नवऱ्याला वाढदिवसाची भेट म्हणून काय द्यावे ह्यासाठी विविध पर्याय

Submitted by किल्ली on 1 June, 2020 - 12:18

धाग्याची प्रेरणा:
https://www.maayboli.com/node/65034

तर मंडळी आमची anniversary आणि ह्यांच्या (म्हणजे आमचे अहो) वाढदिवसाचा महिना जवळ येतोय.
Gift काय द्यावे ते सुचवा.
दोन occasions असल्याने दोन gifts तयार ठेवावी लागतात. एरवी मी काहीतरी विचार करून जमवते व्यवस्थित पण पुरुष मंडळींना काय द्यावं हा नेहमीच पडणारा प्रश्न आहे.

(बरं विचारायला जावं तर iphone, ipad, ray ban अशी उत्तरे येतात . एवढं माझं बाई budget नाही. )

मुलींना किती काय काय देता येतं ना!

(मलाही फेब्रुवारी महिन्यात २ गिफ्ट्स मिळतात म्हणा1.
It is like जगा आणि जगू द्या)

सध्या वेळ कमी आहे म्हणून पटकन घरी order करता येईल किंवा बनवता येईल असं काहीतरी सुचवा प्लीज Happy

(ह्यापूर्वी पाकीट, घड्याळ, perfume, कपडे,
Goggle वगैरे देऊन झालंय)

महिलावर्गाला कामाला येईल हा धागा..
निदान जास्त पर्याय तरी documented राहतील Happy

प्रतिसादांनुसार काही गोष्टींची यादी इथे देते आहे:

----------------------------------------------------------------------------------
चांगले हेडफोन्स, लंबार सपोर्ट असलेली ऑफिस चेअर, अर्गॉनॉमिक कीबोर्ड आणि माउस, फ्लॅट स्क्रीन मॉनिटर,
फॉर्मल टाय ,
योगा मॅट - डंब बेल्स - रेझिस्टंस बँड्स ,
कॉकटेल शेकर आणि कॉकटेल्स बनवण्याठी लागणारी इतर औजारे, कॉकटेल रेस्पीचे पुस्तक, कॉर्डलेस /किंवा कॉर्डेड पावर ड्रिल,
घरगूती टूल्सचा सेट ( हातोडी , नीडल नोझ प्लायर्स, कटिंग प्लायर्स, अडजस्टेबल रेंच ( स्पॅनर म्हणतात बहुतेक भारतात ) अशा गोष्टी ) , ऑफिससाठी किंवा पर्सनल प्रवासाठी बॅकपॅक, छोटेखानी दुर्बीण , रेन जॅकेट , चांगली फोल्डिंग छत्री,
स्वैपाकाची आवड असेल तर चांगल्या प्रतीच्या सुर्‍या,
लेदर बेल्ट, आवडता पर्फ्यूम, हायकिंग / ट्रेकिंग / कॅम्पिंग चे साहित्य , थंड हवेच्या प्रदेशात रहात /प्रवास करत असल्यास लोकरी स्वेटर्/मफलर्/टोपी , ग्लव्ह्स
-------------------------------------------------------------------------------
किंडल/तत्सम काही ॲप असल्यास ऑनलाईन पुस्तक खरेदी
नेटफ्लिक्स चे ३ महिन्याचे सबस्किप्शन
बाळाची डेस्कवर ठेवायला फोटोफ्रेम
हस्तलिखित कविता, थँक्स गिव्हिंग
------------------------------------
SHoes
Perfume, hot cold thermos, water bottle stainless steel , you can engrave your name and baby Rama's name on it, tie , sport shoes,
Surprise dinner
--------------------------------------
वायरलेस हेडफोन, इयरबड ( स्कलकेन्दी वैगरेचे फार महाग नाहित , एअर पोड , फीटबिट , लेदर ऑफिसबॅग, लेदर जेकेट , टी-शर्टस , आदिदास वैगरे जोगर्स पॅन्ट-टी सेट
--------------------------------------------------------
नावासोबत एखादा छानसा फोटो (दोघांचा/एकट्याचा) प्रिंट केलेला कॉफी मग
Tripod Stand for Mobile Phone
Leather Credit Card Holder/Business card/ATM Card holder 24 card Slots
मोबाईल फोन साठी आकर्षक Case
-----------------------------------------------------
Wristwatch, Bluetooth speakers, MP 3 Player,
आराम करणे आवडत असेल तर किंवा बजेट असेल तर ईझी चेअर,
-------------------------------------------------

जुन्या गाण्यांची आवड असेल तर सारेगामा इ
टाटा/ रेमंड चे उत्तम परफ्युम्स
क्लीन शेव्हींग करत असतील/ आवड असेल तर पूर्ण शेव्हिंग किट (मॅन्युअल/ पॉवर्ड)
वॉलेट वापरत असेल तर ते
गाड्यांची इ. आवड असेल तर टीम-बिएचपी च्या गुडीज (मग्स, कीचेन, कार स्टिकर्स, टीज, हूडीज इ.)
---------------------------------------------------
Wireless headphones/ airpods
3 in 1 printer
Wireless charger
Travel Bluetooth folding key board

Play station
Movies membership cards
Dart boards
Desktop golf

Quick dry/super dry towel ( हे काहीही वाटेल पण जे नियमित फिरणारे असतात त्यांना फार ऊपयोगी ठरतो)
Bed side pockets ( for headphones/ power bank/ books/eye glasses)
Travel bag organizers/ smart pack travel sets
Neck tie travel roll
Cuff links

Knife set/ Swiss knife
Chef’s portable multi tool
Couch arm table
Smart squeeze stress release ball

Stimulating aromatherapy inhalers

Letters to my daughter set
--------------------------------------------------------------------------

वरील पर्याय सुचवल्याबद्दल आभार Happy

--------------------------------------------------------------

ह्याशिवाय आणखी खास भेटवस्तु काय असु शकतात, ह्यासाठी प्रतिसादात उत्तम माहीती आहे, ती माहीती प्रतिसादातच वाचावी Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहे, नवीनच घेतला आहे त्यांनी

माझ्याच हातून तुटला आधीचा त्यांचे घनदाट केस कापताना, नको त्या आठवणी

हो आळंदी देवाची, माझं माहेर आहे ते

वाचनाची आवड आहे का?
किंडल/तत्सम काही ॲप असल्यास ऑनलाईन पुस्तक खरेदी?
नेटफ्लिक्स चे ३ महिन्याचे सबस्किप्शन?

वाचन वगैरे नाही करत फारसा, असे खास छंद नाहीत. हा, क्रिकेट भरपूर आवडतं. अशमयुगातल्या क्रिकेट matches सुद्धा आवडीने पाहतो

Team इंडीया ची जर्सी मागील वर्षी गिफ्ट केली पण इंडिया ने वर्ल्ड कप मध्ये माती खाल्ली Biggrin

तो test match साठी तिकीट काढणार होता ह्या वर्षी Lol
पण ipl ठीक आहे.. good idea
पण आता काय देऊ? काहीतरी tangible हवं ना

क्रिकेट भरपूर आवडतं. अशमयुगातल्या क्रिकेट matches सुद्धा आवडीने पाहतो
>>>>

मोह नसतील म्हणजे या माणसाला फार.. द्याल ते आवडेल या कॅटेगरीत असतील

बाळाची फ्रेम अगदीच आवडेल त्याला.. बघते, धन्यवाद Happy

मोह नसतील म्हणजे या माणसाला फार.. द्याल ते आवडेल या कॅटेगरीत असतील---
हो खरंय Happy I am lucky in that way
पण मला काहीतरी खास करायचंय म्हणून हा धागा प्रपंच

माझं लिखाण, नको रे बाबा
अगदी केविलवाणा चेहरा करून वाचतो तो , कशाला वाढदिवशी त्रास त्याला

चांगले हेडफोन्स, लंबार सपोर्ट असलेली ऑफिस चेअर, अर्गॉनॉमिक कीबोर्ड आणि माउस, फ्लॅट स्क्रीन मॉनिटर, फॉर्मल टाय , योगा मॅट - डंब बेल्स - रेझिस्टंस बँड्स , कॉकटेल शेकर आणि कॉकटेल्स बनवण्याठी लागणारी इतर औजारे, कॉकटेल रेस्पीचे पुस्तक, कॉर्डलेस /किंवा कॉर्डेड पावर ड्रिल, घरगूती टूल्सचा सेट ( हातोडी , नीडल नोझ प्लायर्स, कटिंग प्लायर्स, अडजस्टेबल रेंच ( स्पॅनर म्हणतात बहुतेक भारतात ) अशा गोष्टी ) , ऑफिससाठी किंवा पर्सनल प्रवासाठी बॅकपॅक, छोटेखानी दुर्बीण , रेन जॅकेट , चांगली फोल्डिंग छत्री, स्वैपाकाची आवड असेल तर चांगल्या प्रतीच्या सुर्‍या,
लेदर बेल्ट, आवडता पर्फ्यूम, हायकिंग / ट्रेकिंग / कॅम्पिंग चे साहित्य , थंड हवेच्या प्रदेशात रहात /प्रवास करत असल्यास लोकरी स्वेटर्/मफलर्/टोपी , ग्लव्ह्स ;

मेधा,
छान पर्याय सुचवलेत तुम्ही, पाहते ह्यापैकी काय घेता येईल

मनोज,
ते शक्य नाही Lol

बरीच कारणे आहेत

तेही शक्य नाही, तो त्याच्या प्रिय व्यक्तीला इथे घरात सोडून कुठेही जाणार नाही
( प्रिय व्यक्ती = बाळ , आमची लेक )

मेधा खुप छान गिफ्टस सुचवले आहेत. मला सुध्धा हा प्रश्न नेहमी पडतो काय गिफ्ट द्यायचे ते.
किल्ली फोटो खुप छान आहे. मी आमच्या १२ व्या वाढ्दिवसाला १२ गिफ्ट दिले होते नवर्‍याला. प्रत्येक गिफ्ट ला एक क्लु असलेली चिट्टी वेगवेगळ्या ठिकाणी नवर्‍याला दिसेल अशी ठेवली होती. हे कसे जमवले ते मलाच माहीत ;).
साधारण नवरा स्वतासाठी आवश्यक आहे पण ते घ्यायचे टाळतो ते बघायचे. नक्कीच दोनचार गोष्टी मिळतात. त्या पैकी आपल्याला जमेल ती आणुन द्यायचे.

SHoes जवळपास सर्व पुरुषांना आवडतात, घ्यायचे असतात पण घेत नाहीत तर तो एक पर्याय.
दारू पित असतील तर खरंच एखादी कधी न घेतलेली बाटली द्यायला हरकत नाही. तुम्हीही घेणार असाल तर तुमच्या आवडीची घेतलीत तरी चालेल. Rather घ्याच, नवऱ्याला बायकोने कंपनी देणं यासारखी रोमँटिक गोष्ट कोणतीच नाही!
या शिवाय स्पोर्ट्स मधलं काही देऊ शकता, जे काही तो खेळत असेल ते

क्लु असणाऱ्या चिट्ठ्या आणि ट्रेझर हंट प्रकार बायकांना आवडतात पण पुरुषांना आवडत नाहींत. त्यामुळे हे प्रकार बायकोला गिफ्ट द्यायला मस्त आहेत पण नवऱ्याला नका हा त्रास देऊ.

Perfume, hot cold thermos, water bottle stainless steel , you can engrave your name and baby Rama's name on it, tie , sport shoes,
Surprise dinner Happy
Happy birthday to him!!
आदिश्री

आज तारक मेहतामध्ये अय्यरने जेठालालला दोरी उड्या मारण्याची दोरी भेट दिली मस्त पॅकींग करुन.
बघा तुम्हाला आवडतं का ते. बजेटमध्ये फिटनेसपण राहील तुमच्या 'अहों'चा.

Pages