महागुरू सचिन पिळगावकर

Submitted by कटप्पा on 10 June, 2020 - 11:54

एखादी क्षणिक भावना त्या क्षणाचे प्रतिनिधित्व करते पूर्ण आयुष्याचे नाही. हीरा यांनी मी अस्मिता यांच्या स्फुटा बद्धल लिहिलेलं हे वाक्य मला फार आवडले. खरेच किती योग्य विचार मांडला आहे.
काल मी सचिन पिळगावकर यांचा आमची मुंबई हे गाणे पहिल्यांदा पाहिले. नंतर कमेंट्स वाचल्या.

तिरुमला तेल खाऊन इथं हागत जाऊ नको - अशी पहिली कमेंट होती आणि त्याला शेकडो लोकांनी लाईक केला होता. हे बघून मला खरंच आश्चर्य वाटले. महागुरू सचिन यांच्यासारखा चतुरस्त्र कलावंत खरे तर आजच्या जगात सापडणे महाकठीण आहे.
त्यांची दूरदृष्टी, निर्देशन , नृत्य, अभिनय, विनोद सर्वच फार उच्च प्रतीचे आहे.
तो व्हिडीओ सचिनजी नि मैत्रीखातर केला होता आणि त्यांची अट होती व्हिडीओ मध्ये मुली नको मुले हवीत पण निर्देशक च्या कामात ढवळाढवळ करणे त्यांना योग्य वाटले नाही.
त्याच्या एका व्हिडीओ बघून त्याच्या संपूर्ण कारकिर्दी ला - त्या व्यक्तीला असे घालून पाडून बोलणे किती योग्य आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मातब्बर दिग्गज हा शब्द फक्त प्रसिद्ध कलाकार यांच्यासाठी वापरतात का? चांगला डान्सर असेल त्यासाठी हा शब्द वापरू नाही शकत?

तुम्ही तो नच बलिये सीझन पाहिला होता का? जोडीने नाचायचे होते आणि दोघेही नृत्यकुशल असलेली बहुतेक ही एकच जोडी होती.

सचिन सुप्रियाच्या जिंकण्याने मला आनंद झाला होता. मी त्यांना व्होटही दिले होते.

पण त्यांचे प्रतिस्पर्धी दिग्गज मातब्बर कोणत्याही अर्थाने नव्हते.

एकीकडे म्हणताय नृत्यकुशल आहेत म्हणून जिंकले आणि लगेच पुढच्याच वाक्यात म्हणताय बाकी स्पर्धक सो सो होते म्हणून जिंकले. नक्की म्हणायचं काय आहे तुम्हाला? अरे भाई अखिर केहना क्या चाहते हो? Lol

तुम्ही एकदा ठरवा . ते मातब्बर , दिग्गजांना हरवून जिंकले होते का? मग पुढे बोलू. भिंतीवरच्या कोळ्याच्या जाळ्यात फिरायची हौस नाही.

जेव्हा एखादी आई आपल्या बाळाला जगातले सर्वात गोड बाळ बोलते तेव्हा तिच्या मातृत्वावरही असाच आक्षेप घ्याल का?
Submitted by ऋन्मेऽऽष on 13 June, 2020 - 14:49

आईच्या मायेची महती काय वर्णावी?

बकासूराची आई त्याला म्हणू शकेल - बाळ नीट पोटभर जेवलास का? अजून चार घास खा. किती वाळलाय माझा पोरगा!

किंवा कुंभकर्णाची आई त्याला म्हणेल - बाळ नीट झोप झाली की नाही? हवं तर अजून दोन चार आठवडे झोप घे बरं!

याच मायेने तुम्ही जर शाहरुख जगातला सर्वात मोठा सुपर स्टार आहे असं म्हणत असाल तर मग माझा काही आक्षेप नाही.

बायदवे ऋन्मेष सारख्या फॅनची काय अवस्था होते हे दाखवण्याकरताच शाहरुखने फॅन सिनेमा काढला असावा.

तुम्ही एकदा ठरवा . ते मातब्बर , दिग्गजांना हरवून जिंकले होते का? मग पुढे बोलू. भिंतीवरच्या कोळ्याच्या जाळ्यात फिरायची हौस नाही.>>> भरतशेठ माझं वाक्य ठाम आहे की ते मातब्बर दिग्गजांना हरवून जिंकले होते. तुम्ही नक्की काय ते ठरवा, नृत्यकुशल होते म्हणून जिंकले की बाकीचे स्पर्धक सो सो होते म्हणून जिंकले. आणि हो कोळ्याच्या जाळ्यात फक्त कोळी फिरू शकतो. Wink

नच बलीये च्या त्या season मध्ये फार चांगले नर्तक नव्हते आणि वोटिंग साठी सुप्रिया असल्यामुळे पण फायदा झाला

महागुरु च्या चांगल्या अभिनयाची उदाहरणे कोणती आहेत ? त्यांच्यापेक्षा अमोल पालेकर नी नायक म्हणून हिंदी चित्रपटात फार चांगले काम केले आहे पण त्यांची लॉबी नसल्याने तितके कौतुक होत नाही, महागुरूंनी त्यांच्या एकापेक्षा एक या कार्यक्रमात निवेदक पुष्कर कडून जे स्वतःचे कौतुक करवून घेतले त्याला तोड नाही

नच्ह बलियेच्या विजेतेपदानंतर बरेच वाद चालू आहेत वर
सचिनचे वय ४८ होते असे वर वाचले
या वयात आपण असू वा जाऊ तेव्हा किती एनर्जीने नाचू हे बघायला हवे. तो एक नाच करायला आठवडाभर किती प्रॅक्टीस करावी लागते आणि त्यात किती जीव जातो याचा गेले दोन ऑफिस फंक्शनमध्ये स्टेजवर नाचल्यामुळे मी अनुभव घेतला आहे. तेव्हाच मी बायकोला म्हणालेलो की मला माझा फिटनेस किमान ५० वर्षांपर्यंत असा ठेवायचा आहे की स्टेजवर ऑफिस क्राऊड समोर त्यांना बोअर न करता नाचू शकेन. महागुरू सचिन हे त्यादृष्टीने माझ्यासमोरचे एक आदर्श उदाहरण आहेत Happy

एकापेक्षा एक .मध्ये त्यांना ट्रोल कसे करता येईल हेच शोधणारयांनी त्यांच्या नाचाबद्दलच्या कॉमेंटस कधी ऐकल्या आहेत का?

नाही असे असते तर आवडते कलाकार मध्ये सचिन नाव नसते... ते नाव त्याने आयडी घेतल्यापासून आहे. त्याचे जुना धागा देखील आहेत - सचिन , स्वप्नील , सई आणि शाखा बद्धल....
>>>>

हो च्रप्स.
सई स्वप्निल सचिन तिघे आवडीचे. प्रोफाईल बनवल्यापासून ही माहिती आहे. मी या तिघांवर लेख लिहिणार होतो आल्या आल्या. दोघांवर लिहिला. सचिन राहिला होता. कारण तो लेख लिहायला अभ्यासही करावा लागणार होता. ईतके गुण आहेत अंगात.

आत हेपण सांगणं प्राप्त आहे की गांगुली ने नवीन संघाची बांधणी केली. नवीन रणनीतीनं खेळत, यश प्राप्त केलं. त्याच्या संघात निम्म्याहून अधिक खेळाडू नविन होते.
Submitted by फेरफटका on 14 June, 2020 - 02:43

>>>>

सेम पिंच.
सचिननेही कलाकार बदलून वेगळेच म्हणजे मराठीतले तर घेतले. आणि त्या पटकथेला आपल्या दिग्दर्शनाचा टच देऊन चित्रपट अजरामर बनवला.

मेहेनतीबद्दल प्रश्नच नाही पण ते दोघेही सर्वात वयस्कर असल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळाली होती हे नाकारता येत नाही. मराठीतले लोकप्रिय कलाकार असल्यामुळे आणि तो पहिलाच सीजन असल्यामुळे मराठी लोकांनी तरी त्यांनाच वोट दिले असेल. मी नंतरचे सीजन बघितले नाहीत, माझ्यावरून जोखत नाहीये पण पहिला सीजन असल्यामुळे दर्शक संख्याही जास्त असेल. अमृता खानविलकर सारखी स्पर्धक बरोबर असती तर ते नक्कीच जिंकले नसते.

ऋन्मेष, तु म्हट्लस की, दादानं तोच संघ घेतला आणी दादागिरी करत पर्फॉर्मन्स सुधारला. मग मी लिहीलं की गांगुली ने नवीन संघबांधणी केली तर त्याच्याशी पण तू सहमत झालास. एक पे रहना, या तो घोड़ा बोल या चतुर बोल.

ऋन्मेष, तु म्हट्लस की, दादानं तोच संघ घेतला आणी दादागिरी करत पर्फॉर्मन्स सुधारला.
>>>>>
.तोच संघ म्हणजे तेच खेळाडू या अर्थाने नाही तर तोच भारतीय संघ जो आधीच पराभूत मानसिकतेने परदेशात जायचा.

मराठीतले लोकप्रिय कलाकार असल्यामुळे आणि तो पहिलाच सीजन असल्यामुळे मराठी लोकांनी तरी त्यांनाच वोट दिले असेल
>>>>>

तसं असते तर बॉलीवूडचे सुपर्रस्टार खान खन्ना कुमार कपूर नसून जोशी कुलकर्णी सराफ बेर्डे असते..

कृपया खालील प्रवादांचा विचार व्हावा.

स्पर्धेचा विजेता ठरवणे या मागे काही आर्थिक गणिते देखील असतात. परदेशी ब्रॅडला भारतीय सौंदर्य प्रसाधनांची बाजारपेठ काबीज करण्यासाठी दोन दशकांपुर्वी जागतीक सौदर्य स्पर्धेचा निकाल भारताच्या पारड्यात सतत टाकण्यात येत होता.

चॅनेल टिआरपी चा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी त्या भागातील कलाकारांना झुकते माप देण्यात येते. उदा. KBC आणि Indian Idol चे प्रथम विजेते.

हेच ते भयन्कर गाणं Rofl >>>> खरंच काय भयंकर गाणं आहे, संगीत, शब्द, कोरियोग्राफी सगळंच वाईट. म्हाग्रु तर तरुण दिसण्याच्या अट्टहासापायी केविलवाणे वाटायला लागले आहेत. कट्यार काळजात घुसली मध्ये वयानुसार रोल मिळाल्यामुळे खूप चांगले वाटले होते. तिथेही overacting केलीच, पण त्या भूमिकेला शोभून गेलं ते.

पिळगावकरांचा 'लव्ह यु जिंदगी' सिनेमा पाहिला का? वय झालेला माणसाच्या तरुण होण्याच्या अट्टाहासापायी काय काय होतं त्याची कथा आहे. कास्टिंग परफेक्ट होतं म्हणायला हरकत नाही Wink

महागुरूचं अजून एक गाणं आहे दिमाग मे भुसा. हे गाणं त्यांच्या मित्रासाठी गायलंय त्यांनी. 98 डीसलाईक्स आणि 0 लाईक्स आहेत.
गाण्याची लिंक
https://youtu.be/JACgTS8iSgE
रोस्ट लिंक
https://youtu.be/c_10ilHtEYI

सचिन एकेकाळी जेव्हा त्याचे पाय जमिनीवर होते तेव्हा सुसह्य कलाकार आणि दिग्दर्शक होता. तो महागुरु झाला तिथून त्याच्या र्‍हासाला सुरवात झाली. त्यानंतर ते ५० वर्षांची कारकीर्द हे एक पालुपद सुरु झाले. तेव्हापासून आजतागायत तो मला पहा फुले वहा या मोडमध्येच आहे.

राहता राहिला तो शाहरुख खान तर अभिनयक्षमता हा निकष लावायचा झाल्यास आणि अ ते ज्ञ या स्वर-व्यंजनांपैकी अ पासून सुरु केल्यास सचिन साधारण औ किंवा अं या कॅटॅगरीत येईल, शाहरुख खान फारतर ढ किंवा ण, स्वप्निल जोशी फ किंवा ब आणि ती सई ताम्हनकर स किंवा ह कॅटॅगरीमध्ये. तिला ळ किंवा क्ष कॅटॅगरीही देता आली असती पण तिथे संजय कपूर, विजय अरोरा, विश्वजीत, बीना राय, बिपाशा बसू अशी अनेक दिग्गज मंडळी आधीपासून आहेत. शेवटच्या ज्ञ कॅटॅगरीचे अनभिषिक्त सम्राट केवळ आणि केवळ भारत भूषण आणि प्रदीप कुमार हेच असू शकतात त्यामुळे नाईलाज आहे. अर्थात ज्यांनी अभिनेते पाहिलेत त्यांना हे कळेल आणि स्टार पाहून भक्ती केली आहे त्यांना हे बंपर जाईल यात शंका नाही.

आजन्म दुसर्‍या कलाकाराची कॉपी केल्याने माणूस अभिनेता होत नसतो.

भारत भूषण आणि प्रदीप कुमार यांचा अभिनय अर्ध्या लोकांना माहित नसतो पण शिरीष कणेकर ऐकून ऐकून त्यांना ठोकळे म्हणत असतात...

{{{ शेवटच्या ज्ञ कॅटॅगरीचे अनभिषिक्त सम्राट केवळ आणि केवळ भारत भूषण आणि प्रदीप कुमार हेच असू शकतात त्यामुळे नाईलाज आहे. }}}

कमाल आर खान हे नाव ठाऊक आहे काय?

च्रप्स +१.
प्रदीपकुमार, भारतभूषण यांच्या न -अभिनयामुळे कोणताही सिनेमा पाहायचा सोडायची वेळ आली नाही. पण कट्यारमधल्या शेवटच्या जुग लबंदीच्या वेळी डोळे मिटून फक्त ऐकायचं काम केलं. ठोकळे परवडले पण हॅमिंग नको. ही यादी जास्त मोठी आहे.

राहता राहिला तो शाहरुख खान
>>>>
प्याराग्राफची सुरुवातच चुकीची आहे
राहता राहिला..
अहो शाहरूखपासून ईंडस्ट्रीची सुरुवात होते !

शाहरूखचे स्टारडम ईतके अफाट आहे की त्यामुळे त्याच्यातील प्रचंड अभिनय्क्षमताही झाकोळली जाते.
त्यामुळे ज्याला हिरयांच्या राशीतले सोने वेचता येते त्यालाच तो त्याच्या स्टारडमने डोळे दिपवून न घेता बघता येतो Happy

मला नच बलिये पर्यंत सचिन आवडायचा. त्यानंतर एकापेक्षा एक बोअर वाटलं मला, जोडी तुझी माझीचं anchoring आवडलं पण सुप्रिया जास्त आवडली तिथे, तशीही ती मला जास्त आवडते. नंतर सचिन कट्यार मधे आवडला. आता फार हल्ली त्याला बघावं असं वाटत नाही.

पण कट्यारमधल्या शेवटच्या जुग लबंदीच्या वेळी डोळे मिटून फक्त ऐकायचं काम केलं. ठोकळे परवडले पण हॅमिंग नको. ही यादी जास्त मोठी आहे.>>> अगदी अगदी Lol

Pages