काहीतरी आणि बरंच काही..
Submitted by अजिंक्यराव पाटील on 8 April, 2020 - 13:56
संध्याकाळी मासे आणायला हर्णे बंदरावर जातानाच अरविंदाने ती जागा लक्षात ठेवली होती. उंच डोंगरकडा आणि सूर्यास्त दिसायचा तर समुद्रातच अशी दिशा. २ दिवसावर पौर्णिमा असल्याने चंद्र देखील मोठ्ठा असणार असा अंदाज त्याने घाटातून वळताना लावला. मासे घेतानाच त्याने मल्हारला फोन केला आणि दोघांचे टेन्ट, बार्बेक्यू सेट आणि जुजबी सामान तयार ठेवण्याची सूचना केली. अपेक्षेप्रमाणे आदिती आणि सलोनी समुद्रात खेळत असल्याचं मल्हारने कळवलं म्हणून हे प्लॅन करता आलं. नाहीतर, तिथे कसं राहणार, उगाच नसते धाडस कुणी सांगितले वगैरे बोलून मूड घालवला असता.
विषय:
शब्दखुणा: