माझा फा वे टा

Submitted by किल्ली on 28 March, 2020 - 06:01

फावल्या वेळातला Timepass
------------------
फा वे टा चे champion पूज्य आशुतोष शिवलकर आणि अँना मॅथ्यूस ह्यांना स्मरून हा खेळ खेळूया.
( हे दोघे कोण असं विचारताय?
हाय रे फुटी किस्मत!)

Lockdown मुळे घरात बसून कंटाळा आलेल्या जमातीने हा खेळ उत्साहाने खेळावा.
--------------
तुम्हाला बेस्ट फा वे टा कोणता आहे असं वाटतंय?
तुम्ही असं काय करता की ज्याने हा कठीण काळ सुसहय होतो?
सांगा इथे..:)
येऊ द्या गमतीदार फा वे टा clues Happy
..........
उदाहरणे:
१. Tv पाहणे ( मग त्यावर काहीही लागलेले असुदेत.काहीही category मध्ये नागीन पासून 'क्या आपको पता है रावण अभी जीवित है। लंका मे एक खुफिया गुफामे। आईए आपको ले चलते है'वाले प्रोग्रॅम्स on ----- tv channel
२. डाळीतले दाणे मोजणे
3. पंख्याकडे एकटक पाहणे
4. घर अवरण्याच्या नावाखाली जुन्या वस्तू काढून पाहत राहणे (अल्बम, रद्दी,certificates, भांडी, मुलांची खेळणी,)
5. लहान झालेले कपडे कपाटातून काढून ते पाहून शोकव्यक्त करणे, मी बारीक होऊन पुन्हा ते वापरणार आहे ह्या आशवादावर त्यांना कपाटात परत ठेवून देणे

इत्यादी

(हा धागा निव्वळ timepaas आहे. Serious आणि productive प्रतिसाद वाचून मजा नाही येणार हे समजुन घ्या. हा धागा माझा फा वे टा आहे हे वेगळे सांगायला नकोच!)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही सध्यातरी खूप गप्पा मारतोय, बैठे खेळ खेळतोय, जमेल तसे पुस्तक वाचन सुरू आहे अन सोबत खूप सारे खाणे चालुये

फावला वेळ मिळाला की करू अस म्हणत असंख्य गोष्टी बाजूला ठेवलेल्या असतात. त्या जमेल तशा करायच्या. टाईमपास कशासाठी करायचा?

पोरींच्या खोड्या काढणे हा माझाही लग्नाआधीचा टाईमपास होता.

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 28 March, 2020 - 16:44
>>>
काढ की मग धागा,

व्हाट्सएपवर येणारे करोना विनोद, कॉन्स्पिरसी थिअरीज, दारू आणि नवरा बायकोचे विनोद यांचा धज्जा उडवणे.

लोकं असे ststus ठेवत आहेत की ते खूप कामसू आहेत आणि काम नसल्यामुळे त्यांचा जीव कासावीस होत आहे, एरवी हीच लोकं ofc मध्ये बरं वाटत नाही अशी थाप मारुन घरी येतात आणि netflix पाहतात.
Lol

मानव जी
हम सब जाणते है। Biggrin

लहान लेकरं आहेत माझ्या टीममध्ये, एकमेकांच्या चुगल्या करत असतात Lol

@किल्ली,
एवढ्यात बराच वेळा ते तोंपासु फोटो टाकले होते ऋ च्या धाग्यावर . तो तर सिक्रेट फावेटा नव्हे ना?

Secret असं कसं सांगणार? >>
नाही तर काय. विपुत सांगायचं असतं सिक्रेट, इथे फक्त विचारणाऱ्याला विपु पहा एवढंच सांगायचं.

झोपा काढणे.... आणि उरलेल्या वेळेत एखादी रेसिपी बनवणे.
अजुनच वेळ उरला तर तिच रेसिपी इकडे तिकडे पोस्ट करणे... फक्त टेम्पररी
हा. मा. फा. वे. का.

फेसबूकवर सध्या बायकापोरींमध्ये साडी घातलेला फोटो टकायचे फॅड आले...
अधूनमधून एखादी चक्कर टाकून बघत राहतो.. फावल्या वेळात

काल 'ब्रिटनी रन्स मॅरॅथॉन' हा प्रेरणादायी सिनेमा पाहील्याने. २ वेळा स्टेशनरी बाईक झाली Wink अन्यथा १ वेळेची मारामार असते.

चहा पितो
बरेचदा स्वत: विविध पद्धतीने बनवून
दिवसातून आठदहा वेळा होतो हा टाईमपास

Facebook वर मित्र मैत्रिणींचे जुने फोटो शोधून त्यावर पांचट कविता as a कंमेंट म्हणून डकवणे.. कालपासून भारी मजा येतेय राव

मी रोज मला आवडलेल्या एका साडीचा screenshot काढून आईला whatsapp करते आहे. #mylockdown फावेटा
खरंतर बातम्या बघून नैराश्य येऊ नये म्हणून हा उद्योग सुरु केला आहे.

हिंदी गाणी मराठीत भाषांतर करून गाते:
उदा:
१. डोळ्यात तुझ्या विचित्र विचित्र अदा आहेत
हृदयाला बनवील पतंग श्वास तुझी ही हवा आहे
२. माझ्या रंगात रंगणारी परी आहेस की पऱ्यांची राणी
की आहेस माझी प्रेमकहाणी
माझ्या प्रश्नांचं उत्तर दे गं बाई
दे ना

३. तू जवळ आलास आणि हसलास
तू माहिती नाही कितीतरी स्वप्ने दाखवलीस
आता तर माझं हृदय
जगात नाही झोपत नाही
काय करू देवा
कसंतरी होतंय

ऋणम्या, माझा पाहिलास का फोटो Happy
Submitted by सस्मित on 1 April, 2020 - 17:06
>>>

आता पाहिला हा प्रतिसाद.
तो जोक होता
मी कुठे फेसबूकवर पडीक असतो.
अध्येमध्ये जातो थोडंफार स्क्रॉल करतो. बाहेर पडतो.
पण एके दिवशी स्क्रॉल करत होतो तर नुसत्या साडी घातलेल्या बायका. किती पाहिल्या किती नाही मोजदादच नाही. मग तेच डोक्यात घेऊन ईथे आलो आणि ती पोस्ट लिहिली...

बाई दवे,
बघून लाईक करायचा किंवा कॉमेंट टाकून बर काढायचा आहे का Happy

4. एवढं प्रेम करू नको
मी बुडून जाईन कुठेतरी
परत किनाऱ्यावर यायचं
मी विसरुन जाईन कधीतरी
पाहिलाय जेव्हापासून चेहरा तुझा
मी तर झोपुच शकलो नाही

बोल ग ना जरा
हृदयात जे आहे लपलेलं
मी कुणाला सांगणार नाही

अरे वाह किल्ली.. आधी मला वाटले कविता आहेत.. म्हणून वाचल्या नाहीत.. कारण आवडत नाहीत
पण हे हिंदी गाण्यांचे मराठीकरण करायचे एकेकाळी मलाहीशौक होता..
यावर तर वेगळा धागा निघायला हवा. तुम्ही काढणार नसाल तर मी काढतो. क्रिएटीव्ह प्रकार आहे हा.. मला आठवावी लागतील आता मी कधीकाळी बनवलेली गाणी.

ऑर्कुटवर उल्लेख होता पण ती गाणी नव्हती लिहीली.
धागा काढायला एखाद्दुसरे पुरेसे आहे. तेवढे आठवतेय

तुला खरच वाईट दिवस आले रुन्म्या. कोणत्याही धाग्यावर पडीक राह्यला लागला तू आता. सुधर.

मला आठवावी लागतील आता मी कधीकाळी बनवलेली गाणी. >> आठवा आणि लिहा आता Happy

धागा काढ्लाय ऋन्मेऽऽष गुरुजी Happy

( तळटीप : मी ऋन्मेऽऽष चा डु आयडी नाही)

हा रुन्म्याच आहे
~~~~>>>>
+ 7८६ अज्ञातवासी . आयडी चुकला तुमचा बाई दवे .

घर आवरणे
हे काम असे आहे की बास
आयुष्यभर केलं तरी संपत नाही

असाही एक फावेटा Wink
(कस्कायसाभार)
लिहिण्याचा छंद असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हतं..

त्यामुळे समोरच्या घरावर
"घर विकणे आहे"
लिहून आलो...!!!