गेल्या काही दिवसांत निरनिराळ्या फूड ग्रुप्स वर लोकांच्या पाककलेचं दर्शन चालू आहे. त्यात ब्रेड, पाव वगैरे घरी बनवून ते किती छान बनलेत असे एकेक फोटो पोस्ट करायचं पेवच फुटलेलं आहे. पूर्वी मी अनेकदा घरी पाव (वडापावचे पाव) बनवण्याचे प्रयत्न केले आहेत. या जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक रेसिपी तंतोतंत कृतीत उतरवणारे आणि दुसरे माझ्यासारखे स्वतःच्या आयडिया त्यात घुसवणारे. तर पूर्वी जेव्हा मी पाव बनवण्याचे प्रयत्न केले त्यात बटर कमी टाकणे, मैद्याच्या ऐवजी थोडी कणिक वापरणे, पाण्याचे माप खूप जास्त आहे असं वाटून कमीच पाणी घालणे असे अनेक प्रकार केले आहेत. अनेक बॅचेस पिठाचे गोळे वाया घालवल्यानंतर एक दिवस मी जिद्दीने नवीन यीस्ट चे पाकीट घरी आणले आणि तंतोतंत कृती पाळून एकदम भारी पाव बनवले होते. आता एकदा पाव नीट बनल्यानंतर माझा जीव शांत झाला आणि उरलेली यीस्टची पाकिटं तशीच पडून राहिली होती. आणि इथेच आजची पोस्ट सुरु होते.
सध्या लॉकडाऊनमध्ये घरातील ब्रेड संपल्यावर आणि विशेषतः ते नवनवीन ब्रेडचे फोटो पाहून माझ्यात एकदम पुन्हा पाव बनवण्याची खुमखुमी आली. म्हटलं तीन पाकिटं आहेत जुनी, प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे? म्हणून मी एक दिवस बसून दोन-चार रेसिपी पाहिल्या आणि मनात मला योग्य वाटेल ते प्रमाण ठरवून घेतलं(हे असंच असतं आपलं) आणि सुरुवात केली. आता पूर्वीचा अनुभव असल्याने मी लगेच पाणी कोमट करुन त्यात यीस्ट घालून ठेवलं. सानुला 'त्याला हात लावू नकोस' म्हटलं तरी तिने ते पाणी मिसळलंच. आता ते मिश्रण काही बरे वाटेना. पण प्रयत्न करायलाच हवेत. म्हणून मी दिलेल्या मापाच्या दुप्पट मैदा घेतला आणि मळले. ते आपटून, खूप मळून त्या कणकेतले ग्लुटेन वाढवणे वगैरे सर्व प्रकार झाले. दोन तास ठेवले तरी काही पीठ फुगले नाही. म्हटलं इतक्या मैद्याच्या गोळ्यांचं काय करायचं?
त्या कणकेचे मोठे गोळे करुन ६ गोळे लाटले आणि पिझ्झा बेस बनवून ओव्हन मध्ये टाकून भाजले. तरीही खूप कणिक शिल्लक होती. त्यांच्याही लाट्या लाटून घेतल्या. पण थोड्या पातळ केल्या आणि ओव्हनमध्ये भाजायला ठेवल्या. आता त्यांचे फुगून मस्त 'नान' होतील अशी माझी अपेक्षा होती. पण बाहेर आले तोवर चांगलेच कडक झाले होते. मग आम्ही ते तुकडे करुन दुसऱ्या दिवशी पोरांना चिप्स म्हणून खायला दिले. त्या पिझ्झाच्या बेसवर भाज्या घालून पिझ्झा बनवले. बिचारी पोरं ! त्यांना काय माहित पिझ्झा इतका चिवट का लागतोय ते? पण दोघांनीही आवडीने पिझ्झा आणि दुसऱ्या दिवशी चिप्सही खाल्ले. इतकं झालं तरी माझी खाज अजून गेली नव्हती. पाव कुठे बनले होते?
म्हणून दुसऱ्या दिवशी परत निम्म्या मापाने परत यीस्ट ऍक्टिव्हेट करुन पीठ मळून घेतलं. नवरा म्हणे मग काल पण कमी घ्यायचीस ना? म्हटलं असं कसं? यालाच म्हणतात कॉन्फिडंस ! तर मी मळलेलं पीठ पुन्हा दोन तास ठेवलं. ते काही फुगलं नाही. म्हटलं आजच्या मैद्याच्या गोळ्यांचं काय करायचं? शेवटी डोकं लावून छोले बनवले आणि त्या कणकेचे मस्त भटुरे तळले. आयुष्यात कधी मी अशा पुऱ्या केल्या नव्हत्या त्यामुळे जरा धावपळ झाली. पण ते पार पडलं. तळायला तेल काढलंच आहे तर म्हटलं हातासरशी भजीही करुच ना. म्हणून मग कांदा भजी, मिरची भजीही झालीच. पोरांना जाम आवडले छोले-भटुरे आणि सोबत आमरस( मँगो पल्प). अगदी दोघांनी येऊन मिठी मारली मला. म्हटलं चला अजून एक दिवस निघाला.
पुढचे ४-५ दिवस मी कसेबसे काढले पण इच्छा काही जाईना . त्यात अजून लोकांचे नवीन वडापावचे फोटो येत होतेच. अनेकदा वाटलं आपलं यीस्ट जुनं आहे म्हणून होत नसेल. पण ऑनलाईन ऑर्डर दिली तरी ती मे मध्ये मिळणार होती. तोवर मला कुठे धीर? शेवटी मी म्हटलं, बहुतेक मी पाणी गरम करुन घेते ते खूप गरम होत असेल त्यामुळे यीस्ट मरत असेल. म्हणून थर्मामीटर घेऊनच बसले. पाण्याचं तापमान योग्य इतकं झाल्यावर यीस्ट घालून ऍक्टिव्हेट केलं. आता नेहमीपेक्षा जास्त बरं दिसत होतं ते. हे सर्व चालू असताना आमच्या ब्रेड बनवता येणाऱ्या एका मित्राला फोनही केला. त्यांनी यीस्ट नसेल तर बेकिंग सोडा घालून ब्रेड कसा बनवायचा याची रेसिपीही दिली. म्हटलं या कणकेच्या गोळ्यांचं काही झालं नाही तर त्यातच बेकिंग सोडा घालून बेक करु. काय बिघडतंय? नेहमीप्रमाणे कणिक आहे तशीच राहिली. मग मी ठरवलं होतं तसं त्यात बेकिंग सोडा टाकला आणि ओव्हनला लावलं. पण त्यातून कसलातरी भयानक वास येऊ लागला. (कदाचित सोड्याचा). मग जीवावर दगड ठेवून तो दगडासारखा झालेला गोळा फेकून दिला.
आता माझी हिंमत पूर्णपणे खचली होती. पण पुढच्या आठवड्यात आमच्या ब्रेड बनवणाऱ्या मित्रांनी घरी ब्रेड बनवला होता त्याचे फोटो पाहिले आणि पुन्हा माझे हात खाजवायला लागले. मग त्यांनी ज्या यीस्टने तो सुंदर ब्रेड बनवला होता, त्यातलंच थोडं मला बरणीत आणून दिलं. म्हटलं आता हे ऍक्टिव्ह यीस्ट आहे. याने आधीच ब्रेड नीट बनलेला आहे म्हणजे माझाही होईलच. म्हणून पुन्हा मी हिम्मत केली. यावेळी मैद्याचं नवीन पाकीट फोडलं. पण तरी नुसताच मैद्याचा ब्रेड कसा करायचा म्हणून एक कप गव्हाचं पीठ घातलं. त्यांनी दिलेल्या प्रोसेसप्रमाणे मळलेली कणिक रात्रभर ठेवायची होती. मी आपली मळून ठेवून टाकली. रात्री १ वाजता मला खाली जाऊन बघायची इच्छा होत होती. नवरा म्हणे गप झोप. शेवटी सकाळी उठून लहान पोराच्या उत्सुकतेने मी तो कणकेचा गोळा पाहिला. पण त्यात ढिम्म फरक पडलेला नव्हता. इतकी चिडचिड झाली. मी तर दुपारच्या जेवणाला सँडविच करणार होते, स्वतः बनवलेल्या ब्रेडचं. शेवटी तो गोळा आहे तसाच ओव्हनमध्ये टाकला. म्हटलं जे होईल ते होईल.
आता ते ब्रेड फुगणार तर नव्हता. तरीही wishful thinking ! पोरंही बिचारी दोन चार वेळा डोकावून गेली. तासाभराने बाहेर काढलेला ब्रेड म्हणजे विटेचा तुकडाच झाला होता. मारला तर जोरात खोक पडली असती डोक्याला. पण म्हटलं जाऊ दे ना. घट्ट तर घट्ट ब्रेड. वाया का घालवायचा? नवऱ्याला म्हटलं जरा स्लाईस करुन ठेव. आता सँडविच तर बनणार नव्हतं म्हणून जेवणासाठी दुसरं काहीतरी करावं लागलं याचा वैताग होताच. त्यात ब्रेड कापायला घेतलेल्या नवर्याने दमून विचारलं, निम्मा झालाय, उरलेला दुपारी करु का? त्याला म्हटलं मार खाशील. तर आता तो तुकडे केलेला ब्रेड कालपासून डब्यात पडलेला आहे. मी विचार करतेय टोमॅटो सूप बनवावं का? म्हणजे त्यात बुडवून थोडा मऊ पडेल, चावायला तितकाच बरा. Meanwhile नवऱ्याने ऑनलाईन ऑर्डर मध्ये ६ ब्रेड मागवले आहेत. ते आलेत. त्यामुळे त्याला बहुतेक 'सुटलो !' असं वाटत आहे. पण घरात अजून एक जुनं यीस्टचं पाकीट आहे ते त्याला कुठे माहितेय? आणि माझ्यातली खाजही !
तर हे असं आहे. माझासारख्या सुग्रणीला काय काय ऐकून घ्यावं लागतंय पोरांकडून, नवऱ्याकडून या ब्रेड आणि पावाच्या नादात. असो. आताच मी कुणीतरी टाकलेली काजुकतलीची पोस्ट पाहिली. अगदी १५ मिनिटांत झाली म्हणे. उद्या काजूकतलीचा प्रयोग नक्की !
-विद्या भुतकर.
☺️☺️भारी आहे गाणं.
☺️☺️भारी आहे गाणं.
मस्तच लेख
मस्तच लेख

रच्याकने दुसरे माझ्यासारखे स्वतःच्या आयडिया त्यात घुसवणारे>>>इथे मी पण तुमच्याच बोटीत
यामुळे एकपण पदार्थ धड होत नाही माझा
आपल्याला जमत कसे नाही, हाच
आपल्याला जमत कसे नाही, हाच अहंकार गोत्यात आणतो आणि मग असे मैदे, बटर फुकट घालवतो....
ढोकळा हा प्रकार माझ्या ह्या कॅटगरीत येतो. कितीतरी वेळा बेसन फुकट गेलेय..
पाव जमतात आता...
अजय जी भारी
अजय जी भारी
खूप मस्त.
खूप मस्त.
"त्यात ब्रेड कापायला घेतलेल्या नवर्याने दमून विचारलं, निम्मा झालाय, उरलेला दुपारी करु का?" हा सिक्सर होता. या दृश्याची कल्पना केली अन हसून हसून वाट लागली.
फसलेल्या पावानं जसं हसवलंय तसंच जमलेल्या पावानंही हसायच्या प्रतिक्षेत...
"फिफ्टी शेड्स ऑफ शंकरपाळे
"फिफ्टी शेड्स ऑफ शंकरपाळे तुमचंच होतं का?": अशा जुन्या आठवणी काढायच्या नसतात.:))

"यावर दमलेल्या बाबाची कहाणी च्या चालीत फसलेल्या पावाची कहाणी असं गाणं लिहिता येईल " -> अनु that was the inspiration for the title.
"शेवटची डिझायनर वीट खुपच छान दिसतेय. :))"-> thanku thanku
"मनी नाही भाव
म्हणे देवा मला पाव Happy" -> :))
अजयजी कविता मस्त :))
सर्वांचे आभार कमेन्ट्बद्द्ल.
घरी रहा, सुरक्षित रहा.
आमचे स्टेट सध्या ३ नम्बरवर आहे, कोविड-१९ केसेस मधे. त्यामूळे घरात बसून आहे. बाकी सर्व निवान्त.
विद्या.
त्यात ब्रेड कापायला घेतलेल्या
त्यात ब्रेड कापायला घेतलेल्या नवर्याने दमून विचारलं, निम्मा झालाय, उरलेला दुपारी करु का?" हा सिक्सर होता. या दृश्याची कल्पना केली अन हसून हसून वाट लागली.>>>>>>>> हो माझी पण हहपूवा
आमचा पाव बनविण्याचा प्रयत्न..
आमचा पाव बनविण्याचा प्रयत्न..
काय खतरा दिसतायत लादी पाव
काय खतरा दिसतायत लादी पाव
लगेच कृती चा धागा काढा.
एकदम प्रोफेशनल बेकरी
एकदम प्रोफेशनल बेकरी प्रॉडक्टस वाटतंय हे तर !
अव्यक्त कृपया पाकृ सविस्तर + टिप्स + अनुभव लिहून व्यक्त व्हा _/\_
अव्यक्त, तुमचा लादीपाव बघुन
अव्यक्त, तुमचा लादीपाव बघुन टडोपा
(No subject)
अव्यक्त, तुमचा लादीपाव बघुन
अव्यक्त, तुमचा लादीपाव बघुन टडोपा>>>>>> +१.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/520934444731407/posts/1777278179097021/
ह्या लिंक ने सोपा वाटतोय आणि मस्त झालाय पाव.
काय राव लोकं.. इथे पा कृ
काय राव लोकं.. इथे पा कृ टाकतायत
विद्या आणि माझा ही, बेसिक मध्ये लोचा आहे ना..
आमचे ब्रेड चे कच्चे loaf फुगत नाहीये
(स्वगत) या असल्या फोटोंना मी
(स्वगत) या असल्या फोटोंना मी भुलणार नाही ! नाही म्हणजे नाही !
आमचा पाव बनविण्याचा प्रयत्न..
आमचा पाव बनविण्याचा प्रयत्न..
हे साफ खोट आहे. याला प्रयत्न म्हणता तुम्ही...प्रयत्न....देवा उठाले रे बाबा.....वो पाव को !!!!!
आमचे ब्रेड चे कच्चे loaf फुगत
आमचे ब्रेड चे कच्चे loaf फुगत नाहीये>> यीस्ट ठेवुन ठेवुन मेले आहे. फ्रेश यीस्ट वापरा.
यालाच आमच्यात 'बेकिंग बॅड'
यालाच आमच्यात 'बेकिंग बॅड' म्हणतात. असे आमचे 'बेकिंग बॅड' चे बरेच एपिसोड चालू असतात.
एकदम भारी
एकदम भारी
अपणेही पावपर कुलहाडी
अपणेही पावपर कुलहाडी
कमाल.. मी केलेले काही
कमाल..
मी केलेले काही प्रयोग ही याच लाईनवर आहेत...
ला ला ला ला ..ला ला . ( पोर पाठिमागे रडकुंडीला आलेत) ~~~ hilarious

मस्त लेख!
मस्त लेख!

बसून दोन-चार रेसिपी पाहिल्या आणि मनात मला योग्य वाटेल ते प्रमाण ठरवून घेतलं(हे असंच असतं आपलं) >>>माझे पण असेच असते
Pages