एखादी क्षणिक भावना त्या क्षणाचे प्रतिनिधित्व करते पूर्ण आयुष्याचे नाही. हीरा यांनी मी अस्मिता यांच्या स्फुटा बद्धल लिहिलेलं हे वाक्य मला फार आवडले. खरेच किती योग्य विचार मांडला आहे.
काल मी सचिन पिळगावकर यांचा आमची मुंबई हे गाणे पहिल्यांदा पाहिले. नंतर कमेंट्स वाचल्या.
तिरुमला तेल खाऊन इथं हागत जाऊ नको - अशी पहिली कमेंट होती आणि त्याला शेकडो लोकांनी लाईक केला होता. हे बघून मला खरंच आश्चर्य वाटले. महागुरू सचिन यांच्यासारखा चतुरस्त्र कलावंत खरे तर आजच्या जगात सापडणे महाकठीण आहे.
त्यांची दूरदृष्टी, निर्देशन , नृत्य, अभिनय, विनोद सर्वच फार उच्च प्रतीचे आहे.
तो व्हिडीओ सचिनजी नि मैत्रीखातर केला होता आणि त्यांची अट होती व्हिडीओ मध्ये मुली नको मुले हवीत पण निर्देशक च्या कामात ढवळाढवळ करणे त्यांना योग्य वाटले नाही.
त्याच्या एका व्हिडीओ बघून त्याच्या संपूर्ण कारकिर्दी ला - त्या व्यक्तीला असे घालून पाडून बोलणे किती योग्य आहे.
ज्यांनी आयुष्यात स्वतः काही
ज्यांनी आयुष्यात स्वतः काही कमविलेले नसते अशाच व्यक्ती असे trol करत असतात
माझ्याच प्रोफाईलमधून कॉपी
माझ्याच प्रोफाईलमधून कॉपी पेस्ट
आवडते कलाकार/लेखक/कवी:
महागुरू सचिन पिळगावकर, महाराष्ट्राचा सुपर्रस्टार स्वप्निल जोशी, ग्लॅमरस अॅन्ड गॉजिअस मराठी गर्ल सई ताम्हाणकर
विषय संपला !
ईतर जगाला विचारतेय कोण
धन्यवाद ऋन्मेष. हा धागा
धन्यवाद ऋन्मेष. हा धागा माझ्यासाठी इथेच संपला.
मुंबई-पुणे-मुंबई - स्वप्नील
मुंबई-पुणे-मुंबई - स्वप्नील जोशी अति स्वीट वाटला होता. बोअर झालेले मी.
{{{ महागुरू सचिन
{{{ महागुरू सचिन यांच्यासारखा चतुरस्त्र कलावंत खरे तर आजच्या जगात सापडणे महाकठीण आहे.
त्यांची दूरदृष्टी, निर्देशन , नृत्य, अभिनय, विनोद सर्वच फार उच्च प्रतीचे आहे. }}}
जेव्हा तुम्ही गावच्या टेकडीला हिमालय ठरवायला जाता तेव्हा या अतिशयोक्तीला त्याच फोर्सने उत्तर देताना लोक ती टेकडी नसून तो खड्डा कसा आहे यावर प्रतिक्रिया देतात.
{{{ आवडते कलाकार/लेखक/कवी:
महागुरू सचिन पिळगावकर, महाराष्ट्राचा सुपर्रस्टार स्वप्निल जोशी, ग्लॅमरस अॅन्ड गॉजिअस मराठी गर्ल सई ताम्हाणकर
विषय संपला !
ईतर जगाला विचारतेय कोण }}}
हा गर्वच इतर जगाला टोकाच्या हीन प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त करतो. मला जे आवडतं ते जगाने सर्वोत्कृष्टंच म्हणावं या रिशी पकावू छाप अट्टाहासामुळे जगातले उर्वरित बहुसंख्य त्याला नित्कृष्टाच्या खाली ठरवतात. तुम्ही कान आणि डोळे बंद करुन कितीही नाकारलं तरी ते सत्य लपू शकत नाही.
बायदवे ऋन्मेष
तुम्ही तुमच्या प्रोफाइल मध्ये असलेल्या तुमच्या आवडत्या कलावंतांविषयी लिहिलंय त्यावरुन - माझ्या प्रोफाईलमध्ये मी एका जुन्या ज्येष्ठ अभिनेत्याचं छायाचित्र लावलंय पण त्याचं नाव लिहिलं नाही. तो अभिनेता माझा अत्यंत आवडता, आदर्श असा आहे पण इतर सर्वांनीच त्याला द बेस्ट म्हणावं असा माझा आग्रह नाही. ज्यांना तो आवडतो ते त्याचं नुसतं छायाचित्र बघूनही त्याला ओळखतात आणि खूश होतात इतरांना मी पटवण्याचा प्रयत्न करत नाही.
मला डेजावू वाटते आहे
मला डेजावू वाटते आहे
असाच काही धागा रुन्मेष चा काही वर्षांपूर्वी येऊन गेला होता का?
बाकी प्रत्येक कलाकारांची प्रत्येक कलाकृती आयुष्यभर परफेक्ट असेलच असे नाही.
आणि तरीहि कलाकृतीवर काय वाटेल त्या कमेंट करा
कलाकारांवर दिलेली वरची कमेंट एकदम हीन वाटली.
मला जे आवडतं ते जगाने
मला जे आवडतं ते जगाने सर्वोत्कृष्टंच म्हणावं या रिशी पकावू छाप अट्टाहासामुळे
>>>>
यूह आर नॉट गेटींग माय पॉईंट सर
मला जो आवडतो तो मला आवडतो हे माझ्यासाठी पुरेसे आहे.जगाला अवडतो की नाही याच्याशी माझे घेणेदेणे नाही. मी मला आवडणारया व्यक्तीचे कौतुक करताना जगाच्या आवडीनिवडीची पर्वा करणार नाही.
असा त्याचा अर्थ होतो
बाकी टेकडीला हिमालय म्हणताना ते टेकडी आहेत हे तुमचे वैयक्तिक मत झाले. प्रत्यक्षात ते हिमालयच असतील आणि आम्ही हिमालयालाच हिमालय म्हणत असू हि शक्यता तुम्ही लक्षात घेत आहात का? कि तुम्हाला टेकडी वाटली म्हणून ती जगातल्या सर्वांना टेकडीच वाटायला हवी
हा थोडा समान धागा:https://www
हा थोडा समान धागा:
https://www.maayboli.com/node/67335
धन्यवाद ऋन्मेष. हा धागा
धन्यवाद ऋन्मेष. हा धागा माझ्यासाठी इथेच संपला.>>>>
अरेरे.... मी माझे मौलिक योगदान ह्या धाग्यावर(ही) देणार होते(च)..... पण हे तर अगदीच nip in the bud झाले... मूडच गेला आता.
मी अनू येस्स. तो धागा माझाच
मी अनू येस्स. तो धागा माझाच होता.
मला या ॲपवर लिंक देता येत नाही. बरे झाले आपण दिली.
@ साधना
आपण तिथे चर्चा करूया. तो धागा खुला आहे. मी वर काढतो
मला आवडणारया व्यक्तीचे कौतुक
मला आवडणारया व्यक्तीचे कौतुक करताना जगाच्या आवडीनिवडीची पर्वा करणार नाही.
आणि त्या आवडत्या व्यक्तीचे नावही धड लिहण्याचे कष्ट घेववत नाहीत का
ताम्हणकर असे आडनाव आहे तिचे
आणि दवे बाईंना एकदा विचारा की हे गॉजिअस काय असते
आणि तिन्ही मराठी कलाकार असताना त्यांचे कौतुक करणारे इतके इंग्रजी शब्द वापरावे वाटले याबद्दल तर जबरदस्त आदर
चला सुरू होऊ दे पांचट स्पष्टीकरण
ताम्हणकर असे आडनाव आहे तिचे
ताम्हणकर असे आडनाव आहे तिचे
>>>
माझ्यासाठी ती सईच आहे... बदाम बदाम बदाम
आणि तिन्ही मराठी कलाकार
आणि तिन्ही मराठी कलाकार असताना त्यांचे कौतुक करणारे इतके इंग्रजी शब्द वापरावे वाटले याबद्दल तर जबरदस्त आदर
>>>>>
मायबोलीच्या नावातही माय हा ईंग्लिश शब्द वापरला आहे. त्यांनाही सांगा की माझीबोली असे नाव नाही का ठेवता आले असते.
मायबोलीच्या नावातही माय हा
मायबोलीच्या नावातही माय हा ईंग्लिश शब्द वापरला आहे.
मायबोलीतील माय हा इंग्लिश शब्द वाटणार्या पुढे गीता वाचण्यात अर्थ नाही.
मायबोलीतील माय हा इंग्लिश
मायबोलीतील माय हा इंग्लिश शब्द वाटणार्या पुढे गीता वाचण्यात अर्थ नाही.
देन सेव्ह अर्थ
इतकं अगाध ज्ञान असलेल्या
इतकं अगाध ज्ञान असलेल्या व्यक्तीशी आपण बोलू शकतो याबद्दल माझ्या मनात स्वतःबद्दल एक कॉम्प्लेक्स निर्माण झालाय
पांचट स्पष्टीकरण येण्याची
पांचट स्पष्टीकरण येण्याची अपेक्षा होती
पण हे अगदीच म हा गुरू टाईप उत्तर आले
माझ्या मनात स्वतःबद्दल एक
माझ्या मनात स्वतःबद्दल एक कॉम्प्लेक्स निर्माण झालाय
चुकताय तुम्ही, तुम्हाला अभिमान वाटायला हवा, कॉम्प्लेक्स नको, कारण इतक्या अगाध ज्ञान असलेल्या व्यक्तीशी आपण संवाद साधुन आहात. सान्निध्यात राहुन ज्ञानकण वेचत आहात.
आता मायबोलीच्या मायलेकरांनी हिमालयात जाण्याची वेळ झालीय.
आशुचॅम्प, धाग्यावरचे प्रतिसाद
आशुचॅम्प, धाग्यावरचे प्रतिसाद जरा वाढवत होतो
असो, मुळात मराठी कलाकारांचे कौतुक ईंग्लिश विशेषणे लाऊन केल्यास त्यांचा अनादर अवमान अवमूल्य्न वगैरे होते हेच मुळात गंडलेले लॉजिक आहे.
उद्या मला शाहरूखचे कौतुक उर्दुत करायला सांगाल
बाकी एका गोष्टीची गंमत वाटली. ईंग्लिश शब्दांत कौतुक केलेले खटकले. पण हागरू वगैरे शब्द खटकत नाहीत लोकांना. ते ही मराठी कलाकारांबद्दल बोलताना.
मराठीचा अभिमान नुसता शुद्धलेखनातून कामाचा नाही. विचारात आणि वर्तनातून तो दिसायला हवा असे मला वाटते.
असो,
तसेही कलाकार हा भाषा आणि प्रांत यापलीकडे असतो.
कदाचित म्हणूनच हिंदू बहुसंख्य देशात एक मुस्लिम सुपर्रस्टार होऊ शकतो.
राहिला प्रश्न सईच्या आडनावाचा. तर ते ताम्हणकर वा ताम्हाणकर जे काही कानामात्राच्या फरकाने असेल तो फरक आमच्यातील प्रेमाच्या आड येणार नाही याची मला खात्री आहे. या फार क्षुल्लक गोष्टी आहेत हो ज्याचा बाऊ करत आहात.
खरंय जेम्स बॉण्ड
खरंय जेम्स बॉण्ड
पण त्याचा अर्थ माझ्या लेकरांना का हिमालयात जायला सांगता असा लावून हे इथले म्हागृ नवीन धागा काढतील
कोणाच्याही लेकरांना हिमायलात पाठवणे योग्य आहे का इथपासून ते
मुळात हिमालय हा हिमालय आहेच का इथवर प्रश्न पडू शकतात म्हागृना
यांचे ज्ञान कण नाहीयेत थेट पो टाकतात ते
लेटेस्ट पो बघा त्यांच्या ज्ञानाचा
मायबोलीच्या नावातही माय हा
मायबोलीच्या नावातही माय हा ईंग्लिश शब्द वापरला आहे. >>
ओ महाराज. मायबाप, मायमाऊली हे शब्द ऐकले आहेत की नाही.
बाकी धन्य आहात तुम्ही.
मायबाप, मायमाऊली हे शब्द ऐकले
मायबाप, मायमाऊली हे शब्द ऐकले आहेत की नाही.
>>>>
ऐकले आहेत. तेव्हाही ते खटकलेच होते. माझा बाप म्हणायला काय लाजायचे. किंबहुना बाप हिंदी शब्द आहे. माझे वडील म्हणावे
ऋन्मेष तुला माय शब्दाचा अर्थ
ऋन्मेष तुला माय शब्दाचा अर्थ खरंच माहिती नाही, की तू मस्करीत लिहितो आहेस.
माय म्हणजे आई रे. इथे माय म्हणजे my नाहीये.
बाप मराठीत पण म्हणतात रे.
म्हंजे 'माय' या शब्दात किती
म्हंजे 'माय' या शब्दात किती माया आहे ते तुम्हाला समजलेच नाही.
मायबोलीतील माय हा इंग्लिश
मायबोलीतील माय हा इंग्लिश शब्द वाटणार्या पुढे गीता वाचण्यात अर्थ नाही. <<<<<
हाहाहा lol
पण त्याचा अर्थ माझ्या
पण त्याचा अर्थ माझ्या लेकरांना का हिमालयात जायला सांगता असा लावून हे इथले म्हागृ नवीन धागा काढतील
अस असेल तर मी माझा प्रतिसाद विनाशर्त मागे घेतो :((
असो कोणाच्याही कोंबड्याच्या आरवण्याने सकाळ झाल्यासारखं कोणाच्याही प्रतिसादाने काऊंट वाढतोय हे महत्त्वाचे नाही का ?
सध्या काही गोष्टी ते मुद्दाम करत आहेत......अती केलं नी हसु नाही आलं अशातली गत होवु नये म्हणजे मिळवली.
बरं आता आमचं बी ठरलय...
तो नाही का शेक्स पेअर्स सांगुन गेलाय ...नावात काय आहे.
या पुढे सही तांबणकर, फारुक खान, झब्निल मोची सुद्धा चालावे.
विषयाला धरुन चर्चा करतील ते
विषयाला धरुन चर्चा करतील ते ऋन्मेष कुठले?
{{{ तो नाही का शेक्स पेअर्स
{{{ तो नाही का शेक्स पेअर्स सांगुन गेलाय ...नावात काय आहे. }}}
ऋभाऊंच्या शब्दकोशात तो "विल आय अॅम सेक्स फिअर?" या नावाने वावरतो म्हणे...
कृपया विषयांतर करू नका. हा
कृपया विषयांतर करू नका. हा धागा महागुरुंचा होता. ऋन्मेष चा करून सोडलाय
ऋन्मेष तुला माय शब्दाचा अर्थ
ऋन्मेष तुला माय शब्दाचा अर्थ खरंच माहिती नाही, की तू मस्करीत लिहितो आहेस.
>>>>
आमच्या बिल्डींगच्या पहिल्या माळ्यावर म्युन्सिपालटीची मराठी माध्यमाची शाळा होती. रोज घरी ये जा करताना त्या शाळेतूनच जाणे व्हायचे.. मला मायचा अर्थ माहीत नाही हे शक्य तरी आहे का?
Pages