आज खूप दिवसांनंतर कविता ऐकली किंवा त्यासाठी वेळ मिळाला असे म्हणेन..मधुराणी प्रभूलकर यांच्या कवितेचे पान या सदरातील ही कविता..कविता अशी आहे..
चहाच्या कपासोबत त्याने मैत्रीचा हात पुढे केला.
फ्रेंडस! ती भांबावली..
लग्न झालंय, मुलं मोठी, सगळे छान चाललंय म्हणाली.
तो हसला आणि म्हणाला, मी मैत्री म्हणतोय तुला,
ती पुढे म्हणाली, आणि कसं आहे मला असे हे आवडतच नाही. मी बरी, माझे काम बरं, ह्या असल्या गोष्टी न साठी माझ्याकडे वेळच नाही.
तो पुन्हा हसला आणि म्हणाला अग मी मैत्री म्हणतोय तुला,
हो, तेच ते, इथे सगळ्यांची नजर असते, सगळ्यांना उचापती पडल्यात, प्रमोशन तोंडावर आलंय, साध्या साध्या गोष्टीनं च ही काहूर माजतात.
तो पोट धरून हसला, अगं एवढ्याच साठी तर मैत्री म्हणतोय तुला.
एवढे बोलताना धाप लागलेली तीला, चहा थंडगार च निऊन गेलेला. अचानक डोळ्यात उन्ह उन्ह पाणी, खरं तर इतक्या दिवसांत असे विचारलेच नव्हते कोणी.
त्याने शांतपणे खिशातून रुमाल बाहेर काढला आणि सहजतेने तिच्या समोर धरला.
आता ती अजुनच स्फुंदली, अजुनच कोसळली, डोळ्यांच्या कडानी मनसोक्त वाहिली.
यावेळी तो हसला नाही, यावेळी तो हसला नाही तिच्या नजरेत नजर रोखून म्हणाला, "एवढ्याच साठी तर मी मैत्री म्हणतोय तुला, मी मैत्री म्हणतोय तुला".
ही कविता ऐकल्यानंतर खरेच असे वाटले की, आपल्याला ही मित्र म्हणण्यासारखे कोणी ही नाही. खूप वर्ष झाली म्हणजे लग्नानंतर मैत्री हे पान आयुष्यात होतं हेच मी विसरले होते किंवा असे म्हणेन की त्याची गरज भासली नाही किंवा त्या गोष्टींसाठी वेळच नव्हता. त्यामुळे मित्र मैत्रिणी हा शब्द माझ्या शब्दकोषातून बाहेर पडला होता.
त्या सर्वांना सोडून वेगळ्याच विश्वात मी रमत गमत होते.या विश्वात ही काही कमी नाही. सर्व सुख सोयी मिळाल्या. लग्नानंतर खूप छान घर, घरातील माणसं, नवरोबा, मुलंबाळं, नातेवाईक सर्व काही मिळाले, खूप सुखी, खूप सुखी आहे मी.
पण आज का, कोणास ठाऊक मैत्री हा शब्द, शब्दा च राहिलाय, आज ही कधी तरी अचानक डोळ्यांच्या कडा ओल्या होतात, उगाचच रडावसं वाटत, उगाचच गळा दाटून येतो. कुठेतरी असे वाटते की, एक खरा, सच्चा मित्र आपल्याला कोणी ही नाही किंवा मी कोणाची तशी मैत्रीण बनू शकले नाही.
तसे म्हटले तर लग्नानंतर एक हक्काचा मित्र भेटला असे म्हणेन मी, त्यालाही एक हक्काची मैत्रीण भेटली, पण आता वाटते की ती मैत्री आहे का? की नवराबायको चे नाते ?
मित्र मैत्रिणी ची व्याख्या च काही वेगळी असते, ते कधी ही आपल्यावर हक्क सांगू शकत नाहीत, लांब राहून ही आपल्याबरोबर असतात, कोणती ही गोष्ट त्यांच्याशी वाटू शकणे, मित्र खेळकर, खोडसाळ, टपली मारून जाणारा, रडत असताना ही हसवणारा, अडचणीतून मार्ग दाखवणार, आपल्या मनातील, आपल्या चेहऱ्यावरचे भाव ओळखणारा, गोड बोलून समजावणरा, वेळ प्रसंगी दरडवणारा, डीवचणारा, कौतुक करणारा, रोज भेट नाही झाली तरी चालेल पण, त्याचे शब्द आठवले तरी चेहऱ्यावर हास्य उमटावे असे काही...
माझे च नाही असे खूप मुलामुलींचे होत असेल, की मित्र मैत्रिणींची आठवण आली की, डोळे ओले होऊन चेहऱ्यावर स्मित हास्य उमटत असेल.
मी तर म्हणेन प्रत्येकाच्या मनात एक कप्पा नेहमी मित्र मैत्रिणी साठी असतोच फक्त आपल्याला मैत्री करता आली पाहिजे. मग तो कप्पा भरला की तुम्हाला कशाची ही कमतरता भासणार नाही.
मैत्रीचा कप्पा असाच जपुन ठेवा, मैत्री ची उणीव फक्त मित्र च भरून काढू शकतात.
मैत्री चा कप्पा
Submitted by Sandhya Jadhav on 22 May, 2020 - 23:37
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरंय. लग्न झालं की,
खरंय. लग्न झालं की, जबाबदारीच्या ओझ्याने दबल्यामुळे बर्याच मुलींच्या बाबतीत असं घडतं.
धन्यवाद..
धन्यवाद..