https://www.maayboli.com/node/74064 - पुढे
ओल्ड monk legend चे २ राउंड्स झाले आणि गप्पांना अधिक रंग चढू लागला.
"नेहमीच काय रे ओल्ड monk? कधीतरी redwine पण आणत जा की." सलोनी कसंनुसं तोंड करीत पेग संपवताना करवादली. आदिती मात्र एन्जॉय करत होती. मल्हार आणि अवि सारखीच तीदेखील म्हाताऱ्या साधूंची एकनिष्ठ भक्त होती. अवि आणि अदितीने मल्हारकडे तुच्छ कटाक्ष टाकताच नेहमीप्रमाणे मल्हारने पहिली काडी टाकली..
"अरे अव्या, ती तुझी "फिर कभी" गझल आठवतेय का तुला?
"कोणती?" चपापुन जाऊन अविने मल्हार कडे आर्जवाची याचना करणारी नजर टाकली.
"अरे ती नाही का, आंगनमें आना फिर कभी, दिवे लावणा फिर कभी" अरविंदाच्या आर्जवी नजरेकडे साफ दुर्लक्ष करत मल्हारने आपली टकळी सुरूच ठेवली.
"नाही रे मल्ह्या, खूप वर्ष झाले ती लिहून, आता आठवत नाही" एक नजर फोटो बघण्यात गुंतलेल्या अदिती आणि सलोनीकडे टाकत अवि हात जोडत उत्तरला, पण थांबेल तो मल्हार कसला..
"कोणती रे कोणती? मला पण नाही आठवत असली कोणतीच" फोनमध्ये घातलेलं तोंड वर न करता जसं हे वाक्य अदितीने उच्चारलं, तसा मल्हार टुणकन उडी मारून उठला, आणि अविचा ठोका चुकला..
"अरे तू काय काळजी करतो अव्या, मागच्या वेळी आपल्या दारूकामाच्या पिशवीतच तुझी डायरी ठेवली होती, अजूनही असेल तिथेच, थांब आणतो" एवढं बोलता बोलता मल्हारने डायरी आणलीच. हताश होऊन, पण तसं चेहऱ्यावर येऊ न देता अवि पाने उलटू लागला. एव्हाना अदितीने तिसरा राउंड भरला आणि अविच्या तोंडाकडे बघत ते तिघे हातात ग्लास घेऊन बसले.. शेवटी एकदाचं ते पान सापडलं आणि अरविंदाने सुरुवात केली,
"गझलेचं नाव आहे फिर कभी, माझ्या एका सिनियरची स्टोरी ऐकून मी ही गझल तेव्हा लिहिली होती. त्याचं झालं काय की-"
"तू गझल कर रे सुरू, बाकी पुराण आपण नंतर ऐकू." अरविंदला मध्येच तोडत मल्हार बोलला, तशी त्याने गझल वाचणं सुरू केलं..
मेरे आँगन में आना फिर कभी
मेरे साथ चलना फिर कभी
दिये जलकर बुझ गये आज,
शाम रोशन करना फिर कभी
ग्रीष्म कि धूप में जलने दो जरा
बारिश को सुलगाना फिर कभी
मैं दूर तो तुम बेवफा हो गये,
हिसाब ए वफा देना फिर कभी
उलझन है जीने में आजकल,
तुम मुझे याद आना फिर कभी
जीना सिख लिया है मैने टुटकर
तुम आकर बिखेरना फिर कभी
साजिशे है हवा में, के दूर हो जाऊ
कहीं खो ना जाना, आना फिर कभी
ऐसा नहीं के प्यार कम हो गया,
आज मन नहीं, मचलना फिर कभी
लड रहे हैं अभी तो हर पल
तुम कंधा संभालो, देना फिर कभी..
(अजिंक्यराव पाटील)
"क्या बात, क्या बात.. जियो मेरे भाई..."
मल्हारच्या बोलण्याने अविची तंद्री भंगली. "ए कसला भारी लिहितोस तू, ते पण दुसऱ्याच्या स्टोरी ऐकून" इति सलोनी, या कौतुकात अदिती मात्र शांत होती. अविने फक्त पहिल्या दोन ओळी डायरीतून वाचल्या होत्या, आणि बाकी पूर्ण गझल त्याला तोंडपाठच होती हे फक्त तिला कळलं होतं.
दोन क्षणांच्या जीवघेण्या शांततेनंतर आपला पेग संपवून अरविंदच्या कुशीत शिरत अदिती म्हटली.. "छान होती गझल.. वैशु सारखी!" शेवटचे दोन शब्द ऐकून मल्हार बुचकळ्यात पडला, सलोनी तर ढगात होती, आणि अरविंद मंद स्मित करत होता..
क्रमशः.
वाह वाह!
वाह वाह!
पुढचा भाग लवकर येऊदेत.. प्रतिक्षेत!
धन्यवाद मन्या
धन्यवाद मन्या
छान !
छान !
वैशु ने उत्कंठा वाढविली आहे.
वैशु ने उत्कंठा वाढविली आहे. छान लिहिताय
छानच. उत्कंठा वाढत आहे.
छानच. उत्कंठा वाढत आहे.
मस्तच!!! उत्सुकता वाढली आहे!!
मस्तच!!! उत्सुकता वाढली आहे!!!
धन्यवाद सर्वांचे, लवकरच पुढचा
धन्यवाद सर्वांचे, लवकरच पुढचा भाग लिहून पोस्ट करेन. कथा वाहती आहे, जशी कल्पना सुचेल तसे लिहितोय, बांधलेली नाही.
https://soundcloud.com
https://soundcloud.com/imasud00/pyar-ki-raah-mein-chalna-seekh-ghazal-cl...
पुढचा भाग कधी येणार?!
पुढचा भाग कधी येणार?!
अजिंक्यराव वेगळीच घझल ऐकू
अजिंक्यराव वेगळीच घझल ऐकू येतेय त्या लिंक वर -
हि वाली नाही आहे .
मेरे आँगन में आना फिर कभी
मेरे साथ चलना फिर कभी
ऑफिस लॅपटॉपवर शोधत असताना
ऑफिस लॅपटॉपवर शोधत असताना बऱ्यापैकी चांगली लिंक सापडली... जागा सापडली नाही म्हणून इकडे पोस्ट केली.
माहित नाही त्यांच्यासाठी, लिंकमधली गझल सिग्राम इम्पेरिअलच्या "मेन विल बी मेन" जाहिरातीत आहे तीच आहे.