संध्याकाळी मासे आणायला हर्णे बंदरावर जातानाच अरविंदाने ती जागा लक्षात ठेवली होती. उंच डोंगरकडा आणि सूर्यास्त दिसायचा तर समुद्रातच अशी दिशा. २ दिवसावर पौर्णिमा असल्याने चंद्र देखील मोठ्ठा असणार असा अंदाज त्याने घाटातून वळताना लावला. मासे घेतानाच त्याने मल्हारला फोन केला आणि दोघांचे टेन्ट, बार्बेक्यू सेट आणि जुजबी सामान तयार ठेवण्याची सूचना केली. अपेक्षेप्रमाणे आदिती आणि सलोनी समुद्रात खेळत असल्याचं मल्हारने कळवलं म्हणून हे प्लॅन करता आलं. नाहीतर, तिथे कसं राहणार, उगाच नसते धाडस कुणी सांगितले वगैरे बोलून मूड घालवला असता. तसं गाडीत टेन्ट टाकतानाच सलोनी करवादली होतीच कि कारण नसताना कशाला हे धूड सोबत न्यायचं? ज्यावर, "गरज पडली तर असावा" असं म्हणत मल्हारने तिची समजूत काढली होती; पण आदिती आणि सलोनीची त्यावेळची नेत्रपल्लवी पाहत त्यांच्या मनात आलेली शंकेची पाल मल्हार आणि अरविंदने काहीतरी फालतू जोक करून धुडकावून लावली होती.
होमस्टेवर पोचल्याबरोबर मासे आणि कोळंबी वहिनींच्या सुगरण हातात सोपवली. रूमवर येताच "आपला बेत खुशीने पार पाडायचा तर यांना खुश करावेच लागणार!" कॅमेऱ्याचा बंद डोक्यात घालताना मल्हार म्हटल्याबरोबर अरविंदाने निक्षून सांगितलं, "मी पोहायला जाणार आहे, फोटो तुलाच काढावे लागतील!" साग्रसंगीत फोटोसेशन झाले, अंघोळी झाल्या.. अदिती आणि सलोनी कॅमेऱ्यातले फोटो बघत खुश झाल्याचं पाहून, अरविंदने विषय काढला..
"ऐक ना अदिती, मी काय म्हणतो"
"अं?" कॅमेऱ्यातून नजर न हटवता अदितीचे प्रत्युत्तर.. यावर सलोनीने मात्र मल्हारवर कटाक्ष टाकला आणि पुन्हा कॅमेऱ्याकडे नजर वळवली.
"आपण आज टेन्ट लावून राहायचं का बाहेरच?" अजूनही अदितीची नजर फोटोंवर स्थिरावलेली होती, आणि म्हणून तिने उत्तर देण्यासाठी घेतलेले दोन क्षण मल्हार आणि अविला दोन तासांसारखे भासले.
"हं" फोटो पाहण्यात गुंगलेल्या आदितीने उत्तर दिले आणि २ जीव भांड्यात पडले. सलोनी म्हटलीच, "अगं आदू, तू ऐकलंस तरी का?"
"जाऊदेत गं, डास खातील तेव्हा येतील स्वतःच परत. एवढे छान फोटो काढलेत, देऊयात एक चान्स"
एवढं ऐकल्याबरोबर मल्हार वहिनींकडून पळत जाऊन मसाला लावलेले चिकन, फॉईल पेपर मध्ये गुंडाळलेले मासे आणि कोळंबी फ्राय घेउन आला तर अविने गाडीत टाकलेला सामान, नाईट आऊटची स्पेशल बॅग (जी आजवरच्या अनेक अनुभवातून तयार ठेवली होती), दारुकामाची लपवून ठेवलेली साधने तपासली आणि गाडीत बसून सर्वांना आवाज दिला. हे सगळे फक्त १२ मिनिटात घडले असले तरी निघायला अजून १५ मिनिटे लागणार हे गृहीत धरलेच होते! त्यामानाने कमीच वेळ लागायचा दोघींना म्हणून मल्हार आणि अवि खुश होते आपल्या नशीबांवर.
मल्हार आणि अवि कॉलेजपासूनचे मित्र. हॉस्टेलमधले रूमपार्टनर.. करिअरला सुरुवात वेगवेगळ्या शहरात करून चार वर्षांनी पुन्हा एकाच कंपनीत पोचलेले हे दोघे. दोन वर्षात अविने आपली आवडती फोर्ड एन्डेव्हर तर मल्हारने २ BHK फ्लॅट घेतला होता. दोघे पुन्हा फ्लॅट पार्टनर झाले होते. अवि पुण्यात येण्याआधीपासून मल्हार आणि सलोनीचे सूत जुळले होते, तर आदिती आणि अरविंददेखील मागच्या कंपनीतून एकत्रच पुण्याला शिफ्ट झालेले. अरविंद आणि अदितीचे लग्न जवळपास ठरले होते, मल्हार बद्दल सलोनीच्या घरी माहित होते आणि त्यांची या नात्याला काहीच हरकत नव्हती, मात्र मल्हारच्या घरी अजून या सगळ्या प्रकरणाचा काहीच पत्ता नव्हता. आता पुण्यात अरविंद आणि मल्हार सोबत राहत होते तर आदिती आणि सलोनी PG मध्ये राहत होत्या.
दोन वर्षात असं सोबत राहून सलोनी आणि आदितीमध्ये सुद्धा खूप घट्ट मैत्री झाली होती. कॉलेज लाईफचे अनेक किस्से मल्हार कडून सलोनीला आणि सलोनीकडून आदितीला ट्रान्सफर झाले होते आणि आताशा त्या दोघी अगदी वेळेवर योग्य तो किस्सा आठवून या दोघांना टोमणे मारायच्या. असं सगळं नीट सुरु असताना नेहमीसारखं फिरायचा प्लॅन झाला आणि केळशीचा बेत ठरला. केळशी आधी २ वेळा झालं होतं म्हणून ऐन पोचायच्या आधी तिथून जवळच असलेलं आंजर्ले नक्की करण्यात आलं.
रात्र नुकतीच अंधारत असताना गाडी ठरलेल्या ठिकाणी पोचली. सलोनी आणि आदितीने शेकोटीची तयारी सुरु केली तर मल्हार आणि अवि टेन्टच्या कामाला लागले. आदिती आणि सलोनी आसपास काही जळावू लाकडे मिळतात का ते बघत होत्या, मल्हारने तोवर जमीन थोडी साफ करून, एक खळगा केला, आजूबाजूला दगडांचा वर्तुळ आखून ठेवला. मोकळं माळरान असल्याने लाकडे तर काही सापडली नव्हती, थोडयाफार काटक्या गोळा करून, आंजर्ल्यातून आणलेली बाभळीची मोठी गाठ मधोमध ठेवून शेकोटीचा मुहूर्त लागला. हि जागा म्हणजे घाटाचा सर्वात उंच पॉईंट. उंचावर असलं तरी तिथे बऱ्यापैकी विस्तीर्ण पठार होतं. रस्ता सोडून दीडशे मीटर आतल्या बाजूला असलेलं हे मैदान, जिथून नजर पोचेल तिथवर समुद्र दिसत होता. रस्त्यावर संध्याकाळी ७- ७:३० नंतर शुकशुकाट झाला. शेकोटीतून काही कोळसे वेगळे काढून बार्बेक्यूचा सेट लावला आणि मल्हारने खास बनवून घेतलेली शेगडी (तिपाईच्या तोंडावर स्टीलची जाळी, ह्या प्रकाराला शेगडी म्हणावं कि तवा कि अजून काही हा एक प्रश्नच होता खरं तर!) शेकोटीवर ठेवून त्यावर फॉइलपेपर सहित मासे ठेवले. तयार कोळंबी सुद्धा धग लावून थोडी गरम झाली तसे चौघांचे ग्लास किणकिणले.
क्रमशः
मस्त. उत्कंठा वाढली. पहिल्या
मस्त. उत्कंठा वाढली. पहिल्या भागावरुन अंदाज येत नाहीये पुढे काय होईल.
माहोल बनवलात ... लोकडोन मध्ये
माहोल बनवलात ... लोकडोन मध्ये.... पटापट येऊ द्या पुढचा भाग... चियर्स !!!!
वीरु+१, पुभाप्र!
वीरु+१, पुभाप्र!
वातावरणनिर्मिती तर छान झालीय.
वातावरणनिर्मिती तर छान झालीय. आता पुढचा भाग लवकर येऊ दे.
पुभाप्र.
पुभाप्र.
हा भाग वाचुन, कोळंबीची भूक लागलेली आहे.
हा भाग वाचुन, कोळंबीची भूक
हा भाग वाचुन, कोळंबीची भूक लागलेली आहे.>>> ++१११
उत्कंठावर्धक
उत्कंठावर्धक
एक सूचना : ढग चे धग करावेत
जलपऱ्या येणार पुढच्या भागात.
जलपऱ्या येणार पुढच्या भागात. पुभाप्र.
धन्यवाद सर्वांना.. पुढचा भाग
धन्यवाद सर्वांना.. पुढचा भाग डोक्यात शिजतोय. ललित म्हणून सुरू केलेलं हे लिखाण, बघू डोकं कुठं घेऊन जातंय त्याला.
@बोकलत: नाही हो, शक्यतो तसा विचार नाही.
धन्यवाद सर्वांना.. पुढचा भाग
धन्यवाद सर्वांना.. पुढचा भाग डोक्यात शिजतोय. ललित म्हणून सुरू केलेलं हे लिखाण, बघू डोकं कुठं घेऊन जातंय त्याला.
@बोकलत: नाही हो, शक्यतो तसा विचार नाही.
धन्यवाद सर्वांना.. पुढचा भाग
धन्यवाद सर्वांना.. पुढचा भाग डोक्यात शिजतोय. ललित म्हणून सुरू केलेलं हे लिखाण, बघू डोकं कुठं घेऊन जातंय त्याला.
@बोकलत: नाही हो, शक्यतो तसा विचार नाही.
धन्यवाद सर्वांना.. पुढचा भाग
धन्यवाद सर्वांना.. पुढचा भाग डोक्यात शिजतोय. ललित म्हणून सुरू केलेलं हे लिखाण, बघू डोकं कुठं घेऊन जातंय त्याला.
@बोकलत: नाही हो, शक्यतो तसा विचार नाही.
छान..चांगली सुरूवात
छान..चांगली सुरूवात
छान सुरुवात! थोड कन्फ्युजन
छान सुरुवात! थोड कन्फ्युजन होतंय सुरुवातीला, पण इट्स ओके.
पुभाप्र!
इथून पुढे कथेचे अनेक रस्ते
इथून पुढे कथेचे अनेक रस्ते सुरू होऊ शकतात,
१. मर्डर mystery
२. भूत वगैरे
३. प्रेमकथा
४. गझल आणि कविता टाकून ललित..
तुम्हाला काय वाचायला आवडेल?
जी कथा तुमच्या मनात घोळत असेल
जी कथा तुमच्या मनात घोळत असेल ती लिहा की..
गझल व कविता ललीत
गझल व कविता ललीत
इतका माहोल बनवलाय... ग्लास
इतका माहोल बनवलाय... ग्लास किणकिणलेत...ललित असू द्या... मर्डर नको...
छान सुरुवात आहे.
छान सुरुवात आहे.
@अजिंक्यराव पाटील
तुम्हाला काय वाचायला आवडेल?>>>>
तुम्ही कथेचे जनक आहात. ती कुण्या घरी बरी राहील तिकडं पाठवा
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/74883 पुढचा भाग