उभा जन्म मुंबईत गेल्याने रिक्षा नामक तीन चाकी वाहनाशी दोन हात करायचा प्रसंग फारसा आला नाही. त्यातही शेअर रिक्षा या प्रकारापासून मी चार हात लांबच राहतो. कारण त्यात आपल्यासोबत आणखी चार-सहा हात बसवतात. ज्यांच्याशी आपली ओळख ना पाळख अश्यांसोबत एकाच रिक्षात खेटून प्रवास करायला नाही म्हटले तरी जरा संकोचच वाटतो. त्यातही जर दोन मुलींच्या मध्ये बसायची वेळ आली तर आणखी अवघड होते. तसे पाहता ईयत्ता पहिली ते चौथी दोन मुलींच्या मध्ये बसूनच मी माझे प्राथमिक शिक्षण पुर्ण केले आहे. पण तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हाची लोकं भोळी होती. तेव्हाचे मन निरागस होते. पण आता मात्र....
असो, तर ईथे विस्तव तिथे शेकोटी. मधले लोणी पार विरघळून ताक झाल्यास नवल नाही. ज्यांना हे रोजच्या सवयीचे आहे त्यांचे ठिक असते, पण नसते एखाद्याला सवय तर नाही जमत. आज अशीच अग्नीपरीक्षा माझ्यातल्या रामाला द्यावी लागली. पण हे मोबाईलयुग असल्याने भलतेच रामायण घडले.
तर झाले असे,
मीटर रिक्षाची एक रांग होती आणि शेअर रिक्षाची एक रांग होती. मीटरची रांग मोठी होती आणि शेअरची रांग छोटी होती. मी जरा घाईत असल्याने शेअरने जायचे ठरवले. एका रिक्षात मागे तीन प्रवासी आणि पुढे ड्रायव्हर, आणि त्याच्या मांडीला मांडी लाऊन आणखी एक प्रवासी. असे एका रिक्षात टोटल पाच रहिवाशी. बहुधा रिक्षाचा पुढे होणारा निमुळता आकार लक्षात घेता, तिचा गुरुत्वमध्य आणि पॅसेंजरचा गुरुत्वमध्य यातील eccentricity कमीत कमी राखायला अशी पाच-तीन-दोन व्यूहरचना गरजेची असावी. तसेच सारे रिक्षावाले ईथून तिथून मिथुन किंवा गेला बाजार येण्णा रास्कला रजनीकांत असल्याने स्टेअरींगच्या उजव्या बाजूला बसून रिक्षा चालवणे त्यांच्या डाव्या हाताचे काम असावे. बहुधा रिक्षावाल्यांना लायसन देताना अश्या अवस्थेत रिक्षा चालवायची चाचणी मस्ट असावी.
असो. तर आम्हा पाच जणांचे लगेज भरताच लगेच ती रिक्षा भरघाव सुटली. जेवढ्या कमी वेळात एक फेरी पुर्ण तितका धंदा जास्त असे काळ काम वेगाचे साधेसोपे गणित असावे. रिक्षावाला ना सिग्नल पाळत होता. ना खड्डे टाळत होता. हातात दही घेऊन बसलो असतो तर ताक झाले असते, केळी घेऊन बसलो असतो तर शिकरण झाले असते, वांगी घेऊन बसलो असतो तर भरीत झाले असते. मी मुठीत जीव घेऊन बसलो होतो. त्याचे पाणी पाणी होत होते. रिक्षा वाशीची होती आता आम्हीही रिक्षावासी झालो होतो. बाजूने सानपाड्याचा रेल्वेट्रॅक दिसत होता. माझी स्मरणशक्ती मला दगा देत नसेल तर गुलाम चित्रपटातील आमीर खान आणि मंडळी दस दस ची दौड हा खेळ ईथेच खेळले होते. कदाचित रिक्षासोबत स्पर्धा करायची हिंमत नसल्याने त्यांनी ट्रेनचा सोपा पर्याय निवडला असावा. पण चक्राऊन तर मी तेव्हा गेलो जेव्हा वाशीहून सुटलेल्या ट्रेनला आमच्या समांतर चाललेल्या रिक्षाने केव्हाच मागे टाकले होते.
आता रिक्षाने वळसा घेत मेन रोड पकडला होता. आजूबाजूच्या अवजड वाहनांशी स्पर्धा करत रिक्षा पळत होती. शेजारून त्यांचे मोठाले टायर छातीत धडकी भरवत जात होते. ते पाहून मी जरा बाजूला सरकलो तसे तिकडची मुलगी अंगावर खेकसली. मी पुन्हा सावधपणे मधोमध बसलो.
रिक्षावाल्याला म्हटलं, जराआतल्या रस्त्याने घे राजा.
त्यावर तो म्हणाला भाऊ तिथे ट्राफिक असतो. आणि ट्राफिक हवालदार सुद्धा असतो. चौथा पॅसेंजर पकडला जाईल.
मी म्हटलं हमम, मी यातला एक्स्पर्ट तर नाही. पण.....
जर ट्राफिक असेल तर त्याचा एक फायदा सुद्धा आहे, आपण ट्राफिक हवालदाराला दिसणार नाही.
तसे त्याने एकवार मागे पाहिले. माझी खिल्ली उडवली. आणि पुन्हा रिक्षा भरघाव सुटली.
पुढच्या सिग्नलला मात्र त्याने गाडी आतल्या गल्लीत घेतली. आधी माझी तो कसोटी घेत होता, आता गल्ली क्रिकेट सुरू झाले. तिथे क्रिकेटमध्ये एकच आफ्रिकेचा एबी डीविलिअर्स मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळखला जातो. ईथे दर दुसर्या गल्लीतील तिसरा रिक्षावाला त्यासाठी प्रसिद्ध असतो. जो जागच्या जागी पुढचे चाक ३६० अंशात वळवू शकतो. कमालीचे हातपाय अॅण्ड आय कोऑर्डीनेशन. आपल्याला देखील आपली आय आठवते. मलाही माझी आठवली. त्या रिक्षाच्या मागे "आईचा आशीर्वाद" असे कोणासाठी लिहिले होते त्याचा उलगडा झाला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. अचानक एका बेसावध क्षणी रिक्षा उसळली आणि मी डावीकडच्या मुलीवर हलकेच कोसळलो...
तिने एक तुसडा कटाक्ष टाकला तसे मी घाबरून उजव्या बाजूला सरकलो. एक कोपरखळी तिकडून पोटात बसली.
ठिक से बैठा करो, बीच के सीट पे क्यू बैठे हो, एक साईडमे नही बैठ सकते थे..
हायला! हे असे सुद्धा असते का? मी रांगेत जसा मान खाली घालून आय मीन मोबाईलमध्ये डोकं खुपसून उभा होतो तसाच आत चढलो होतो. पुढच्यामागच्या डावीउजवीकडच्या जगाची पर्वा करायची असते हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.
वाद घालण्यात अर्थ नव्हता. मी जितके अंग चोरून बसायचा प्रयत्न करत होतो तितके रिक्षा मला जास्त उसळवत होती. थोडा ओळखीचा भूभाग दिसताच मी रिक्षावाल्याला रिक्षा बाजूला घ्यायला लावली. शेअरचेही वीस रुपये झाले होते. कसली महागाई वाढली आहे. मीटररिक्षाने एकट्यादुकट्याने प्रवास करायलाच नको.
मी रिक्षातून खाली उतरून पाकिटात हात घालून पैश्यांची जमवाजमव करत असताना सहज माझे लक्ष रिक्षात बसलेल्या मुलीकडे गेली. तिच्या मोबाईलचे तोंड माझ्या दिशेने वळलेले, मुद्दामच वळवलेले मला स्पष्ट दिसत होते. काय करत असावी? माझा फोटो? माझा फोटो काढत असावी? वीजेच्या वेगाने लखकन विचार डोक्यात चमकला आणि माझी स्थिती डोक्यात वीज कोसळल्यासारखीच झाली. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी माझा फोटो काढत होते आणि मी ईस्माईल देत नव्हतो. पुरेसा प्रकाश, हल्लीच्या मोबाईल कॅमेर्यांची क्लॅरीटी, त्या मुलीचा सराईतपणा आणि तिच्या चेहर्यावरील तुसडेपणाच्या भावाच्या जागी आता दिसणारा खट्याळपणा हेच सांगत होते की उद्या माझे पोस्टर सोशलसाईटच्या भिंतीभिंतीवर छापले जाणार होते. सोबत एखादी पोस्ट.! काय असेल? रिक्षात खुलेआम छेडछाड करणार्या एका मवाल्याचा मुलीने चपळाईने प्रसंगावधान दाखून टिपला फोटो. मग तीच पोस्ट कसलीही शहानिशा न करता छोट्यामोठ्या वृत्तपत्रात बातमी म्हणून झळकणार. काही स्वयंघोषित हौशी पत्रकार माझ्या घरी टपकणार. त्या मुलीची जात निघणार, माझा धर्म निघणार, रिक्षावाल्यांचा प्रांत निघणार, खाया पिया कुछ नही पण ईज्जतीचे वाभाडे निघणार. प्रकरणाला राजकीय वळण लागले तर मायबोलीवरही धागे झळकायला वेळ लागणार नाही. ती वेळ यायच्या आधीच आपणच का नाही धागा काढून आपली बाजू क्लीअर करावी म्हणून हा लिखाणप्रपंच !
थॅंन्क्स अॅण्ड द रिगार्ड
ऋन्मेष
कश्याबद्दल विचारेन च्रप्स?
कश्याबद्दल विचारेन च्रप्स? तीन लग्नाबद्दल का? तिला ठाऊक आहे हे.. तिसरे तिच्याशी झालेय हेच तिच्यासाठी महत्वाचे आहे
लेखाचं शिर्षक वाचुन परिचित
लेखाचं शिर्षक वाचुन परिचित सरांचाच काहीतरी पराक्रम असावा असं वाटलं.
परिचित मी आणि ऋन्मेष एकच आहोत
परिचित मी आणि ऋन्मेष एकच आहोत असे वाटतंय का तुम्हाला ?
नाही मला नाही असं वाटत. पण
नाही मला नाही असं वाटत. पण काय हो कटप्पामामा तुमच्या मनात तुम्ही अन ऋन्मेशभाऊ एकच असावेत अशी शंका का येते.
मी त्या बाहुबलीला शोधतोय
मी त्या बाहुबलीला शोधतोय ज्याने हा आरोप केला होता . तुमच्याबद्धल मला खूप आदर आहे वीरू . तुम्ही टाकीवर चढला होता ना पंच्याहत्तर मध्ये ?
नाय ब्वॉ, तो दुसरा कोणी आसंल,
नाय ब्वॉ, तो दुसरा कोणी आसंल, आपला काय बी सबंध नाही त्याच्याशी. पण मामा तुम्हाला लै जुन्या जुन्या गोष्टी आठवता हो.
आनं मामा आपल्याला बी
आनं मामा आपल्याला बी तुमच्याबद्दल लै आदर आहे बरका. तुमी यकदम अम्रेकेत राहता. बाब्वो.
तो प्रसंग फारच gucci होता .
तो प्रसंग फारच gucci होता . म्हणून लक्षात आहे .
गुड नाईट वीरू प्राजी .
गुड नाईट वीरू प्राजी .
100
100
ऋन्मेश दादा... अप्रतिम!!!
ऋन्मेश दादा... अप्रतिम!!!
"कोट्या" मात्र एकदम अस्सल, क्रिएटिव्ह!!!
Pages