरोबर तिला एक नोट लावलेली दिसली.
शांतारामबरोबर पाठवणे, ११ च्या आत.
तिला तो कागद फाडून टाकावासा वाटला. ती डोकं गच्चं धरून बसली.
शेवटी तिने स्वतःशीच विचार केला. मनाचा निग्रह करून तिने त्या कागदावर सही केली, आणि तो कागद बाजूला ठेवला व त्याबरोबर एक फोन फिरवला.
"हॅलो नीला."
"हाय परू, कशी आहेस?"
"ओके आहे. आज संध्याकाळी सात वाजता बोलेवार्ड? महत्वाचं बोलायचंय."
"वेट..." तिकडून फोन बाजूला ठेवल्याचा आवाज आला.
"डन. एक मिटिंग होती, पण रिस्केड्युल करता येईल. चालेल."
थँक्स नीला, सी या." पर्वणीने फोन ठेवला.
आणि ती आवरू लागली.
◆◆◆◆
आज सकाळी मनूने सगळ्यांना अर्जंट मिटिंगचा मेल पाठवला होता. किंबहुना बऱ्याच लोकांची दिवसाची सुरुवातच मनूच्या मेलने झाली होती.
आज सकाळी मनू सकाळी आठ वाजताच ऑफिसला पोहोचला.
त्याने आज गाडी पर्वणीसाठी रिजर्व असलेल्या पार्किंगमध्ये लावली...
ऑफिसचा कोपरा आणि कोपरा तो फिरला.
"माय ऑफिस..." तो स्वतःशीच हसला.
ऑफिसला येणारा प्रत्येक माणूस आज मनूला लवकर ऑफिसमध्ये बघून आश्चर्यचकित होत होता.
मनूने मात्र अजूनही लॅपटॉपमधून डोकं काढलं नव्हतं.
सकाळी साडेदहा वाजता शांतारामने पत्र आणलं.
"थँक्स शांताराम." मनू म्हणाला, आणि त्याचक्षणी केबिनच्या बाहेर आला.
"ऑल हेड्स, मिटिंग रूम...." मनू जवळजवळ ओरडलाच.
मनूची ही आज्ञाच होती. सर्व हेड्स अक्षरशः मिटिंग रूममध्ये धावले.
आज पर्वणीच्या चेयरवर मनू बसला होता... बाकी सर्व हेड्स पटापट चेयरवर बसले.
सर्वांच्या चेहऱ्यावर एक तणाव होता. कारण आज मनू प्रचंड आक्रमक दिसत होता.
"काही अपरिहार्य कारणांमुळे मिस पर्वणी ह्या चेयरमन आणि MD पद सोडत आहेत. ती कारणे मला सांगायची गरज वाटत नाही. म्हणून आजपासून मी चेयरमन आणि MD पद सांभाळेन व स्नेहल विल बी युवर न्यू सीईओ. डिसमिस!"
तो सगळ्यांचा आधी उठला, आणि तरातरा निघून गेला.
एका अनपेक्षित धक्क्यातुन सावरल्यासारखे सगळेजण उठले. बरेच जण स्नेहलचं अभिनंदन करू लागले, मात्र तीच फार मोठ्या धक्क्यात होती.
ती सरळ मनूच्या केबिनमध्ये गेली. मनू डोळे मिटून चेयरवर बसला होता.
"बॅड डे, हं?"
मनूने डोळे उघडले.
"हे स्नेहल, कॉंग्रेचुलेशन!" मनू डोळे उघडून स्वतःला सावरत म्हणाला.
"माझं कन्फ्युजन तेच आहे, की मी हॅपी होऊ की नको? कारण हे इतकं अनपेक्षित घडतंय, की मला रियाक्टच करता येत नाहीये. सगळं ठीक आहे ना?"
"येस. येस. पर्वणी जस्ट निड या ब्रेक." मनू उसनं हसू आणत म्हणाला.
"ओके, सो, थँक्स फॉर प्रमोशन. होप इट विल रिफ्लेक्ट इनटू मॉनिटरी अँड अदर थिंग्स टू."
"येस." मनू म्हणाला.
"ओके..." स्नेहल म्हणाली, आणि ती जायला निघाली, मात्र दरवाजाजवळ जाऊन ती मागे वळली.
"मनू, आज संध्याकाळी मी प्रमोशनची पार्टी देतेय. सात वाजता, माय होम. रिक्वेस्ट इफ यू कॅन जॉईन?" तिने जरा चाचरतच विचारले.
"अम्म्म... आय मे हॅव सम अदर..."
"नो,नो... इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड." स्नेहल प्रचंड खजील झाल्यासारखी म्हणाली.
एक अस्वस्थ शांतता पसरली.
"सात वाजता... ओके आय विल बी देअर."
मनू थोडया वेळाने स्नेहलकडे न बघता म्हणाला.
"थँक्स. सी या..." स्नेहल घाईतच बाहेर पडली.
बाहेर पडताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान पसरलं होतं.
क्रमशः
आता राहिलेले भाग वाचले छान
आता राहिलेले भाग वाचले छान चालू आहे आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर पण मिळालं hospitalized होती त्यामुळे लेट रिप्लाय केला.
@सोनाली -
@सोनाली -
धन्यवाद. आणि काळजी घ्या. होप एव्हरीथिंग इज ऑल राईट नाऊ!
पुढील भाग प्रकाशित केला आहे.
पुढील भाग प्रकाशित केला आहे.
Best wishes.Aani mi nakki
Best wishes.Aani mi nakki vachat rahil.
Thanks Nisha.
Thanks Nisha.
Pages