लाईफ आफ्टर डेथ - जर्नी ऑफ सोल्स - भाग 3

Submitted by राधानिशा on 23 April, 2020 - 11:30

मायकल न्यूटन लिखित जर्नी ऑफ सोल्स पुस्तकात वर्णन केलेले महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे -

15 - स्पिरिट वर्ल्ड मध्ये परतल्यानंतर , गाईड आणि प्रगत आत्म्यांच्या पॅनेलसोबत चर्चा झाल्यानंतर आत्मा आपल्या ग्रुपसोबत राहायला जातो .

काहीवेळा आधी ग्रुपची भेट आणि नंतर सावकाश गाईड व पॅनेल सोबत चर्चा असाही क्रम होतो .

16 - या पुस्तकानुसार मृत्यूनंतर नरक , जहन्नम , हेल असे कोणतेही प्रकार अस्तित्वात नाहीत . पृथ्वीवरच्या पापकृत्यांची शिक्षा ठरवायला वर बसलेली कमिटी नाही .

हे कदाचित अन्याय्य किंवा टू गुड टू बी ट्रू वाटू शकेल पण तसं नाही .

इथे सगळ्यात भयंकर शिक्षा ही पश्चातापाची किंवा आत्मलांच्छनेची भावना ही असते .

कल्पना करा की तुम्ही एक सदभिरु व्यक्ती आहात , कुणाला शब्दानेही दुखावण्याचा तुमचा स्वभाव नाही , कुणाचं वाईट चिंतलेलं नाही , परिस्थितीचा फायदा घेऊन कुणालाही कोणत्याही प्रकारे दुखावलेलं / शोषण केलेलं नाही ( आर्थिक / मानसिक / भावनिक / शारीरिक कोणत्याच प्रकारचं ) ...

अचानक एक दिवस तुम्हाला मागचा जन्म आठवू लागला , ज्यात तुम्ही खून , रेप , शारीरिक क्रूर कृत्यं केली आहेत ... विक्टीमच्या वेदना , किंकाळ्या , अबोलपणे सहन केलं गेलेलं दुःख - ज्या गोष्टींनी त्यावेळी तुम्हाला काडीचा फरक पडला नव्हता ... आता मात्र क्षणोक्षणी तीच दृश्यं मनासमोर येत आहेत , तेच आवाज कानात घुमत आहेत .. गिल्टचं ओझं एवढं असह्य आहे की मरण येईल तर बरं होईल अशी तुमची अवस्था झाली आहे .

ह्या जन्मात जे लोक क्रूर , मानवतेला काळीमा फासणारी कृत्यं करतात त्यांना मृत्यूनंतर असाच जबरदस्त धक्का बसतो..... आपल्या हातून असं घडलं हे त्यांना सहनच होत नाही .... आपण स्पिरिट वर्ल्ड मध्ये परत जायला लायक नाही , आपण खूप अशुद्ध झालो आहोत अशी त्यांची भावना होते ...

अशा लोकांपैकी काहींचे आत्मे स्पिरिट वर्ल्ड मध्ये जाण्यास नकार देतात ... स्पिरिट वर्ल्ड पासून लांब स्वतःच्या कृत्यांची शिक्षा म्हणून स्वतःला कोंडून घेतात ... स्वतःसाठी अत्यंत आनंदशून्य क्वचित वेदनादायक जागा निर्माण करून तिथे राहतात .....

माणसाचा स्व - भाव असतो स्वतःच्या चुका जस्टीफाय करण्याचा ... मानव जन्मात आपले गुन्हे हे गुन्हेगारांना मानसिक त्रास देत नाहीत .... पण आत्मा स्वरूपात ते भयंकर मानसिक यातना देतात .

लक्षात घ्या आत्मा आणि तुम्ही आता जे आहात ते ही एकच गोष्ट नाही . आपण जे आत्ता आहोत तो फक्त या आयुष्यात गोळा केलेल्या अनुभवांवरून , ज्या परिस्थितीत लहानाचे मोठे झालो , ज्या गोष्टी आजूबाजूला पाहिल्या त्यातून बनलेला स्वभाव आहे ... चांगल्या वाईट घटनांमधून आपण जे उचललं त्यातून तो बनला आहे . एखादी व्यक्ती आपल्या एखाद्या कृत्याचं इथे समर्थन करू शकते पण आत्मा स्वरूपात दुसऱ्या कुणापाशी समर्थन करण्याचा प्रश्न नसतो आणि स्वतःशी समर्थन करता येत नाही ... एखाद्या विशिष्ट परिस्थितीत लहानाचे मोठे झालेल्या व्यक्तीला बायकोला मारणं ही अगदी क्षुल्लक गोष्ट वाटू शकते , त्यात काही गैर आहे हा विचारही ।मनाला स्पर्श करणार नाही .... पण आत्मा स्वरूपाची स्मृती जागृत झाली की तो आत्मा लाजेने आणि गिल्टने काळवंडून जाईल ... आपल्या ग्रुप मध्ये परत जायलाही त्याला शरम वाटेल .. शिवाय प्रगतीची एक संधी फुकट घालवल्याचं दुःखही होईल .

17 - विक्टीम झालेले आत्मे इथे अगदी सहज माफ करू शकतात .. राग धरून ठेवणे हा आत्म्याचा गुणधर्मच नाही ... अपार प्रेम आणि करुणा हा आत्म्यांचा मूळ गुण आहे ...

पण क्रूर कृत्यं केलेले सहजासहजी स्वतःला माफ करत नाहीत .

18 - स्पिरीट वर्ल्ड मध्ये न येता बाहेरच स्वतःला शिक्षा करून घेणाऱ्या आत्म्यांचीही स्पिरिट वर्ल्डच्या संचालकांना काळजी असते .. पण ते लगेच हस्तक्षेप करत नाहीत ... काही काळ त्या आत्म्यांना पश्चातापाच्या अग्नीत जळू देतात ... त्यांचा आत्मक्षोभ काहीसा कमी झाला की त्यांना समजवायला प्रगत आत्म्यांपैकी योग्य ते स्किल्स असलेल्या व्यक्तीला पाठवलं जातं ... ही व्यक्ती ( आत्मा ) सदर क्रूर गुन्हे करून आलेल्या आत्म्याला समजावून स्पिरिट वर्ल्ड मध्ये परत नेण्याचा प्रयत्न करते ..

पण निर्णय शेवटी त्याच व्यक्तीचा असतो .

18 - काही क्रूर कृत्यं केलेल्या व्यक्तींचे आत्मे स्वतःच स्वतःला शिक्षा न जरून घेता डायरेक्ट स्पिरिट वर्ल्ड मध्ये परत येतात .

अशांना कोणतीही वाईट वागणूक दिली जात नाही . जेल मध्ये गुन्हेगाराला वागवावं तसं वागवलं जात नाही .

अशा आत्म्यांची एनर्जी खूप दूषित झालेली असते .. त्यासाठी त्यांना स्वतंत्र ठिकाणी , इतर सर्व आत्म्यांपासून लांब ठेवलं जातं .... शुद्ध शक्तीचा वर्षाव होऊन त्यांची झालेली हानी भरून निघते ... त्याहीनंतर आत्मपरीक्षणासाठी आणि हिलिंगसाठी इतर आत्म्यांपासून, त्या आत्म्याच्या मूळ ग्रुप पासून दूर , क्वारंटाईन रूम मध्ये त्याची राहण्याची सोय केली जाते .... हेच बाहेर राहिलेल्या आणि समजावून परत स्पिरिट वर्ल्ड मध्ये आणलेल्या आत्म्यांबाबत केलं जातं .

त्या आत्म्याची पुरेशी तयारी झाल्यानंतर नवीन जन्माची तयारी होते .... आपल्या क्रूर कृत्यांची शिक्षा ज्या ठिकाणी , ज्या परिस्थितीत मिळेल असा नवीन जन्म तो आत्मा निवडतो . या शिक्षेतून त्याला आपल्या विक्टिम्सच्या वेदनांचा प्रत्यक्ष अनुभव येणार असतो .

20 - साधे लोक ( गुन्हेगार वगैरे नसलेले ) मृत्यूनंतर स्पिरिट वर्ल्ड मध्ये आपल्या ग्रुप मध्ये परत पोहोचल्यानंतर काही काळ तिथे राहतात ...

आपल्या नुकत्याच संपवून आलेल्या जन्माची , घटनांची चर्चा होते ... इतरही आपापल्या जन्मांचे अनुभव शेअर करतात ... सगळ्या आत्म्यांच्या शेकडो वर्षांच्या अनुभवाच्या आधारे ह्या नवीन अनुभवांची पाहणी केली जाते ... कुणाच्या काय चूका झाल्या , कोण अधिक चांगला परफॉर्मन्स करू शकला असता , तू माझ्याजागी असतास तर काय केलं असतंस ? मी या अमुक परिस्थितीत काय केलं असतं ...... असं डिस्कशन होतं .. त्यातून टीम मधल्या सगळ्यांचाच फायदा होतो ....

आत्मा आपल्या ग्रुपमध्ये अतिशय आनंदी असतो ... ग्रुपमधले सगळे जण हजारो वर्षं एकत्र जन्म घेऊन अनुभव , आयुष्यं शेअर केलेले असतात ... त्यांच्यात मैत्रीचा एक अतूट धागा असतो .

पुन्हा जन्म घेण्याची आत्म्यावर सक्ती केली जात नाही ... पण गाईड्स हे आपल्या शिष्याच्या प्रगतीबाबत सजग असतात त्यामुळे ते - चला पुरे आता , एवढी सूटी पुरे झाली , तुझा आराम झालेला आहे , शक्ती भरून आलेली आहे ... आता नवीन प्रोजेक्टचा विचार सुरू करा , बसून बसून आऊट ऑफ प्रॅक्टीस होशील ... असे छोटे टोचे द्यायला चालू करतात ..

एखाद्या आत्म्याने हट्टाने मला परत जायचं नाहीच अशी भूमिका घेतली तर त्याचा गाईड किंवा अधिक प्रगत आत्म्यांपैकी योग्य त्या व्यक्ती त्याचं कौन्सिलिंग करतात ... गेल्या जन्मात त्याची काय / किती प्रगती झाली आहे ; त्या व्यक्तीमुळे आणखी कुणा आत्म्यांची प्रगती व्हायला मदत झाली हे सगळं समजावून सांगतात ....

तरीही शेवटचा निर्णय हा त्या आत्म्याचाच असतो ... इथेच राहायचं , परत जन्म नको किंवा निदान पृथ्वीवर नको हा निर्णय घेण्याचा हक्क त्या आत्म्याला असतो ... त्याच्यावर किंचितही सक्ती केली जात नाही .

पुन्हा जन्म नको अशी भूमिका एखादा आत्मा भौतिक कठीण परिस्थिती , हालअपेष्टा अशा गोष्टींमुळे कधीच घेत नाही , ह्या गोष्टी क्षुल्लक असतात , शिवाय हव्या त्या ग्रहावर हवा तसा जन्म निवडायचं स्वातंत्र्य बहुतेक आत्म्यांना असतं तेव्हा नाईलाजाने हालअपेष्टा असलेल्या ठिकाणी जन्म झाला असं काही होत नाही .

पुन्हा जन्म नको अशी भूमिका घेण्यामागचं कारण म्हणजे - जन्म घेताना काही एक उद्दिष्टं मनाशी बाळगली होती ... मानवी स्वभावातल्या अमुक निगेटिव्ह प्रवृत्तींवर या जन्मात विजय मिळवेन - उदाहरणार्थ या वेळी द्वेष , स्वार्थ किंवा असूयेच्या प्रभावाखाली आंधळा होऊन आयुष्यातल्या कृती करणार नाही .. आणि ते करण्यात ती व्यक्ती अपयशी झाली - नेमकं द्वेषाने किंवा स्वार्थाने किंवा असूयेच्या आहारी जाऊनच आयुष्य जगली तर आत्मा फ्रस्टेट होतो ....

स्पिरिट वर्ल्डपासून दूर जाणं , आत्म रुपाचं जे संपूर्ण ज्ञान असतं , जी संपूर्ण शुद्ध प्रेमभावना असते , ईश्वराचं सान्निध्य सतत जाणवत असतं ते सगळं सोडून , विसरून अज्ञानी आणि काम क्रोध मोह लोभ मद मद मत्सर यांनी ग्रस्त झालेल्या मनुष्याच्या शरीरात 50 - 100 वर्षं काढणं ही आत्म्यासाठी एक काहीशी नाराजीची घटना असते .... इथे स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळते ही एक चांगली बाजू आहे पण तरीही निघताना अक्षरशः काळजावर दगड ठेवून निघावं लागतं .... आत्मा हे फक्त आणि फक्त प्रगतीसाठी , एक दिवस परमात्म्याच्या अगदी निकट जाण्याचं ध्येय समोर ठेवून करत असतो ....

प्रत्येक जन्म ही मूल्यवान संधी असते .... कारण एका जन्मात करता येणाऱ्या प्रगतीवर काही बंधन , मर्यादा नाही .

पण जेव्हा व्यक्ती या निगेटिव्ह भावनांच्या अंमलाखाली जाऊन आयुष्याचे निर्णय घेते / वर्तन करते ; तेव्हा मृत्यूनंतर परत आलेल्या आत्म्याला एक सुवर्णसंधी तर फुकट घालवलीच शिवाय 60 - 70 वर्षं एवढ्या प्रेममय घरापासून दूर राहून पदरात काहीच पाडून घेतलं नाही असं फ्रस्टेशन येतं ....

अशा वेळीच गाईड आणि प्रगत आत्मे त्या व्यक्तीशी बोलून तिने केलेली छोटी छोटी प्रगती किंवा दुसऱ्यांच्या प्रगतीला लावलेला हातभार त्याच्या नजरेस आणून देतात आणि तुझं हे आयुष्य अगदीच निष्फळ झालेलं नाही हे पटवून देतात ... हळूहळू , कालांतराने आत्म्याचं फ्रस्टेशन कमी होतं आणि नवीन जन्माचं चॅलेंज स्वीकारून पुन्हा एकदा प्रगतीसाठी प्रयत्न करायला सज्ज होतो .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सर्व मला कोण्या तल्लख मेंदूचे, स्वप्नरंजनच वाटते आहे. म्हणजे विश्वासार्ह वाटत नाहीये. राधानिशा आपल्याला उद्देश्युन नाही लिहीलेले. मला माहीत आहे आपण फक्त इथे पुस्तकातील विचार मांडत आहात.

इन जनरल माझे मत नोंदावते आहे.

राधानिशा, छान लिहिलंय! Happy
मला हे पुस्तक "मृत्युनंतर काय?"
याविषयावर लेखकाने केलेला एक कल्पनाविलास वाटतोय.. पण तुम्हाला उमजलेल अगदीच व्यवस्थित मुद्देसुत मांडलंय.. पुलेशु!

धन्यवाद मन्या ...

सामो , काल्पनिक स्वप्नरंजन हीही एक शक्यता आहेच . बरेचदा प्रश्न पडतात , हा आयुष्याचा खेळ कशासाठी ... का इतकी माणसं आणि इतके प्राणी यातना सहन करत आहेत ? देव करुणेचा सागर म्हणतात तर तो हे कसं होऊ देतो आहे ? काही करत का नाही ... या सगळ्याचा हेतू काय किंवा उपयोग काय ? ह्यातून निष्पन्न तरी काय होत आहे .... हिंदू किंवा दुसरे कुठलेच धर्म या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देत नाहीत ... त्यामुळे धार्मिक लिटरेचरच्या बाहेर या प्रश्नांची उत्तरं मिळवायचा प्रयत्न केला .

आता ही जी मिळाली ती खरी आहेत की नाही माहीत नाही पण प्रश्नांनी डोकं भणाणून देवाच्या चांगुलपणावरचा विश्वास उडत चालला होता ... ह्या उत्तरांनी माझ्यापुरतं समाधान मिळालं ... तरी मी ते 100 % ऍक्सेप्ट केलेलं नाही पण " ऍट लिस्ट हे असं असेल तर ठीक आहे " गॉड isn't completely heartless .. काहीतरी योजना आहे , प्लॅनिंग आहे , घटनांमागे कारणं आहेत , सगळं रॅन्डमली / विदाऊट परपज चालेलेलं नाही , प्रत्येकाला चॉईस आहे , every soul is cared for .. " अशी एक शक्यता मनाला समाधान देते .

सगळ्यांनी यावर विश्वास ठेवावा असा माझा अजिबातच आग्रह नाही ... लोकांनी आपल्या तर्कबुद्धीला पटेल त्यावरच विश्वास ठेवावा ...

हे सर्व मला कोण्या तल्लख मेंदूचे, स्वप्नरंजनच वाटते आहे. म्हणजे विश्वासार्ह वाटत नाहीये +111

@राधानिशा. तुमचा प्रतिसाद रास्त आहे.. आत्मांन्या किंवा त्यांना मिळणार्या जन्मांचा/आयुष्याचा नक्कीच काहीतरी पर्पज असला पाहिजे.. आपण स्वतःहून किंवा ही सृष्टी आपोआप निर्माण झाली नाहीये काहीतरी प्लॅनिंग नक्की आहे हे मात्र खरं...

मला असं वाटतं सृष्टीचा विधाता किंवा देव, गाॅड, अल्ला ह्याउपर एका शक्तीची एक शक्ती आहे.. उदा. एक पॅरोडाॅक्स (Omnipotence Paradox) वाचला होता कुठेतरी..

समजा देवाला सांगितलं की तु एक असा दगड निर्माण कर की, जो कुणीच उचलू शकत नाही...

ह्यात दोन शक्यता होतात..समजा देवाने असा दगड निर्माण केला आणि त्याला उचलताच आला नाही तर मग देव सर्वशक्तीमान कसा?

आणि समजा त्याने उचलला तर मग तो असा काही दगड बनवूच शकला नाही.. म्हणजे कुठेतरी देवालाही मर्यादा आहेत..

सांगण्याचं तात्पर्य इतकचं.. प्रत्यक्ष देवालाही कुठलीतरी शक्तीची आवश्यकता असते किंवा देवसुद्धा ह्या शक्तीच्या उपर नाही...ही जी शक्ती आहे तिला फक्त फ्लो व्हायचं आहे.. विविध रूपे घ्यायची आहे.. आणि स्वत्वातूनच निर्माण झालेला पसारा सांभाळायचा आहे.. आणि हा पसारा सांभाळायला त्या शक्तीला पोसिटीव्ह एनर्जी सतत लागत असावी.. आता एखादी एनर्जी कितपत पोझीटीव्ह किंवा शुद्ध असावी ह्याच मूल्यमापन करायचा झाल्यास काहीतरी फिल्टर असणं आवश्यक आहे.. मग माॅनिटर करायला काही देवदूतांची निर्मती झाली असावी.. आता एनर्जी सतत फ्लो होत राहीली तर तिचं मूल्यमापन कसं करणारं?? कारण एनर्जी दोन प्रकारच्या आहेत एक पोझिटीव्ह आणि एक निगेटीव्ह.. निगेटीव्ह एनर्जीच वर्चस्व वाढलं तर हा पसारा किंबहुना ती शक्तीच स्वतःच स्वतःला स्वतःतूनच निर्माण झालेल्या निगेटीव्ह एनर्जीपासून वाचवू शकत नाही.. किंवा तिच अस्तित्वचं उरणार नसेल..मग उपाय काय?? तर निगेटीव्ह एनर्जीला पोसिटीव्ह एनर्जीत रूपांतर करणे..
कारण एनर्जीला थांबवता किंवा डायरेक्ट संपवता येऊ शकत नाही हा पण तिला कन्वर्ट करता मात्र येऊ शकतं..

निगेटीव्ह एनर्जीला पोझिटिव्ह एनर्जीत जर रूपातंर करायचं असेल तर काहीतरी प्रोसेस हवी.. राईट.. मग त्या एनर्जीचे आत्मे निर्माण झाले असावेत.. कारण एकदा एनर्जी ज्या वस्तूत किंवा घटकांत विलीन झाली तर तिचं स्वरूप बदलतं..मूळ रूप बदलत. तिला तिचा फ्लो बदलता येऊ शकतो...

जस्ट लाईक आग.. समयीत राहून सुखद उब देऊ शकते तसेच वणवा होऊन अख्ख जंगलही पेटवू शकते.. फक्त तिला योग्य त्या फाॅर्ममध्ये ठेवणं..हे करता आलं पाहीजे.. मनुष्यजन्म ही प्रोसेस.. आत्मा म्हणजे निगेटीव्ह एनर्जी..कर्म ही फिल्टर आणि मूल्यमापन करायचं साधन..

आता कुठे विचार चालू आहेत..हे माझे कच्चे विचार असावेत परिपूर्ण नाही.. सत्य शोधताना.. खुप पडताळणी करावी लागेल..कदाचित स्वतःच अस्तित्व किंवा ह्या सृष्टीचं अस्तित्वाचं कारण शोधायला कित्येक विचारांचे पैलू आजमावे लागतील...सध्या ही शक्यता मला तरी वाटते..योग्य असेलच असं नाही ..

>>>>हिंदू किंवा दुसरे कुठलेच धर्म या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देत नाहीत >>>>
बौद्ध धर्मात प्रतिपादित केलेल्या चार आर्य सत्यांपैकी दुःख हेच पहिले आर्य सत्य आहे.
ख्रिश्चॅनिटीतही सॅटन अर्थात सैतान व ईश्वर यांच्यातल्या संघर्षावर/अस्तित्वाच्या सत्यासत्यतेवर बरीच पुस्तके ग्रंथालयात असतात.
शीख धर्माचे व अन्य धर्मांचे तितकेसे वाचन नाही.
___________
अजय वाचला आपला प्रतिसाद. खूप आवडला. यावरती विचार केला पाहीजे.
______________
>>>>पण प्रश्नांनी डोकं भणाणून देवाच्या चांगुलपणावरचा विश्वास उडत चालला होता ... >>> माझेही केस पिकलेत याबद्दल विचार करकरुन. Sad
पण मग मला एकच उत्तर सापडले - गोंदवलेकर महाराज म्हणतात नामस्मरण करा. बस्स! तू (=मी) ते कर ना, कशाला विचारांचा पसारा हवा. लीव्ह दॅट टू इन्टेल्क्च्युअल्स, विचारी, बुद्धीमान लोक पाहून घेतील. Happy

मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवला,
'किस पथ से जाऊँ?' असमंजस में है वह भोलाभाला,
अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ -
'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला

अनिता मुरजानीचे'Dying to be me' हे पुस्तक वाचा.त्यात तिचा after death (म्हणजे डॉ.च्या दृष्टीने) अनुभव तिने लिहिला आहे.तिचे you tube वर बरेच interview आहेत.