देणं सीझन २ – भाग १
https://www.maayboli.com/node/73996
देणं सीझन २ – भाग २
https://www.maayboli.com/node/74043
देणं सीझन २ – भाग 3
https://www.maayboli.com/node/74080
देणं सीझन २ – भाग ४
https://www.maayboli.com/node/74117
देणं सीझन २ – भाग ५
https://www.maayboli.com/node/74153
देणं सीझन २ – भाग ६
https://www.maayboli.com/node/74194
आता पुढे..
“६ महिन्यात असं काय झालं की निरोप घेऊन गेलेला तू डायरेक्ट प्रपोज करायला आलास? “
दीप्तीचा प्रश्न जरी बोचणारा असला तरी तिच्या आवाजाला बोचरी धार नव्हती. बधीर, थकलेली अशी ती आणि तसाच तो शिवाजी पार्क मैदानाच्या कट्ट्यावर बसून मैदानात बघत बोलत होते
“आत्तापर्यन्त इतर कुणाला कधी माझ्या पर्सनल स्पेस मध्ये येऊ दिलंच नव्हतं मी डीडी. मास्टर्सची आणि त्यानंतर जॉबची वर्षं तूफान काम आणि स्टुडेंट लोन फेडण्यासाठी पैसे कमावणे एवढंच डोळ्यासमोर ठेवलं. तुझी आठवण होऊन त्रास व्हायला लागला की जिममध्ये जाऊन ऊर फुटेस्तोवर वर्कआउट करायचो.”
“ हम्म ...ते दिसतं आहे “ दीप्ती त्याच्या टम्म फुगलेल्या दंडाकडे बघून म्हणाली
“तुझ्याकडून फायनल नकार घेऊन गेल्यानंतर मी आईने दाखवलेल्या पहिल्या मुलीला होकार दिला. म्हटलं जर ती तू नाहीयेस तर मग कोणी का असेना काय फरक पडतो ... ”
...
“ एंगेजमेंट करून यू एस ला परत गेलो आणि ऑफीशियली तुझ्यानंतर पहिल्यांदाच कुणाशी तरी कमपॅनियन म्हणून बोलण्याचा काही महीने प्रयत्न केला. तिच्या बरोबर नवीन आयुष्य बनवण्याचा प्लॅन केला. तेव्हा कळलं की इट इज नॉट गोइंग टु वर्क आउट. नायदर विथ धिस गर्ल नॉर विथ एनी अदर गर्ल...मी कुणाला कनेक्ट च करू शकत नाहीये अॅस माय लाईफ पार्टनर”
“कशी होती ती मुलगी ? “
“चांगली होती. तिच्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. फक्त ती तू नव्हतीस..”
“आणि मग तू ठरवलंस की इंडिया ला परत जायचं? व्हॉट हॅपन्ड टु ऑल यॉर ड्रीम्स अँड प्लॅन्स व्हिच यू हॅड व्हेन यू फर्स्ट वेन्ट देअर?
“तू जेन्यूइनली विचारते आहेस की सारकॅस्टिकली?”
“आपण आत्ता सारकॅझमच्या खूप पलीकडे गेलो आहोत असं नाही वाटत तुला?”
“ नाऊ दॅट्स सारकॅस्टिक..”
“राइट .. सॉरी “ दीप्ती ने जीभ चावली. उपहास हे कायमच तिचं प्रभावी शस्त्र होतं. पण आत्ता त्याचा काही उपयोग नव्हता.
“ती स्वप्न तिथेच आहेत डीडी. स्वतःची स्टार्टअप उभी करायची. नवीन प्रॉडक्ट आयडिया लॉंच करायच्या. आपला मराठी बाणा बाजूला ठेऊन बिझनेसमन व्हायचं...एनजीओ चं काम करायचं... वर्ल्ड ट्रॅवल करायचं.. हिमालयामध्ये ट्रेकिंग, आफ्रिकन सफारी, युरो रेलने युरोप मध्ये बॅगपॅकिंग, लडाखला बाइक ट्रीप, नॉर्दन लाइटस् बघायचे ही सगळी तर आपल्या दोघांची स्वप्न होती ना ... ती मी एकटा पूर्ण करू शकत नाही ते ही रीअलाइझ झालं. अजून काय सांगू? “
“कळलं मला आशु... आय गॉट व्हॉट यू मीन ... “
“नाही अजून माझं सांगून झालं नाहीये सांगून... “ आता अजून हा काय म्हणणार आहे ते दीप्ती ला कळेना
“.. आय अॅम मोस्ट अशेम्ड दॅट आय लेफ्ट यू व्हेन यू नीडेड मी मोस्ट...मला त्याचं किती वाईट वाटतंय ते मी एक्सप्लेन नाही करू शकत.”
“..मला पण तसं वाटलं असतं जर मी तुझ्या जागी असते ...गिल्ट इज द वरस्ट फीलिंग“ .... म्हणत दीप्ती ने आशु चा हात हातात घेतला आणि त्याला थोपटलं.
“मग कसं करायचं आता?”
“आय मेट समवन ... “
“व्हॉट !!! “ हा धक्का आशुसाठी मोठा होता. त्याने ही अपेक्षाच केली नव्हती.
“तू कधी काही सांगितलं नाहीस.. “
“तू कधी काही विचारलंसंच नाहीस ..” आशुच्या चेहेऱ्यावर मळभ दाटून आलं.
“मी तुला खूप अझ्यूम केलं दीप्ती ...आपल्यात इतरांविषयी हे असं बोलणं होईल असं कधी वाटलंच नाही. .. असो ... तू निवड केली असणार म्हणजे ती चांगलीच असणार.. कॉंगरॅज्युलेशन्स .. “ डोळ्यात पाणी आणून आशु मनापासून म्हणाला
“मला काही वेळ हवाय निर्णय घ्यायला. गैरसमज करून घेऊ नकोस. मी त्याला अजून कमिट केलेलं नाहीये. आणि त्याला खेळवंत ही ठेवलेलं नाहीये. हा निर्णय आदीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे मला तो सर्व बाबींचा विचार करून घ्यायचा आहे. नंतर मग पुढे रामभरोसे..”
“तू काय म्हणते आहेस मला अजून कळलं नाहीये .. पण लुक्स लाइक यू हॅव अ प्लॅन टु कम टु अ डेसिशन. आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. व्हॉटएवर इट इज .. आय अॅम रेडी टु वेट अॅस लॉन्ग अॅस यू वॉन्ट... “
हलकेच आशुच्या हातावरून हात काढून दीप्ती ने निःश्वास सोडला.
“मी कसलं ही प्रॉमिस करू शकत नाहीये आशु. तू किती आणि कशाला तुझं आयुष्य थांबवतोस?
“आय हॅव नथिंग मोअर टु लूज .. “
१० मिनिटं दोघं तशीच शांत बसून राहिले. एकमेकांना ते इतके जास्त ओळखत होते की स्वतःच्या भावना व्यक्त करायला त्यांना शब्दांची गरज नव्हती.
“चल निघूया आता .. उशीर झालाय .. “ दीप्तीने कट्ट्यावरून उडी टाकली आणि ड्रेस झटकत तिने भेट आवर्ती घेतली
“हम्म.. उशीर तर झालाय नक्की .... “ आशु ची नजर अजूनही शून्यातच होती. सगळं हरवलेल्या फकिरासारखा तो तसाच खांदे पाडून बसून राहिला.
क्षणभर दीप्ती ला गलबलून आलं. पण मनाला आवर घालत ती थकल्या पावलांनी घराची वाट चालायला लागली.
“मला प्लीज माफ करशील दीप्ती ? “ आशुचा कातर आवाजातला प्रश्न ऐकून तिची पावलं जागीच थबकली
“ मी तुला जरी केलं तरी तू करशील स्वतःला?.. माफ? ” त्याच्याकडे न बघता ती म्हणाली आणि आणि त्याचा आवाजच ऐकू जाणार नाही इतक्या झपाट्याने पुढे चालायला लागली
**************************************************************************************************************************
“ व्हाय डोन्ट यू ट्राय धिस लेटेस्ट बुच्छेरॉन कलेक्शन सर? “
दर्दी सावज गावल्यावर हॅरोड्स मधल्या सेल्समनने सगळ्यात महागडी रेंज उघडली. स्त्रीयांच्याच काय पण पुरुषांच्या हृदयाचे ठोके ही थांबवू शकतील असे अव्वल हिरे त्या केस मध्ये लखलख करत होते. एका टपोऱ्या हिऱ्यावर यशची नजर पडली आणि क्षणात त्याची निवड झाली सुद्धा. “
“आय होप यू प्लॅन टु प्रोपोस द लव ऑफ यॉर लाईफ विथ धिस रिंग सर .. अॅज इट इज गोइंग टु कॉस्ट यू क्वाइट डिअरली.. इट्स अॅन एक्सक्विसिट चॉइस”
“सो, व्हॉट डॉ यू थिंक? विल शी से येस?” यश ने खिलाडूपणे विचारले
“ओह विथ दॅट रिंग इन यॉर हँड .. ईवन द क्वीन वूड से येस“ ब्रिटिशांच्या आदराची परमावधीची मजल क्वीनच्या पुढे काही जात नाही. त्याच्या मार्केटिंगवर खूश होऊन यश ने ५० पाऊंड्स ची नोट त्याच्या हातात सरकवली आणि अंगठी पॅक करायला सांगितली.
चकाकणाऱ्या वस्तूंवर भाळणार्यातली दीप्ती नव्हे ही त्याला माहीत असलं तरी तिला सगळ्यात ऊंची अंगठी द्यायची ही यश ने स्वित्झर्लंडलाच ठरवलं होतं. सरे हिल्स वरून अत्यंत विमनस्क अवस्थेत यश लंडन ला परतला होता. त्याचा कदाचित सर्वात मोठा आधार निखळला होता. त्यातून दीप्ती शी २ दिवसांत बोलणं सुद्धा झालं नव्हतं. कुठली तरी एक शंकेची पाल त्याच्या मनात चुकचुकत होती. पण त्याकडे निर्धाराने दुर्लक्ष करून तो ऑक्सफोर्ड स्ट्रीट वरील श्रीमंतांच्या लाडक्या हॅरोड्स मध्ये खरेदीला आला होता.
मनासारखी खरेदी झाल्यावर मात्र त्याचा मूड उंचावला तो हॅरोड्स मधून बाहेर पडत असतानाच त्याचा फोन वाजला. दीप्ति डार्लिंग अशी अक्षरे बघून त्याच्या चेहेऱ्यावर एक प्रसन्न हसू आपसूकच उमटलं
“हॅलो डार्लिंग! आ गयी नाचीज की याद आपको? “ त्याने अचानक हिन्दी च सुरू केलं
“डोन्ट कॉल मी दॅट. आणि आज अचानक हिन्दी अँड ऑल?”
“तुम्हारी आवाज सुनके हमारे अंदाज शायराना हो गए जानेमन..”
“ए पकाव! मला कळेल अश्या भाषेत बोलणार आहेस की मी कॉल कट करू? २५ रुपये पडतात पर मिनिट इंटरनॅशनल कॉलला.”
“तू दीक्षित मॅडम ची मुलगी असून इतकी म्हणजे इतकी कशी गं ड्राय? श्याः! सगळा मूड घालवला. “
“कारण मी सुरेश दीक्षितांची पण मुलगी आहे कळलं? बरं तुझा टु विचित्र मूड गेला असेल तर बरंच झालं. तुझ्याकडे एक काम होतं. “
“त्याशिवाय तू कशाला फोन करणार आहेस... बोला काय आज्ञा..” यश हताश पणे उद्गारला
“शेक्सपियर ने अॅन हॅथवे साठी लिहिलेल्या रेअर सॉनेट्सचं कलेक्शन नुकतंच सायमन अँड शूटर नी पब्लिश केलंय. इट्स एवलेबल ओन्ली इन लंडन. त्याची एक कॉपी आणशील प्लीज? पुढल्या आठवड्यात आईचा बर्थडे आहे. तिला खूप आवडेल. “
“ ओह इज इट? आणतो नक्की. “
“ ओके देन“
“आणि काही ?”
“नाही आणि काही नको. सगळं मिळतं की इथे आता. “
“आय मेन्ट आणि काही बोलायचं नाहीये का तुला? “
“आणि काही आत्तातरी आठवत नाहीये.”
“होपेलेस .. होपेलेस..” यश होपेलेस होऊन पुटपुटला
“बरं ठेऊ मी ? ऑलरेडी १०० क्रॉस केलं असेल बिलने.”
“अगं माझ्याकडून बिल घे मी आल्यावर ... ” आता वैतागलाच तो
“एवढं चिडायला काय झालं? इंटरनॅशनल कॉल वर काय गप्पा मारायच्या असतात?“ ती सुद्धा वैतागली
“अगं पण मी कुठे आहे कसा आहे ते तरी विचारशील की नाही? “
“बरं बरं सांग. “
“जाऊ दे आता...द मोमेंट इज गॉन. “
“आहेच का परत इमोश्नल रॅन्ट ..”
“हो आहे! अँड गेट यूज्ड टु इट.. आय मिस्सड यू ... हियर.... ?” आता दीप्तीला हसू फुटलं
“काय सांगतोस? मला वाटलं लंडन च्या गर्लफ्रेंडस न भेटल्यावर परत येतोयस की नाही”
“येणारे आणि तुझ्या डोक्यावर बसणारे समजलं? आता तू सुटणार नाहीस लक्षात ठेव. “
“बघू .. टाइम शाल टेल... “ दीप्ती आजाणतेपणे म्हणून गेली
“डेअर मी ! “
“यशम्हात्रे .. वी नीड टु टॉक..” संभाषणाचा रोख दीप्ती ने एकदम बदलला
“बोल? एव्रिथिंग ओके? “ यशला तिचा बदललेला टोन जाणवला
“तू ये लवकर आपण बोलू.. “
“यू आर स्केअरिंग मी नाऊ. आत्ता सांग. “
“आत्ता नाही सांगू शकत यश. म्हटलं ना? तू आल्यावर निवांत बोलू.. चल हॅव अ सेफ जर्नी “
“दीप..” यश चं वाक्य पूर्ण होईपर्यंत दीप्ती ने फोन ठेवलाही होता
|| क्रमशः ||
मस्त
मस्त
छान झालाय हा भाग पण.
छान झालाय हा भाग पण.
डिडि ची मनस्थिती बघता, कुछ भी पॉसिबल है.
लवकर येऊ द्या पुढचा भाग
नको यार मला आवडलाय यश
नको यार मला आवडलाय यश म्हात्रे...
त्या दुसर्याने त्याच्या पार्टनर सोबत वर्क आउट नाही झाल म्हणून ति दीप्ति सारखी नाही हे गोंड़स रीजन पुढे केले... मला हा आशुतोष आवडला नाही... स्वार्थी... मे बी मि जज करतीय पण आता तरी हे च आहे...
मि दीप्ती च्या जागी असते तर त्या आशुतोष ला इतके एक्सप्लेनेशन देउ ही दिले नसते. भले त्या यश ला हो बोलले नसते ही पण या आशुतोष ला नक्की च परत आयुष्यात येऊ दिले नसते
सहीच!
सहीच!
Mast .... Waiting eagerly
Mast .... Waiting eagerly
मस्त!
मस्त!
मस्त!!
मस्त!!
खूपच मस्त... पुढील भाग लवकर
खूपच मस्त... पुढील भाग लवकर टाका
नवीन भाग कधी यायचा?
नवीन भाग कधी यायचा?
नको यार मला आवडलाय यश
नको यार मला आवडलाय यश म्हात्रे...
त्या दुसर्याने त्याच्या पार्टनर सोबत वर्क आउट नाही झाल म्हणून ति दीप्ति सारखी नाही हे गोंड़स रीजन पुढे केले... मला हा आशुतोष आवडला नाही... स्वार्थी... मे बी मि जज करतीय पण आता तरी हे च आहे...
मि दीप्ती च्या जागी असते तर त्या आशुतोष ला इतके एक्सप्लेनेशन देउ ही दिले नसते. भले त्या यश ला हो बोलले नसते ही पण या आशुतोष ला नक्की च परत आयुष्यात येऊ दिले नसते>>>> +1111