चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला असा एकुलता एक उपग्रह जो रात्री आपला वाटतो त्याचा शीतल प्रकाश आणि ते चांदणं याचं साहित्य विभागांशी एक वेगळंच नातं दोन प्रेमी जीवांना तो एकमेकांना जोडणारा दुवा वाटतो. सौंदर्याचे उपमा ही चंद्राची व्यक्त पूर्ण होऊ शकत नाही .कधी बहिणीला तो भाऊ वाटतं. भाऊबीजेला जीला भाऊ नाही तिने चंद्राला ओवाळावे अशी प्रथा प्रचलित आहे आणि लहान मुलांचा तो मामा असतो. करवा चौथ,ईद, आणि हिंदू बरेच सण पोर्णिमेला आहेत. हे सगळे सण चंद्राच्या कलेशी संबंधित आहेत.
एक उपग्रह म्हणून पाहिले तर समुद्राची भरती ओहोटी चंद्र आणि पृथ्वी यांच्या आकर्षणावर अवलंबून आहे त्यामुळे व्यवहारिक जीवनामध्ये नक्कीच फरक पडला असता. विशाल अशा सागराला गळ कशाची घालावी तर इतक्या लांबून चंद्राच्या प्रेमामुळेच कधी-कधी भरभरून भरतीला येतो. अन कधी तो ओहोटीला ला जातो
चंद्राच्या प्रथमा पासून पौर्णिमेपर्यंत वाढत जाणारा आकार आणि त्यानंतर कमी कमी होत अमावस्या हे सारं खूप सुंदर आहे. खगोल शास्त्रानुसार पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते आणि सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला मानव. असा चंद्र फक्त एक उपग्रह आहे. त्यावर वातावरण नाही गुरुत्वाकर्षण नाही. आणि जीवन संपदा ही नाही. चंद्राबद्दल अजुन काही माहीती मिळवण्यासाठी भारताने 2019 मध्ये उतरवलेले चंद्रयान ती मोहीम यशस्वी झाली असते तर आज अजून काही गूढ रहस्य आपल्याला कळली असती आणि एक भारतीय म्हणून आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट होती. एखाद अपयश आलं तरीसुद्धा आपले वैज्ञानिक पुन्हा प्रयत्न निश्चित करतील आणि आपण यशस्वी होऊ.
चंद्र हा सामान्य माणसासाठी आणि वैज्ञानिकांसाठी हे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. लहानपणापासूनच तो आपला चांदोमामा आहे.
लहानपणी चांदोबा हे मासिक बऱ्याच जणांनी वाचलं आहे .आपल्या जीवनाचा तो एक अविभाज्य भाग आहे .चांदोबा चांदोबा भागलास का, चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी पासून चांद छुपा बादल में ,चंद्र आहे साक्षीला असं वयानुसार बदलत जाणारे चंद्रासोबत आपलं नातं आहे. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा चंद्रासाठी हट्ट केला होता आणि मग पाण्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब दाखवून चंद्र आपल्याकडेच आहे असा तो बालहट्ट पुरविला गेला होता. तर आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा उंदरावरून जात असताना खाली पडले म्हणून चंद्र त्यांना हसला आणि त्यांनी आपला अर्धा सुळा फेकून चंद्रालाच नष्ट केले होते मग चंद्र शरण आला तेव्हा गणेश चतुर्थीच्या दिवशी जो कोणी चंद्र पाहील त्याच्यावर चोरीचा आळ येईल असे सांगितले आणि बाकी दिवसातून चंद्रास त्यांनी शापमुक्त केले. असं पुराणातही चंद्राने आपलं स्थान पटकावले आहे. तो भगवान शिवाच्या डोक्यावरती विराजमान आहे.
असा चंद्र नसता तर.... ना समुद्राला भरती आली असते ना प्रेमाला. अनादि अनंत काळापासून चंद्र पृथ्वीच्या सोबत आहे . तरीही त्याचे आकर्षण आणि गूढ वाटत राहते. आणि अशा चंद्रावरती जितकी गाणी लिहाल , कविता लिहाल तितक्या कमीच आहेत एवढ्या नवीन नवीन प्रतिभा देणारा तो प्रतिभा स्थान आहे. त्यामुळे तो नसता तर हा विचार करण्यापेक्षा त्याच्यावर जेवढं लिहिता येईल तेवढे कमी आहे.
असा चंद्र फक्त एक उपग्रह आहे.
असा चंद्र फक्त एक उपग्रह आहे. त्यावर वातावरण नाही गुरुत्वाकर्षण नाही. >>>>>> ???????
हो म्हणजे आपल्याला काय
हो म्हणजे आपल्याला काय सुचवायचे आहे
https://en.m.wikipedia.org
https://en.m.wikipedia.org/wiki/Gravitation_of_the_Moon
Okk
Okk